ADVERTISEMENT
home / Acne
चेहर्‍यासाठी तांदळाच्या पिठाचे फायदे (Benefits Of Rice Flour For Face In Marathi)

चेहर्‍यासाठी तांदळाच्या पिठाचे फायदे (Benefits Of Rice Flour For Face In Marathi)

हल्ली आलं-लसूण पेस्टपासून ते इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सपर्यंत सर्व काही एका क्लिकवरच उपलब्ध होत असल्यानं आयुष्य कसं अगदी ‘इन्स्ंटट’मय झालं आहे. इन्स्टंट ब्रेकफास्ट-फूड, इन्स्टंट रीलिफ (Relief), इन्स्टंट मेसेजिंग, वगैर-वगैर. एवढं सर्व झटपट मिळत असताना, यामध्ये आपल्या सौंदर्याशी निगडीत गोष्टी कशा काय मागे राहतील. आपली त्वचा निरोगी ( Healthy),नितळ तसंच चमकदार (Glowing)असावी, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. ही इच्छा केवळ महिलावर्गाचीच नाही तर बहुतांश पुरुषांची देखील असते. इन्स्टंट ग्लो मिळवण्याच्या प्रयत्नात तुम्ही महागड्या सलूनमधील कित्येक उपचार पद्धती केल्या देखील असतील. तेथील तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार छोट्या-मोठ्या शस्त्रक्रियाचांही मार्ग अवलंबला असेल.  पण या असंख्य ब्युटी ट्रिटमेंट्स केल्यानंतर तुम्हाला चेहऱ्यावर मनासारखा ग्लो मिळाला का? बरं, ट्रिटमेंटचा परिणाम जरी इस्टंट मिळाला असला तरीही चेहऱ्यावरील चमक टिकून राहिली का?

नाही ना. क्षणिक आणि तात्पुरत्या रिझल्टमुळे तुम्हाला सतत सलूनची वारी करावी लागते. परिणामी तुमच्या चेहऱ्याचा पोत खराब होऊन नैसर्गिक चमक नाहीशी होते. आता तुम्ही म्हणाल की मग नेमकं करावं तरी काय? निराश होण्याची अजिबात आवश्यकता नाही. कारण, नॅचरल ग्लोसाठी खर्चिक ब्युटी प्रोडक्ट्स वापरण्याऐवजी तुम्हाला घरामध्येच एकापेक्षा एक उपाय (Remedy)मिळतील. ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल. स्वयंपाकघरात नीट डोकावल्यास सौंदर्यवर्धक औषधोपचारांची कित्येक रहस्यं सापडतील. या खजिन्यापैकीच एक म्हणजे ‘तांदळाचं पीठ’. तांदूळ हा आपल्या रोजच्या जेवणातील एक घटक आहे. तांदळापासून आरोग्यदायी तसंच अनेक सौंदर्यवर्धक फायदे देखील आपल्याला मिळतात. त्यामुळे आपल्या त्वचेची योग्य पद्धतीनं देखभाल करण्यासाठी तांदळाच्या पिठाचा दैनंदिन जीवनात समावेश केल्यास चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.

ShutterStock

ADVERTISEMENT

तांदळाचं पीठ म्हणजे नेमके काय? (What Is Rice Flour)

शेतमळ्यातून भात पिकाची कापणी केल्यानंतर त्याची भरडणी केली जाते. या प्रक्रियेत तांदळावरील पापुद्रे-साल दाण्यापासून वेगळी केली जाते. यानंतर हे दाणे धुऊन सुकवण्यात येतात. सुकवलेले तांदळाचे धान्य गिरणीवर अथवा जात्यावर दळून त्याची जाड किंवा बारीक पिठी काढली जाते. तांदळाच्या पिठापासून (Rice Flour)अनेक पौष्टिक, रुचकर तसंच स्वादिष्ट अन्नपदार्थ तयार केले जातात. एवढंच नाही तर सौंदर्य खुलवण्यासाठीही विविध प्रकारच्या फेस पॅकमध्ये तांदळाच्या  पिठाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. 

वाचा : काळ्या तांदुळाचे फायदे, ठरतात आरोग्यासाठी फायदेशीर

ADVERTISEMENT

तांदळाचं पीठ घरी तयारी करण्याची सोपी पद्धत (Way To Prepare Rice Flour At Home)

हल्ली प्रत्येक गोष्टीमध्ये भेसळीचं (Adulteration) प्रमाण वाढल्यानं शक्यतो तांदळाच पीठ घरीच तयार केल्यास आरोग्याच्या दृष्टीकोनातून उत्तम ठरेल. 

तांदूळ पाण्यात भिजत ठेवा (Soak Rice To Make Rice Flour)

आवश्यकतेनुसार तांदूळ घ्या आणि किमान दोन वेळा पाण्यात स्वच्छ धुवा. धुतलेले तांदूळ 2 ते 3 तास पाण्यात भिजत ठेवा. यानंतर पाणी काढून घ्या आणि भिजलेले तांदूळ एका भांड्यात नितळत ठेवा.  

भिजलेले तांदूळ सुकवा (Dry Rice To Make Rice Flour)

एका मोठ्या स्वच्छ कापडावर भिजलेले तांदूळ सुकण्यासाठी पसरवा. सुमारे 45 मिनिटे ते एक तास तांदूळ वाळू द्यावेत. महत्त्वाचे म्हणजे तांदूळ उन्हामध्ये सुकवायचे नाहीत हे लक्षात ठेवा. तसंच तांदळाचे दाणे पूर्णतः कोरडे न होऊ देता किंचितसे ओलसर ठेवावेत.

असं तयार करा तांदळाचं पीठ (Home Made Recipe Of Rice Flour)

मिक्सरच्या भांड्यात वाळलेल्या तांदळाची बारीक पिठी होईपर्यंत वाटून घ्या. तांदूळ वाटून झाल्यानंतर पीठ चाळणीनं चाळावं. पीठ चाळल्यानंतरही तुम्हाला तांदळाचे बारीक-बारीक दाणे त्यात आढळतील. हे दाणे तुम्ही पुन्हा मिक्समध्ये वाटून घेऊ शकता किंवा रवा इडली-डोसा अथवा अन्य कोणत्याही पदार्थांमध्ये याचा समावेश करू शकता. तांदळाचं पीठ चांगलं बारीक वाटून झाल्यानंतर ते पूर्णतः कोरडे होईपर्यंत एका मोठ्या प्लेटमध्ये ठेऊन द्या. पीठ सुकल्यानंतर ते एका हवाबंद डब्यात भरून ठेवा.

ADVERTISEMENT

वाचा : सुपरफूड अवकॅडोचे आरोग्यदायी फायदे

ShutterStock

सौंदर्यवर्धक आहे तांदळाचं पीठ (Rice Flour Is Aesthetic)

तांदळामध्ये पॅरा अमिनोबेन्झोइक अ‍ॅसिड (para aminobenzoic acid),फेरुलिक अ‍ॅसिड (ferulic acid)आणि अलॉनटोइन (allantoin)हे घटक प्रचंड प्रमाणात आहेत. पॅरा अमिनोबेन्झोइक अ‍ॅसिड हे जीवनसत्त्व ‘बी’ गटातील एक घटक आहे. हा घटक एक चांगलं सनस्क्रीन म्हणून उत्तम कार्य पार पाडतं तसंच शरीरातील व्हिटॅमिन सीचं प्रमाणदेखील वाढवतं. निरनिराळी सौंदर्यप्रसाधने, सनस्क्रीन तसंच सौंदर्य उत्पादनांमध्ये या घटकाचा समावेश केला जातो. फेरुलिक अ‍ॅसिड हे अँटीऑक्सिडन्ट असून अलॉनटोइन नैसर्गिकरित्या त्वचेचं आरोग्य जपण्याचं (दुरुस्तीचं) काम करतं. 

ADVERTISEMENT

तोंडाला पाणी आणणारे अप्रतिम तांदळाचे पदार्थ, रेसिपी मराठीत (Rice Recipes In Marathi)

1. डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करते (Reduces Dark Circles)

डोळ्यांखालील काळी वर्तुळे (Dark Circle)येणं ही प्रत्येक वयोगटातील स्त्री समस्या आहे. या समस्येमुळे सौंदर्यात बाधा येते. अपुरी झोप, प्रदूषण, पौष्टिक आहाराच्या कमतरतेमुळे डार्क सर्कलची समस्या निर्माण होते. या समस्येपासून सुटका मिळणवण्यासाठी तुम्ही तांदळाच्या पिठाचा वापर करू शकता. 

कसा कराल वापर  –

स्टेप 1 : दोन चमचे तांदळाच्या पिठात अर्ध पिकलेलं केळ आणि एक चमचा दुधाची साय घ्या

ADVERTISEMENT

स्टेप 2 : हे सर्व योग्य प्रकारे एकत्र करून त्याचं मिश्रण तयार करा

स्टेप 3 : जवळपास 15 मिनिटे हे मिश्रण डोळ्यांखाली लावा

स्टेप 4 : 15 मिनिटांनंतर चेहरा कोमट पाण्यानं स्वच्छ धुवून घ्या

कसा होता परिणाम –

ADVERTISEMENT

आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा प्रयोग केल्यास डोळ्याखालील काळी वर्तुळ कमी होण्यास मदत होते. डोळ्यांखालील सुरकुत्यादेखील कमी होतात. डोळ्यांचं सौंदर्य खुलून येते. 

ShutterStock

2. मुरुमांवर गुणकारी (Curative On Acne)

रोजच्या धावपळीमुळे आपल्याला त्वचेची काळजी घेणं शक्यच नसतं. प्रदुषणामध्ये त्वचेचा पोत बिघडत जाणून सुरकुत्या, मुरुमांसारख्या समस्या निर्माण होतात. हा त्रास कमी करण्यासाठी तांदळाचं पीठ वापरा.

ADVERTISEMENT

कसा कराल वापर – 

स्टेप 1 : तांदळाच्या पिठात एक चमचा मध आणि कोरफडीचा गर मिसळून पेस्ट तयार करा 

स्टेप 2 : ही पेस्ट मुरुमांवर लावून 10 ते  15 मिनिटांसाठी ठेवा

स्टेप 3 : मुरुमांना इजा न पोहोचवता कोमट पाण्यानं चेहरा धुवून घ्या

ADVERTISEMENT

कसा होतो परिणाम –

तांदळाची ही पेस्ट मुरुमांवर लावल्यास काही दिवसांतच तुम्हाला फरक जाणवेल. मुरुमांचं प्रमाण कमी होईलच शिवाय त्वचा ग्लो होण्यासही मदत होते.

ShutterStock

ADVERTISEMENT

3. त्वचेवरील टॅनिंग कमी होतं (Skin Tanning Is Reduced)

पर्यटनाचं वेड असणारे आणि कामानिमित्त सातत्यानं घराबाहेर असणाऱ्यांना टॅनिंगच्या समस्येचा सामना करावा लागतो. धूळ, माती, प्रदूषणामुळे त्वचा खराबही होऊ लागते. त्वचा काळवंडणे, मोठ-मोठे फोड येणे, त्याचे डाग उठवणे अशा कित्येक गंभीर समस्या निर्माण होतात. यासाठी स्कीन स्पेशलिस्टकडे जाऊन पाण्यासारखा पैसा खर्च केला जातो, पण त्वचेच्या समस्या जैसे थे कायम असतात. तांदळाचं पीठ टॅनिंग कमी करण्याचं उत्तम प्रकारे करतं.  

कसा कराल वापर –

स्टेप 1 : एक चमचा तांदळाच्या पिठात लिंबाचा रस मिसळा आणि पेस्ट तयार करा

स्टेप 2 : टॅनिंग झालेल्या भागावर ही पेस्ट लावून 20 मिनिटे ठेवा

ADVERTISEMENT

स्टेप 3 : पेस्ट सुकल्यानंतर हलक्या हातानं मसाज करा

स्टेप 4 : यानंतर कोमट पाण्यानं चेहरा धुवा

कसा होता परिणाम –

तांदळाचं पीठ नैसर्गिकरित्या स्किन व्हायटनिंगचं काम करतं. नियमित या पेस्टचा वापर केल्यास टॅनिंग कमी होतं. शिवाय मृत त्वचादेखील काढण्यास मदत होते.

ADVERTISEMENT

4. ब्लॅकहेड्सवर रामबाण उपाय (Remedy For Blackheads)

धूळ, घाम, तेलकट त्वचा आणि प्रदूषणामुळे चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स येतात. चेहऱ्यावरून हे काढणं आवश्यक असतं. ब्लॅकहेड्स काढण्यासाठी अनेक जण फेस मास्क, महागड्या क्रीम्स वापरतात. पण अनावश्यक खर्च टाळण्यासाठी घरगुती उपाय म्हणून तांदळाचं पीठ वापरा.  

कसा वापर कराल –

स्टेप 1 : दही आणि तांदळाचं पिठाचं मिश्रण करा

स्टेप 2 : ही पेस्ट ब्लॅकहेड्सवर अर्धा तास लावून ठेवा 

ADVERTISEMENT

स्टेप 3 : यानंतर हळूहळू हलक्या हातानं स्क्रब करा आणि कोमट पाण्यानं चेहरा स्वच्छा धुवा

कसा होतो परिणाम –

तांदळांमध्ये अमिनो अ‍ॅसिड असल्यानं त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते. तसंच प्रदूषणामुळे संरक्षणदेखील होते. या मिश्रणात दह्याचा समावेश असल्यानं चेहऱ्याला नैसर्गिक ओलावा मिळतो आणि ब्लॅकहेड्सची समस्या कमी होते.

5. बॉडी स्क्रब (Body Scrub)

झपाट्यानं बदलणाऱ्या जीवनशैलीमुळे आपल्याला स्वच्छ आंघोळ करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे घाण,  दुर्गंधी तशीच राहून शरीर म्हणावं तसं स्वच्छ होत नाही. यामुळे त्वचेचा मूळ रंग नाहीसा होऊ लागता. यासाठी बॉडी स्क्रब वापरणं गरजेचं आहे. केमिकलयुक्त बॉडी स्क्रब वापरण्याऐवजी तांदळाच्या पिठापासून नैसर्गिक बॉडी स्क्रब तयार करा. 

ADVERTISEMENT

कसा कराल वापर –

स्टेप 1 :  तांदळाचं पीठ, बेसन पीठ, मध आणि आवश्यकतेनुसार नाराळचं  तेल घ्या आणि हे सर्व मिश्रण एकत्र करा

स्टेप 2 : या मिश्रणानं शरीराला हलक्या हातानं स्क्रब करा

स्टेप 3 : काही वेळानंतर कोमट पाण्यानं आंघोळ करा

ADVERTISEMENT

कसा होतो परिणाम –

या स्क्रबमुळे संपूर्ण शरीरावरील मृत त्वचा (dead skin)सहजरित्या निघते आणि नितळ होते. या स्क्रबच्या वापरामुळे त्वचा उजळण्यास मदत होते. 

6. नॅचरल डिओड्रंट (Natural Deodorant)

काही जणांना बॉडी स्प्रे, परफ्युम्सची एलर्जी असते. अशा वेळेस शारीरिक दुर्गंधीपासून बचाव करण्यासाठी तांदळाच्या पिठाचा नॅचरल डिओड्रंट म्हणून वापर केला जाऊ शकतो.

कसा कराल वापर –

ADVERTISEMENT

स्टेप 1 : एखाद्या सुगंधी पावडरप्रमाणेच तांदळाचं पीठ अंडरआर्म्सवर लावावं

स्टेप 2 : घाम येऊ लागल्यास कोमट पाण्यानं अंडरआर्म्स स्वच्छ पुसून घ्यावेत

स्टेप 3 : किंवा तुम्ही तांदळांचं पीठ पॅक म्हणूनही अंडरआर्म्सवर लावू शकता  

कसा होता परिणाम –

ADVERTISEMENT

तांदळाच्या पिठामुळे तुमच्या अंडरआर्म्समधून दुर्गंधी येणं थांबतं. महत्त्वाचे म्हणजे यामुळे हायपर पिगमेंटेशन कमी होऊन अंडरआर्म्सचा भाग उजळतो. 

7. टोनर (Toner)

तांदळाचं पीठ हे त्वचेसाठी उत्तम टोनर म्हणूनदेखील काम करत.  

कसा कराल वापर –

स्टेप 1 : तांदळाचं पीठ रात्रभर पाण्यात भिजत ठेवा 

ADVERTISEMENT

स्टेप 2 : सकाळी पीठ आणि पाणी वेगळं करा. त्या पाण्यामध्ये अर्धा लिंबू पिळून मिश्रण तयार करा

स्टेप 3 : कापसाच्या मदतीनं हे पाणी चेहऱ्यावर लावा. काही वेळ ठेवून कोमट पाण्यानं  चेहरा स्वच्छ धुवा

कसा होता परिणाम –

लिंबू आणि तांदळाच्या पाण्यात ब्लीचिंगचे गुणधर्म असल्यानं चेहऱ्याचं  रंग सुधारण्यास मदत होते. तेलटक त्वचा असणाऱ्यांनी हे टोनर आवर्जून वापरावे.

ADVERTISEMENT


 

तांदळाच्या पिठापासून तयार करा हे फेसपॅक (Facepack From Rice Flour)

त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी बरेच जण महागड्या केमिकलयुक्त ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करतात. पण याचा परिणाम अगदी तात्पुरत्या स्वरुपात आणि निष्फळ असतो. गंभीर बाब म्हणजे याचे त्वचेवर दुष्परिणामदेखील होण्याची भीती असते. त्यामुळे या समस्या टाळण्यासाठी घरगुती उपचारांचा पर्याय निवडणं केव्हाही चांगलंच. त्वचेच्या सर्व समस्यांवर तांदळाचं पीठ हे रामबाण उपाय आहे.    

1. तांदळाचं पीठ, टोमॅटो आणि कोरफड (Rice Flour, Tomatoes And Aloe)

घटक : अर्धा चमचा तांदळाचं पीठ, एक चमचा अ‍ॅलोव्हेरा जेल (किंवा कोरफडीचा गर) आणि एक चमचा टोमॅटोची पेस्ट

असा तयार करा फेस पॅक –

ADVERTISEMENT

– एका वाटीमध्ये तांदळाचं पीठ घ्या

– त्यामध्ये अ‍ॅलोव्हेरा जेल आणि टोमॅटोची पेस्ट मिक्स करून पॅक तयार करा

– अर्धा तासापर्यंत हा पॅक चेहऱ्यावर लावून ठेवावा

– यानंतर कोमट पाण्यानं चेहरा धुवा.

ADVERTISEMENT

असा होता फायदा –

कोरफडीमध्ये नैसर्गिक मोईश्चरायझर, व्हिटॅमिन A,C,Eअसल्यानं चेहऱ्यावर ग्लो येतो. त्वचेसाठी उपयुक्त असणारे ब्लीचिंग एजंट टोमॅटो आणि तांदळामध्ये निसर्गतः असल्यानं चेहऱ्याचा पोत सुधारण्यास मदत होते. ज्यांची त्वचा तेलकट आहे, मुरुमांचा त्रास आहे त्यांनी हा फेसपॅक वापरावा. यामुळे मुरुमांचा त्रास तसंच त्वचा काळवंडणंही कमी होतं.

ShutterStock

ADVERTISEMENT

2. तांदळाचं पीठ, ओट्स आणि मध (Rice Flour, Oats And Honey)

घटक : एक चमचा तांदळाचं पीठ, एक चमचा मध,  एक चमचा ओट्स आणि एक चमचा दूध

असा तयार करा फेस पॅक –

– तांदळाचं पीठ, ओट्स, मध आणि दूध एकत्रित करा

– थोड्या-थोड्या प्रमाणात हे मिश्रण घेऊन चेहऱ्यावर हलक्या हातानं मसाज करावा

ADVERTISEMENT

-15 मिनिटांसाठी फेस पॅक चेहऱ्यावर ठेवावा

– कोमट अथवा थंड पाण्यानं चेहरा स्वच्छ धुवावा

असा होतो फायदा –

ओट्समुळे मृत त्वचा, दुर्गंध आणि चेहऱ्यावरील छिंद्रांमध्ये अडकलेली घाण बाहेर येऊन त्वचा स्वच्छ होते. मधामुळे त्वचेला नैसर्गिक ओलावा मिळतो आणि त्वचा ग्लोदेखील होते. कोरडी आणि निस्तेज त्वचा असणाऱ्यांना हा पॅक वापरल्यास उत्तम.

ADVERTISEMENT

 

ShutterStock

3. तांदळाचे पीठ, सफरचंद आणि संत्रे (Rice Flour, Apples And Oranges)

घटक : दोन चमचे तांदळाचे पीठ, दोन चमचे दही, संत्र्याचे 3 ते 4 काप ( Slice), सफरचंदाचे 2 ते 3 काप (Slice) 

ADVERTISEMENT

असा तयार करा फेसपॅक –

– संत्रे आणि सफरचंदाचे काप मिक्सरच्या भांड्यात एकत्रित वाटून त्याचा रस काढा

– एका वाटीत  तांदळाचे पीठ घ्या. त्यामध्ये तीन चमचे संत्रे आणि सफरचंदाचा काढलेला रस एकत्र करा

– आता यामध्ये दही घ्या आणि सर्व घटक चांगल्या पद्धतीनं एकत्रित करून त्याची पेस्ट तयार करा

ADVERTISEMENT

– हा फेसपॅक चेहऱ्यावर  15 मिनिटांसाठी लावा

– त्यानंतर कोमट पाण्यानं चेहरा स्वच्छ करावा

असा होतो फायदा –

दह्यात असलेल्या लॅक्टिक अ‍ॅसिडमुळे त्वचा एक्सफॉलिएट होऊन नैसर्गिक ओलावा मिळतो.  तसंच सफरचंद आणि संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी असल्यानं त्वचेमध्ये कोलेजन उत्पादन उत्तेजित होतं आणि त्वचेचा पोत सुधारतो. ज्यांची त्वचा सैल आणि काळवंडलेली आहे, त्यांनी हे पॅक जरूर वापरावे. 

ADVERTISEMENT

ShutterStock

4. तांदळाचं पीठ, चण्याचं पीठ आणि मध (Rice Flour, Tea Flour And Honey)

घटक : दोन चमचे तांदळाचं पीठ, दोन चमचे चण्याचं पीठ आणि तीन चमचे मध

असा तयार करा फेसपॅक –

ADVERTISEMENT

– एका वाटीत तांदळाचं पीठ आणि चण्याचं पीठ एकत्र घ्या

– यानंतर त्यात मध मिक्स करून चांगली पेस्ट तयार करून घ्या

– चेहरा स्वच्छ धुवून त्यावर हा पॅक लावा

– 15 ते 20 मिनिटांसाठी हा पॅक चेहऱ्यावर राहू द्यावा

ADVERTISEMENT

-पॅक सुकल्यानंतर चेहरा कोमट पाण्यानं धुवावा

असा होता फायदा –

चण्याचं पीठ त्वचेसाठी क्लीजिंग एजंटचं काम करतं. यामुळे त्वचा हेल्दी राहण्यास मदत होते. डार्क सर्कल, मृत त्वचा असणाऱ्यांनी हा पॅक वापरावा.

ADVERTISEMENT

ShutterStock

5. तांदळाचं पीठ, गुलाब पाणी आणि टी ट्री ऑइल (Rice Flour, Rose Water And Tea Tree Oil)

घटक : एक चमचा तांदळाचं पीठ, एक चमचा गुलाब पाणी आणि 10 थेंब टी ट्री ऑइल

असा वापरा फेस पॅक –

– एक वाटीत तांदळाचं पीठ घ्या

ADVERTISEMENT

– त्यामध्ये टी ट्री ऑइल आणि गुलाब पाणी चांगल्या प्रकारे मिक्स करा

– हा पॅक चेहऱ्यावर 15 ते 20 मिनिटांसाठी लावा

– यानंतर कोमट अथवा थंड पाण्यानं चेहरा स्वच्छ करावा

असा होता फायदा –

ADVERTISEMENT

गुलाब पाण्यामध्ये अ‍ॅस्ट्रिन्जेंटचे गुणधर्म असतात. यामुळे निस्तेजपणा कमी होऊन तुमची त्वचा तरुण राहते. टी ट्री ऑइलमध्ये अँटिऑक्सिडंट, अँटिबॅक्टेरिअरल ( बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ) आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म (विरोधी दाहक गुणधर्म) असल्यानं त्वता नितळ आणि स्वच्छ होते. त्वचेवरील टॅन काढण्यासाठी या पॅकचा वापर करावा. कोरडी त्वचा असणाऱ्यांनी हा उपाय करावा.

ShutterStock

6. तांदळाचं पीठ, नारळाचं तेल आणि लिंबू रस (Rice Flour, Coconut Oil And Lemon Juice)

घटक : एक चमचा तांदळाचं पीठ, एक चमचा लिंबाचा रस,10 थेंब नारळाचं तेल,10 थेंब पुदिन्याचं तेल 

ADVERTISEMENT

असा वापरा फेस पॅक –

– एका वाटीत तांदळाचं पीठ घ्या. त्यामध्ये लिंबाचा रस मिक्स करून मिश्रण ढवळून घ्या

– आता त्यामध्ये  नारळाचं तेल आणि पुदिन्याचं तेल मिक्स करा

– सर्व मिश्रण एकत्रिक करून चेहऱ्यावर लावा 

ADVERTISEMENT

– फेस पॅक सुकल्यानंतर कोमट पाण्यानं चेहरा धुवावा

असा होतो फायदा –

नारळाच्या तेलामुळे आपल्या त्वचेला प्रचंड प्रमाणात नैसर्गिक ओलावा मिळतो. तर लिंबूमध्ये असलेल्या अ‍ॅसिडिक गुणधर्मांमुळे त्वचा स्वच्छ आणि हेल्दी राहते. पुदिन्याचं तेल चेहरा टवटवीत ठेवण्याचं काम करतं.  

7. तांदळाचं पीठ, मिल्क क्रीम आणि ग्लिसरिन (Rice Flour, Milk Cream And Glycerin)

घटक : एक चमचा तांदळाचं पीठ, एक चमचा मिल्क क्रीम आणि एक चमचा ग्लिसरिन 

ADVERTISEMENT

असा वापरा फेसपॅक –

-एका वाटीत तांदळाचं पीठ, त्यानंतर मिल्क क्रीम आणि ग्लिसरिन चांगल्या पद्धतीनं मिक्स करा

– हा पॅक चेहरा आणि मानेवर लावा

– पॅक पूर्णतः सुकेपर्यंत ठेवून द्या. यानंतर कोमट पाण्यानं चेहरा आणि मान धुवून घ्या

ADVERTISEMENT

असा होतो फायदा –

मिल्क क्रीम त्वचा एक्सफॉलिएट करण्याचं काम करतं, त्यामुळे त्वचा अतिशय मऊ आणि नितळ होते. ग्लिसरिनमुळे चेहऱ्याला आद्रर्ता मिळते. परिणामी त्वचा मऊ आणि तेस्वजी दिसू लागते. उन्हाळामुळे त्वचेवर डाग आलेल्या आणि  काळवंडलेल्या लोकांसाठी हा फेसपॅक अतिशय उत्तम आहे.  

8. तांदळाचं पीठ, कोको पावडर आणि दूध (Rice Flour, Cocoa Powder And Milk)

घटक : 2 चमचे तांदळांचं पीठ, 2 चमचे कोको पावडर आणि एक चमचा दूध

असं वापरा फेसपॅक –

ADVERTISEMENT

– एका वाटीत तांदळाचं पीठ घ्या, त्यामध्ये कोको पावडर मिक्स करा

– तांदळाचं पीठ आणि कोको पावडर एकत्र केल्यानंतर त्यामध्ये दूध घ्या आणि या मिश्रणाची पेस्ट करा

-हा पॅक 25 ते 30 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा. त्यानंतर कोमट पाण्यानं चेहरा स्वच्छ करा     

असा होतो फायदा –

ADVERTISEMENT

दुधामुळे मृत त्वचेची समस्या कमी होऊन दुर्गंधी छिद्रांबाहेर येते. यामुळे तुम्हाला हेल्दी आणि चमकदार त्वचा मिळते. कोको पावडरमध्ये अँटिऑक्सिडेंटचे गुणधर्म प्रचंड प्रमाणात असतं, जे  तुमची त्वचा हेल्दी ठेवण्यास मदत करते.  

9. तांदळाचं पीठ आणि काकडी (Rice Flour And Cucumber)

घटक : एक चमचा तांदळाचं पीठ आणि एक चमचा काकडीचा रस

असा वापरा फेस पॅक –

– तांदळाच्या पिठात काकडीचा रस मिक्स करा आणि त्याची पेस्ट तयार करा

ADVERTISEMENT

– हा पॅक चेहऱ्यावर 15 मिनिटांसाठी लावा

– पॅक सुकल्यानंतर चेहरा कोमट पाण्यानं धुवा  

असा होतो फायदा –

काकडीमुळे चेहरा मऊ आणि नितळ होतो. शिवाय, चेहरा तेजस्वीदेखील दिसू लागतो. तेलकट आणि मुरुमाची समस्या असलेल्या हा पॅक वापरावा. यामुळे त्वचेच्या समस्या कमी होण्यास मदत होईल.

ADVERTISEMENT

ShutterStock

10. तांदळाचं पीठ, हळद आणि लिंबू रस (Rice Flour, Turmeric And Lemon Juice)

घटक : तीन चमचा तांदळाचं पीठ, एक चमचा लिंबू रस, चिमूटभर हळद 

असा वापरा फेस पॅक –

ADVERTISEMENT

– एक वाटीत तांदळाचं पीठ घ्या. त्यामध्ये लिंबाचा रस आणि हळद मिक्स करा

– हा फेसपॅक चेहऱ्यावर 10 मिनिटांसाठी लावून ठेवा

– त्यानंतर कोमट पाण्यानं चेहरा स्वच्छ करा

असा होतो फायदा –

ADVERTISEMENT

फार प्राचीन काळापासून त्वचेची देखभाल करण्यासाठी हळदीचा वापर केला जातो. हळदीमुळे त्वचा निरोगी राहते. लिंबूमुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो.  निस्तेज आणि कोरड्या त्वचेसाठी हा पॅक वरदान आहे. 

तांदळाच्या पिठाच्या दुष्परिमाण (Side Effects Of Rice Flour)

तांदळाच्या पिठाच्या फायद्यांप्रमाणेच त्याचे काही दुष्परिणामही आहेत. ते जाणून घेऊया…

1. तांदळाच्या पिठात फोलेटचं कमी प्रमाण (Low Concentration Of Folate In Rice Flour)

शरीरामध्ये फोलेटचं प्रमाण असणं अतिशय आवश्यक असते.  फोलेट म्हणजे ‘व्हिटॅमिन बी’. रक्तातील होमोसिस्टीन शरीराबाहेर फेकण्याचं काम फोलेट करतं. या प्रक्रियेमुळे  हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका कमी होतो. त्यामुळे तुम्ही नियमित तांदळा पिठाचं सेवन करण्याऐवजी आहारात गव्हाच्या पिठाचं प्रमाण वाढवावं, कारण गव्हाद्वारे तुम्हाला जवळपास 14 टक्के फोलेट मिळतं. 

ADVERTISEMENT

2. मधुमेह आणि लठ्ठपणाचा त्रास (Diabetes And Obesity Disorders)

दैनंदिन आहारात तांदळाच्या पिठाचा समावेश करणं आरोग्याच्या दृष्टीनं सुरक्षित आहे. पण नियमित आवश्यकतेनुसार अधिक प्रमाणात तांदळाचं सेवन केल्यास मधुमेह प्रकार 2 (Type 2 Diabetes)आणि लठ्ठपणाचा त्रास निर्माण होऊ शकतो. यामुळे संतुलित आहार घेणं आवश्यक आहे. 

3. त्वचा कोरडी होण्याची समस्या (Problems With Dryness Of The Skin)

चेहऱ्यावर नैसर्गिक चमक मिळवण्यासाठी हल्ली तांदळांच्या निरनिराळ्या प्रकारचा फेस पॅकचा वापर केला जातो. पण तांदळामध्ये अॅसिडिक गुणधर्म अधिक प्रमाणात असल्यानं याचा त्वचेवर दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे त्वचेवरील तैल ग्रंथी, नैसर्गिक ओलावा कमी होऊन त्वचा कोरडी होण्याची शक्यता असते. यामुळे त्वचेच्या समस्या अधिक गंभीर होऊ शकतात.

4. पोटाच्या समस्या वाढतात (Stomach Problems Increase)

असं  म्हणतात आपल्या संपूर्ण शरीराचं आरोग्य हे पोटावर अवलंबून असतं. यासाठी आपला आहार योग्य असणं गरजेचं आहे. पण तुमच्या आहारात नियमित तांदूळ किंवा तांदळाच्या पिठाचा समावेश असल्यास तुम्हाला पोटाच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तांदळाच्या पिठामध्ये फायबर्स नसतात. यामुळे पचनप्रक्रियेवर दुष्परिणाम होतात. परिणामी, गॅस, बद्धकोष्ठता आणि पोटाच्या अन्य समस्या निर्माण होतात.

5. हाडांसाठी हानिकारक (Harmful For Bones)

तांदळाचं पीठ हाडांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यातही जर तुम्ही पांढऱ्या तांदळाचं सेवन करत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण पांढऱ्या तांदळामध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण कमी असतं. हाडांना पोषक घटक मिळत नसल्यानं हाडे ठिसूळ होतात.

ADVERTISEMENT

6. गंभीर आजारांची भीती (Fear Of Serious Illness)

बहुतांश जणांचा आहार तांदूळ किंवा तांदळाच्या पिठाशिवाय पूर्ण होत नाही. पण नियमित याचे सेवन केल्यास आर्सेनिकसारखे विषारी रसायन शरीरामध्ये जातात. यामुळे कॅन्सर, हृदयसंबंधित रोग होण्याची  भीती असतो. तांदळामध्ये 10 ते 20 टक्के अधिक प्रमाणत आर्सेनिक रसायन आढळून येतं. 

तांदळाचं पीठ वापरण्याबाबत असलेले प्रश्न FAQs

1. तांदळाच्या पिठामुळे त्वचा उजळते?

तांदळामध्ये असलेल्या पोषक घटकांमुळे त्वचेचा रंग उजळण्यास होत. तांदळामध्ये अमिनो अॅसिड आणि पोषक जीवनसत्त्वांचं प्रमाण अधिक आहे. हे घटक चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्याचं काम करतात.

2. तांदळाच्या पिठानं त्वचा सैल पडत नाही?

तांदळाचं पीठ आणि अंड्याचा पांढरा भाग एकत्र करून त्वचेवर लावल्यास याचा तुम्हाला चांगला फायदा होतो. तांदळाच्या पिठामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन बी असतं, ज्यामुळे त्वचेच्या पेशी नव्यानं तयार होत राहतात आणि त्वचा तरुण राहण्यास मदत होते. अंड्याच्या पांढऱ्या भागात अस्ट्रिन्जेंटचे गुणधर्म असतात, यामुळे त्वचा सैल पडत नाही. त्वचा सैल पडू नये यासाठी दोन चमचे तांदळाच्या पिठात एका अंड्यातील पांढरा भाग आणि ग्लिसरिनचे चार थेंब मिक्स करून त्याचा फेसपॅक चेहऱ्यावर लावा. 

ADVERTISEMENT

3. तांदळाच्या पिठामुळे त्वचेचा रंग गोरा होतो?

चमकदार आणि तणावपूर्ण त्वचा मिळवण्यासाठी तांदळाच्या पिठाचा वापर करणं  फायदेशीर ठरेल. तेजस्वी त्वचेसाठी दोन चमचे तांदळाच्या पिठात एक चमचा दूध आणि एक चिमूटभर हळद मिक्स करून त्याचा फेसपॅक लावावा. त्वचेमधील फरक तुम्हाला काही दिवसांतच जाणवेल. 

4. तांदळाच्या पिठामुळे चेहऱ्यावरील अनावश्यक केस कमी होतात?

तांदळाचं पीठ आणि हळदीचा फेसपॅक वापरल्यास चेहऱ्यावरील अनावश्यक केसांपासून तुमची सुटका होईल. यासाठी दोन चमचे तांदळाचे पीठ, दोन चिमूट हळद आणि गरजेनुसार हळद घेऊन मिश्रण तयार करा. हा लेप चेहऱ्यावर जवळपास 20 मिनिटे लावा आणि  कोमट पाण्यानं चेहरा धुवा. 

 

प्रत्येकाच्या त्वचेचा प्रकार हा वेगवेगळा असल्यामुळे यापैकी कोणत्याही उपचारांचा प्रयोग करून पाहण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा  किंवा तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. महागडे ब्युटी प्रोडक्ट्स वापरून खिसा रिकामा करण्यापेक्षा या नैसर्गिक औषधोपचारांचा स्वीकार केल्यास फायदेदेखील होतील आणि दुष्परिणामांचाही सामना करावा लागणार नाही.   

ADVERTISEMENT

फोटो सौजन्य : shutterstock

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

 

20 Nov 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT