जाणून घ्या एचआयव्हीची लक्षणे (HIV Symptoms In Marathi)

HIV Symptoms In Marathi

एचआईवी/एड्स (HIV/Aids) हा एक गंभीर आजार नक्कीच आहे पण आयुष्याचा अंत नाही. एक वेळ अशी होती जेव्हा भारतात एड्सचं नाव घेणं अथवा त्याबद्दल चर्चा करणंही पाप समजण्यात येत होतं. कोणाला विचारलं किंवा त्याबद्दल काही बोललं तरीही लोकांना चुकीचं वाटायचं. पण आता एड्सबद्दल गेल्या काही वर्षात जागरूकता वाढली आहे. आधीच्या  तुलनेत एचआयव्ही आणि एड्स पीडित व्यक्तींच्या संख्येतही घट झाली आहे. एचआयव्हीचा सर्वात पहिला रूग्ण हा 19 व्या शतकात हा जानवरांमध्ये सापडला. असं म्हटलं जातंं की, चिम्पाझीमधून हा रोग माणसांमध्ये जडला. 1959 मध्ये कांगोमधील एका आजारी माणसाच्या रक्ताचा नमुना घेतल्यानंतर डॉक्टरांना त्यातून एचआयव्हीचा व्हायरस मिळाला. हीच व्यक्ती पहिली रूग्ण असल्याचं मानलं जातं. त्यानंतर जगभरात एड्सबद्दल जागरूकता निर्माण करण्यास सुरुवात झाली. कंडोमचा वापर केवळ कुटुंब नियोजनासाठी नाही तर एड्सपासून वाचण्यासाठीही तितकाच महत्त्वाचा आहे.  1988 पासून प्रत्येक वर्षी 1 डिसेंबरला वर्ल्ड एड्स डे साजरा करण्यात येतो. पण आजही देशभरात किमान 25 लाखापेक्षा अधिक रूग्ण एड्सने पीडित आहेत. पण तुम्हाला नक्की याची लक्षणं काय असतात माहीत आहेत का? जाणून घेऊया HIV सकारात्मक होण्याची लक्षणं आणि याबाबत माहिती.

Table of Contents

  एच.आय.व्ही. म्हणजे नेमकं काय (What Is HIV)

  Shutterstock

  एचआयव्ही पॉझिटिव्ह असणं म्हणजे कोणत्याही आजाराशी लढण्याची तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती कमी होऊन जाते आणि तुमचं शरीर अनेक आजारांनी एकाच वेळी ग्रस्त होतं. एचआयव्हीचं पूर्ण नाव म्हणजे ह्यूमन इम्यूनो डेफिशिअन्सी व्हायरस. हा एक असा व्हायरस आहे ज्यामुळे एड्स रोग होतो. हा व्हायरस एका माणसामुळे दुसऱ्या माणसामध्ये जातो. ज्या व्यक्तीमध्ये हा व्हायरस आढळतो त्या व्यक्तीला एचआयव्ही पॉझिटिव्ह असं म्हटलं जातं. वास्तविक एचआयव्ही पॉझिटिव्ह म्हटलं की, त्याला एड्स झालाय असं समजण्यात येतं. पण यामध्ये काहीच तथ्य नाही.

  पावसाळ्यात हे घरगुती उपाय करून आजारपण ठेवा दूर

  एड्स नक्की काय असतं (What Is AIDS)

  तुम्ही एखाद्या HIV पॉझिटिव्ह व्यक्तीला तोपर्यंत एड्सग्रस्त म्हणून शकत नाही, जोपर्यंत HIV व्हायरस त्या व्यक्तीच्या शरीरावर पूर्णपणे हमला करत नाही. ही पूर्ण प्रक्रिया होण्यासाठी किमान 8 ते 10 वर्ष लागतात. वास्तविक  एचआयव्ही व्हायरस शरीरात गेल्यानंतर शरीरातील प्रतिकारकशक्ती हळूहळू कमी होऊ लागते आणि शरीरामध्ये अनेक तऱ्हेचे आजार आणि इन्फेक्शन होण्यास सुरुवात होते. एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे हे कळल्यानंतर साधारण 8 ते 10 वर्षानंतर या सगळ्या रोगांची लक्षणं दिसू लागतात. या परिस्थितीला एड्स ( AIDS- Acquired Immunodeficiency Syndrome) म्हटलं जातं. तसं तर एचआयव्ही पॉझिटिव्ह झाल्यानंतर एड्स होईपर्यंतचा काळ हा औषधांच्या मदतीने वाढवला जाऊ शकतो. तसंच अनेक आजार त्या काळात बरेही करता येतात. 

  HIV होण्याची ही 5 महत्त्वाची कारणं (HIV And Aids Causes)

  Shutterstock

  पहिले कारण - HIV पॉझिटिव्ह पुरुष अथवा महिला यांच्याबरोबर असुरक्षित (कंडोमशिवाय) सेक्स केल्यास, हा सेक्स होमोसेक्शुअल असला तरीही. भारतात एचआयव्ही/एड्सचं सर्वात मोठं कारण हेच आहे. देशामध्ये एड्सग्रस्त जितक्या व्यक्ती आहेत, त्यापैकी 86 टक्के व्यक्तींना असुरक्षित सेक्स संबंधांमुळेच एड्स झाला आहे. 

  दुसरं कारण -  HIV संक्रमित रक्त दिलं गेल्यास. या कारणाने एड्स होण्याची शक्यता असते. तसंच या कारणाने एड्स होण्याऱ्या व्यक्तींची टक्केवारी साधारण 2.57 इतकी आहे. 

  तिसरं कारण - एचआयव्ही पॉझिटिव्ह महिलेपासून जन्म झालेल्या मुलाला एड्स. मूल जन्माला आल्यानंतर आईचं दूध प्यायल्यास, व्हायरस त्याच्यातही संक्रमित होतो. 

  चौथं कारण - रक्त तपासणी करताना रक्ताचं सँपल घेताना अथवा रक्त देताना डिस्पोजेबल सिरिंज (एकदाच वापरता येणारी सुई) न वापरल्यास अथवा स्टरलाईज केल्याशिवाय वापरल्यास अथवा नीडलशिवाय सिरिंज वापरल्यास, 1.97 टक्के व्यक्तींना एड्स झाला आहे. 

  पाचवं कारण - हेअरड्रेसर अर्थात न्हाव्याकडे गेल्यानंतर स्टरलाईज्ड वस्तरा वापरल्यास अथवा जुनं इन्फेक्टेड ब्लेड वापरल्यास एड्सचा धोका असतो. सलॉनमध्ये नेहमी नवीन ब्लेडचा वापर होतो की नाही हे नेहमी निश्चित करा.

  एचआयव्ही/एड्स च्या बाबतीत काय म्हणतात डॉक्टर्स

  HIV पॉझिटिव्ह झाल्यानंतर बऱ्याच जणांना आपलं आयुष्य संपलं असं वाटतं. पण हे खरं नाही. डॉक्टर्सच्या सल्ल्यानुसार तुम्ही जर नीट औषधं घेतलीत तर तुम्ही एक सामान्य आयुष्य जगू शकता. कोणत्याही व्यक्तीला एड्स झाल्यानंतर त्या व्यक्तीला अँटी-रेट्रोव्हायरल उपचार देण्यात येत नसतील तर साधारण 12 ते 18 महिन्याचं त्याचं आयुष्य असतं. पण अँटी रेट्रोव्हायरल उपचार केल्यास, ती व्यक्ती बऱ्याच कालावधीपर्यंत सामान्य जीवन जगू शकते. पण हा आजार कधीही बरा होत नाही आणि आयुष्यभर यासाठी औषधं घ्यावी लागतात हे लक्षात ठेवा. 

  एचआयव्ही प्राथमिक लक्षणे (Symptoms Of HIV In Marathi)

  एड्स हा एक आजार असला तरीही एड्सपीडित व्यक्तीचं शरीर हे संक्रमित आजारांनी आपली प्रतिकारक शक्ती गमावून बसतं. बॅक्टेरिया आणि व्हायरसने होणारा हा आजार आहे. एड्स हा सुरुवातीला सहसा कळून येत नाही आणि त्यामुळे त्यावर उपचार करण्यासाठी उशीर होतो. वास्तविक सुरुवातीला काही लक्षणं दिसून येतात पण त्यानंतर पुन्हा काही काळाकरिता लक्षणं दिसत नाहीत. एचआयव्ही संक्रमित झाल्यानंतर इतर आजार होण्याचा धोका अजून वाढतो. त्यामुळे याची सुरुवातची आणि मुख्य लक्षणं काय आहेत याबद्दल प्रत्येकाला माहिती असणं आवश्यक आहे. 

  सतत घसा खवखवणं

  Shutterstock

  योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यानंतरही एखाद्या व्यक्तीच्या घशात सतत खवखवंत असेल अथवा त्या व्यक्तीला सतत घशात काहीतरी टोचत असेल तर हे एड्सचं संभावित लक्षण आहे. 

  सुका खोकला येणं

  सतत सुका खोकला येत राहणं हे एड्सच्या लक्षणांपैकी एक आहे. खोकला नसूनही सतत तोंडात कफ येत असेल तर वेळीच तपासणी करून घ्या. तसंच यामुळे तुमच्या तोंडाची चवही निघून जाते. त्यामुळे वेळेवर लक्ष देऊन तपासणी करून घेणं योग्य. 

  अभिनेत्री रश्मी देसाईला होता ‘हा’ गंभीर आजार, म्हणून वाढत होतं वजन

  मळमळणं

  Shutterstock

  कोणत्याही खाण्याचा वास आल्यानंतर सतत मळमळ होणं अथवा काहीही खाल्ल्यानंतर लगेच सतत उलटी होत असेल तर एचआयव्ही व्हायरस संक्रमित झाल्याचा हा इशारा आहे. 

  सतत थकवा येणं

  जास्त काम न करताही दिवसभर तुम्हाला शरीरात थकवा जाणवत असेल तर हे एड्सचं सुरुवातीचं लक्षण आहे. वेळीच तपासणी करून घ्यायला हवी

  मांसपेशीमध्ये सतत खेचल्यासारखं होणं

  तुम्ही कोणत्याही प्रकारचं भारी सामान उचलण्याचं काम करत नसाल आणि तरीही तुमच्या मांसपेशी सतत खेचल्यासारख्या वाटत असतील तर तुम्ही याबाबत डॉक्टर्सचा सल्ला नक्की घ्या.

  सतत ताप येणं

  Shutterstock

  तसं तर ताप येणं ही अगदी साधी बाब आहे. पण सतत ताप येत असेल आणि तो जास्त काळ राहात असेल तर तुम्ही सतर्क व्हायल हवं. कारण दर 2-3 दिवसांनी ताप येणं हे एचआयव्हीचं सर्वात पहिलं लक्षण आहे. 

  हळूहळू वजन कमी होणं

  Shutterstock

  एचआयव्हीग्रस्त व्यक्तींचं वजन एकदम कमी होत नाही तर हळूहळू कमी होतं आणि त्याचा प्रभाव दिसू लागतो. कोणत्याही व्यक्तीचं वजन काहीही न करता कमी होऊ लागलं तर त्या व्यक्तीने वेळेवर जाऊन तपासणी करून घ्यावी. 

  शरीरावर निळे डाग पडणं

  एचआयव्ही झाल्यावर तोंड, डोळ्यांच्या खाली आणि नाकावर लाल, निळे अथवा जांभळ्या रंगाचे डाग पडतात. जे तुम्ही बऱ्याचदा दुर्लक्षित करता. पण हे डाग दुर्लक्षित करण्यासारखे नाहीत हे लक्षात ठेवा. 

  अन्य एचआयव्हीची लक्षणे (Other Symptoms Of HIV)

  एचआयव्हीची काही अन्य लक्षणंही आहेत. ती पण जाणून घेऊ 

  • थंडी वाजणं
  • भूक कमी लागणं
  • जंत होणं
  • त्वचेची समस्या
  • रात्रभर सतत घाम येत राहाणं

  याद्वारे संक्रमित होतो HIV व्हायरस

  एचआयव्ही व्हायरस हा वेगवेगळ्या प्रकारे संक्रमित होत असतो. त्याचं सेक्स हे एकच कारण नाही. नक्की हा कसा संक्रमित होतो ते जाणून घेऊया 

  • रक्त अर्थात ब्लड
  • सीमेन (वीर्य)
  • व्हजायनल फ्लूईड (महिलांच्या व्हजायनातून निघणारं द्रव्य)
  • ब्रेस्ट मिल्क
  • शरीराचा कोणताही दुसरा फ्लूड ज्यामध्ये रक्ताचा अंश असेल

  HIV च्या नक्की किती स्टेज आहेत (Stages Of HIV)

  एचआयव्ही संसर्ग तीन टप्प्यात होतो. योग्य वेळेत उपचार न केल्यास ते आपली रोगप्रतिकारक शक्ती पूर्णपणे नष्ट करू शकतात. या स्टेज पुढीलप्रमाणे आहेत -

  पहिला टप्पा: एचआयव्ही संसर्ग

  प्रथम एचआयव्हीची लागण झाल्यावर शरीरावर त्याचा विशेष प्रभाव पडत नाही. तथापि, त्याचे परिणाम हळूहळू पाहिले जाऊ शकतात. आपण दर 2 ते 3 आठवड्यांनी आजारी पडतो. या शारीरिक स्थितीस रेट्रोव्हायरल सिंड्रोम किंवा प्राथमिक एचआयव्ही संसर्ग म्हणतात. एड्सच्या या पहिल्या टप्प्यात, फ्लू सारखा ताप एक किंवा दोन आठवड्यांनंतर बरे होतो. या टप्प्यावर दिसणार्‍या एड्सची लक्षणे डोकेदुखी, अतिसार, मळमळ आणि उलट्या, थकवा, स्नायू दुखणे, घसा दुखणे, सूजलेल्या लिम्फ नोड्स, लाल पुरळ, तीव्र ताप (अप्पर रेशेस) वरच्या किंवा टॉरसोमध्ये. ताप) इ. अशी आहेत. असुरक्षित सेक्स किंवा इतर विषाणूंमुळे तुमच्या शरीरात एचआयव्ही विषाणूचा प्रवेश होऊ शकतो. या विषाणूपासून बचाव करण्यासाठी तुम्ही एचआयव्ही-विरोधी गोळ्या घेऊ शकता. तथापि, प्रथम डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे कारण हे औषध किंवा ज्याचे वैद्यकीय नाव पीईपी आहे त्याचे बरेच दुष्परिणाम आहेत.

  दुसरा टप्पा: तीव्र एचआयव्ही संसर्ग

  फ्लूच्या लक्षणांचा पहिला टप्पा संपल्यानंतर वैद्यकीय शब्दावलीला एसीम्प्टोमॅटिक किंवा क्लिनीकली लेटंट पीरियड मानले जात नाही, म्हणजे एचआयव्ही संसर्ग किंवा एड्सची लक्षणे यावेळी समजली नाहीत. आणि म्हणूनच हा दुसरा टप्पा सर्वात जास्त कठीण आहे. आपल्या शरीरात व्हायरस किती मजबूत आहे याची आपल्याला कल्पनाही येत नाही. आपल्या जाणीवेशिवाय एचआयव्ही विषाणू इतर लोकांच्या शरीरात संक्रमित होतात. तीव्र एचआयव्ही संसर्गाचा हा दुसरा टप्पा दहा वर्षापर्यंत टिकू शकतो.

  जर आपल्याला दुसर्‍या टप्प्यात हे समजत नसेल आणि त्यावर उपचार न केल्यास एचआयव्ही विषाणू तुमची रोगप्रतिकारक शक्ती किंवा रोगप्रतिकारक शक्ती पूर्णपणे नष्ट करेल. शिवाय, ते रक्तातील सीडी 4 टी पेशी नष्ट करतात. रक्ताच्या चाचण्यांमधून हे दिसून येते की या पेशींपैकी किती प्रमाणात तुमच्या रक्तात आहेत. जेव्हा रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, आपल्या रक्तात या पेशींची संख्या कमी होते आणि आपण लवकर आजारी पडता.

  तथापि, जेव्हा योग्य उपचार आणि योग्य औषधोपचार केला जातो तेव्हा स्टेज बर्‍याच नियंत्रणाखाली येतो. 

  तिसरा किंवा प्रगत टप्पा: एड्स

  आम्ही पूर्वी म्हटल्याप्रमाणे आपल्याकडे एचआयव्ही आणि एड्सबद्दल बरेच गैरसमज आहेत. एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे, परंतु एड्सचे रुग्ण नाहीत. एड्स म्हणजे एचआयव्ही पॉझिटिव्हचा शेवटचा टप्पा किंवा तिसरा टप्पा. तिसऱ्या किंवा प्रगत अवस्थेत पाहिले जाते जेव्हा प्रति सूक्ष्म लिटर सीडी -4 पेशी 20 पेक्षा कमी खाली येतात. एड्सशी संबंधित असेही काही रोग आहेत. कपोसीच्या सारकोमा प्रमाणेच, जो त्वचारोगाचा किंवा त्वचेचा कर्करोग आणि न्यूमोसिसिस न्यूमोनियाचा एक प्रकार आहे, फुफ्फुसांचा आजार कुणालाही झाल्यास एड्स होण्याची शक्यता असते. एचआयव्ही संसर्गाच्या या तिसऱ्या टप्प्यातील लक्षणे (एचआयव्हीची लक्षणे) - नेहमी थकल्यासारखे, सूजलेल्या लिम्फ नोड्स, जे मुख्यत: घसा आणि पोट आणि घशाच्या मध्यभागी दिसतात, ताप दहा दिवसांपर्यंत टिकू शकतो, रात्री घाम येणे, अचानक वजन कमी होणे, त्वचेवर जांभळे डाग निघून जात नाहीत जे दमा, तीव्र अतिसार, तोंडात बुरशीजन्य संक्रमण, घसा आणि योनीतून अचानक येणे.

  HIV पॉझिटिव्ह समजल्यावर नक्की काय करावं ?

  Shutterstock

  बऱ्याच लोकांना HIV पॉझिटिव्ह असल्याचं कळल्यानंतर लाज वाटते, भीती वाटते. त्यांना समाजात स्थान मिळणार नाही, त्यांच्यावर बहिष्कार टाकला जाईल असं वाटतं. पण असं नक्कीच नाही. आता समाजाचा दृष्टीकोन बदलला आहे. कोणत्याही व्यक्तीला एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचं कळल्यानंतर सर्वात पहिले जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधं व्यवस्थित घेणं सुरु करायला हवं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एड्सचे उपचार हे मोफत आहेत हे जाणून घ्या. त्यामुळे कोणत्याही पैशाची चिंता न करता तुम्ही डॉक्टरकडे जा. तसंच या महत्त्वाच्या गोष्टींकडेही लक्ष द्या. 

  • धूम्रपान आणि दारूचं सेवन करू नये
  • असुरक्षित सेक्स विसरूनही करू नका
  • आपल्या शरीराच्या स्वच्छतेकडे लक्ष द्या
  • कोणत्याही प्रकारच्या नशेच्या औषधांचा वापर करू नका
  • योग्य वेळी तुमचं औषध घ्या आणि कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा त्यात करू नका
  • आपली जीवनशैली सुधारा
  • रोज योगा करा

  HIV बद्दल असलेले गैरसमज (HIV And AIds Myths)

  प्रत्येक जण प्रत्येक बाबतीत काही ना काही बोलतच राहणार. अगदी याबाबतदेखील हे खरं आहे. एचआयव्ही/एड्स संबंधित असे बरेच गैरसमज आहेत जे खरे समजले जातात. जाणून घेऊया असेच काही गैरसमज आणि तथ्य नसलेल्या बाबी. या गोष्टींमुळे खरं तर एचआयव्ही व्हायरस पसरत नाही -

  • एकत्र खाण्याने आणि हवेच्या कणातून पसरत नाही
  • हात मिळवणं, गळाभेट घेणं अगदी इतकंच काय एकच टॉयलेट वापरल्याने व्हायरस पसरत नाही
  • एकाच ग्लासातून पाणी प्यायल्याने अथवा सर्दी खोकल्याने हा व्हायरस पसरत नाही
  • डॉक्टर या डेंटिस्टकडे जाऊन उपचार घेतल्याने (जे डॉक्टर्स स्टरलाईज्ड गोष्टींचाच वापर करतात)
  • टॅटू बनवल्याने पसरत नाही. फक्त वापरण्यात येणारी सामग्री स्टरलाईज्ड असायला हवी
  • मच्छर चावल्याने अजिबात पसरत नाही
  • सुरक्षित पद्धतीने रक्तदान केल्यास हा व्हायरस पसरत नाही

  या व्यक्तींना होण्याची आहे जास्त भीती (Risk Factor)

  एड्स नक्की कोणत्या व्यक्तींना जास्त प्रमाणार होऊ शकतो हे जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. 

  पुरुषोंबरोबर संबंध ठेवणारे पुरुष

  Shutterstock

  समलैंगिक (Gay) पुरुषांचं प्रमाणही सध्या दिसून येत आहे. पुरुषांना अशा तऱ्हेने सेक्स केल्याने एचआयव्ही/एड्स होण्याचा धोका सर्वात जास्त असतो. त्यामुळे त्यांनी सेक्स करताना योग्य काळजी घेणं आवश्यक आहे. 

  महिला

  HIV संक्रमित जोडीदाराबरोबर असुरक्षित यौन संबंध ठेवल्यास, एड्स होतो. याची संख्या खूपच जास्त प्रमाणात आहे. महिलांना एड्स होण्याचं हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे. 

  तरूणवर्ग

  Shutterstock

  बऱ्याच तरूणांमध्ये सेक्सची खूपच उत्सुकता असते आणि बऱ्याचदा यामुळे वाईट मार्गाला लागून नशा करणं आणि असुरक्षित सेक्स करणं या गोष्टी घडतात त्यातूनच एड्सचा धोका अधिक प्रमाणात असतो. 

  वरीष्ठ नागरीक

  हे वाचून कोणालाही आश्चर्य वाटेल. अधिक वरीष्ठ नागरिकांना आपल्याला एड्स होणार नाही असं वाटतं. त्यामुळे कोणत्याही प्रकारे न घाबरता गोष्टी केल्यास, त्यांना एचआयव्ही होऊ शकतो.

  इंजेक्शनने नशा करणाऱ्या व्यक्ती

  इंजेक्शनद्वारे नशा करणाऱ्या व्यक्तींना एचआयव्ही/एड्स होण्याचा धोका इतरांच्या तुलनेत जास्त प्रमाणात असतो. 2009 मध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, नशा करणाऱ्या व्यक्तींमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना एड्स असतो आणि त्यांना याबाबत माहितीही नसते, 

  या रोगावरील औषधं (HIV Medicines)

  Shutterstock

  तसं तर अजूनपर्यंत एचआयव्ही पूर्णपण बरं करण्यासाठी कोणत्याही प्रकारची लस निघाली नाही. हा व्हायरस अनेक प्रकारचा असतो आणि शरीराच्या प्रतिकारक शक्तीवर याचा वाईट परिणाम होतो. वैज्ञानिकांसाठी ही लस तयार करणं हे आजही एक आव्हान आहे. वर्ष 1987 मध्ये पहिल्यांदा एड्सवर औषध तयार करण्यात आलं. पण त्याचे दुष्परिणामही होते आणि रूग्णांना बरेच डोस घ्यावे लागत होते. 90 च्या दशकात यामध्ये सुधारणा झाली. ओरा क्विक टेस्ट द्वारे दावा करण्यात आला की, लारच्या परीक्षणात 20 मिनिट्समध्ये एचआयव्ही आहे की नाही हे सांगता येऊ शकतं. तसंच आता एचआयव्हीसाठी बरीच औषधंही बाजारामध्ये उपलब्ध आहेत. पण पूर्ण बरा होण्यासाठी एकही औषध नाही. 

  एचआयव्ही संबंधित प्रश्नोत्तरे (FAQ's)

  1. पॉझिटिव्ह आहात की नाही कसं निश्चित कराल?

  एचआयव्ही/एड्स असल्याचं साधारणपणे शरीरातील एचआय अँटीबॉडीमधून कळतं. सर्वात पहिले सर्वसाधारण याची टेस्ट आहे ती म्हणजे एलिसा (ELISA Tests for HIV). एलिसा टेस्ट शरीराची प्रतिरोधक क्षमता आणि संक्रमणाशी संबंधित टेस्ट आहे. एकदा एलिसा केल्यानंतर तुम्हा एचआयव्ही आहे की नाही हे कळणं अतिशय सोपं होतं.

  2. दुसरी टेस्ट करण्याची गरज आहे का?

  त्यासाठी पुन्हा टेस्ट करण्याची गरज भासत नाही. डब्ल्यूएचओनुसार, एचआयव्ही आहे की नाही कळून घेण्यासाठी ईआरएस (ELISA, Rapid or Spot) सतत करण्याची गरज मात्र भासते. आता सध्या पूर्वी करण्यात येणाऱ्या वेस्टर्न बेल्ट टेस्ट (Western Blot Tests for HIV) चा सल्ला देण्यात येत नाही. तसंच एका टेस्टपेक्षा किमान दोन टेस्ट करून घेणं हे कधीही चांगलं असतं. 

  3. सतत वर्षातून टेस्ट करत राहायला हव्यात का?

  किमान वर्षातून एक टेस्ट करून तुमचं शरीर योग्य आहे की नाही तपासून घेणं कधीही चांगलं. त्यामुळे तुम्ही नियमित चेक अप किमान वर्षातून एकदा तरी करून घ्या. 

  मानसिक आजार म्हणजे काय आणि त्याचे काय आहेत प्रकार