प्रत्येक घराला आत्मा असतो, असं म्हणतात. आपलं घर केवळ आपल्याशीच नाही तर येण्या-जाणाऱ्या प्रत्येकाशी काहीतरी संवाद साधत असते. आपलं व्यक्तिमत्त्वही घराच्या ठेवणीतून झळकतं. पण पूर्वीच्या काळी आतासारखी ‘इंटिरिअर डिझायन’ ही संकल्पना अस्तित्वात नव्हती. तेव्हा घरातलीच मंडळी विशेषतः महिलावर्ग स्वतःच आपापल्या पद्धतीनं सजावट करत असत. जीवनशैली बदलत गेली तसतशा निरनिराळ्या अत्याधुनिक बाबींचा उदय होत गेला. आताच्या स्पर्धेच्या युगात लोकांना स्वतःकडे देखील निरखून पाहायला वेळ नाही. मग घर तरी कधी आणि कसे पाहणार? घराची मांडणी, सजावट, सौंदर्य अबाधित कोण राखणार. पण इंटिरियर डिझायनर्समुळे तुमचं-आमचं सर्वांचंच टेन्शन कमी झालंय. कारण आवड-बजेटनुसार ‘स्वप्नवत घर सत्यात उतरवणारे’ एकापेक्षा एक इंटिरियर डिझायनर आपल्यासाठी आता मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.
इंटिरियर डिझायनरची यासाठी आहे आवश्यकता
केवळ घर सुंदर दिसावं, आपल्याला चार चौघात मिरवता यावं… म्हणून केवळ इंटिरियर डिझायनरची मदत घेतली जात नाही. आपण जे काही म्हणतो किंवा प्रत्यक्ष कृती करतो, त्यास प्रत्येक वास्तू ‘तथास्तु’ म्हणत असते हे थोरामोठ्यांकडून आपण ऐकलंच असेल. त्यानुसार घरामध्ये सकारात्मक भावना वाढवण्यासाठी, आसपासचं वातावरण चैतन्यमय राहण्यासाठी, मानसिक शांततेसाठी, आपण कोणत्या वस्तूंची, रंगाची निवड करावा, याची मदत आपल्याला इंटिरियर डिझायनरकडून काही प्रमाणात मिळते. महत्त्वाचे कधी-कधी तुमच्या स्वतःच्या कल्पनांचा वापर करून गृहसजावट करता, त्यावेळेस कदाचित तुमचा खिसा अधिक प्रमाणात कापला जाण्याचीही शक्यता असते. त्यामुळे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी ‘इंटिरियर डिझायनर’ महत्त्वाची कामगिरी निभावतात
भारतातील टॉप 5 इंटिरिअर डिझायनर
इंटिरिअर डिझायनर म्हणजे केवळ फर्निचरची निवड करणारा तज्ज्ञ नव्हे. तर संपूर्ण घराचा, ऑफिसचा किंवा एखाद्या जागेचा कायापालट करणार सल्लागारच होय. आरामदायी आणि निवांत गृहसजावटीसाठी केवळ तुमच्यासाठी एका क्लिकवर आणली आहे भारतातील टॉप 5 इंटिरिअर डिझायनरची माहिती…
1. सुनिला कोहली
सुनिता कोहली या रिसर्च बेस्ड इंटिरिअर डिझायनर आणि K2INDIAच्या अध्यक्ष आहेत. ऐतिहासिक वास्तू आणि वास्तू पुनर्निर्माणात सुनिता यांना प्रचंड अनुभव आहे. फाइन कन्टेम्परेरी आणि क्लासिकल फर्निचर निर्मितीमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. 1992 मध्ये पद्मश्री पुरस्कार पटकावणाऱ्या त्या पहिल्या इंटिरियर डिझायनर आहेत.
शिक्षण : इंग्रजी साहित्य – मास्टर आणि बी.ए.पदवी. इंटिरिअर डिझाइन आणि ऑटो डिटेक्टमध्ये सुनिता यांनी कोणतंही विशेष प्रशिक्षण घेतलेलं नाही.
कार्य : नवी दिल्लीतील पंतप्रधान कार्यालय, संसद भवन वसाहत (1985-1989), हैदराबाद हाऊस आणि राष्ट्रपती भवन सुशोभिकरण आणि पुनर्निर्माण
अधिक माहितीसाठी वेबसाइट : http://www.k2india.com/about_sunitakohli.asp
(वाचा : चेहर्यासाठी तांदळाच्या पिठाचे फायदे)
2. शबनम गुप्ता
क्रिएटिव्ह आणि आकर्षिक करणारं डिझाइन, हे शबनम यांच्या कामाचं वैशिष्ट्य आहे. जागेचा निराळ्याच पद्धतीनं वापर करून आपल्या डिझाइनच्या माध्यमातून त्या एक वेगळी कथाच साकारतात. शबनम गुप्ता मोकळ्या जागा वापरुन कथा व्यक्त करतात.
शिक्षण : एल.एस. रहेजा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमधून इंटिरिअर डिझाइन अभ्यासक्रमाचं पदवी (Graduation) शिक्षण
कार्य : बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी आणि कंगना रणौत यांचं घराचं इंटिरिअर डिझाइन, चंदिगडमधील विद्यापीठ, मुंबई-बंगळुरूतील बार स्टॉक एक्सचेंजचं आउटलेट.
अधिक माहितीसाठी वेबसाइट : http://shabnamgupta.in/
(वाचा : यंदा कर्तव्य आहे! मुंबईतील ‘या’ लई भारी बँक्वेट हॉलमध्ये थाटामाटात करा लग्न)
3. अम्बरिश अरोरा
इंटिरिअर डिझाइन क्षेत्रात अम्बरिश यांना तब्बल 30 वर्षांचा अनुभव आहे. Spatial Designमध्ये त्यांनी आपल्या कामानं ठसा उमटवला आहे. बोट डिझायनर म्हणून काम करण्याचाही त्यांना अनुभव आहे.
शिक्षण : ऑटो डिटेक्ट किंवा डिझायनर
कार्य : मेहरानगड संग्रहालय ट्रस्ट, क्राफ्ट्स म्युझियम (दिल्ली) चे डिझाइन सल्लागार . देशभरातील आर्किटेक्चर आणि डिझाइन स्कूलमध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी आणि सल्लागार म्हणून काम केलं
अधिक माहितीसाठी वेबसाइट : http://studiolotus.in/
4. लिपिका सुद
देशातील आघाडीच्या इंटिरिअर डिझायनर्सपैकी लिपिका सुद देखील एक आहेत. लिपिका सुद इंटिरिअर्स प्रा.लि. आणि डायमेन्शन डिझायनर प्रा.लि.च्या या संस्थापक संचालक आहेत. इंटिरिअर डिझायनच्या क्षेत्रात दोन दशकांपासून कार्यरत आहेत.
शिक्षण : श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून (दिल्ली विद्यापीठ) इकॉनॉमिक्स विषयात पदवी शिक्षण, इंडियन इस्टिट्यु ऑफ मास कम्युनिकेशनमधून अॅडव्हर्टायझिंग-पी.आर. विषयात पद्युत्तर शिक्षण ,लंडन येथून इंटिरिअर डिझायनमध्ये डिप्लोमा.
कार्य : हेवेल्स कॉर्पोरेट ऑफिस, शारदा विद्यापीठ, शिवाजी स्टॅडियम मेट्रो स्टेशन, नवी दिल्ली रेल्वे मेट्रो स्टेशन, ब्लुमबर्ग, अमेरिकन एक्स्प्रेस, किर्लोस्कर ब्रदर्स अँड टाटा मोटर्स, नामांकित हॉटेल्स, इत्यादी.
अधिक माहितीसाठी वेबसाइट : https://www.lipika.com/
(वाचा : सावधान! अजिबातच घाम येत नाही, मग ‘हा’ आजार घेईल तुमचा जीव)
5. आमिर आणि हमीदा
आमिर शर्मा आणि त्याची पत्नी हमीदा केवळ हैदराबादमध्येच नाही तर इंटिरिअर डिझायन क्षेत्रातील सुप्रसिद्ध जोडी आहे. अतिशय महागडी, भव्यदिव्य रेस्टॉरंट्स, बार आणि सोयीसुविधांनी पूर्ण अपार्टमेंट अशी त्यांच्या कामाची श्रेणी आहे.
कार्य : केवळ हैदराबादमध्येच गेल्या 8 वर्षात या दोघांनी 47 हून अधिक रेस्टॉरंट आणि बार डिझाइन केले आहेत. बॉलिवूड अभिनेता सुनिल शेट्टी याचं बुटीक, टॉलिवूडचा सुपरस्टार अलु अर्जुनचं फार्म हाउसदेखील डिझाइन केले आहे.
अधिक माहितीसाठी वेबसाइट : http://www.aandh.in/
मुंबईतील टॉप 10 इंटिरिअर डिझायनर
तुम्हाला हक्काच्या घराचा कायापालट करायचा आहे का? यासाठी तुम्ही बेस्ट इंटिरिअर डिझायनरच्या शोधात आहात का? फरशी, फर्निचरपासून ते रंगसंगती निवडण्यात तुमचा गोंधळ उडतोय. जास्त ताण घेऊ नका, जाणून घ्या मुंबईतील टॉप 10 इंटिरिअर डिझायनरची माहिती
1.आदि इंटिरिअर्स
आदि इंटिरिअर्स आपल्या ग्राहकांच्या स्वप्नातलं डिझाइन सत्यात उतरवण्याचं काम करते. बदलती जीवनशैली आणि नैसर्गिक बाबींमध्ये समतोल राखून ते अप्रतिम डिझाइन घडवतात. ग्राहकांच्या गरजा ऐकून घेतल्यानंतर संबंधित प्रोजेक्ट अद्वितीय, उत्कृष्ट कसा होईल, यावर भर दिला जातो. पर्यावरणाचा ऱ्हास न करता ग्राहकांच्या गरजा भागवणे मुख्य उद्दिष्ट आहे. घराचे नैसर्गिक सौंदर्य वाढवले असे त्यांचे डिझाइन नाजूक असतं.
पत्ता : A-1, प्रेम नगर, बिल्डिंग क्रमांक 7, प्रेम नगर गार्डनजवळ, एस.व्ही. रोड, बोरिवली पश्चिम 400092
स्पेशलिटी : बाथरूम डिझाइन, बेडरूम डिझाइन, फ्लोअर प्लान, फर्निचर निवड, होम ऑफिस डिझाइन, होम थिएटर डिझाइन, हाउस प्लान, इंटिरिअर डिझाइन, इंटिरिअर डिझाइन फोटोग्राफी, किड्स बेडरूम डिझाइन, किचन डिझाइन, स्वयंपाकघराचे नूतनीकरण आणि पुनर्निर्मिती, लायटिंग डिझाइन, लिव्हिंग रूम डिझाइन, स्पेस प्लानिंग
अपेक्षित खर्च : 10 लाख रुपये ते 1 कोटी रुपये
2.संदीप कानविंदे
ग्राहकांच्या बजेटनुसार डिझाइनसंदर्भात सल्ला दिला जातो. निरनिराळ्या कॉन्ट्रॅक्टर्सची भक्कम टीम कानविंदेंकडे आहे. महत्त्वाचे म्हणजे ठरवून दिलेल्या वेळेत तुम्हाला काम पूर्ण करून मिळते. ग्राहकांच्या मागणीनुसार आधुनिक, पारंपरिक, क्लासिक, कन्टेम्पररी, क्लासिक थीमवर देखील डिझाइन करतात.
पत्ता : 35/22 अमरज्योती कॉ.हा.सो. मनिष नगर, 4 बंगला, अंधेरी पश्चिम 400053
स्पेशलिटी : बाथरूम डिझाइन, बेडरूम डिझाइन, रंगसंगतीचा सल्ला, गरज-आवडीनुसार केबिनेट, फर्निचर, किचन केबिनेट डिझाइन, डायनिंग रूम डिझाइन, फ्लोअर फ्लान, फर्निचर निवड, होम ऑफिस डिझाइन, होम थिएटर डिझाइम, हाउस प्लानस, इंटिरिअर डिझाइन, किड्स बेडरूम डिझाइन, किचन डिझाइन, लिव्हिंग रूम डिझाइन, नर्सरी डिझाइन, स्पेस प्लानिंग, वॉडरोब डिझाइन
अपेक्षित खर्च :1,500 रुपये ते 12,000 रुपये प्रती चौरस फूट जागा
3. मानसी देसाई
‘डिझाइन्स फॉर लिव्हिंग’ अशी मानसी देसाई यांच्या फर्मची टॅगलाइन आहे. या टॅगलाइनचं तंतोतंत पालनदेखील केलं जातं. केवळ आर्थिफ फायद्यासाठी नाही तर डिझाइनद्वारे ग्राहकांचं व्यक्तिमत्त्व दिसावं, यासाठी ही टीम तत्पर असते. बदलत्या जीवनशैलीनुसार ही टीम ट्रेंड, साहित्य आणि डिझाइनमध्ये स्वतःला अपडेट करते. मागणीनुसार प्रोडक्ट देऊन ग्राहकांना खूश ठेवणं, हे देसाई टीमचं उद्देश आहे.
पत्ता : कॅसाब्लांका,1001, 10 मजला, जंक्शन ऑफ गुलमोहर क्रॉस रोड क्रमांक 10. समर्थ रामदास रोड, जेव्हीपीडी स्कीम, विले पार्ले पश्चिम मुंबई 400056
स्पेशलिटी : बाथरूम डिझाइन, बेडरूम डिझाइन, डायनिंग रूम डिझाइन, फ्लोअर प्लान, फर्निचरची निवड, होम ऑफिस डिझाइन, इंटिरिअर डिझाइन, किड्स बेडरूम डिझाइन, किचन डिझाइन, स्वयंपाकघराचे नूतनीकरण आणि पुनर्निर्मिती, लिव्हिंग रूम, नर्सरी रूम, प्लेरूम डिझाइन, स्पेस प्लानिंग, वॉडरोब डिझाइन, बाथरूम व्हॅनिटिज, बुककेस, कस्टम फर्निचर, कस्टम होम बार
अपेक्षित खर्च : 50 हजार रुपये ते 1 कोटी रुपये
4. सोनाली शहा
हाय रेसिडेन्शिअल आणि कमर्शिअल प्रोजेक्टमध्ये तब्बल 20 वर्षांचा अनुभव आहे.या डिझायनरला केवळ रंगसंगती आणि फर्निचर निवडण्यापेक्षाही एका सुंदर-आकर्षक डिझाइन निर्माण करण्यामध्ये अधिक भर देते. ही फर्म एक अशी जागा घडवते ज्यामध्ये वावरताना तुम्हाला अतिशय वेगळाच अनुभव येईल.
पत्ता : एस.व्ही. रोड, नौपाडा, विले पार्ले पश्चिम मुंबई 400056
स्पेशलिटी : बेसमेंट डिझाइन, बाथरूम डिझाइन, बेडरूम डिझाइन, रंगसंगती सल्ला, कस्टम बाथरूम व्हॅनिटिज, कस्टम बुककेस, कस्टम केबिनेट, कस्टम फर्निचर, कस्टम होम बार, डायनिंग रूम डिझाइन, इत्यादी
अपेक्षित खर्च : 50 लाख रुपये ते 5 कोटी रुपये
5. मयांक बिष्ट डिझाइन्स
एखाद्या जागेला संस्मरणीय करण्याचं काम मयांक बिष्ट डिझाइन कंपनी करते. फर्निचर निर्मिती ही त्यांची खासियत आहे. घेतलेले काम गांभीर्यानं पूर्ण करणं आणि ग्राहकांना आगळंवेगळं डिझाइन देण्यात यांचा हात कोणीही धरू शकत नाही. घर हे विश्रांती घेण्याचं हक्काचं ठिकाण आहे आणि हक्काचं घर आरामदायी असावं, हेच सुख देण्याचा प्रयत्न मयांक बिष्ट डिझाइन्स करत असतं.
पत्ता : C-26 अनुबेन निवास, चौपाटी, गिरगाव, मुंबई 400007
स्पेशलिटी : बाथरूम डिझाइन, बेडरूम डिझाइन, रंगसंगती सल्ला, कस्टम फर्निचर, फर्निचर निवड, होम ऑफिस डिझाइन, हाउस प्लान्स, इंटिरिअर डिझाइन, लिव्हिंग रूम डिझाइन, इत्यादी
अपेक्षित खर्च : एक लाख रूपयांपर्यंत
6. शिबानी मेहता
शिबानी मेहता यांची ‘नक्ष डिझाइन’ नावाची कंपनी आहे. प्रत्येक प्रोजेक्टमध्ये अचूकता आणि परिपूर्णता देणे हे त्यांच्या कंपनीचं वैशिष्ट्य आहे. ग्राहकांची लाइफस्टाइल, कुटुंब प्रणालीचा विचार करून ग्राहकांना डिझाइनसंदर्भात सल्ला दिला जातो. मेहतांनी घडवलेली डिझाइन साधी, मनमोहक, आकर्षक असतात पण त्यास फ्युजन टच देखील असतो.
पत्ता : रतन आबद बिल्डिंग, शॉप क्रमांक 7 आणि 8, टी.जे.रोड, भाटिया हॉस्पिटलच्या पुढे, ग्रँट रोड पश्चिम मुंबई 400007
स्पेशलिटी : बेसमेंट डिझाइन, बाथरूम डिझाइन, बेडरूम डिझाइन, रंगसंगती सल्ला,कस्टम फर्निचर, कस्टम किचन कॅबिनेट, डायनिंग रूम, फ्लोअर प्लान, लिव्हिंग रूम,इत्यादी
अपेक्षित खर्च : 10 लाख रुपये ते 50 लाख रुपये
7. रितिका चोखनी
रितिका चोखनी यांची ‘अरियोना इंटिरिअर’ नावाची कंपनी आहे. रिक्त जागेमध्ये उत्तम डिझाइन घडवून त्या जागेचा ही कंपनी अर्थ देते. राहतं घर आपलं व्यक्तिमत्त्व सादर करते, असे म्हणतात. ग्राहकांचं स्वप्नवत घराचं स्वप्न सत्यात उतरवणं, हे चोखनी यांची खासियत आहे.
पत्ता : वडाळा, मुंबई 400037
स्पेशलिटी : बाथरूम डिझाइन, बेडरूम डिझाइन, डायनिंग रूम डिझाइन, फ्लोअर प्लान, फर्निचरची निवड, होम ऑफिस डिझाइन, इंटिरिअर डिझाइन, किड्स बेडरूम डिझाइन, इत्यादी
अपेक्षित खर्च : 10 लाख रुपये ते 50 लाख रुपयांपर्यंतत
8. सायमा सालम
रेसिडेन्शिअल, कॉर्पोरेट ऑफिस, रिटेल, लाइफस्टाइल इत्यादी उत्तम सर्व्हिस सायमा सालम डिझाइन कंपनी आपल्या ग्राहकांना पुरवते. उत्कृष्ट डिझाइन आणि वेळेपूर्वी प्रोजेक्ट पूर्ण करणे यासाठी ही कंपनी बाजारा प्रसिद्धी आहे. अभ्यास आणि संशोधनानंतरच एखाद्या प्रोजेक्टला येथे आकार दिला जातो.
पत्ता : B/F -189 एक्स्प्रेस झोन,वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीच्या समोर, मालाड पूर्व मुंबई 400097
स्पेशलिटी : बाथरूम डिझाइन, बेडरूम डिझाइन, डायनिंग रूम डिझाइन, फ्लोअर प्लान, फर्निचरची निवड, होम ऑफिस डिझाइन, इंटिरिअर डिझाइन, किड्स बेडरूम डिझाइन, इत्यादी
अपेक्षित खर्च : 25 लाख रुपये ते 5 कोटी रुपयांपर्यंत
9. दारा मिस्त्री
दारा मिस्त्री यांची अॅस्ट्रल डिझाइन नावाची कंपनी आहे. घर आणि ऑफिस डिझाइनसाठी ही कंपनी प्रसिद्ध आहे. यांच्या प्रोजेक्टचे ले-आउट आकर्षित असे असतात. ग्राहकांना घर आणि ऑफिस दोन्हीसाठी उत्कृष्ट डिझाइन देण्याचा कंपनीचा प्रयत्न असतो.
पत्ता : 508, नमन मिडटाउन, बी-विंग, सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी रोड मुंबई 400013
स्पेशलिटी : बेसमेंट डिझाइन, बाथरूम डिझाइन, बेडरूम डिझाइन,कस्टम बुककेस, कस्टम कॅबिनेट, कस्टम फर्निचर, कस्टम होम बार, डायनिंग रूम, इत्यादी
अपेक्षित खर्च : 15 लाख रूपये ते 10 कोटी रूपये
10.सपना जैन
आजकालच्या स्पर्धेच्या जगात धावपळ केल्यानंतर एका निवांत जागेची प्रत्येकालाच गरज हवी असते, अशीच जागा निर्माण करण्याचं कौशल्य सपना जैन यांना लाभलं आहे. त्यांनी निर्माण केलेल्या डिझाइनमध्ये आपल्याला निवांत, आरामदायी क्षण अनुभवायला मिळतात.
पत्ता : A 301ईटर्निया हिरानंदानी गार्डन पवई मुंबई 400076
स्पेशलिटी : 3D रेंडरिंग, बाथरूम डिझाइन, बेडरूम डिझाइन, फ्लोअर प्लान, फर्निचरची निवड, होम ऑफिस डिझाइन, हाउस प्लान, इंटिरिअर डिझाइन, किड्स बेडरूम डिझाइन,इत्यादी
अपेक्षित खर्च : अंदाजे 1 लाख रूपयांच्या पुढे
इंटिरिअर डिझायनसंदर्भातील प्रश्नोत्तरे
1.मुंबईतील बेस्ट इंटिरिअर डिझायनरची निवड कशी करावी?
तुमच्या स्वप्नातल्या घराची संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी योग्य इंटिरिअर डिझायनरची निवड करणं अत्यावश्यक आहे. अनुभव आणि पूर्वीचे प्रोजेक्ट पाहून डिझायनरची निवड करा. तुमची आवड-बजेटनुसार आणि मुख्यतः तुम्ही आखून दिलेल्या वेळेत तुमचं घर,ऑफिसचं काम करणाऱ्या डिझायनरला प्राधान्य द्यावं.
2.मुंबईत इंटिरियर डिझाइनचा किती आहे खर्च?
इंटिरिअर डिझायनर्सचा अपेक्षित खर्च साधारणतः विविध गोष्टींवर अवलंबून असतो. घर, ऑफिस किंवा मालमत्तेचा प्रकार, जागेची रचना, डिझायनिंगची गरज, 3D/2D मॉडेलचे तंत्रज्ञान, कच्चा माल, मजूर आणि लागणार वेळ या सर्व गोष्टींवर होणार खर्च ठरवला जातो. तसंच 2-3 बीएचकेसाठी अंदाजे 2 ते 5 लाख रूपयांचा खर्च अपेक्षित असतो.
3.प्रोफेशनल इंटिरिअर डिझायनरची निवड का करावी?
इंटिरिअर डिझायनरची निवड करावी किंवा करू नये, हा प्रत्येकाचा खासगी प्रश्न आहे. पण जर तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास त्यांची तपशीलवार सर्व बारीक-बारीक गोष्टींवर नजर असते. सौंदर्यशास्त्र, गुणवत्ता, कोणती वस्तू कोणत्या ठिकाणी जास्त सुंदर दिसेल, याचं ज्ञान त्यांना अधिक असते. महत्त्वाचं म्हणजे डिझायनर तुमच्या बजेटनुसार डिझायनिंगची योजना आखतात.
4. इंटिरिअर डिझायनसाठी योग्य वेळ कोणती?
पावसाळ्यात शक्यतो इंटिरिअर डिझायनिंगचा पर्याय टाळा. घराचा कायापालट करण्यासाठी उन्हाळा किंवा हिवाळ्याचा ऋतू उत्तम. कारण या दिवसांत घराचा किंवा एखाद्या वस्तूचा रंग किंवा एखादं ओलसर मेटेरिअल सुकण्यासाठी अधिक वेळ लागत नाही.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.