लग्नानंतर मुलींचं आयुष्य पूर्णतः बदलून जाते. म्हणजे एखाद्या मुलीचं जीवन सुरुवातीपासून सुरू होतं. लग्नानंतर ती केवळ आपलं घरच सोडत नाही तर स्वतःच्या कित्येक इच्छा-आकांक्षा मागे सोडून सासरी जाते. नव्या घरात तिला पहिल्या दिवसापासून परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागते. लग्नापूर्वी त्या मुलीचं आयुष्य काही वेगळंच असतं, पण यानंतर तिच्यावर कित्येक जबाबदाऱ्यांचं ओझे येते. माहेरी असताना मुलगी आईवडिलांकडून स्वतःचे सर्व हट्ट पूर्ण करून घेते, पण सासरी तिला या सर्व सवयींना आवर घालावा लागतो. तुमचा प्रेमविवाह झाला असला तरीही मुलींचं जीवनात असे काही बदल घडून येतात, हे बदल तुम्ही इच्छा नसतानाही रोखू शकत नाहीत. पण या सर्व परिस्थिती-बदलांचं ताण घेण्याऐवजी तुम्ही सुरुवातीपासून यासाठी मानसिक स्वरुपात तयारी करून घ्यायला हवी. एका स्त्रीच्या आयुष्यात लग्नानंतर कोणते बदल होतात, हे जाणून घेऊया.
(वाचा : थंडीपासून होईल बचाव, स्टायलिशही दिसाल; वाचा विंटर फॅशन टिप्स)
सासरी सर्वांची काळजी घेणे
लग्नापूर्वी तुम्ही एखाद्या पर्वा नसलेल्या व्यक्तीसारखं मनाप्रमाणे वागत होतात, तेच लग्नानंतर तुमच्या या वागणुकीवर नकळतच बंधन येतात. कारण असं वागणं नंतर शक्यच नसते. तुम्हाला स्वतःच्या आनंदाऐवजी दुसऱ्यांच्या आनंदाला प्राधान्य द्यावं लागतं. आपल्या व्यवहारातून सर्वांची हृदयात विशेष जागी निर्माण व्हावी, हाच प्रयत्न प्रत्येक मुलीचा असतो. सोबतच सर्वांना आनंदित ठेवणे आणि सर्वांची काळजी घेण्यात बरेच कष्ट घ्यावे लागतात.
(वाचा : ‘ओम’कार साधनेचे 11 आरोग्यदायी फायदे, गंभीर आजारातून होईल मुक्तता)
‘लेट लाइट’ला BIG NO
लग्नापूर्वी तुम्ही मित्रमैत्रिणींसोबत फिरण्याची योजना आखण्यासाठी आणि ती अंमलात आणण्यासाठी जरासाही विचार केला नसेल. केवळ आईवडिलांना ‘फिरायला जातेय’ असं सांगून तुम्ही घर सोडत असाल. पण लग्नानंतर मित्रमैत्रिणी खूप मागे राहतात. त्यांची भेट क्वचितच होते. विशेषतः मित्रमैत्रिणींसोबत लेट नाइट पार्टी किंवा दो तीन दिवसांच्या पिकनिकसाठी बाहेर जाणंही अशक्य असते. लग्नानंतर एक तर तुम्ही जोडीदारासोबत बाहेर फिरायला जावं किंवा फिरायला जाताना सासरच्यां मंडळींचाही समावेश करावा, अशी तुमच्याकडून अपेक्षा केली जाते.
(वाचा : ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहात, या गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष)
सासरच्या मंडळींची परवानगी
लग्नानंतर प्रत्येक मुलीला इच्छा नसतानाही सासरच्या मंडळींनी घेतलेले निर्णय स्वीकारावे लागतात, त्यांना सहमती दर्शवावी लागते. लग्नापूर्वी आपल्या प्रत्येक निर्णयामध्ये आपण केवळ आईवडिलांची परवानगी घेतो. पण लग्नानंतर आपल्या छोट्या-मोठ्या निर्णयात जोडीदार आणि सासरच्या मंडळींचा समावेश असतो. स्वतःसाठी एखादी गोष्ट करण्यापूर्वी तुम्हाला नेहमीच पतीसोबत चर्चा करावी लागते.
लाइफ स्टाइल बदलते
लग्नानंतर प्रत्येक मुलीचं लाइफ स्टाइलदेखील बदलतं. केवळ लाइफ स्टाइलचं नाही तर काही ठिकाणी सूनेनं कोणते कपडे घालावेत, यातही बदल होतात. याव्यतिरिक्त खाण्यापिण्याच्या सवयींमध्येही कित्येक बदल घडतात. कारण तुमच्या आवडीचे अन्नपदार्थ सासरच्या मंडळींना आवडतीलच, असं नाही, अशावेळी तुम्हालाच परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागते. एवढंच नाही तर मुख्यतः मुलीच्या उठण्यापासून ते झोपण्यापर्यंतच्या वेळांमध्ये बदल होतो. एकूणच मुलींचं आयुष्य लग्नानंतर पूर्णतः बदलून जाते.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.