तुम्हाला माहिती आहे का, हेल्दी राहण्यासाठी दिवसभरात कितीदा खाल्लं पाहिजे

तुम्हाला माहिती आहे का, हेल्दी राहण्यासाठी दिवसभरात कितीदा खाल्लं पाहिजे

आपल्यापैकी बहुतांश जण दिवसातून तीन वेळा खाण्यापिण्यावर भर देतात. सकाळचा नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचं जेवण करणं आवश्यक आहे. पण काही जणांना दिवसभरात ठराविक वेळानंतर भूक लागते किंवा चार ते पाच वेळा खाण्याची सवय असते. पण दिवसातून तीन वेळा खाल्ल्यानं आरोग्य चांगलं राहतं कारण यामुळे जेवण चांगल्या पद्धतीनं पचते, असा काही जणांचा समज आहे. तर काही आरोग्य तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की, दिवसभरात पाच ते सहा वेळा थोड्या-थोड्या वेळानं  खाल्ल्यानं शरीर निरोगी राहण्यास मदत होते. आता तीन वेळा खाणं योग्य की सहा वेळा? यावरूनही गोंधळ आहे. सतत खाण्याच्या सवय म्हणजे थोड्या फार प्रमाणात अल्पोपाहार करणे. यामुळे शरीरात अधिक प्रमाणात कॅलरी साचून राहतं, जे आरोग्याच्या दृष्टीनं हानिकारक ठरू शकतं. कारण वारंवार खाण्याची सवयीमुळे आपण जंक फूडकडे कळत-नकळत आकर्षित होतो. तसं पाहायला गेलं तर दिवसभरात भरपूर वेळा अन्नपदार्थ खाणं वाईट बाब नाही, पण यावर तुम्ही पौष्टिक अन्नपदार्थ पोटात जाणं महत्त्वाचं आहे, असं आहारतज्ज्ञाचं म्हणणं आहे. शरीराला प्रत्येक दोन-तीन तासांनी थोड्या-जास्त प्रमाणात अन्नपदार्थांची आवश्यकता भासते. यामुळे अधे-मधे खाणं गरजेचं आहे.

(वाचा : सावधान ! तुमच्यात आढळली आहेत का ब्रेस्ट कॅन्सरची ‘ही’ लक्षणं)

shutterstock

आहारतज्ज्ञांनुसार, एकाच वेळेस भरपूर प्रमाणात अन्नपदार्थ पोटात ढकलण्याऐवजी थोड्या-थोड्या वेळानं खाणे कधीही फायदेशीर असते. कारण अशा पद्धतीनं खाल्ल्यास आपल्या शरीरात चरबी (Fats), विषारी अन्नपदार्थ साचून राहत नाहीत. सोबत शरीराची चयापचयाची क्षमता मजबूत होते. रक्तातील साखरेचं प्रमाण समतोल राहतं.  शरीरात ऊर्जा कायम राहते. जर तुम्ही वजन घटवण्यासाठी प्रयत्न करत आहात, तर दिवसभरात केवळ तीनच वेळा खाण्याऐवजी ठरवून काही वेळानं थोडं-थोडं खावे. महत्त्वाचे म्हणजे मोठ-मोठे घास घेण्याऐवजी छोटे-छोट घास खाण्याची सवय लावावी. जोपर्यंत जेवण तोंडामध्ये पूर्णतः विरळत नाही तोपर्यंत अन्नाचा घास योग्य पद्धतीनं चावला गेला पाहिजे. 

(वाचा : थंडीमध्ये जास्वंदीच्या फुलांचा चहा प्या, त्वचेच्या समस्या होतील कमी)

काय खावे- काय खाऊ नये?

पॉपकॉर्न :

पॉपकॉर्नमध्ये भरपूर प्रमाणात पौष्टिकतत्त्वांचा समावेश आहे. याचा आपल्या आहारात समावेश करावा. यामुळे वजन घटवण्यासाठी तुम्ही आहारतज्ज्ञांकडे आहार योजनेची (Diet Plan) विचारणा करता, त्यावेळेस तुम्हाला आहारात पॉपकॉर्नचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. बाजारात 98 टक्के फॅट फ्री पॉपकॉर्न उपलब्ध आहेत. मक्याचं पाकिट खरेदी करा आणि बटरमध्ये पॉपकॉर्न तयार करावे. पॉपकॉर्नमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि कॅलरी कमी प्रमाणात असतात. यामध्ये सोडिअम आणि साखरेची मात्रा सम प्रमाणात असते. यामुळे तुमचं पोट देखील भरलेलं राहतं आणि शरीरासाठी आरोग्यदायी तत्त्वेही मिळतात.   

(वाचा : आरोग्यासाठी स्वादानुसारच करा वेलचीचा वापर, अन्यथा होतील गंभीर परिणाम)

स्मूदी :

आपल्या आवडीच्या फळांचं स्मूदी तयार करून तुम्ही सेवन करू शकता. पण या रेसिपीमध्ये मलई असलेल्या दुधाऐवजी टोन्ड किंवा स्किम्ड दुधाचा वापर करावा. या रेसिपीतून तुम्हाला अनेक पोषकतत्त्वे मिळतात. 

गोड बिस्किट : 

गोड बिस्किट नियमित खाणे टाळा कारण बिस्किटांमध्ये फॅट्सचं प्रमाण भरपूर असतं. तुम्हाला बिस्किट खाणे आवडत असल्यास मारी बिस्किट खावे कारण यामध्ये फायबर अधिक प्रमाणात असते.  

हे देखील वाचा :
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.