ADVERTISEMENT
home / Weight Loss
पोटावरील चरबी घटवण्यासाठी करा 4 सोपे उपाय

पोटावरील चरबी घटवण्यासाठी करा 4 सोपे उपाय

तुम्हाला वजन कमी करायचं असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोटावरील चरबी कमी करायची असेल तर त्यासाठी योग्य डाएट फॉलो करणं गरजेचं आहे. त्यासाठी केवळ व्यायाम हा एकमेव उपाय नाही तर तुम्ही काय खाता आणि किती खाता यावरही अवलंबून आहे. न केवळ व्यायामाने वजन कमी होत ना केवळ रिकाम्या पोटी राहिल्याने. असं केल्याने कदाचित तुमचं वजन कमीदेखील होईल पण तुमचं शरीर मात्र कमजोर राहील. कारण व्यायाम तुमच्या शरीराचा स्टॅमिना, प्रतिकारशक्ती आणि मेटाबॉलिजम मजबूत करण्याची क्षमता वाढवतो. तर जेवल्याने आपल्या शरीरातील साखर आणि कार्ब्सचं प्रमाणही योग्य राहातं. त्यामुळे दोघांचंही संतुलन असणं आवश्यक आहे. पण सध्याच्या लाईफस्टाईलमुळे सर्वात जास्त चरबी जमा होते ती पोटावर. पोटावरील चरबी कमी करणं खूपच कठीण आहे पण अशक्य नाही. लठ्ठपणा आणि वजन कमी होतं पण बरेचदा पोटावरील चरबी मात्र तशीच राहाते. मग अशावेळी काय करायचं तर आम्ही तुम्हाला 4 सोपे उपाय सांगत आहोत. हे उपाय करून तुम्ही पोटावरील चरबी नक्की करू शकता. त्यासाठी तुम्हाला व्यायाम करून जास्त घाम गाळायचीदेखील गरज नाही. पाहूया नक्की काय आहेत हे उपाय. 

1. लाईफस्टाईल बदला

Shutterstock

वजन कमी करण्यासाठी मेटाबॉलिजम अथवा चयापचयाची क्रिया ही उत्तम असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला ग्रीन टी नक्कीच मदत करतं. तुम्हाला ग्रीन टी मुळे लगेच परिणाम दिसणार नाही. पण तुम्ही नियमित ग्रीन टी पित राहिलात तर त्याचा परिणाम नक्कीच होतो. त्याशिवाय तुम्ही दिवसभरात 8 तासाची झोप घेणं अत्यंत गरजेचं आहे. दिवसभर भरपूर पाणी प्या. तसंच आपल्या जेवणातील कुकिंग फॅट्स बदला, जास्त फायबरचा जेवणामध्ये समावेश करा. या सगळ्याचा परिणाम हा प्रत्यक्षपणे पोटात जमलेल्या चरबीवर होतो. तुमच्या चयापचयाच्या क्रियेला यामुळे मदत  मिळते. त्यामुळे वजन तर कमी होतंच पण मुळात तुमच्या शरीरातही उत्साह येतो. 

ADVERTISEMENT

2. भाजी जास्त प्रमाणात खा

Shutterstock

वजन कमी करण्यासाठी यापेक्षा सोपा उपाय काहीच नाही. वजन कमी करण्यात भाज्यांची भूमिका महत्त्वाची आहे. तुम्ही जर डाएट करत असाल तर तुम्ही आपल्या डाएटमध्ये भाज्यांचा समावेश करून घ्या. भाज्यांमध्ये अधिक प्रमाणात पोषण असतं. शिवाय भाजी जास्त खाल्ल्याने तुम्हाला भूक जास्त लागत नाही आणि भाज्यांनी वजनही वाढत नाही. भाज्यांमध्ये जास्त प्रमाणात फायबर असतं जे तुमच्या चयापचायच्या क्रियेसाठी फायदेशीर ठरतं. पण भाज्याही नक्की कोणत्या खायच्या हे लक्षात घ्यायला हवं. वजन वाढवणाऱ्या भाज्या तुम्ही जेवणातून बाद करायला हव्या. स्टार्ची अर्थात बटाट्यासारख्या भाज्या तुम्ही जास्त खाऊ नका. ब्रोकोली, कोबी, काकडी, गाजर अशा भाजी तुम्ही आपल्या जेवणात जास्त प्रमाणात समाविष्ट करून घ्या. याचा पोटावरील चरबी कमी करून वजन कमी करण्यासाठी जास्त उपयोग होतो. 

बेली फॅट नियंत्रणात आणून परफेक्ट फिगरसाठी ‘हे’ आहेत सोपे उपाय

ADVERTISEMENT

3. न सोललेला गहू आहारात समाविष्ट करा

Shutterstock

तुम्हाला जर तुमच्या पोटावरील चरबी कमी करायची असेल तर तुम्हाला तुमच्या तोंडावर नक्कीच नियंत्रण ठेवायला हवं. त्याशिवाय वजन वाढवणारे पदार्थ आहारातून कमी करायला हवेत. त्यामध्ये न सोललेल्या गव्हाचा तुम्ही समावेश करून घ्यायला हवा. तुम्ही हा गहू उकडवून सलाडमध्ये खायला वापरू शकता अथवा भाजीमध्ये शिजवूनदेखील तुम्ही हा गहू खाऊ शकता. नेहमीच्या गव्हामध्येही वजन वाढण्याची क्षमता अधिक असते. त्यामुळे तुम्ही या अशा गव्हाचा वापर करा. आपल्या घरात आलेला गहू हा सोललेला गहू असतो. ज्यामध्ये कमी सत्व असते. त्यामुळे अशा तऱ्हेच्या गव्हाचा आहारामध्ये समावेश करून तुम्ही एक चांगला पर्याय म्हणून वापरू शकता. 

पोटातील चरबी आणि वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे पपई

ADVERTISEMENT

4. आळशी करू शकते चरबी कमी

Shutterstock

तुम्ही रोजच्या जेवणात आळशीचं बी थोड्या प्रमाणात खायला लागल्यासदेखील याचा चांगला परिणाम तुम्हाला दिसून येईल. हा अतिशय सोपा उपाय आहे. जर तुम्हाला वजन आणि चरबी लवकर कमी करायचं असेल तर तुम्ही रोज आळशीचं बी काही प्रमाणात खा. याचं योग्य प्रमाण तुम्हाला माहीत असायला हवं. जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा मिळेल. तुम्ही आळशी कच्ची पण खाऊ शकता. पण तुम्हाला स्वाद वाढवायचा असेल तर आळशी तुम्ही भाजून घ्या. त्याची पावडर करून घ्या आणि ही पावडर तुम्ही एक चमचा पाण्यातून घ्या अथवा नुसती खा. त्याची चटणी करूनही तुम्ही रोज एक चमचा खाऊ शकता. हा उपाय अतिशय सोपा आणि तितकाच परिणामकारक आहे. 

पोटाची चरबी वाढण्याची नक्की काय आहेत कारणं, जाणून घ्या

ADVERTISEMENT

हे चारही उपाय पोटावरील चरबी घरच्या घरी कमी करण्यासारखे आहेत. तसंच याचा कोणताही दुष्परिणाम नाही. त्याशिवाय तुम्हाला जर जास्त  वेळ नसेल तर तुम्ही हे सोपे उपाय करून आपल्या शरीराची काळजी नक्कीच घेऊ शकता. पोटावरील चरबी लवकर कमी होण्यास मदत होईल. 

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

23 Jan 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT