केसांसाठी सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे केस नेहमी एकसारखे राहात नाहीत. कधी आपले केस इतके सुंदर दिसतात की, त्याकडे बघतच राहावं. पण कधीतरी असं होतं की, कितीही केसांची काळजी घेतली तरीही केसांचे हाल इतके वाईट होतात की आपल्याला खूपच वाईट वाटतं. अशावेळी केस अधिक गुंततात आणि खराब दिसतात. मग त्यावेळी केस बांधण्याशिवाय अथवा जास्तीत जास्त केसांची गुंडाळी करून ठेवण्याव्यतिरिक्त काहीही उपाय आपल्याला सुचत नाही. विशेषतः त्यावेळी जेव्हा तुमच्या केसांना दुहेरी फाटा (Split Ends) फुटलेला असतो. खरं तर यामुळेच जास्त समस्या निर्माण होतात. पण यासाठी तुम्हाला घरच्या घरी पटकन उपाय करता येतात. तुम्ही हे दुहेरी फाटा फुटलेले केस नक्कीच चांगले करू शकता. त्यासाठी तुम्हाला पार्लरमध्ये जाऊन सतत केसांवर प्रक्रिया करून घेण्याची गरज नाही. कारण पार्लरमध्ये जाऊन तुम्ही इतके पैसे खर्च करणार त्यापेक्षा तुम्हाला घरच्या घरी अगदी सहजरित्या ही समस्या दूर करता येईल. त्यासाठी तुमच्या घरात मेयोनीज असणं गरजेचं आहे. हे वाचून तुम्हाला नक्की धक्का बसला ना? हो पण तुम्ही योग्य वाचत आहात. मेयोनीजचा वापर करून तुम्ही तुमची Spit Ends ची समस्या दूर करू शकता.
केसांसाठी फायदेशीर ठरतं मेयोनीज
Shutterstock
मेयोनीज हे केसांच्या मऊ आणि मुयायमपणासाठी उपयुक्त ठरतं. तसंच तुमच्या केसांसाठी याचा फायदा तुम्हाला करून घेता येतो. दुहेरी केसांची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही मेयोनीजचा मास्क वापरू शकता. यामुळे तुमच्या केसांना योग्य पोषण मिळतं तसंच तुमच्या केसांना मजबूतीदेखील मिळवून देतं. फ्रिजी आणि कोरड्या केसांपासून सुटका मिळवून देण्यासाठी मेयोनीजचा मास्क हा उत्कृष्ट ठरतो. आम्ही तुम्हाला इथे मेयोनीजचे काही मास्क सांगणार आहोत. ज्याचा वापर करून तुम्ही नक्कीच तुमचे केस अधिक सुंदर बनवू शकता आणि तुम्हाला दुहेरी केसांपासूनही लवकरच सुटका मिळेल. पाहूया कोणते आहेत हे मास्क –
केसांना फुटलेत फाटे, काय आहेत त्यावर घरगुती उपाय
मेयोनीज आणि कोरफड जेल मास्क
Shutterstock
Split Ends पासून सुटका मिळवण्यासाठी तुम्हाला मेयोनीजचा एक हेअर मास्क बनवावा लागेल. ज्यासाठी तुम्ही 3 चमचेे मेयोनीज घेऊन त्यात 1 चमचा कोरफडची ताजी जेल मिक्स करा. हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर तुम्ही हे मिश्रण तुमच्या केसांना लावा आणि साधारण 1 तास हे तसंच राहू द्या. त्यानंतर माईल्ड शँपूचा वापर करून तुम्ही केस धुवा. आठवड्यातून 2 वेळा तुम्ही हा उपाय केल्यास, तुमची दुहेरी केसांची समस्या नक्की संपून जाईल.
Split Ends ची समस्या सोडवण्यासाठी वापरा 7 सोप्या टिप्स
मेयोनीज आणि बदामाच्या तेलाचा मास्क
Shutterstock
मेयोनीज केसांना मऊपणा देऊन त्यातील फ्रिजीपणा कमी करण्यास मदत करतो. हा हेअर मास्क बनवण्यासाठी ¼ कप मेयोनीज आणि ⅓ कप शुद्ध बदामाचं तेल आणि 2 अंडी इतकं मिश्रण मिक्स करून घ्या. त्याची पेस्ट बनवा. ही मिश्रण तुम्ही तुमच्या केसांवर पूर्ण लावा. साधारण अर्धा तास तसंच ठेवा आणि मग शँपू आणि कंडिशनरने तुम्ही तुमचे केस धुवा. आठवड्यातून तुम्ही दोन वेळा नक्की हे मिश्रण तुमच्या केसांना लावा आणि त्याचा उत्तम परिणाम पाहा.
केस घनदाट दिसण्यासाठी वापरा 7 सोप्या टिप्स
अॅव्हॅकॅडो हेअर मास्क
Shutterstock
मेयोनीजशिवाय तुमच्या केसांमधील दुहेरी केसांची समस्या दूर करण्यासाठी अजून एक फळ आहे ज्याचं नाव आहे अॅव्हॅकॅडो. विटामिन ई, मिनरल्स आणि फायटोन्यूट्रिएंट्सने भरपूर असलेल्या अॅव्हॅकॅडोमुळे केसांना अधिक मुलायमपणा येतो. हा हेअर मास्क बनवण्यासाठी अर्धा अॅव्हॅकॅडो पल्प घ्या आणि त्यामध्ये 1 चमचा बदामाचं तेल घाला आणि पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट तुम्ही केसांंना आणि स्काल्पवर लावा. काही वेळानंतर माईल्ड शँपूने केसा धुवा. दुहेरी केसांची समस्या यामुळे लवकर निघून जाईल.
घरगुती उपायांनी मिळवा सुंदर केस
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.