19 जानेवारी 2020चं राशीफळ, तूळ राशीला मिळेल आनंदाची बातमी

19 जानेवारी 2020चं राशीफळ, तूळ राशीला मिळेल आनंदाची बातमी

मेष : उधार दिलेले पैसे पुन्हा मिळतील
आजचा तुमचा दिवस अतिशय आनंदमय राहील. एखादी महागडी वस्तू तुम्हाला भेट स्वरुपात मिळेल. उधार दिलेली रक्कम पुन्हा मिळू शकते. व्यवसायात फायदा आणि नोकरीतील उत्पन्न वाढेल. प्रवासाचा योग आहे.

कुंभ : अपत्याकडून खूशखबर मिळू शकते
आज भाग्योदयाचा दिवस आहे. अपत्याकडून आनंदाची बातमी मिळाल्यानं मनोधैर्य वाढेल. आईवडिलांचं सहकार्य आणि सहवास लाभेल.कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या सहकार्यामुळे मोठ जबाबदारी मिळू शकते.

मीन : नवे काम सुरू करणं टाळा
आज एखादे नवीन कामाची सुरुवात करणं टाळा. अडचणी निर्माण होऊ शकतात. जोखीम असलेल्या कामांपासून दूर राहा. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसोबत मतभेद होऊ शकतात. वादांपासून दूर राहा. व्यावसायिक करार रद्द होण्याची शक्यता आहे.

वृषभ : कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात
कामाच्या ठिकाणी अडचणी निर्माण होऊ शकतात. व्यावसायिक करार रद्द होण्याची शक्यता आहे. निरर्थक गुंतागुंत निर्माण होईल. प्रियकरासोबतचे संबंध दृढ होतील. अपत्यासंबंधी आनंदाची बातमी ऐकण्यास मिळण्याची शक्यता आहे.

(वाचा : जाणून घ्या प्रत्येकजण आपल्या राशीनुसार कसं व्यक्त करतात 'प्रेम')

मिथुन : पायांच्या दुखण्याची तक्रार
आज तुमचे गुडघे आणि पायांचे दुखणे उद्भवू शकते. खाण्यापिण्याच्या आणि नियमित दिनक्रमाची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी जबाबादारी वाढू शकतील. जोडीदाराचं सहकार्य मिळेल.

कर्क : एखादी व्यक्ती महत्त्वपूर्ण होईल
तुमच्यासाठी एखादी व्यक्ती विशेष स्वरुपात महत्त्वपूर्ण होईल. प्रेमसंबंधांना मार्ग मिळण्याची शक्यता आहे. परस्पर मतभेद विसरून एकत्रितरित्या कामाला लागा, यश नक्कीच मिळेल. कायदेशीर प्रकरणातून दिलासा मिळण्याचा योग आहे.

सिंह : कला-संगीतात आवड वाढेल
विद्यार्थ्यांची कला आणि संगीतात आवड निर्माण होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी परिस्थिती अनुकूल असेल. व्यवसायात फायदा होईल. तत्काळ लाभासाठी तडजोड करण्यास तयारी दर्शवाल.

(वाचा : यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा 'या' गुडलक वास्तू टीप्स)

कन्या : कर्ज घेणे टाळा
निरर्थक खर्च करणं टाळा. अडचणी निर्माण होऊ शकतात. कर्ज घेणे टाळा. वादांपासून दूर राहा. रखडलेली कामे पूर्ण करा. व्यवहाराच्या प्रकरणात सावधगिरी बाळगा. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होईल. आध्यात्मिक आवड वाढेल.

तूळ : अपत्याकडून आनंदाची बातमी मिळेल
आज तुम्हाला अपत्याकडून आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात मौज-मस्तीचं वातावरण असेल. व्यावसायिक योजनांमध्ये यश मिळेल. जोडीदारासोबत एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल.

वृश्चिक : कौटुंबिक नात्यांमध्ये कलह
कौटुंबिक नात्यात कलह कायम राहील. नवीन संपर्क प्रस्थापित करताना सावधगिरी बाळगा. विश्वासघात होऊ शकतो. वरिष्ठांसोबत मतभेद होऊ शकतात. निरर्थक वाद करणं टाळा. रचनात्मक कामांमध्ये प्रगती होईल.

(वाचा : वास्तूशास्त्रानुसार इतरांनी वापरलेल्या ‘या’ वस्तू मुळीच वापरू नका)

धनु : उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील
उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील. कौटुंबिक मालमत्तेचा हक्क तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक करारांमुळे फायदा होईल. कामाच्या ठिकाणी वेतनवाढ होण्याची शक्यता आहे. राजकारणात आवड वाढेल.

मकर : शारीरिक थकवा जाणवेल
आज होणाऱ्या निरर्थक धावपळीमुळे त्रस्त असाल. शारीरिक थकवा आणि अशक्तपणा जाणवण्याची शक्यता आहे. जोडीदाराचं भावनिक सहकार्य मिळेल. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. प्रतिस्पर्ध्यांपासून सतर्क राहा. मित्रांच्या भेटीगाठी होतील.