ADVERTISEMENT
home / Periods
तुम्हाला ‘पिरेड्स पिंपल्स’ म्हणजे काय ते माहीत आहे का?

तुम्हाला ‘पिरेड्स पिंपल्स’ म्हणजे काय ते माहीत आहे का?

रोजच्या तुलनेत चेहऱ्यावर पिंपल्स थोडे जास्त येऊ लागले की आपण समजून जातो आता पिरेड्स येणार आहेत. माझ्यासाठीही कपाळावर पिंपल्स येणे म्हणजे माझे पिरेड्स जवळ आले असे मी समजते. कमी जास्त फरकाने सगळयाच मुलींच्या बाबतीत असे घडत असेल. या विशिष्ट काळात येणाऱ्या या पिंपल्सला ‘Premenstrual acne’ असं म्हणतात. अर्थात आपण त्याला पिरेड्स पिंपल्स म्हणतो.जाणून घेऊया या विषयी सर्वकाही

चेहऱ्यावर ग्लो हवाय? या आयुर्वेदिक टीप्स करतील तुम्हाला मदत (Ayurvedic Skin Care In Marathi)

 

पिरेड्सच्या आधी का येतात पिंपल्स

ADVERTISEMENT

shutterstock

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, पिरेड्सच्या आधीच हे पिंपल्स नेमके येतात कसे? तर तुम्हाला पिरेड्स येण्याच्या साधारण आठवडाभर आधी तुमच्या शरीरात हार्मोनल बदल होऊ लागतात. या बदलामुळेच महिलांच्या त्वचेतही बदल दिसू लागतात. तुमच्या शरीरातील progesterone hormone वाढू लागते. तुम्हाला पिरेड्स येणार त्या काळात sebaceous glands मधून sebum नावाचा पदार्थ अधिक प्रमाणात स्त्रवू लागतो. Sebum हा तेलकट असा पदार्थ ज्यामुळेच तुम्हाला पिंपल्स येतात. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर याचा त्रास तुम्हाला अधिक होऊ लागतो. आणि मग तुम्हाला पिंपल्स येतात. हे आहे पिंपल्स येण्यामागचे शास्त्रीय कारण.

पिरेड्स पिंपल्स ओळखाल कसे?

आता तुम्हाला आलेले पिंपल्स कसे ओळखाल?म्हणजे काहींची त्वचा Acneproneअसते. त्यांना कायमच पिंपल्स येत असतात. पण पिरेड्सच्या कालावधीत येणारे पिंपल्स फार वेगळे असतात. पिरेड्समध्ये येणारे पिंपल्स हे तुलनेने अधिक लाल असतात. बारीक बारीक पुटकुळ्या वाटत असल्या तरी त्या इतर पिंपल्सपेक्षा अधिक दुखतात. त्यामध्ये इतर पिंपल्ससारखा पू साचतोच असे नाही. त्यामुळे तुम्हाला अशा पुटकुळ्या आल्या असतील तर तुम्ही अधिक काळजी घ्यायला हवी. 

काळजी करण्याचे काहीच कारण नाही

ADVERTISEMENT

shutterstock

पिंपल्स आलेले कोणालाच आवडत नाही. पण जर तुम्हाला पिरेड्स पिंपल्स आले असतील तर फार काळजी करु नका. कार तुम्हाला एकदा पिरेड्स आल्यानंतर तुमचे पिंपल्स आपोआप कमी होतात. म्हणजे जर तुम्हाला ही काळजी असेल की, या पिंपल्समुळे तुमच्या सुंदर त्वचेला हानी पोहोचणार आहे. तर ती काळजी करणे तुम्ही सोडून द्या आणि तुमचे पिरेड्स एन्जॉय करा.

त्वचेसाठी Hygine महत्वाचे

shutterstock

ADVERTISEMENT

आता ते पिंपल्स जाणार आहेत. म्हणून तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करुन अजिबात चालणार नाही. तुम्हाला तुमच्या त्वचेची काळजी ही घेता आलीच पाहिजे. तुमचा चेहरा तुम्ही स्वच्छ ठेवा. त्वेचवर तेल साचू देऊ नका. विशेषत: तुमचा चेहरा जर तेलकट असेल तर तुम्हाला अधिक काळजी घेता आली पाहिजे. दिवसातून किमान चार वेळा तरी तुम्ही तुमचा चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवा. म्हणजे तुम्हाला होणारा त्रास कमी होईल. 

आता तुम्हाला पिरेड्स पिंपल्स म्हणजे काय ते कळालं असेलच. मग आता अजिबात काळजी करु नका आणि पिरेड्सचे 5 दिवस आराम करा. 

चेहऱ्यावरील पिंपल्स गेले पण डागांचे काय, करा हे घरगुती उपाय (Home Remedies For Acne Scars In Marathi)

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

ADVERTISEMENT
20 Sep 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT