चेहऱ्यावरील पिंपल्स गेले पण डागांचे काय, करा हे घरगुती उपाय (Home Remedies For Acne Scars In Marathi)

चेहऱ्यावरील पिंपल्स गेले पण डागांचे काय, करा हे घरगुती उपाय (Home Remedies For Acne Scars In Marathi)

सुंदर, नितळ चेहरा कोणाला आवडत नाही म्हणा. पण चेहरा नेहमीच छान, टवटवीत असणाऱ्या व्यक्ती अगदी हातावर मोजण्याइतक्या असतील. मासिक पाळी, ऊन्हात सतत फिरणे, चुकीच्या खाण्याच्या सवयी याचा परिणाम तुमच्या त्वचेवर होत असतो. काहींना मासिक पाळीच्या आधी किंवा नंतर चेहऱ्यावर पिंपल्स येतात. तर काहींना तेलकट पदार्थ खाऊन चेहऱ्यावर पिंपल्स येतात.  एखादा जरी पिंपल चेहऱ्यावर आला तर आपण त्याला घालवण्यासाठी अनेक उपाय करतो. पिंपल्स फोडू नये असे सांगितले जाते म्हणून आपण त्यांना हात पण लावत नाही. पण तरीही अनेकदा पिंपल्स गेले तरी त्याचे डाग राहतात त्यांनाच आपण मुरुमांच्या चट्टे असे म्हणतो. यामुळे तुमची त्वचा तुम्हाला इतरांपेक्षा अधिक खराब वाटू लागते.


मुरुमांच्या चट्टे म्हणजे काय 


मुरुमांच्या चट्टे वर इलाज करण्याची गरज काय


घरच्या घरी पिंपल्सचे डाग घालवतील असे १० फेसपॅक


त्वचेसाठी हे टाळा


चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी टिप्स


Home Remedies For Acne Scars In Marathi


उन्हाळ्यात पायांवरील टॅन या सोप्या पद्धतींनी घालवा


मुरुमांच्या चट्टे म्हणजे काय?(What Is Acne Scar)


पिंपल्स बसल्यानंतर जे डाग तुमच्या चेहऱ्यावर राहतात त्याला मुरुमांच्या चट्टे असे म्हणतात. तुम्हालाही कधी काळी पिंपल्स असतील तर तुम्ही तुमचा चेहरा नीट निरखून पाहा जर तुम्ही न राहवून तुमचे पिंपल्स फोडले असतील तर त्याचे डाग तुमच्या चेहऱ्यावर राहतात. ते डाग कितीही केले तरी जाता जात नाही आणि तुमची त्वचा निस्तेज दिसू लागते. त्यामुळे आता मुरुमांच्या चट्टे म्हणजे काय हे तुम्हाला कळले असेलच.


मुरुमांच्या चट्टे वर इलाज करण्याची गरज काय? (Impact Of Acne)


आरोग्याशी निगडीत कोणतीही तक्रार असली की, आपण त्यावर योग्य इलाज करतो. त्वचेच्या बाबतीतही अगदी तसेच आहे. तुमच्या चेहऱ्यावर काहीही झाले असेल तर त्यावर योग्यवेळी इलाज करणे गरजेचे असते. मुरुमांच्या चट्टे च्या बाबतीतही तसेच आहे. त्यांचा योग्यवेळी इलाज नाही केला तर तुम्हाला त्याचा अधिक त्रास होऊ शकतो.


1. चेहरा काळवंडणे (Discoloration)


%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE %E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%87 - %E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2 %E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%97 %E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80 %E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80 %E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF


जर तुमच्या चेहऱ्यावर मुरुमांच्या चट्टे जास्त काळासाठी राहिले तर तुमचा चेहरा काळवंडतो. कारण पिंपल्स गेल्यानंतर काळे डाग जाण्यासाठीचे उपाय करणं अनेकजण सोडून देतात. त्यामुळे पिंपल्सचे चेहऱ्यावरील काळे डाग तिथेच राहतात.


उदा.काही जणांना कपाळावर पिंपल्स येतात. जर ते पिंपल्स तसेच राहिले तर त्यांचे फक्त कपाळ काळे राहिलेले दिसतात. तुम्ही तुमच्या आजुबाजूला अनेकांना पाहिले असेल ज्यांच्या चेहऱ्यावरील काही भाग हा त्यांच्या इतर भागांपेक्षा काळवंडलेला दिसतो. त्यामुळे त्यांचे पहिले इंप्रेशन अस्वच्छ असे होते.


तुमच्या तेलकट त्वचेसाठी झटपट घरगुती उपाय


 2. चेहऱ्यावर खड्डे पडणे (Bump On Skin)


काहींना चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स येतात. त्यामुळे चेहऱ्यावरील खड्ड्यांमध्ये पू देखील साचतो. अनेक जण ते हातानेच फोडतात. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर खड्डे पडू शकतात. त्यामुळे तुमची त्वचा नितळ दिसायची आशा धूसर होऊन जाते. एकदा तुमच्या चेहऱ्यावर खड्डे पडले की, मग तुमची त्वचा एकसारखी करण्यासाठी तुम्हाला अनेक इलाज करावे लागतात. त्यामुळे तुम्हाला योग्यवेळी काळजी घेणे गरजेचे असते.


उदा. काही जण पिंपल्स आले की, ते लवकर जाण्यासाठी हातानेच फोडतात किंवा पिनेने वापरतात. त्यांना तात्पुरते बरे वाटते पण नंतर जेव्हा त्याचे डाग आणि खड्डे दिसू लागतात तेव्हा काय करायचे असे होते.


3. चेहऱ्यावरील तेज निघून जाणे (Dull Skin)


आता तुमच्या त्वचावर काळे डाग आणि खड्डे असतील तर तुमचा चेहरा कसा काय चांगला दिसू शकेल. तुमच्या त्वेचतील तेज निघून जाते. तुम्ही मेकअपने डाग लपवण्याचा जरी प्रयत्न केला तरी तुमचा त्वचा तात्पुरती चांगली दिसू शकेल. पण मेकअप काढल्यानंतर तुमचा चेहरा पुन्हा तुमचा चेहरा डल दिसू लागते.


आता तुमच्या चेहऱ्यावरही मुरुमांच्या चट्टे असतील आणि तुम्हाला सध्या खूप पैसे घालवण्याची इच्छा नसेल तर तुम्ही घरच्या घरी तुमच्या चेहऱ्यावरील डाक कमी करु शकता. आम्ही तुमच्यासाठी १० फेसपॅक  काढले आहेत. जे तुमच्या डागांवर काम करु शकतील. मग आता हे फेसपॅक कोणते ते पाहूया.


घरच्या घरी पिंपल्सचे डाग घालवतील असे १० फेसपॅक (Homemade Facepacks For Acne Scars)


पिंपल्स गेल्यानंतर त्याचे डाग घालवणे हे फार महत्वाचे असते. तुम्ही जर घरच्या घरी हे डाग घालवण्याचा विचार करत असाल तर घरच्या घरी हे 10 फेसपॅक वापरु शकता. 


1. केळ्याचा सालीचे मास्क (Banana Mask)


 • केळ्याच्या सालीमध्ये पोटॅशिअम.झिंक,आर्यन, व्हिटॅमिन A,B,C,E आणि मॉश्चरायझर असते. जे तुमच्या त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक असते.

 • तुम्हाला केळीचे साल घेऊन आतल्या बाजूने ज्या ठिकाणी पिंपल्स आहेत तेथे केळीचे हे साल तुम्हाला घासायचे आहे. साधारण ३ ते ५ मिनिटे तुम्हाला सुमच्या त्वचेवर हे साल घासायचे आहे.

 • आठवड्यातून दोनदा हा प्रयोग करुन पाहा. तुम्हाला साधारण १५ दिवसांनी हा फरक जाणवेल. तुम्हाला थोडी वाट पाहावी लागेल.


आयुर्वेदिक उपायांनी आणा तुमच्या चेहऱ्यावर ग्लो


2. अॅपल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar)


%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%AA%E0%A4%B2 %E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A1%E0%A4%B0 %E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%B0 - %E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2 %E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87 %E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%97 %E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80 %E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80 %E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF


 • अॅपल सायडर व्हिनेगर हे देखील तुमच्या चेहऱ्यांवरील  पिंपल्सचे डाग घालवण्यासाठी चांगला पर्याय आहे. पण अॅपल सायडर व्हिनेगर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर थेट लावायचे नाही. तर तुम्हाला १ चमचा अॅपल सायडर व्हिनेगर, त्यात दोन चमचे पाणी आणि १ चमचा मध घालायचे आहे.

 • तयार मिश्रण तुम्हाला तुमच्या डागांवर लावायचे आहे.  साधारण ५ मिनिटे तुम्हाला हे मिश्रण चेहऱ्यावर लावून ठेवायचे आहे. थंड पाण्याने तुम्हाला चेहरा धुवून टाकायचे आहे.

 • अॅपल सायडर व्हिनेगर हे थोडे स्ट्राँग असते. त्यामुळे तुम्हाला त्याची अधिक जळजळ होत असेल तर तुम्ही पुन्हा हा प्रयोग पुन्हा करु नका. याचे कारण ते तुमच्या चेहऱ्यासाठी योग्य नाही.


3. ओट्स आणि मध फेसपॅक (Oats And Honey Facepack)


 • ओटस जितके शरीरासाठी पौष्टिक असते. तितकेच ते तुमच्या त्वचेसाठी चांगले असते. तुमची त्वचा मुलायम करण्यासोबत तुमच्या चेहऱ्यावरील डाग घालवण्यास योग्य आहे.

 • एका भांड्यात २ चमचा ओट्स आणि एक चमचा मध घ्या. आवश्यकतेनुसार त्यात पाणी  घालून तुम्हाला तयार मिश्रण तुमच्या डागांवर लावायचे आहे.

 • हे मिश्रण वाळल्यानंतर चेहऱ्यावर पाणी लावून तेच मिश्रण तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर स्क्रब करायचे आहे. चेहरा स्वच्छ धुवून तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर मॉश्चरायझर लावायचे आहे.


4. अंड्याचा मास्क (Egg Mask)


 • अंडे देखील तुमच्या चेहऱ्यासाठी चांगले असते. तुम्ही अंडे खात नसाल तर हा मास्कचा प्लॅन स्किप करु शकता.

 • तुम्हाला अंड्याचा त्रास नसेल तर तुम्हाला एका भांड्यात एका अंड्याचा पांढरा बलक घ्यायचा आहे. हा बलक तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर लावायचा आहे.

 • हा मास्क चेहऱ्याला लावल्यानंतर तुम्हाला चेहऱ्याला थोडी खाज आल्यासारखी वाटेल. पण त्यात घाबरण्यासारखे काही नाही. तुमच्या पिपंल्सचे डाग घालवण्यासाठी हा मास्क चांगला आहे.

 • हा मास्क सुकल्यानंतर १० ते १५ मिनिटे तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर ठेवायचा आहे. चेहरा धुतल्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा मुलायम झाल्यासारखा वाटेल.


5. कडुनिंब फेसपॅक (Neem Face Pack)


%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AC %E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%95 - %E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87 %E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%97 %E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80 %E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF


 • कडुनिंबाचे अनेक फायदे आहेत. कडूलिंबाचा फेस पॅक चेहऱ्यावरील पिंपल्सवर आणि डागांवर चांगले काम करतो.

 • घरी निंबाची पाने आणून सुकवा. त्याची पावडर करुन ठेवा. एक चमचा निंबाची पाने घेऊन त्यात शक्य असल्यास चंदन पावडर, गुलाबपाणी घालून ते मिश्रण चेहऱ्याला लावा.

 • वाळल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या.

 • कडुनिंब तुमच्या पिंपल्सचे डाग कमी करते. शिवाय तुम्हाला येणारे पिंपल्सही बसतात.


6. नारळाचे पाणी (Coconut Water)


 • नारळाचे पाणी देखील पिंपल्सच्या डागांवर चांगले काम करते.

 • एक दिवस नारळ पाणी पिण्याऐवजी तुमच्या चेहऱ्यासाठी ठेवून द्या.

 • पिंपल्सचे डाग असतील त्या ठिकाणी कापसाने तुम्हाला नारळाचे पाणी लावायचे आहे

 • साधारण ३० मिनिटे तुम्हाला नारळपाणी चेहऱ्यावर लावून ठेवायचे आहे.तुम्हाला तुमचे डाग कालांतराने डाग कमी झालेले दिसतील.


7. बेकिंग सोडा मास्क (Baking Soda Mask)


 • बेकिंग सोडा तुम्ही केवळ स्नॅक्सना खुसखुशीत बनवण्यासाठी वापरला असेल. पण बेकिंग सोडा त्वचेसाठी चांगला आहे.

 • बेकिंग सोडामध्ये तुम्हाला थोडा लिंबाचा रस घालायचा आहे. तयार मिश्रण तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर लावायचे आहे.

 • साधारण ५ ते ७ मिनिटांनी कोमट पाण्याने तुम्हाला तुमचा चेहरा धुवायचा आहे.


8. व्हिटॅमिन E तेल (Vitamin E Capsule)


%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8 E %E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B2 - %E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2 %E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%97 %E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80 %E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B8


होम रेमेडीज आणि स्किन केअर टिप्स मराठीमध्येही वाचा


 


 • व्हिटॅमिन E च्या कॅप्सुल्स बाजारात सहज मिळतात. त्या कॅप्सुल्स आठवड्यातून एकदा तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर लावायच्या आहेत.

 • जर तुमचा चेहरा तेलकट असेल तर तुम्ही या कॅप्सुल्स चेहऱ्याला लावणे टाळा.

 • आणि जर हे तेल तुमच्या चेहऱ्याला सूट झाले तर तुम्हाला कालांतराने तुमच्या पिंपल्सचे डाग कमी झालेले देखील दिसतील.


9. ग्रीन टी (Green Tea)


 • ग्रीन टी तुम्हाला स्लीम आणि ट्रिम ठेवते तसेच ते तुमच्या त्वचेचीही काळजी घेते.

 • ग्रीन टी  पिऊन झाल्यानंतर उरलेला चोथा तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला लावायचा आहे. त्यातील इशेंशिअल हर्ब्स तुमच्या चेहऱ्यावरील डाग कमी करतात.

 • रोज ग्रीन टी पिऊन झाल्यानंतर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावा. १० ते १५ मिनिटे चेहऱ्याला लावून ठेवा. थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या.


10. बटाटा मास्क (Potato Mask)


 • बटाट्यामधील ब्लिचिंग एजंट तुमच्या चेहऱ्यावरील डाग घालवू शकतात.

 • तुम्हाला एक बटाटा किसून त्याचा रस काढून घ्यायचा आहे  किंवा कच्च्या बटाट्याचा किस तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर लावायचा आहे.

 • मास्क सुकल्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा कोमट पाण्याने धुवायचा आहे.

 • हा प्रयोग तुम्हाला साधारण महिनाभर केल्यानंतर तुम्हाला तुमचे डाग कमी झालेले दिसतील. (आठवड्यातून फक्त दोनवेळा)


*वरील दिलेले सगळे फेसपॅक एकाचवेळी लावून पाहू नका. तुम्हाला एखादा फेसपॅक तुमच्या चेहऱ्यावर काम करत आहे असे वाटत असेल तर तोच वापरा. आठवड्यातून २ वेळा हे फेसपॅक लावा.


हे आहेत चेहऱ्यावरील डाग घालवण्यासाठी घरगुती उपाय नक्की ट्राय करा.


त्वचेसाठी हे टाळा (Things You Should Never Do To Your Skin)


1. गरम पाण्याने आंधोळ केल्यानंतर लगेच चेहऱ्यावर कोणतेही क्रिम लावू नका. त्यामुळे तुम्हाला पिंपल्स येऊ शकतात. कारण गरम पाण्यामुळे तुमचे पोअर्स ओपन होतात. त्यात जर क्रिम गेली तर ऊन लागून त्याचे आणखी भयंकर परिणाम होऊ शकतात.


2. काही तेलकट पदार्थ खात असाल तर हात धुतल्याशिवाय चेहऱ्याला हात लावू नका. कारण त्यामुळेही तुमच्या त्वचेवर पिंपल्स येऊ शकतात.


3. पिंपल्स आल्यानंतर घरच्या घरी प्रयोग करत असताना पिंपल्स फोडू नका. विशेषत: सेफ्टी पिन्स, टाचणी याने फोडण्याचा प्रयत्न तर अजिबात करु नका.  


4. पिंपल्स फोडल्यानंतर त्यावर काहीही लावू नका.कारण तुम्ही तुमच्या नाजूक भागाला दुखापत केलेली असते. तुम्ही त्यावर तातडीने काही लावले तर तुमची त्वचा अधिक जळजळू शकते.


5. त्वचेचा प्रकार ओळखल्याशिवाय तुम्ही चेहऱ्यावर कोणतेही प्रयोग करु नका.


त्वचेसाठी हे करा (Skin Care Tips In Marathi)


1. बाहेरुन घरी आल्यानंतर चेहऱ्यावरील मेकअप काढून मगच चेहरा फेसवॉशने धुवा. मेकअप काढताना डोळ्यांचा मेकअप अतिशय काळजीपूर्वक काढा.


2. चेहरा चांगला टवटवीत दिसावा म्हणून चांगल्या गोष्टींचे सेवन करा. उदा. फळ, भाज्या, मांस, मटण आहारात असू द्या. तेलकट, चमचमीत पदार्थ आहारातून कमी करा. 


3. पाणी पिण्याची सवय ही सगळ्याच दृष्टिकोनातून चांगली. त्यामुळे दिवसातून किमान ५ ते ६ लीटर पाण्याचे सेवन करा. 


4. मासिळ पाळी, टेन्शन्स अशा काळात पिंपल्स येणे स्वाभाविक आहे. त्यामुळे अगदीच पॅनिक होण्याची काहीच गरज नाही.


5. जर तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स हे जातच नसतील तर मात्र योग्यवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणेच फायद्याचे असते.


फोटो सौजन्य- Shutterstock, Instagram


तुम्हाला कदाचित ही गोष्ट आवडेल:


How To Get Rid Of Pimples In Marathi


स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी घरगुती उपाय