पावसाळा ऋतू प्रत्येकाला हवाहवासा वाटत असला तरी या काळात अनेक त्वचेच्या समस्यांना तुम्हाला तोंड द्यावं लागू शकतं. पावसाळ्यात वातावरणात दमटपणा वाढलेला असतो. त्यामुळे जर पावसात भिजल्यावर तुम्ही बराचवेळ तसेच राहीला तर तुम्हाला त्वचेच्या समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. शिवाय या वातावरणात त्वचा डिहायड्रेड होण्याची आणि त्वचेचं नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. जर या काळात तुम्ही त्वचेची योग्य काळजी घेतली नाही तर तुम्हाला acne चा त्रास सहन करावा लागू शकतो. यासाठीच या काळात पिंपल्स अथवा acne होण्यामागची कारणं जरूर जाणून घ्या
पावसाळ्यात जास्त पिंपल्स येण्यामागचं कारण
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता आणि उष्णता दोन्ही अचानक वाढतात. कधी गरम होतं तर कधी गारवा जाणवतो. ज्यामुळे तुमच्या त्वचेमध्ये sebum चं प्रमाण वाढू लागतं. असं झाल्यामुळे त्वचेवर तेलकटपणाचा थर निर्माण होतो. तैलग्रंथींमधून अतिरिक्त तेलाची निर्मिती झाल्यामुळे त्वचा चिकट होते. अशा त्वचेवर जीवजंतूंचे पोषण चांगले होते. तेलकट त्वचेवर धुळ, प्रदूषण, माती चिकटते आणि त्वचेला इनफेक्शनचा धोका निर्माण होतो. त्वचेच्या आतील छिद्रे यामुळे बंद होतात आणि त्वचेवर पिंपल्स अथवा acne दिसू लागतात.
पिंपल्स आल्यामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसू लागते. बऱ्याचदा काही लोकांना इतर ऋतूंमध्ये पिंपल्स येत नाहीत मात्र पावसाळ्यात हमखास पिंपल्स अथवा पुरळ येतं. यामागे वातावरणात झालेला हा बदल कारणीभूत असू शकतो. शिवाय या काळात फक्त चेहऱ्यावर पिंपल्स येत नाहीत तर हात, पाय, पाठ, मान अशा कोणत्याही भागावर पुरळ अथवा acne येऊ शकतात. यासाठीच पावसाळ्यात या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी त्वचेची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.
पावसाळ्यात acne समस्या दूर ठेवण्यासाठी सोप्या टिप्स
- तुमचा त्वचाप्रकार ओळखा आणि त्यानूसार तुमच्या त्वचेची काळजी घ्या.
- दिवसभरात कमीत कमी दोन ते तीन वेळा चेहऱ्या स्वच्छ करा आणि कोरड्या कापडाने पुसून घ्या.
- पावसात भिजण्यापूर्वी त्वचेवर तुमच्या त्वचेसाठी योग्य मॉश्चराईझर अथवा सनस्क्रीनचा वापर करा.
- सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी चेहरा व्यवस्थित क्लिझिंग करा.
- डेली स्किन केअर रूटीन अवश्य फॉलो करा.
- त्वचेवर कोणतेही नवीन उत्पादन लावण्यापूर्वी त्यावरील माहिती जरूर वाचा.
- मुबलक प्रमाणात पाणी प्या.
- कडूलिंबाचा वाटलेला पाला चेहऱ्यावर लावा आणि वीस मिनीटांनी चेहरा धुवून टाका
- अती तेलकट आणि अपथ्यकारक आहार घेऊ नका.
- धुम्रपान अथवा मद्यपान करणे कटाक्षाने टाळा.
- चेहऱ्यावर आलेल्या पिंपल्सवर उपाय करण्यासाठी तज्ञांचा सल्ला घ्या.
- अती प्रमाणात कॉफीचे सेवन करू नका.
- पिंपल्स नखांच्या मदतीने फोडू नका.
- चेहरा मॉश्चराईझ करण्यासाठी बदामाच्या तेलाचा वापर करा.
- रात्री झोपताना चेहरा गुलाबपाण्याने स्वच्छ करा आणि मगच झोपी जा.
- पावसाच्या काळात अती मेकअप करणे टाळा. कारण त्यामुळे तुमच्या त्वचेला पुरेसे ऑक्सिजन मिळू शकत नाही.
- आठवड्यातून एकदा चंदन पावडर अथवा मुलतानी मातीचा लेप चेहऱ्यावर लावा आणि काही मिनीटांनी चेहरा स्वच्छ करा.
- चेहरा धुतल्यावर तो टर्किशच्या टॉवेलने रगडून पुसू नका. त्याऐवजी एखाद्या मलमलच्या सुती कापडाने तो टिपून घ्या.
- पिंपल्स लपविण्यासाठी त्यावर मेकअपचा थर चढवू नका.
अधिक वाचा
चेहऱ्यावरील पिंपल्स गेले पण डागांचे काय, करा हे घरगुती उपाय
‘या’ लाईफ चेजिंग मेकअप टीप्स तुम्हाला माहित असायलाच हव्या
पिंपल्स आल्यानंतर कधीच करु नका या 5 चुका
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम