जीवन जगत असताना आपल्याला सतत अनेकांची मदत मिळत असते. आपल्याला जन्म देणारे आईवडील, निसर्ग, दैनंदिन जीवनात लागणाऱ्या सर्व गोष्टी पूरवणारी माणसं अशा अनेक गोष्टी आणि माणसे यातून आपलं जीवन समृद्ध होत असतं. यासाठीच जीवन जगत असताना प्रत्येकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला हवी. कृतज्ञता व्यक्त करायची म्हणजे या सर्वांबद्दल सतत चांगले विचार करायचे आणि सर्वांबद्दल आभारी असणं होय. वास्तविक कृतज्ञता कशी व्यक्त करायची हेच अनेकांना माहीत नसतं. ज्यामुळे जीवनात सुखी असूनही ते सुख त्यांना अनुभवता येत नाही. यासाठीच आपण सकाळी उठल्याबरोबर पहिला श्वास घेण्यासाठी, डोळे उघडल्यावर पाहता येण्यासाठी, शांत झोप लागल्यामुळे उठल्यावर फ्रेश वाटण्यासाठी निसर्ग, परमेश्वराबद्दल कृतज्ञ राहायला हवं. आई-वडीलांमुळे हे जग पाहायला मिळालं, सुंदर जीवन मिळालं त्याबद्दल आपल्या जन्मदात्यांचे कृतज्ञ राहायला हवं. दिवसांगणिक तुमचं शरीर वाढतंय, रक्त, शारीरिक क्रिया, पचनक्रिया अशा अनेक क्रिया सुरळीत सुरू आहे त्याबद्दल शरीर आणि निसर्गाबद्दल कृतज्ञ राहायला हवं. लहानपणापासून ज्ञान देणाऱ्या शिक्षकांपासून ते दिवसभर घरात लागणाऱ्या वस्तूं आणि सार्वजनिक गोष्टींपर्यंत कृतज्ञ राहायला हवं.
कृतज्ञतेबाबत जगातील काही थोर व्यक्तीमत्वांचे विचार
कृतज्ञता ही माणसाला यशाच्या शिखरावर नेणारी एक महत्त्वाची पायरी आहे- सदगुरू श्री वामनराव पै
कृतज्ञता हे एक असे चुंबक आहे जे जगातील सर्व चांगल्या चांगल्या गोष्टी तुमच्याकडे खेचून आणू शकते – डॉ. मर्फी
तज्ञ माणूस कृतज्ञ होतो तेव्हा तो नक्कीच सुज्ञ होतो- प्रल्हाद वामनराव पै
तुम्हाला जीवनात जे जे हवं आहे ते मिळवण्यासाठी जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा – जीम रोहन
आभार व्यक्त करणे ही जगातील सर्वात मोठी प्रार्थना आहे जी कोणीही बोलू शकतं – एलीसन वॉकर
Shutterstock
कृतज्ञ राहण्यासाठी दररोज करा या गोष्टी –
जीवनात छोट्या छोट्या गोष्टींबद्दल आपण कसं कृतज्ञ असावं हे आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत.
1. सकाळी उठल्यावर अंथरूणातच पाच ते दहा मिनीटे डोळे मिटून बसा आणि तुमच्या आयुष्यातील प्रत्येकाबद्दल कृतज्ञता व्यक्त करा.
2. रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या डायरीत दिवसभर तुम्हाला मदत केलेल्या लोकांची नोंद करा.
3. सकाळी तुमच्या घरातील केर नेणाऱ्या सफाई कामगारापासून रात्री बिल्डिंगबाहेर पहारा देणाऱ्या वॉचमेन पर्यंत प्रत्येकाला भेटल्यावर थॅंक्स म्हणा.
4. कृतज्ञतेपोटी धन्यवाद म्हणण्याचा जाणिवपूर्वक सराव करा.
5. लहानपणापासून आतापर्यंत तुमच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटसमयी तुम्हाला देवाप्रमाणे मदतीसाठी उभ्या असलेल्या व्यक्तींना डोळ्यांसमोर आणून त्यांना मनातून धन्यवाद द्या.
6. कुटूंबीय, मित्रपरिवार, ऑफिसमधले सहकारी यांना रोज थॅंक्स म्हणायला विसरू नका.
7. स्वतःची शारीरिक आणि मानसिक स्तरावर काळजी घ्या.
8. जन्मदात्यांची काळजी घ्या आणि त्यांचा आदर राखा.
9. निसर्गाची, पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी झाडे लावा, सार्वजनिक ठिकाणी कचरा करू नका.
10. तुमच्या कुटुंबियांसोबत पुरेसा वेळ घालवा.
11. वर्तमान क्षणाबद्दल कृतज्ञ राहण्याचा प्रयत्न करा. वर्तमानकाळात तुमचं सर्वकाही चांगलं सुरू आहे याबद्दल परमेश्वराचे आभार व्यक्त करा.
12. स्वतःप्रमाणेच इतरांचाही विचार करा. कारण दुसऱ्यांच्या बाजूने विचार केल्यास तुम्हाला त्यांना काय म्हणायचं आहे हे लगेच कळू शकेल.
13. इतरांना दोष देण्यापेक्षा आणि त्यांची इतरांकडे तक्रार करण्यापेक्षा त्यांना माफ करण्याचा प्रयत्न करा.
14. इतरांना दररोज कमीत कमी स्मितहास्य तरी देण्याचा प्रयत्न करा.
15. जास्तीत जास्त नम्र राहण्याचा प्रयत्न करा.
16. इतरांसाठी जे काही कराल ते मनापासून करा.
17. इतरांचे बोलणे शांतपणे ऐकण्याचा प्रयत्न करा आणि मगच त्यांना प्रतीउत्तर द्या.
18. सर्वांना छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद देण्याचा प्रयत्न करा.
19. घरात येणाऱ्या प्रत्येकाचे मनापासून स्वागत करा.
20. आयुष्य फार छोटं आहे त्यामुळे लोकांना पटकन माफ करा.
21. दिलेलं वचन पाळा आणि उगाचच अशक्य वचन देऊ नका.
22. स्वतःचा आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांचा आदर करा.
23. इतरांचे मनापासून कौतूक करा.
24. सतत आनंदी राहण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःशी प्रामाणिक राहा.
25. दररोज अशी एक तरी गोष्ट करा ज्यामुळे तुम्हाला आणि इतरांना खरा आनंद मिळेल.
26. सतत सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करा.
27. दररोज व्यायाम, ध्यानधारणा आणि प्राणायम करा ज्यामुळे तुमच्या शरीराबद्दल तुम्ही कृतज्ञ राहू शकाल.
28. वर्षातून एकदा तरी एखाद्या अनाथ आश्रम, वृद्धाश्रम अथवा गरजू लोकांसाठी वेळ काढा.
30. राष्ट्राबद्दल कृतज्ञ राहण्याचा शक्य तितका प्रयत्न करा.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक
हे ही वाचा –
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.
अधिक वाचा –
नववर्षाची सुरूवात करा ‘या’ संकल्पांनी
यशस्वी जीवनासाठी प्रयत्नपूर्वक करा सकारात्मक विचार
जीवन जगताना मानसिक समाधान देतील हे ‘50′ आध्यात्मिक सुविचार