एका रात्रीत निघून जाईल हाताच्या कोपऱ्याचा काळेपणा, करा घरगुती उपाय

एका रात्रीत निघून जाईल हाताच्या कोपऱ्याचा काळेपणा, करा घरगुती उपाय

आपण सगळेच चेहरा आणि केसांची काळजी अधिक प्रमाणात घेत असतो. इतर शरीराची काळजी ही त्यामानाने कमी प्रमाणात घेतली जाते असं म्हटलं तर अतिशयोक्ती नक्कीच ठरणार नाही.  पण आपण बऱ्याचदा आपल्या हाताच्या कोपऱ्याच्या काळेपणाकडे लक्ष देत नाही. त्यामुळेच बऱ्याच जणांच्या हाताचे कोपरे हे तुम्हाला काळे झालेले दिसून येतात. पण या काळेपणामुळे तुमचा इतर लुकही बिघडू शकतो हे लक्षात घ्या. हाताच्या कोपऱ्याची ही समस्या दूर करण्यासाठी अनेक महागडी उत्पादनंही वापरली जातात. पण त्यामुळे हा काळेपणा निघून जाईलच याची काहीच खात्री नसते. मग अशावेळी नक्की काय करायचं? काही घरगुती उपाय यावर असू शकतो का असे प्रश्नही निर्माण होतात. तर याचं उत्तर नक्कीच हो असं आहे. तुम्ही घरगुती उपाय करून हाताच्या कोपऱ्याचा हा काळेपणा नक्कीच घालवू शकता. इतकच नाही आम्ही तुम्हाला सांगत असलेल्या उपायामुळे तुम्ही एका रात्रीत हा हाताच्या कोपऱ्याचा काळेपणा घालवू शकता. तुम्हाला  कोणताही महागडा उपचार करायचा नसून अतिशय साधासोपा पॅक तयार करायचा आहे आणि त्यामुळे तुमच्या हाताच्या काळेपणावर तुम्हाला मात करता येईल. जाणून घेऊया नक्की काय हा पॅक आणि कसा तयार करायचा - 

#DIY: अंडरआर्म्सचा काळेपणा कमी करण्यासाठी झटपट घरगुती उपाय

पॅकसाठी आवश्यक सामान

Shutterstock

तुम्हाला घरातल्या वस्तूंचाच तुमच्या हाताच्या कोपऱ्याचा काळेपणा घालवण्यासाठी उपयोग करून घेता येतो.  त्यासाठी तुम्हाला जास्त खर्चही नाही आणि त्रासही होत नाही. 

 • 1 चमचा मध
 • 1 चमचा नारळाचं तेल
 • 1 चमचा लिंबाचा रस 
 • 1 चमचा बेकिंग सोडा 

वाचा - गुडघा आणि कोपरांवर काळेपणा येतो

कसा तयार करायचा पॅक

पॅक अगदी सोप्या पद्धतीने  तयार करता येतो. त्यासाठी तुम्हाला काहीही त्रास घ्यावा लागत नाही. तसंच घरात उपलब्ध असणाऱ्या वस्तूंमध्येच तुमचं काम होतं. 

 • सर्वात पहिले एका भांड्यात मध घ्या आणि मग त्यात नारळाचं तेल मिक्स करा. दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्या जेणेकरून हे अतिशय स्मूद असेल
 • त्यानंतर यामध्ये लिंबाचा रस मिक्स करा आणि पुन्हा एकदा नीट मिक्स करून घ्या
 • सर्वात शेवटी बेकिंग सोडा घाला आणि सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्या. लक्षात ठेवा की, यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गुठळ्या राहू देऊ नका

हाताचा कोपरा (Elbow) आणि गुढघ्याचा (Knees) काळेपणा करा दूर

पॅक लावण्याची पद्धत

Shutterstock

पॅक लावण्याची पद्धतही अतिशय सोपी आहे. तुम्हाला दिवसभरात वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हे करू शकता. पण तुम्ही स्वतःसाठी वेळ काढणंही तितकंच महत्त्वाचं आहे. 

 • सर्वात पहिले तुम्ही तुमच्या हाताचा कोपरा नीट स्वच्छ धुऊन घ्या. त्यानंतर थोडंसं स्क्रब करा
 • आता हा वर तयार केलेला पॅक तुम्ही तुमच्या हाताच्या बोटांनी वरून खाली अशा तऱ्हेने लावा
 • हा पॅक लावल्यानंतर काही काळ तसाच ठेवा आणि सुकू द्या आणि त्यावर एक मऊ कपडा बांधून ठेवा आणि रात्रभर हे पडणार नाही याची काळजी घ्या.  त्यामुळे थोडा घट्ट बांधून ठेवा
 • सकाळी उठल्यानंतर तुम्ही कोमट पाण्याने स्क्रब करून हा पॅक काढून टाका

हा पॅक लावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी तुमच्या हाताच्या कोपऱ्यातील काळेपणामध्ये आलेला सुधार तुम्हाला स्वतःला जाणवेल. हा पॅक काढून टाकल्यानंतर तुम्ही हाताच्या कोपऱ्याला मॉईस्चराईजर लावायला विसरू नका. तसंच लक्षात ठेवा की, तुमच्या हाताच्या कोपऱ्याला कोणत्याही प्रकारची जखम झाली असेल तर तुम्ही हा पॅक लावू नका.  कारण त्याने जळजळ होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. पण तुम्हाला या पॅकने नक्कीच हाताच्या कोपऱ्याचा काळेपणा दूर करता येईल. 

मानेवरील काळेपणा घालवण्यासाठी वापरा 6 घरगुती उपाय

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.