परफेक्ट मेकअपसाठी जाणून घ्या 5 सोप्या टिप्स

परफेक्ट मेकअपसाठी जाणून घ्या 5 सोप्या टिप्स

मेकअप ही एक कला आहे आणि ती सगळ्यांना जमत नाही हे तर नक्कीच सर्वांना मान्य असेल. तुम्ही जर मेकअपचं बेसिक नीट समजून घेतलं तर तुम्हाला ही कला अंगीकारणंही सोपं जाईल. आपल्याला वाटतं चांगला मेकअप करायचा म्हणजे आपल्याला अगदी प्रोफेशनलकडे जाऊनच त्याची मदत घ्यायला हवी. पण असं काहीही नाही. तुम्ही बेसिक समजून घेतल्यानंतर तुम्हाला घरच्या घरी ही कला आत्मसात नक्कीच करता येते. तुम्हाला मेकअपच्या  5 सोप्या टिप्स माहीत असायला हव्यात. जेणेकरून तुम्हीही अप्रतिम मेकअप करून सुंदर दिसू शकता. आता या नक्की काय टिप्स आहेत याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. तुम्ही या टिप्स वापरून स्वतःचा मेकअप करा परफेक्ट आणि दिसा अधिक सुंदर! जाणून घेऊया कसा करायचा परफेक्ट मेकअप - 

1. मॉईस्चराईजर आणि सनस्क्रिन

Shutterstock

सर्वात महत्त्वाची आणि कायम लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे मेकअप करताना तुमचा चेहरा पूर्ण तऱ्हेने मॉईस्चराईज्ड आणि सन-प्रोटेक्टेड असण्याची गरज आहे. असं केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील मेकअप लुक हा परफेक्ट दिसतो. मेकअप करण्यापूर्वी तुम्ही तुमचा चेहरा फेसवॉशने स्वच्छ धुऊन घ्या. जेणेकरून तुमची त्वचा स्वच्छ राहील. त्यानंतर त्वचा टोन करणंही महत्त्वाचं आहे. त्वचा टोन करून घेतल्यावर तुम्ही चेहऱ्यावर मॉईस्चराईजर लावा. यानंतर तुम्ही हात आणि पायांवर सनस्क्रिन लावायला विसरू नका. ही अतिशय बेसिक गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा मेकअप कराल तेव्हा दिवसभर तुमचा चेहरा कोरडा राहणार नाही आणि ही बेसिक गोष्ट केल्याने तुमचा मेकअपही बराच काळ चेहऱ्यावर टिकून राहील. 

मेकअप न करता सुंदर दिसण्यासाठी सोप्या टिप्स

2. योग्य बेस महत्त्वाचा

Shutterstock

मेकअपसाठी योग्य बेस महत्त्वाचा आहे. तुम्हाला जर स्ट्राँग बेस हवा असेल तर तुम्ही लाईट फाऊंडेशन अथवा बीबी-सीसी क्रिमचा वापर नक्की करा. तसंच ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने हे व्यवस्थित चेहऱ्यावर ब्लेंड करून घ्या. त्यानंतर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर हा बेस लावलात की, मेकअप करण्याच्या आधी चेहऱ्यावर फाऊंडेशन व्यवस्थित अब्जॉर्ब होत आहे की नाही याची तपासणी करून घ्या. ते झालं की मग तुम्ही मेकअप तुमच्या चेहऱ्यावर लावू शकता. असं न केल्यास, फाऊंडेशन चेहऱ्यावर पसरून चेहरा अधिक खराब दिसतो. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत गरजेची आहे. तुम्ही जर उष्ण प्रदेशात राहात असाल तर तुम्ही स्ट्राँग फाऊंडेशनचा वापर अजिबात करू नका. कारण यामुळे चेहरा अधिक केकी अर्थात विचित्र दिसण्याची शक्यता असते. शक्यतो लाईट फाऊंडेशनच तुम्ही तुमच्या चेहऱ्यासाठी वापरा. त्याने  तुम्हाला परफेक्ट लुक मिळतो. 

तुमच्या मेकअप किट मध्ये हे ‘5’ मेकअप ब्रश आहेत का

3. कन्सीलरचा करा वापर

Shutterstock

तुमच्या चेहऱ्यावर काळी वर्तुळं, पिंपल्स अथवा काळे डाग असतील तर तुम्ही कन्सीलरचा वापर हा करायलाच हवा. जर तुम्हाला परफेक्ट मेकअप लुक हवा असेल तर कन्सीलर तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. कन्सीलरचा वापर करताना तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की, कन्सीलरची खरेदी करताना तुम्ही तुमच्या त्वचेपेक्षा एक टोन लाईटर घ्यायला हवा. त्याचा वापर अशाच ठिकाणी करा जिथे चेहऱ्यावर डाग असतील. इतर ठिकाणी कन्सीलर वापरू नका. त्याने चेहरा अधिक खराब दिसतो. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग लपवण्यासाठी तुम्ही कन्सीलरचा वापर करा. त्यासोबतच करा चेहऱ्यावरील खड्डे जाण्यासाठी उपाय.

4. कॉम्पॅक्ट आणि ब्लश

Shutterstock

मेकअप सेट करण्यासाठी तुम्हाला पूर्ण चेहऱ्यावर कॉम्पॅक्ट पावडर लावायला हवी आणि त्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर तुम्ही हलक्या ब्लशचा वापर करा. जेणेकरून तुमचा मेकअप लुक हा परफेक्ट दिसेल आणि जास्त गॉडीही वाटणार नाही. ब्लश लावण्याची एक पद्धत असते. ती जाणून घ्या. तुम्ही चेहऱ्याच्या एका बाजूच्या चीकबोन्सकडून दुसऱ्या बाजूच्या चीकबोन्सपर्यंत ब्लश लावा. त्यामुळे तुमचा चेहरा उठावदार दिसतो. त्याशिवाय तुम्ही हलकेसे नाकावर, कपाळावर आणि मानेच्या भागावरही ब्लश आणि कॉम्पॅक्ट पावडर लावली की, तुमचा चेहरा आणि मान याचा स्किनटोन वेगळा दिसणार नाही. तसंच तुमचा लुक अतिशय सुंदर आणि उठावदार दिसेलच. त्याशिवाय हे वापरणं आणि घरच्या घरी तुम्ही स्वतः करणं सोपं आहे. 

मेकअप साफ करण्यासाठी परफेक्ट रिमूव्हर्स, तेदेखील तुमच्या बजेटमध्ये

5. डोळ्यांचा मेकअप आणि लिपस्टिक

Shutterstock

बेस लावल्यावर सर्वात शेवटी जर मेकअपचा कोणता भाग असेल तर तो आहे डोळ्यांचा आणि ओठांचा मेकअप. डोळ्यांना पहिले आयशॅडो तुमच्या कपड्यांप्रमाणे लावा. तुम्ही कोणत्या कार्यक्रमाला जात आहात त्याचप्रमाणे तुम्ही आयमेकअप करा. स्ट्राँग आय मेकअप हा एखाद्या लग्न समारंभ अथवा तत्सम कार्यक्रमांसाठी असतो. पार्टीसाठी ग्लिटरी लुक तुम्ही करू शकता. त्यानंतर त्यावर आयलाईनर आणि मस्कारा लावून डोळ्यांचा मेकअप पूर्ण करा. सर्वात शेवटी आपल्या कपड्याला साजेशी लिपस्टिक निवडून तुम्ही लावा. जर तुम्हाला लिपस्टिक लावणं आवडत नसेल तर तुम्ही त्याऐवजी लिप बाम लावून आपला लुक परफेक्ट करू शकता.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.