DIY Body Mask: त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी वापरा घरगुती बॉडी मास्क

DIY Body Mask: त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी वापरा घरगुती बॉडी मास्क

हिवाळ्यात केवळ चेहऱ्याचीच नाही तर आपल्या संपूर्ण शरीराची काळजी घेणं आवश्यक आहे. थंडीच्या दिवसात आपली पूर्ण त्वचा कोरडी होत असते त्यामुळे संपूर्ण शरीराची त्वचा फाटते. त्यामुळे आपली त्वचा मऊ आणि मुलायम राहण्यासाठी नियमित मॉईस्चराईजर लावणं गरेजचं आहे. पण तुमची त्वचा थंडीच्या दिवसात मऊ आणि मुलायम राहण्यासाठी आणि त्याचा कोरडेपणा दूर करण्यासाठी तुम्ही DIY करू शकता. त्यासाठी तुम्ही घरच्या घरी विविध बॉडी मास्क (Body Mask) तयार करू शकता. ज्यामुळे तुम्हाला थंडीच्या दिवसात त्वचेचा कोरडेपणा दूर ठेवण्यासाठी मदत मिळेल.  नैसर्गिक गोष्टींनी तयार करण्यात आलेले बॉडी मास्क हे तुमच्या त्वचेवरील पोअर्स बंद करण्यासाठी फायदेशीर ठरतात आणि त्वचा मुलायम तसंच मऊ बनवण्यासाठीही मदत करतात. तुमची त्वचा अधिक प्रमाणात कोरडी असेल तर तुम्हाला हे बॉडी मास्क त्वचा एक्स्फोलिएट करण्यासाठी फायदेशीर ठरतात. तुम्ही घरच्या घरी बऱ्याच प्रकारचे बॉडी मास्क बनवू शकता. त्यामध्ये दही, ओटमील आणि हळद यासारखे पदार्थ महत्त्वाचं काम करतात. आपण या लेखाद्वारे कोणते फायदेशीर बॉडी मास्क बनवता येऊ शकतात ते पाहूया. तुम्हालाही हे बॉडी मास्क घरच्या घरी तयार करून आपल्या कोरड्या त्वचेची काळजी घेता येऊ शकेल.  पाहूया कसे बनवायचे बॉडी मास्क - 

1. ओटमील बॉडी मास्क

Shutterstock

ओटमील हा आपल्या त्वचेवर चमकदारपणा आणण्यासाठी आणि त्वचा मऊ ठेवण्यासाठी फायदेशीर ठरणारा पदार्थ आहे. तुम्ही याचा वापर करून बॉडी मास्क तयार करू शकता. यामुळे तुमची त्वचा कोरडी राहण्यापासून वाचते आणि शिवाय थंडीत तुम्हाला मऊ आणि मुलायम त्वचा मिळते. 

साहित्य 

 • ½ कप ओट्स
 • 1 कप साखर
 • ½ कप कच्चा मध
 • ¼ कप नारळाचं तेल
 • 4 थेेंब लोबान 

बनविण्याची पद्धत 

 • ओट्सची तुम्ही बारीक पावडर करून घ्या
 • त्यामध्ये बाकी सर्व वर दिलेलं साहित्य मिक्स करून त्याची पेस्ट तयार करा
 • ही पेस्ट तुम्ही तुमच्या त्वचेवर लावा आणि 5-10 मिनिट्स मालिश करा आणि आपलं शरीर एक्स्फोलिएट करून घ्या
  बॉडी मास्क सुकल्यानंतर तुम्ही स्क्रब करून काढा. लगेच पाणी लावून धुवू नका. त्यासाठी तुम्हाला हाताने हे मिश्रण काढून टाकणं आवश्यक आहे
 • तुम्ही आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करू शकता ज्यामुळे तुमची त्वचा कोरडी राहणार नाही

#DIY: नैसर्गिकरित्या त्वचा अधिक सुंदर बनवण्यासाठी

2. दही, मध आणि ऑलिव्ह ऑईल मास्क

Shutterstock

दही, मध आणि ऑलिव्ह ऑईल यांचं मिश्रण तुमच्या शरीराच्या त्वचेला अधिक चांगल्या प्रकारे एक्स्फोलिएट करण्यास फायदेशीर ठरतं. तुमची त्वचा कोरडी असेल तर मध आणि दह्याच्या मिश्रणाने त्वचा अधिक मुलायम होण्यास मदत मिळते. 

साहित्य -

 • 1 मोठा चमचा दही
 • ¼ कप ऑलिव्ह ऑईल
 • 1 चमचा दही
 • 3 मोठे चमचे साखर

बनविण्याची पद्धत 

 • हे सर्व साहित्य एकत्र करून तुम्ही एक जाडी पेस्ट बनवा
 • तुमचा चेहरा नीट धुऊन घ्या आणि त्यावर ही पेस्ट लावा
 • हा मास्क तुम्ही साधारण 8-10 मिनिट्स ठेवा आणि मग नंतर हळूवार मालिश करा आणि मग तुमच्या शरीरावरही ही पेस्ट लावून त्वचा एक्स्फोलिएट करा
 • त्यानंतर तुम्ही कोमट पाण्याने आंघोळ करा
 • यामुळे तुमच्या त्वचेवरील कोरडेपणा कमी होतो

DIY: त्वचेसाठी उत्तम आहेत हे गाजरापासून तयार केलेले फेसमास्क

3. हळदीचा बॉडी मास्क

Shutterstock

हळद ही प्रत्येकाची त्वचा चमकदार बनवते. हळद ही अँटिसेप्टिक असते त्यामुळे त्वचेसाठी ही अतिशय उत्कृष्ट ठरते. म्हणून बॉडी मास्क बनवण्यासाठी तुम्ही हळदीचा वापर करू शकता. 

साहित्य 

 • 1 कप साखर
 • 2 चमचे हळदी पावडर
 • 1 कप नारळाचं तेल

बनविण्याची पद्धत

 • सर्व साहित्य एकत्र करून त्याची थोडी पेस्ट करून घ्या
 • तुमची त्वचा स्वच्छ करून घ्या आणि ही पेस्ट लावा 
 • 5-10 मिनिट्स हळूहळू तुम्ही मालिश करा आणि शरीरही एक्स्फोलिएट करून घ्या
 • हायड्रेटिंग बॉडी मास्क तुम्ही कोमट पाण्याने स्वच्छ करा आणि त्वचेवरील फरक पाहा

#DIY: अंडरआर्म्सचा काळेपणा कमी करण्यासाठी झटपट घरगुती उपाय

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.