ADVERTISEMENT
home / Vastu
Vastu Tips : घरातील तव्याशी निगडीत आहे घरातील खुशाली

Vastu Tips : घरातील तव्याशी निगडीत आहे घरातील खुशाली

घरामध्ये आनंद आणि समृद्धीच वातावरण राहावं यासाठी घराची वास्तूही योग्य असणं आवश्यक असतं. स्वयंपाकघर किंवा किचन हा घरातील महत्त्वाचा भाग आहे आणि त्यामुळे वास्तूशास्त्रातही (Vastu) याला फार महत्त्व आहे. घरातील स्वयंपाकघर कसं असावं याबाबत वास्तूशास्त्रात अनेक टिप्स आहेत. ज्यामध्ये स्वयंपाकघराची रचना ते रोजच्या वापरातील भांड्यांपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे. कारण या गोष्टींचाही तुमच्या रोजच्या जीवनावर खोलवर परिणाम होत असतो. 

Shutterstock

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण अगदी किचनमध्ये ठेवलेली भांडीसुद्धा शुभ आणि अशुभ गोष्टी होण्याचं कारण ठरू शकतात. त्यामुळे किचनमधील भांड्यांचा वापर करतानाही काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. त्यातही किचनमध्ये सर्वात जास्त वापरलं जाणारं भांडं म्हणजे तवा (Pan). प्रत्येक घरात याचा उपयोग रोज हमखास होतोच. तुम्ही हे जाणून हैराण व्हाल की, तव्याशी निगडीतही काही खास वास्तू टिप्स आहेत. ज्यांची माहिती सर्वांना असली पाहिजे. खासकरून किचनमध्ये काम करणाऱ्या गृहिणीला तव्याशी निगडीत टिप्स माहिती असाव्यातच. किचनमध्ये योग्य दिशेला ठेवलेला तवा तुमच्या जीवनात सकारात्मकता आणू शकतो.

ADVERTISEMENT

Canava

  • दुसऱ्यांच्या नजरेपासून ठेवा दूर – लक्षात ठेवा किचनमध्ये तवा अशा ठिकाणी ठेवावा जिथे बाहेरून आलेल्या व्यक्तींची तो नजरेस पडणार नाही. कारण बाहेरच्या व्यक्तींची नजर तव्यावर पडणं, वास्तूशास्त्रानुसार अशुभ मानलं जातं. 
  • तव्यावर शिंपडा मीठ – सकाळी पोळी करण्याआधी तव्यावर मीठ शिंपडावं. या उपायाने घरात अन्नधान्य मुबलक प्रमाणात कायम राहतं. घरात समृद्धी आणि खुशाली राहण्यासाठी बनवलेली पहिली पोळी नेहमी प्राणीपक्ष्यांना द्यावी.
  • तवा कधीही ठेवू नका उलटा – किचनमध्ये कधीही तवा आणि कढई उलटी ठेवू नये. वास्तूशास्त्रानुसार असं केल्याने घरात अचानक घडणाऱ्या गोष्टींमध्ये वाढ होते.
  • लिंबू आणि मीठाने स्वच्छ करा तवा – लिंबू आणि मीठाचा वापर करून नेहमी तवा स्वच्छ करावा. वास्तूनुसार स्वच्छ आणि चमकत्या तव्याच्या मदतीने तुमचं नशीबही पालटू शकतं.
  • तवा कधीही खरवडू नये – तव्याची स्वच्छता ठेवताना कधीही तो खरवडू नये. गरम पाण्याच्या मदतीने त्यावर चिकटलेले पदार्थ काढावे. एवढंच नाहीतर तवा आणि कढईतून पदार्थ कधीही खाऊ नयेत किंवा ते उष्टेही करू नयेत. असं केल्याने वास्तूदोष निर्माण होण्याची शक्यता असते.
  • तवा नेहमी स्वच्छ धुवून ठेवावा – अनेक गृहिणी रात्री जेवण झाल्यावर तवा धुवून ठेवण्याचा कंटाळा करतात. पण असं कधीही करू नये. हा अन्नाचा अपमान करण्यासमान मानलं जातं. त्यामुळे रात्री जेवण झाल्याझाल्या तवा स्वच्छ करून ठेवावा.

Vaastu Tips : घरात कुठे असावा आरसा

#VaastuTips : जाणून घ्या कसं असावं देवघर

ADVERTISEMENT

Canava

जर तुमचाही वास्तूशास्त्रावर विश्वास असेल तर वरील तव्यासंबंधीचे उपाय नक्की करून पाहा.

घराला स्वच्छ ठेवण्याकरिता 6 सोप्या टिप्स

ADVERTISEMENT

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

 

07 Jan 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT