सरळ केस अनेकांना आवडतात. दिवाळी सारखा फेस्टिव्ह सीझन आला की, ट्रेडिशनलवेअरवर हमखास केस सरळ केले जातात. केस सरळ करण्यासाठी हेअर स्ट्रेटनिंग केले जाते. पण घाईघाईत आणि चांगले दिसण्यासाठी हेअर स्ट्रेट करताना तुम्ही केसांना किती डॅमेज करत आहात हे मात्र तुमच्या अजिबात लक्षात येत नाही. जर तुम्ही ही अशाच पद्धतीने केस सरळ करत असाल तर मग तुम्हाला हेअर smooting बद्दल काही गोष्टी माहीत हव्यात नाहीत का?
केसांसाठी ओट्स वापरताना ही घ्या काळजी
काय आहे हेअर smoothing
तुम्ही जर कोणत्या सलुनमध्ये गेला असाल तर तुम्हाला हेअर smoothing बद्दल अनेकांनी सांगितले असेल. केसांवर केमिकल प्रयोग करुन हेअर smoothing केले जाते. पण त्यामध्ये तुम्हाला सतत हिटचा प्रयोग करावा लागत नाही. तुमच्या केसांच्या मुळांना क्रिम लावले जाते. त्यानंतर केस स्वच्छ धुवून केसांवर स्ट्रेटनर फिरवला जातो. पण केसांवर स्ट्रेटनर फिरवताना त्याचे तापमान खूप जास्त नसते. यामध्ये तुमचे केस सरळ करणे हा उद्देश नसतो तर त्यांचा फिल सॉफ्ट आणि स्मुथ करणे असा असतो. त्यामुळेच क्रिमच्या दुसऱ्या फेरीत कधीही केसांवर स्ट्रेटनिंग मशीन फिरवली जात नाही. तुम्हाला हवा असलेला लुक यामध्ये मिळतो.
म्हणून स्ट्रेटनिंगपेक्षा तुम्ही करा smoothing
आता तुम्ही तुमच्या केसांसाठी हेअर smoothing करण्याच्या विचारात असाल तर तमग तुम्हाला काही गोष्टी नक्कीच कळायला हवा.
- कमीत कमी केमिकल्सचा वापर यासाठी केला जातो.
- तुमचे केस यामध्ये तुटत नाही.
- तुमच्या केसांच्या मुळांना यामध्ये केमिकल्स लावले जात नाही.
- केसांवर उत्तम प्रतीचे हेअर स्ट्रेटनिंग मशीन वापरले जाते.
- अशा केसांची काळजी घेणेही फार सोपे असते.
काळजी घेणे फारच सोपे
जर तुम्ही कधी केसांचे स्ट्रेटनिंग केले असेल तर तुम्हाला एक गोष्ट हमखास माहीत असेल ती म्हणजे केसांचे स्ट्रेटनिंग केल्यानंतर खूप काळजी घ्यावी लागते. केस सरळ केल्यापासूनच तुम्हाला ते बांधता येत नाही. तीन दिवसांपर्यंत ते धुता येत नाही. पण smoothingमध्ये तुम्हाला इतकी काळजी घ्यावी लागत नाही. म्हणजे तुम्ही केस बांधले तरी चालू शकतात. हा फक्त झोपताना तुम्हाला केस घट्ट बांधून झोपायचे नसते. केस धुताना तुम्हाला विशेष शॅम्पू दिला जातो. Smoothingमध्ये तुमच्या केसांची शाईन जात नाही. तर ते अधिक चमकदार दिसतात.
सणासुदीसाठी असे करा झटपट फेशियल आणि मिळवा ग्लो
किंमतीशी करु नका तुलना
आता अनेक जण बजेटचा विचार करत असतील तर तुम्हाला बजेटपेक्षा तुमचे केस जास्त महत्वाचे असायला हवे. स्ट्रेटनिंगची किंमत नक्कीच smoothing च्या तुलनेत कमी असेल. पण त्याचे तुमच्या केसांना नुकसान होत नाही. त्यामुळे तुम्ही किंमतीशी त्याची अजिबात तुलना करु नका. तुमच्या केसांसाठी जे योग्य आहे तेच करा.
योग्य सलोनची करा निवड
केसांसाठी काहीही करताना तुम्हाला चांगल्या गोष्टी निवडता आल्या पाहिजेत. केसांसंदर्भात काहीही करताना तुम्हाला त्याचे योग्य ज्ञान असणारे पार्लर किंवा सलोन निवडता यायला हवे. त्यामुळे चांगल्या सलोनची निवड करा.
आता लक्षात ठेवा हेअर स्ट्रेटनिंग नाही तर smoothing करुन घ्या. तुमचे केस नेहमीच सुंदर दिसतील.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.