आता हळूहळू हवेमध्ये गारवा जाणवायला लागला आहे. पण याचा सर्वात मोठा परिणाम होतो तो आपल्या त्वचेवर. यामुळे केवळ चेहरा कोरडा होत नाही तर टॅनदेखील व्हायला लागतो. तर काही जणींच्या चेहऱ्यावरील चमकही यामुळे निघून जाते. तुम्हालाही हा त्रास होत असेल आणि त्यावर तुम्ही बाजारातील विविध क्रिम्सचा वापर करत असाल तर त्यातून तुम्हाला चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या येण्यासारख्या इतर समस्यादेखील होण्याची शक्यता असते. मग प्रश्न पडतो अशावेळी तुम्ही चेहरा अथवा त्वचा चमकदार तरी नक्की कशी ठेवणार? तुम्हाला माहिती आहे का? तुमची त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार दिसण्यासाठी दुधाची मलई अतिशय फायदेशीर ठरते. तुम्ही दुधाच्या मलईमध्ये हळद किंवा लिंबू मिक्स करून मास्क तयार करून वापरल्यास, तुमची त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार दिसते. आम्ही तुम्हाला दुधाच्या मलईचे तुमच्या त्वचेसाठी होणारे अधिक फायदे सांगणार आहोत. जाणून घेऊया.
हिवाळ्यातदेखील तुमची त्वचा टॅन होते. अशावेळी इतर बाजारातील क्रिम वापरण्यापेक्षा घरच्या वस्तूंचा वापर करून तुम्ही तुमची त्वचा अधिक चमकदार करा. जेव्हा तुमची स्किन अशी टॅन व्हायला लागते तेव्हा तुम्ही हे टॅनिंग काढण्यासाठी दुधाची मलई तुमच्या चेहऱ्यावर साधारण 10 मिनिट्स लावून ठेवा. त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. तुम्हाला हवं असेल तर चेहऱ्यासाठी तुम्ही बेसन आणि मलईचं अप्रतिम मिश्रण करून लावू शकता. याचा फेसपॅक करून तुम्ही साधारण 10 मिनिट्स चेहऱ्याला लावा आणि मग थंड पाण्याने चेहरा धुवा. तुम्हाला अधिक चांगला परिणाम हवा असेल तर आठवड्यातून किमान 2 वेळा तुम्ही हा उपाय करून पाहू शकता.
तुमची त्वचा जर कोरडी असेल तर तुम्ही मध आणि मलई हे कॉम्बिनेशन नक्की वापरून पाहा. बऱ्याचदा हिवाळ्यात त्वचा कोरडी होते. त्यावेळी तुम्ही एक चमचा दुधाचा मलई घ्या. त्यामध्ये 1 चमचा मध मिक्स करा. हे मिश्रण व्यवस्थित करून घ्या. हा फेसपॅक साधारण तुम्ही 20 मिनिट्स चेहऱ्याला लावून ठेवा. त्यानंतर 20 मिनिट्सने चेहरा धुवा. तुम्हालाच तुमचा चेहरा अतिशय मऊ आणि मुलायम झाल्याचं जाणवेल. मधामध्ये अँटिसेप्टिक गुण असतात. तर त्वचेला मऊ बनवण्याचे गुणधर्म हे मलईमध्ये असतात.
चमकदार त्वचा हवी असल्यास करा घरगुती फेसपॅकचा (Homemade Facepack) वापर
तुमच्या त्वचेवरील चमक निघून गेली असेल तर तुम्ही जास्त चिंता करू नका. तुम्हाला तुमच्या त्वचेवरील चमक परत आणायची असेल तर तुम्ही त्यासाठी हळद आणि मलईचा फेसपॅक घरी तयार करा आणि वापरा. हा फेसपॅक बनवण्यासाठी तुम्ही 1 चमचा बेसन आणि त्यामध्ये थोडीशी हळद आणि मलई मिक्स करा. हे व्यवस्थित मिक्स करून तुम्ही चेहऱ्यावर लावा. हा फेसपॅक साधारण तुम्ही 20 मिनिट्स चेहऱ्याला लावून ठेवा. त्यानंतर 20 मिनिट्सने चेहरा धुवा. तुमचा चेहरा चमकदार ठेवण्यासाठी आठवड्यातून साधारण दोन ते तीनवेळा तुम्ही हे करू शकता. हळद, मलई आणि बेसनच्या कॉम्बिनेशनमुळे तुमच्या चेहऱ्यावर अधिक चमक येते.
तुमची त्वचा 10 मिनिट्समध्ये बनवायची असेल चमकदार तर करा वापरा 'हे' फेसपॅक
तुमच्या डेड स्किनसाठी तुम्ही मलईचा वापर करून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला जास्त काही करायची गरज भासणार नाही. तुम्हाला केवळ ओटमील अथवा ब्रेड क्रम्ब्स घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये मलई मिक्स करून तुमच्या त्वचेवर लावायचं आहे. तुम्ही हा पॅक तुमच्या हातावर, कोपऱ्यावर अथवा पायांवरही लावू शकता. काही मिनिट्स हे लावून तसंच ठेवा आणि नंतर थंड पाण्याने धुवा. यामुळे तुमची डेड स्किन निघून जाईल.
मलईचा वापर केल्याने तुमचा चेहरा अगदी आतपर्यंत व्यवस्थित साफ होतो. तसंच यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील पोअर्स खुले होण्यास मदत मिळते आणि त्यातील जमलेला मळ हा बाहेर निघून जातो. दुधाची मलई आणि त्यामध्ये लिंबाचा रस तुम्ही मिक्स करून चेहऱ्याला लावा आणि चेहऱ्याला मसाज करा. असं काही वेळ करा आणि मग कापसाने अथवा पाण्याने तुमच्या चेहरा स्वच्छ करा. तुम्हाला आठवड्यातून असं दोन वेळा केल्यास, स्वतःच्या चेहऱ्यामध्येच चांगला फरक जाणवेल.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.
मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.