बऱ्याचदा काही घरांमध्ये तुम्हाला सतत भांडणं असल्याचं जाणवतं. काही घरांमध्ये सुखशांती आणि समाधानाचा अंशही नसतो. अशावेळी आपल्याला काही वास्तूदोष असल्याचंही सांगण्यात येतं. पण तुम्हाला जर घरामध्ये सुखशांती राखायची असेल तर तुमच्या स्वभावासह तुमच्या घरातदेखील काही वास्तूबदल करावे लागतात. त्यासाठी नक्की काय उपाय करायचे असतात याबाबतीत बऱ्याच टिप्स असतात. घरात आणि आपल्या ऑफिसमध्ये अथवा आपल्या आजूबाजूला सुखशांती हवी असेल तर त्यासाठी वास्तूचे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. या सगळ्या उपायांमुळे नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन वातारवण अधिक सकारात्मक बनवण्यास मदत मिळते. वास्तू नियमांप्रमाणे पूर्व आणि उत्तर ही दिशा अधिक उर्जात्मक आहे. त्यामुळे या दिशांना योग्य गोष्टी ठेवल्यास, आरोग्य, समृद्धी आणि इतर शक्तींचा विकास होतो. नक्की काय आहेत घरात सुखशांती राखण्यासाठी उपाय जाणून घ्या -
घरामध्ये सुखशांती राखून ठेवण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो. त्यासाठी आपला स्वभाव, तडजोड या सगळ्या गोष्टी तर असतातच पण त्यासह आपल्याला साथ हवी असते ती वास्तूदोष हटवण्याची. त्यामुळे त्यासाठी काय टिप्स फॉलो करायच्या हे जाणून घेऊया -
आपण बऱ्याचदा ही गोष्ट ऐकतो. पण याचं नक्की कारण काय हे आपल्याला माहीत नसतं. खरं तर हिंदू संस्कृतीनुसार मृत व्यक्तीचे पाय हे दक्षिण दिशेला करून ठेवले जातात. त्यामुळे दक्षिण बाजूला नकारात्मक ऊर्जा असते असं म्हटलं जातं. म्हणूनच कोणत्याही घराचं दार हे दक्षिणमुखी नसावं असंही सांगण्यात येतं. जर तुमचं दार दक्षिण बाजूला असेल तर त्याला पर्याय म्हणून तुम्ही त्याच दाराच्या समोर मोठा आरसा लावू शकता ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकणार नाही.
तुम्ही तुमच्या घर अथवा ऑफिस अथवा तुमच्या शो रूममध्येही पूर्व दिशेला लाकडी फर्निचर अथवा लाकडाने बनवलेल्या कोणत्याही वस्तू ठेवल्यात. उदाहरणार्थ सामान ठेवण्यासाठी वॉर्डरोब, शो पीस, लाकडी फ्रेममधील फोटोज तर यामुळे तुम्हाला सकारात्मक ऊर्जा घरामध्ये मिळते असं म्हटलं जातं. लाकडी वस्तू या घराला शोभाही देतात आणि बघायलाही प्रसन्न वाटतं त्यामुळे या गोष्टींचा उपयोग करावा.
घराच्या खिडक्या आणि दारं अशा ठिकाणी तुम्ही करून घ्यावीत जिथून तुमच्या घरामध्ये सूर्यप्रकाश अधिक येईल आणि घरात हसतंखेळतं वातावरण राहील. घरात सतत अंधार आल्यास अधिक प्रमाणात आजार निर्माण होतात. पण हेच जर अधिक आणि व्यवस्थित सूर्यप्रकाश सतत घरात येत असेल तर तुमच्या घरातील आजारपण दूर होऊन घरात सुखशांती आणि समाधान टिकून राहण्यास मदत होते. शिवाय घरातल्या प्रत्येक रूममध्ये किमान एकतरी खिडकी असावीच याकडे लक्ष द्या.
घराचा मुख्य दरवाजा म्हणजे घरात सकारात्मक शक्ती येण्याचा मार्ग. शौचालय हे सहसा आपल्या आरोग्यासाठी चांगलं मानण्यात येत नाही. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी तुमचं शौचालय हे घराच्या आतल्या बाजूला एखाद्या कोपऱ्याजवळ असणं अपेक्षित आहे. कधीही घरात प्रवेश करणार असलेल्या दरवाजाजवळ शौचालय बांधून घेऊ नये. त्यामुळे घरात सतत नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव राहातो.
कधीही तुमच्या झोपण्याच्या खोलीमध्ये झाडं लावणं योग्य नाही. याचं सर्वात महत्त्वाचं वास्तूनुसार आणि विज्ञानानुसारही कारण म्हणजे झाडं ही रात्री कार्बनडाय ऑक्साईड सोडत असतात. त्याचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होऊन आजारी पडण्याची भीती असते. आपल्याला रात्री झोपताना चांगल्या ऑक्सिजनची गरज भासते. मग असताना झाडं जर झोपण्याच्या खोलीत असतील तर नकारात्मक ऊर्जा पसरून तुम्ही आजारी पडू शकता. त्यामुळे सहसा झोपण्याच्या खोलीत तुम्ही झाडं अर्थात रोपटीही लावू नका.
खरं तर अगरबत्तीच्या सुवासाने संपूर्ण घरात सुगंध पसरतो. त्यातही चंदन हे अँटिऑक्सिडाईज्ड असतं आणि त्याचा आपल्या शरीराला चांगला फायदाच मिळतो. त्यामुळे घरातलं वातावरणही सुगंधी आणि प्रसन्न राहतं. सहसा अशा आनंदी वातावरणात कोणालाही भांडण करावंसं वाटणार नाही. त्यामुळे नियमित तुम्ही मानसिक तणावपासून दूर राहण्यासाठी घरात चंदनाची अथवा तुमच्या आवडीची कोणतीही अगरबत्ती संध्याकाळच्या वेळी लावा. तुम्हाला हवी असल्यास, दिवसातून दोनवेळादेखील तुम्ही याचा वापर करू शकता. यामुळे तुमचा तणाव कमी होऊन शांतता मिळते.
तुमच्या बेडरूम अशी कोणतीही वस्तू नसावी ज्यामुळे आवाज होईल. जसं रेडिओ, टीव्ही किंवा कोणतेही वाद्य यंत्र. यामुळे आर्थिक समस्या, मानसिक तणाव, आजारपण इत्यादी समस्या निर्माण होतात. आपल्या बेडरूममध्ये अशा ठिकाणी विंडचाइम लावावे जिथून हवा येत असेल. विंडचाईमचा मधूर आवाज कानावर पडल्याने तुम्हाला एक आनंद मिळतो आणि तणाव कमी होतो. तसंच घरातील वातावरणसुद्धा सकारात्मक आणि उत्साही राहण्यास मदत मिळते.
बेडच्या समोर कधीही आरसा नसावा. यामुळे समाजात बदनामी होण्याची सदैव चिंता राहते. वास्तुशास्त्रानुसार, सकाळी उठल्यावर सर्वात आधी आरसा बघू नये. जर तुम्ही असं केलंत तर दिवसभर तुमच्याबरोबर चुकीच्या गोष्टी होतील. ज्या तुम्हाला अतीव दुःख होईल. त्यामुळे सकाळी उठल्यावर असा एखादा फोटो बघा ज्याने तुम्हाला सकारात्मक उर्जा मिळेल. असं जर होणार नसेल तर सकाळी उठल्यानंतर तुम्ही किमान ५ मिनिट्स मेडिटेशन करा.
तुमची बेडरूम अशी असावी की जेणेकरून येणाऱ्या पाहुण्यांना तुमचा बेड थेट दिसणार नाही. जर दरवाजासमोर बेड असेल त्याला थोड शिफ्ट करा. नाहीतर वास्तुदोषामुळे दांपत्याच्या जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात. जर तुमची रूम छोटी असेल आणि बेड शिफ्ट करता येणार नसेल तर पडदा लावावा.
आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याबाहेर हत्तीच्या जोडीची मूर्ती ठेवा आणि घराबाहेर पडताना ती बघून निघा. यामुळे तुमचं गुडलक नेहमी कायम राहील आणि घर सुरक्षित राहील. तसंच कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करणार नाही.
आपल्याकडे शहरात प्रदूषण आणि धूळ सतत असते. त्यामुळे घर स्वच्छ ठेवण्यासाठी आपण सतत कचरा काढत असते. पण घरात भांडणं नको असतील तर सतत लक्षात ठेवा, घरात कधीही दोन वेळा केर काढू नये किंवा लादी पूसू नये. एकदाच केर-लादी केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. पण दुसऱ्यांदा अर्थात सतत केरकचरा काढत राहिल्यास, सकारात्मक ऊर्जा घरातून निघून जाते.
जेव्हा तुम्ही झोपायला जाता तेव्हा डोकं अशा दिशेला असावं की जेणेकरून तुम्ही जागे व्हाल तेव्हा तुम्ही उत्तर-पूर्व दिशेला असेल. कारण या दिशेला कुबेराचा वास असतो असं सांगण्यात येतं आणि असं केल्याने तुमच्या घरातील सुख-समृद्धीही वाढेल. कुबेर अर्थात संपत्ती त्यामुळे तुम्हाला कुबेर प्रसन्न होऊन तुमच्या घरातील सुखसमाधान टिकून राहण्यास मदत होते.
जर घरातील कोणी व्यक्ती महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाणार असेल तर लक्षात ठेवा की, बाथरूममध्ये एकही बादली रिकामी ठेऊ नका. प्रत्येक बादली पाण्याने भरलेली असली पाहिजे. बाथरुममध्ये शक्यतो निळ्या रंगाच्या बादल्याचा वापर करावा. बाथरूममध्ये निळा रंग वापरण चांगलं मानलं जातं. वास्तूशास्त्रानुसार बाथरुममध्ये नेहमी एक तरी निळ्या रंगाची बादली स्वच्छ पाण्याने भरून ठेवलेली असावी. असं केल्याने तुमचं गुडलक नेहमी चांगलं राहील आणि यशही मिळेल. यश मिळाल्यास, चिडचिड होणार नाही आणि घरातही शांतता टिकून राहील.
जर तुम्ही घर घेण्याच्या विचारात असाल किंवा घरात इंटरिअरप्रमाणे बदल करणार असाल तर लक्षात ठेवा की, स्वयंपाकघर बनवताना ते नेहमी दक्षिण-पूर्व दिशेला असावं. जर त्या दिशेला बनवणं शक्य नसल्यास उत्तर-पश्चिम दिशेला बनवून घ्या आणि स्वयंपाकघराचा दरवाजा उत्तर किंवा उत्तर-पूर्व दिशेला बनवा. वास्तूशास्त्रानुसार या दिशांना स्वयंपाकघर न केल्यास कुटुंबात सतत भांडणं होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमचं स्वयंपाकघर नक्की कोणत्या दिशेला आहे ते नीट तपासून घ्या.
आपल्याकडे बऱ्याच जणांच्या घरात स्वयंपाकघरातच देव्हारा असतो. पण वास्तुशास्त्र नेमकं याच्या उलट सांगतं. वास्तूनुसार, स्वयंपाकघरामध्ये किंवा जवळ कधीही देव्हारा असू नये. यामुळे घरातील लोकांच्या रागात वाढ होते. तसंच आरोग्यनिगडीत समस्याही वाढतात. त्यामुळे शक्य असल्यास देव्हारा तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरापासून दूर ठेवा आणि घराच्या हॉलमध्ये अथवा अन्य ठिकाणी तुम्ही हा देव्हारा करून घ्या.
हे अर्थातच तुमच्या मानण्यावर आहे. पण वास्तूशास्त्रानुसार काही गोष्टी तुम्ही फॉलो केल्यास, तुम्हाला त्याचा योग्य परिणाम पाहायला मिळतोय का हे तुम्ही एकदा अनुभव घेऊन पाहा.
या सगळ्या गोष्टी तुमच्या मनावर अवलंबून असतात. पण हे एक शास्र असतं. त्यामुळे तुम्ही जर या शास्त्रानुसार काही टिप्स फॉलो केल्यात तर तुम्हाला त्याचा परिणाम काय होतोय हे पाहायला मिळेल आणि हा तुमचा स्वतःचा अनुभव असेल.
हेदेखील तुम्ही सर्वतः तुमच्या मनावर अवलंबून आहे. तुमचं घर आधीच तुम्ही व्यवस्थित इंटिरिअर केलेलं असतं. त्यामुळे वास्तूशास्त्रानुसार तुम्हाला त्यात बदल करायचा आहे की नाही हा सर्वस्वी तुमचा निर्णय असेल.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.
मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.