ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
या सवयींमुळे तुमच्यात होतील सकारात्मक बदल

या सवयींमुळे तुमच्यात होतील सकारात्मक बदल

जीवन जगताना दररोज तुम्हाला निरनिराळ्या आव्हानांना सामोरं जावं लागतं. ऑफिसचं टारगेट, घरच्या जबाबदाऱ्या, मुलांचं संगोपन, सामाजिक बांधिलकी यामुळे बऱ्याचदा स्वतःकडे लक्षच दिलं जात नाही. रोजच्या दगदगीने थकल्यामुळे मग नकळत तुमची चिडचिड होऊ लागते. दिवसभर घेतलेल्या शारीरिक कष्टाचा परिणाम तुमच्या मनावर होतो आणि मानसिक थकव्यामुळे पुन्हा शारीरिक समस्या निर्माण होतात. म्हणूनच या दुष्टचक्राला कधी ना कधी तरी मोडावंच लागणार. निरोगी शरीर आणि  मानसिक स्थैर्य हवं असेल तर स्वतःकडे पुरेसं लक्ष द्या. तुमच्या जीवनशैलीकडे पाहिल्यास तुमच्या सहज लक्षात येईल की तुमच्या मनात नकारात्मक विचारच वाढत आहेत. यासाठी स्वतःला काही सवयी लावा. ज्यामुळे तुमच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल आपोआप होऊ लागतील. 

सकारात्मक बदल हवे असतील तर या सवयी जरूर लावा –

रात्री वेळेवर झोपा –

आरोग्यशास्त्रानूसार माणसाने रात्री किमान सहा ते आठ तास शांत झोप घेणं गरजेचं आहे. मात्र आजकाल जवळजवळ सर्वांनाच उशीरा झोपण्याची सवय असते. ज्यामुळे रात्रीची झोप पूर्ण होत नाही. ज्याचा परिणाम तुमच्या दिवसभरांच्या कामावर होतो. आजकालच्या दगदगीच्या जीवनात रात्री झोपण्याची वेळ पाळणं कठीण असलं तरी अशक्य मुळीच नाही. यासाठीच रात्री शक्य तितक्या लवकर झोपण्याचा प्रयत्न करा.

सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा –

“लवकर निजे,लवकर उठे, त्यास आयु-आरोग्य लाभे” हे वाक्य तुम्ही नक्कीच ऐकलं असेल.  खरंतर पूर्वजांच्या या शिकवणीचे अनेक चांगले फायदे आहेत. ज्या लोकांना लवकर झोपून लवकर उठण्याची सवय असते ते  जीवनात सुखी, बुद्धीवान, श्रीमंत आणि निरोगी असतात. अनेक यशस्वी आणि श्रीमंत माणसांच्या यशाचे गुपिक लवकर उठण्याच्या सवयीत दडलेले आहे. जर तुम्हाला ही जीवनात सुखी आणि यशस्वी व्हायचं असेल तर लवकर उठण्याची सवय लावून घ्या. मात्र जर लवकर उठण्याची सवय लावायची असेल तर तुम्हाला आधी वेळेवर झोपण्याची सवय स्वतःला लावावी लागेल.

ADVERTISEMENT

दररोज कृतज्ञता व्यक्त करा –

माणूस हा समाजशील प्राणी आहे. स्वाभाविकच आपण अनेक गोष्टींसाठी समाजातील विविध लोकांवर अवलंबून असतो. समाजातील अनेक माणसं दिवसरात्री कष्ट घेतात ज्यामुळे आपला दिवस आनंदात जातो. शेतकरी शेतात राबतात, जवान सीमेवरून आपलं रक्षण करतात, इंजिनिअर आपलं घर बांधतात, सफाई कामगार दररोज तुमच्या घरातला कचरा स्वच्छ करतात असे आपण प्रत्यक्ष ओळखत असलेले अथवा नसलेले अनेक लोक तुमच्यासाठी काही ना काहीतरी करत असतात. समाजात आपल्यासाठी राबणाऱ्या अनेकांबद्दल  आपण कृतज्ञ राहणं फार गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपले आई,वडील, जोडीदार, मुले, शिक्षक, मदतनीस, सल्लागार, मित्रमैत्रीणी, डॉक्टर्स, शेजारी अशा अनेक लोकांची कृतज्ञता व्यक्त करणं गरजेचं आहे. यासाठी रात्री झोपताना डायरीत या सर्वांबद्दल लिहा आणि त्यांना धन्यवाद द्या. 

दररोज इतरांना मदत करण्याचा प्रयत्न करा –

सत्कर्म करण्यासाठी इतरांना जमेल तितकी मदत करणं, दानधर्म करणं नेहमीच चांगलं. गरजवंताला मदत केल्यामुळे मदत करणाऱ्या व्यक्तीलाच शेवटी समाधान मिळते. मात्र तुमच्याकडे जर इतरांना देण्यासाठी काहीच नसेल तर कमीत कमी समोरच्या व्यक्तीला स्माईल तरी नक्की द्या. कारण दिवसभराच्या दगदगीत इतरांकडून फक्त सुंदर हास्यजरी मिळालं तरी मनाला बरं वाटू शकतं.

दिवसभरात कमीतकमी दहा मिनीटे मेडिटेशन करा –

जर तुम्हाला तुमच्या शरीराचा आणि मनाचा उत्तम समतोल राखायचा असेल तर मेडिटेशन हा चांगला पर्याय आहे.  यासाठी तुम्ही कितीही बिझी असला तरी दिवसभरात कमीतकमी दहा मिनीटे मेडिटेशनसाठी काढा. ज्यामुळे तुमचे मन स्वस्थ आणि शांत राहील. मेडिटेशन करताना तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा ज्यामुळे तुमचे शारीरिक स्वास्थही चांगले राहील. 

 

ADVERTISEMENT

 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

हे ही वाचा-

ADVERTISEMENT

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अधिक वाचा –

यशस्वी जीवनासाठी प्रयत्नपूर्वक करा सकारात्मक विचार

तुमचं जीवन अधिक सुखकर करतील हे छोटेसे बदल

ADVERTISEMENT

कृतज्ञ राहण्यासाठी करा नियमित या छोट्या छोट्या गोष्टी

 

 

30 Jan 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT