चविष्ट पदार्थ खाण्याची आवड असणाऱ्या प्रत्येकाचेच आवडीची ठिकाणी ठरलेली असतात. काहींची खाऊ गल्ली ठरलेली असते, तर काहींना स्ट्रीट फूड प्रचंड आवडतं… तर काहींना हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये जाऊन वेगवेगळ्या पदार्थांची चव चाखणं अधिक प्रिय असते. मुंबई हे असं ठिकाण आहे जेथे कोणीही कोणत्याही वेळी उपाशी राहू शकत नाही, असं म्हटलं जातं. मुंबापुरीची हीच खासियत आहे. स्वप्ननगरी मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विविध प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ मिळतात. कुठे-कोणत्या प्रकारच्या पाककृती प्रसिद्ध आहेत, पदार्थाच्या चवीमध्ये नावीन्य काय आहे, याचा शोध खवय्ये नेहमीच घेत असतात. खास खवय्यांसाठी ‘PopXo मराठी‘नं मुंबईतील बेस्ट रूफ टॉफ रेस्टॉरंटची माहिती आणली आहे. जाणून घेऊया कोणत्या रेस्टॉरंटची काय खासियत आहे.
सोशल, वर्सोवा (Social, Versova)
वर्सोव्यातील ‘सोशल’ रूफ टॉप हॉटेल हे अनेक खवय्यांचे आवडतं ठिकाण आहे. विशिष्ट प्रकारे करण्यात आलेली हॉटेलची सजावट ग्राहकांना आकर्षित करते. उत्कृष्ट जेवण आणि सौम्य म्युझिक एन्जॉय करायचं असेल तर ‘सोशल रेस्टॉरंट’ला नक्की भेट द्या. या हॉटेलमधून शहराचं सुंदर दृश्य पाहायला मिळतं. मुंबईतील सर्वोत्तम रेस्टॉरंटच्या यादीमध्ये ‘सोशल’च्या नावाचा समावेश आहे. व्यावसायिक, स्थानिक रहिवासी आणि तरुण मंडळींचा हा आवडता अड्डा आहे.
रेस्टॉरंटची फूड स्पेशालिटी : नॉर्थ इंडियन, चायनीज, बिर्याणी, अमेरिकन, कॉन्टिनेंटल
पत्ता : 311/2, प्लॉट B, सावित्रीबाई ज्योतिबा फुले रोड, वर्सोवा लिंक रोड, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, मुंबई 400061
वेळ : सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्री उशिरा 1 वाजेपर्यंत उपलब्ध
संपर्क क्रमांक : 075063 94247
दोन जणांचा अंदाजे खर्च : 1400 रुपये
वाचा : मुंबईतील बेस्ट साऊथ इंडियन रेस्टॉरंट
रास्ता, खार (Raasta, Khar)
रास्ता रूफ टॉप रेस्टॉरंटमध्ये शांत आणि आल्हाददायक वातावरण आहे. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांकडून मिळणारी सर्व्हिस उत्तम आहे. पिझ्झा, कॉकटेल नाचोज, मॉकटेल, हनी चिली पोटॅटो, पिंक सॉस पास्ता, बर्गर हे ‘रास्ता’च्या मेनूमधील सर्वोत्कृष्ट पदार्थ आहेत. कॉन्टिनेंटल फूड, सी-फूड, इटालियन, फिंगर फूड या पाककृतींसाठी रास्ता हॉटेल प्रसिद्ध आहे.
रेस्टॉरंटची फूड स्पेशालिटी : कॉन्टिनेंटल, सी-फूड, इटॅलियन, स्टार्टर
पत्ता : रास्ता, चौथा-पाचवा मजला, रोहन प्लाझा, 5th रोड, Road, युनियन बँकजवळ, खार, मुंबई
वेळ : दुपारी 12 वाजल्यापासून ते रात्री उशिरा 1 वाजेपर्यंत उपलब्ध
संपर्क क्रमांक : +91 8655000811, +91 8655000833
दोन जणांचा अंदाजे खर्च : 1,800रुपये
वाचा : खवय्यांसाठी दक्षिण मुंबईतली बेस्ट रेस्टॉरंट्स
कँडी अँड ग्रीन (Candy And Green, Breach Candy)
हॉटेलचं नाव जरी विचित्र असलं तरी इंटिरिअर अतिशय सुंदर आहे. येथील वातावरण मंत्रमुग्ध करणारे आहे. येथील पदार्थ केवळ चवदारच नाहीत, तर ते पदार्थ पाहिल्यानंतर डोळे देखील सुखावतात. मिष्ठान्नासाठी हे ठिकाण स्वर्गाप्रमाणे आहे. एशियन फूड, इटालियन फूड, कॉन्टिनेंटल फूड, मिठाई, हेल्दी फूड हे कँडी अँड ग्रीन रेस्टॉरंटची खासियत आहे.
रेस्टॉरंटची फूड स्पेशालिटी : एशियन, इटॅलियन, कॉन्टिनेंटल, डेझर्ट्स, हेल्दी फूड
पत्ता : कँडी अँड ग्रीन रेस्टॉरंट, चौथा-पाचवा मजला, हब टाऊन स्काय बे, भुलाबाई देसाई रोड, ब्रीच कँडी, मुंबई : 400026
वेळ : दुपारी 12 वाजेपासून ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत उपलब्ध
दोन जणांचा अंदाजे खर्च : 2000 रुपये
वाचा : घाटकोपरच्या खाऊ गल्लीत काय आहे चविष्ट पदार्थ, टाकूया एक नजर
द मरिना अपर डेक (The Marina Upper Deck, Colaba)
कुलाब्यातील ‘सी पॅलेस’ हॉटेलमधील कॅफे मरीना (Cafe Marina) हॉटेल रूफ टॉप व्ह्यूसाठी सर्वात उत्तम जागा आहे. कॅफे मरीनामधून तुम्हाला समुद्र आणि ऐतिहासिक गेट-वे ऑफ इंडियाचा नयनरम्य देखावा पाहायला मिळेल. येथील प्रसन्न वातावरण तुम्हाला नक्कीच आवडेल. सूर्यास्त पाहण्यासाठी ही जागा सर्वात उत्तम आहे. येथील जेवणाची चव अप्रतिम आहे. तंदुरी आलू, द थिन क्रस्ट पिझ्झा, एगप्लान्ट पिझ्झा स्लायडर आणि चीज नान हे त्यांच्या मेनूमधील सर्वोत्कृष्ट पदार्थ आहेत. मोकळ्या आभाळाखाली जेवणाचा आस्वाद घेण्याची वेगळीच मजा येथे अनुभवायला मिळेल.
रेस्टॉरंटची फूड स्पेशालिटी : नॉर्थ इंडियन, इटॅलियन
पत्ता : कॅफे मरीना, सी पॅलेस हॉटेल, पी.जे. रामचंदानी मार्ग, अपोलो बंदर, कोलाबा, मुंबई 400005
वेळ : दुपारी 4 वाजल्यापासून ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत उपलब्ध
संपर्क क्रमांक : 022 61128000, +91 9594848120
दोन जणांचा अंदाजे खर्च : 1600 रुपये
रेटिंग : 3.8 स्टार
असिलो (Asilo, Lower Parel)
मुंबईमध्ये सर्वाधिक उंचावर असलेले हे रूफ टॉप रेस्टॉरंट आहे. तसं पाहायला गेलं तर लोअर परळ हा शहरातील जास्त प्रमाणात वर्दळ असणारा परिसर. पण 40 व्या मजल्यावर असलेल्या या रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर तुमच्या डोळ्यांना चहुबाजूंनी दिसणारा शहराचा देखावा नयनरम्य असाच आहे. हॉटेल थोडसं महागडं आहे, पण जिवाची मुंबई करण्यासाठी असीलो रेस्टॉरंटला एकदा तरी भेट द्या.
रेस्टॉरंटची फूड स्पेशालिटी : युरोपियन
पत्ता : The St. Regis, 40वा मजला, सेनापती बापट मार्ग, फीनिक्स मिल्स, लोअर परेल पश्चिम 400013
वेळ : संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून ते रात्री उशिरा 1:30 वाजेपर्यंत उपलब्ध
संपर्क क्रमांक : 022 71628031/ 7796849978
दोन जणांचा अंदाजे खर्च : 5,000 रुपये
रेटिंग : 4.1 स्टार ो
जामजर डिनर (Jamjar Diner, Versova)
जामजर डिनरचा सर्वोत्तम रेस्टॉरंटच्या यादीमध्ये समावेश आहे. लंच डेटसाठी ही जागा उत्तम आहे. सकाळच्या वेळेस एकदा तरी या हॉटेलला नक्की भेट द्यावी. अमेरिकन, इटालियन, मेक्सिकन, हेल्दी फूड इत्यादी पाककृती या हॉटेलची खासियत आहेत. नाचोज, बर्गर, पास्ता, कोकटेल, पिझ्झा, फ्राइज हे पदार्थ ग्राहकांना अतिशय आवडतात.
रेस्टॉरंटची फूड स्पेशालिटी : अमेरिकन, इटॅलियन, मेक्सिकन, हेल्दी फूड
पत्ता : 7A & B, आराम नगर 2, यारी रोड, वॉशिंग बेच्या मागील बाजूस, वर्सोवा , अंधेरी पश्चिम
वेळ : सकाळी 9 वाजेपर्यंत ते रात्री उशिरा 1 वाजेपर्यंत उपलब्ध
संपर्क क्रमांक : 7506640066/ 022 26358880
दोन जणांचा अंदाजे खर्च : 2,000 रुपये
रेटिंग : 4.1 स्टार
रूड लाउंज (Rude Lounge, Powai)
तरुणाईमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेले रेस्टॉरंट म्हणजे रुड लाउंज. या रेस्टॉरंटमध्ये तुम्ही वीकेंड मस्तपैकी एन्जॉय करू शकता. येथे तुम्हाला लाइव्ह डीजेचाही आनंद लुटता येईल. वाढदिवस साजरा करण्यासाठी, एखाद्या पार्टीचं नियोजन करण्यासाठी हे रेस्टॉरंट चांगला पर्याय आहे. या ठिकाणी वीकेंड सेलिब्रेट करण्याचा तुमचा प्लान असेल तर अॅडवान्समध्येच टेबल बुक करायला विसरू नका.
रेस्टॉरंटची फूड स्पेशालिटी : नॉर्थ इंडियन, इटॅलियन, चायनीज, कॉन्टिनेंटल, बीबीक्यू
पत्ता : आठवा मजला, बी विंग, सुप्रीम बिझनेस पार्क, हिरानंदानी गार्डन्स, पवई, मुंबई
वेळ : सकाळी 11.30 ते रात्री उशिरा 12.30 वाजेपर्यंत उपलब्ध
दोन जणांचा अंदाजे खर्च : 1,600 रुपये
रेटिंग : 4.5 स्टार
डोम रेस्टॉरंट (Dome Restaurant)
दक्षिण मुंबईतील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक प्रसिद्ध रेस्टॉरंट म्हणजे डोम रेस्टॉरंट. या हॉटेलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला समोरच समुद्र मनमोहक देखावा दिसेल. येथील अन्नपदार्थ अतिशय स्वादिष्ट आहेत.
रेस्टॉरंटची फूड स्पेशालिटी : जपानी, पिझ्झा, नॉर्थ इंडियन, एशियन
पत्ता : हॉटेल इंटरकॉन्टिनेंटल, 135, चर्चगेट, मुंबई 400020
वेळ : संध्याकाळी 5 वाजेपासून ते रात्री उशिरा 1.30 वाजेपर्यंत उपलब्ध
संपर्क क्रमांक : 022 39879999/ 9769611724
दोन जणांचा अंदाजे खर्च : 3,500 रुपये
रेटिंग : 4.2 स्टार
कसबाह ग्रँड (Kasbah Grand, Goregoan)
ज्यांना संध्याकाळी अतिशय आरामदायी वातावरणात मित्रमैत्रिणींसोबत जेवणाचा आस्वाद घेणे पसंत असेल त्यांनी ‘कसबाह ग्रँड’ रेस्टॉरंटला एकदा तरी भेट द्यावी. काही अपवाद वगळता येथील पदार्थांचा आस्वाद समाधानकारक आहे. शाकाहारी खवय्यांना ही जागा नक्कीच आवडेल. वीकेंडला रेस्टॉरंटमध्ये फार गर्दी असते. त्यामुळे अॅडवान्समध्ये बुकिंग करायला विसरू नका.
रेस्टॉरंटची फूड स्पेशालिटी : नॉर्थ इंडियन, मोघलाई, चायनिज, थाय, सी-फूड
पत्ता : टॉप फ्लोअर, चांदीवाला आर्केड, गोरेगाव लिंक रोड, गोरेगाव पश्चिम 400090
वेळ : दुपारी 12 वाजेपासून ते रात्री उशिरा 3 वाजेपर्यंत उपलब्ध
संपर्क क्रमांक : 00 2248932017
दोन जणांचा अंदाजे खर्च : 2,000 रुपये
रेटिंग : 4.6 स्टार
द टेरेस (The Terrace)
ज्यांना मासांहार करणं आवडतं, त्यातही जे चिकन प्रेमी आहेत, अशा लोकांनी ‘द टेरेस’ हॉटेलला नक्की भेट द्यावी. शांत निवांत अशा या हॉटेलमध्ये स्वादिष्ट अन्नपदार्थाचा नक्की आस्वाद घ्या.
रेस्टॉरंटची फूड स्पेशालिटी : नॉर्थ इंडियन, कॉन्टिनेंटल
पत्ता : पहिला मजला, हॉटेल किंग, इंटरनॅशनल कम्पाउंड, जुहू तारा रोड, जुहू
वेळ : दुपारी 12 वाजेपासून ते रात्री उशिरा 3 वाजेपर्यंत उपलब्ध
संपर्क क्रमांक : 9665295999
दोन जणांचा अंदाजे खर्च : 1,200 रुपये
रेटिंग : 4.4 स्टार
ओहेका रेस्टॉरंट (Oheka Restaurant)
वांद्र्यातील हे रूफ टॉप हॉटेल तुमच्या खिशाला परवडणारे आहे. म्युझिक, आरामदायी जागा आणि हॉटेलच्या स्टाफकडून मिळणारी उत्कृष्ट सर्व्हिसिंग या सर्व गोष्टींमुळे ‘ओहेका रेस्टॉरंट’ नक्की आवडेल.
रेस्टॉरंटची फूड स्पेशालिटी : नॉर्थ इंडियन, एशियन, इटॅलियन, मेक्सिकन
पत्ता : 132, तिसरा मजला, C’est La Vie बिल्डिंग, सईद वाडी, हिल रोड, वांद्र पश्चिम
वेळ : दुपारी 1 वाजेपासून ते रात्री उशिरा 1.30 वाजेपर्यंत उपलब्ध
संपर्क क्रमांक : +91 9324029879/+91 7977579868
दोन जणांचा अंदाजे खर्च : 1,600 रुपये
रेटिंग : 4.6 स्टार
90 फूट वरील, बोरिवली (90 Ft Above, Borivali)
बोरिवलीकरांची ही सर्वांत आवडती जागा आहे. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी हे रेस्टॉरंट आहे. तुमच्या जोडीदाराला ही जागा नक्कीच आवडेल. येथून दिसणारा शहराचा देखावा अत्यंत सुखद असा आहे. महत्त्वाचे म्हणजे हे रेस्टॉरंट तुमच्या खिशाला परवडणारे आहे.
रेस्टॉरंटची फूड स्पेशालिटी : नॉर्थ इंडियन, इटालियन, एशिया
पत्ता : द रूफटॉप, सातवा मजला, विनि एलेगन्स, एल.टी.रोड, तनिष्क शोरूमच्या वर, बोरिवली पश्चिम
वेळ : दुपारी 12 वाजल्यापासून ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत उपलब्ध
संध्याकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री उशिरा 12:15 वाजेपर्यंत उपलब्ध
संपर्क क्रमांक : 8655059090/022 28991900
दोन जणांचा अंदाजे खर्च : 1,600 रुपये
रेटिंग : 4 स्टार
रूफटॉप रेस्टॉरंटसंदर्भातील प्रश्नोत्तरे (FAQs)
1. रोमँटिक डिनरसाठी मुंबईतील रूफ टॉप रेस्टॉरंटचा चांगला पर्याय कोणता?
उत्तर : जोडीदारासोबत रोमँटिक डिनर करण्यासाठी तुम्ही एखाद्या चांगल्या जागेच्या शोधात असाल तर वरळीतील ‘एर लाउंज’ आणि पवईतील ‘ब्रीझ लाउंज’ रूफ टॉप रेस्टॉरंट हे उत्तम पर्याय आहेत. एर लाउंजमध्ये जाण्याचं ठरवल्यास तुम्हाला रोमँटिक वातावरणासह समुद्राचे सुंदर दृश्य पाहायला मिळेल. एर लाउंजमध्ये तुम्हाला बजेटमध्ये रोमँटिक डिनर डेट एन्जॉय करता येईल.
2. दक्षिण मुंबईतील सर्वात बेस्ट रूफ टॉप रेस्टॉरंट कोणते?
उत्तर : दक्षिण मुंबईतील प्रत्येक रूफ टॉप रेस्टॉरंट तेथील निरनिराळ्या कारणांसाठी प्रसिद्ध आहेत. काहींना एखाद्या रेस्टॉरंटमधील वातावरण-रूफ टॉप व्ह्यू पसंतीस पडतो, तर काही जण केवळ स्वादिष्ट भोजनासाठी त्यांच्या आवडीच्या हॉटेलला भेट देतात.
- कोलाब्यातील ‘कोयला’ रेस्टॉरंट (Koyla) सर्वात सुंदर जागा आहे. कारण येथे समोरच समुद्राचा सुंदर देखावा नजरेस पडतो.
- नॉर्थ इंडियन, चायनिज आणि कॉन्टिनेंटल फूड…स्वादिष्ट पाककृतीचा खुल्या हवेत आस्वाद घ्यायचा असेल तर ‘बेव्ह्यू कॅफे’ बेस्ट जागा आहे. हे रेस्टॉरंट देखील कोलाबा येथेच आहे.
3. रात्रीच्या जेवणासाठी मुंबईतील बेस्ट ठिकाण कोणते?
उत्तर : टल्ली टरमरीक (Talli Turmeric) हे रेस्टॉरंट तुमच्या खिशालाही परवडणारे आहे. रात्री उशिरा 1 वाजेपर्यंत हे रेस्टॉरंट ग्राहकांसाठी उपलब्ध असते. मुंबईच्या मध्यभागी म्हणजे वरळी येथे हे रेस्टॉरंट आहे. दोन जणांचा अंदाजे खर्च 1500 रुपये अपेक्षित आहे. शाकाहार आणि मासांहाराचा तुम्ही येथे आस्वाद घेऊ शकता. आयुष्यातील खास व्यक्तीसोबत किंवा कुटुंबीयांसह या रेस्टॉरंटमध्ये जाण्याचा प्लान तुम्ही आखू शकता.