बॉलीवूडमध्ये सध्या Good news चा मौसम सुरु आहे. या good news मध्ये आणखी एक भर पडली आहे. अभिनेत्री अॅमी जॅक्सनला सोमवारी मुलगा झाला आहे. ही गोड बातमी कळल्यानंतर त्यांनी शेअर केलेला फोटो सध्या जास्त व्हायरल होत आहे. फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून अॅमीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शिवाय तिने इतक्या बिनधास्तपणे शेअर केलेल्या फोटोचीही तारीफ होत आहे
सेलिब्रिटी कधीच इतके बोल्ड फोटो विशेषत: डिलीव्हरीनंतर शेअर करत नाही. पण अॅमीने शेअर केलेला फोटो जरा खासच आहे असं म्हणावं लागेल. कारण या फोटोमध्ये ती #breastfeeding करताना दिसत आहे. तिने तिच्या आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तींना एकाच फ्रेममध्ये चांगल्या पद्धतीने कॅप्चर केले आहे.त्यामुळेच हा फोटो एकदम खास आहे. शिवाय तिने इन्स्टा स्टोरीमध्ये तिच्या मुलाचा एक व्हिडिओ करुन टाकला आहे. ज्यामध्ये तिने तिच्या मुलाचा चेहराही दाखवला आहे.
अॅमी जॅक्सनने तिच्या डिलीव्हरीपूर्वीही तिचे #babybump मधील अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. तिने तिचा #babybump कधीच लपवला नव्हता. उलट तिने तिचे प्रेग्नंसीमधील सगळे फोटो तिने अगदी बिनधास्त शेअर केले होते. तिने तिचा फिटनेसही या कालावधीत अजिबात मागे पडू दिला नाही. उलट तिने या काळातही योगा सुरु ठेवला होता. तिच्या पेग्नंसीच्या बातमीपासून ते तिच्या बेबी शॉवरपर्यंत तिचे सगळे फोटो इन्स्टाग्रामवर तिने शेअर केले आहेत.
अॅमीच्या मुलाचे मान अँड्रियास असे ठेवण्यात आले आहे. अॅमी जॅक्सन आयरीश असून तिथे बेबी जेंडर आधीच माहीत करण्याची पद्धत आहे. तिच्या बेबी शॉवर दरम्यान तिचा निळा रंगच तिला मुलगा होणार हे सांगून जातो. त्यामुळेच मुलाचे नाव अॅमी आणि तिचा बॉयफ्रेंड जॉर्ज यांनी मुलाचे नाव ठरवून ठेवले असावे.
अॅमीचा बॉयफ्रेंड जॉर्ज असल्याची चर्चा तर खूप झाली होती. त्यांचे अनेक फोटो एकत्र असतात. पण अद्याप त्यांनी लग्न केलेले नाही. त्यांनी त्यांचा साखरपुडा झाल्याचे 1 जानेवारी रोजी सोशल मीडियावर सांगितले. त्यानंंतर ही गोड बातमी समोर आली.
अॅमी ही एक इंग्लिश अभिनेत्री असून तिने टॉलीवूडमध्ये अनेक काम केली आहेत. नुकतीच ती रजनीकांत यांच्यासोबत 2.0 या चित्रपटात दिसली होती. प्रतिक बब्बरसोबत तिने एक दिवाना था या चित्रपटातून हिंदी चित्रपटात काम करायला सुरुवात केली. सिंग इज ब्लिंग हा तिचा आणखी एक चित्रपट चांगला चालला.
आता सध्या तरी अॅमी अँड्रियासमध्ये व्यग्र असून लवकरच ती चित्रपटात दिसेल अशी अपेक्षा आहे.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.