ADVERTISEMENT
home / Make Up Trends and Ideas
मेकअप कधी करावा? तुम्हालाही पडतो का प्रश्न

मेकअप कधी करावा? तुम्हालाही पडतो का प्रश्न

आपल्या सगळ्यांकडे मेकअपचे साहित्य असते. त्यांचा वापर करायचा हे ही आपल्याला माहीत असते. पण मेकअप कधी करावा? हा अनेकांना पडतो. कारण मेकअपचे वेगवेगळे प्रकार पाहता मेकअप नेमका कधी आणि कसा करावा? असा प्रश्न पडणे फारच स्वाभाविक आहे. ऑफिसला जाताना, डेटवर जाताना, लंच किंवा डिनर पार्टीला जाताना नेमका मेकअप करावा की करु नये? असे काही प्रसंग आल्यानंतर असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर तुमच्यासाठी या काही टिप्स आहेत. ज्या तुम्हाला तुमच्या प्रश्नांचे उत्तर मिळण्यास मदत करतील… मग करुया सुरुवात

डोळ्यांना आयशॅडो लावताना या हमखास चुका अशा येतील टाळता

मेकअप म्हणजे काय?

मेकअपचे साहित्य

shutterstock

ADVERTISEMENT

आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे मेकअप म्हणजे काय ? चेहऱ्याला सौंदर्यप्रसाधने लावून अधिक सुंदर दिसणे. अशी आपण याची सर्वसाधारण व्याख्या करुया. आता यामध्ये प्रामुख्याने डोळे, ओठ आणि गाल यांच्यावर अधिक लक्ष केंद्रीत केले जाते. आता तुमच्या चेहऱ्यावरील हे भाग अधिक सुंदर दिसण्यासाठी आपण काजळ, आयलायनर, मस्कारा, ब्लशर, हायलायटर, लिपस्टिक यांचा वापर करतो. सगळ्यांकडेच हे साहित्य असते. हे साहित्य म्हणजेच मेकअप होय. 

आता नो टेन्शन…मेकअप जास्त वेळ टिकण्यासाठी फॉलो करा या टिप्स

मेकअप कधी करावा?

मेकअप करताना हे लक्षात ठेवा

shutterstock

ADVERTISEMENT
  •  मेकअप करण्यासाठी हमखास निमित्त हवं. तुमच्याकडे सगळे साहित्य आहे म्हणून तुम्हाला मेकअप करुन चालत नाही. 
  • जर तुम्ही ऑफिसला जात असाल तर तुम्हाला प्रत्येक दिवशी #heavy मेकअप करण्याची गरज नाही. तुम्ही कॉम्पॅक्ट, आयलायनर, काजळ, मस्कारा, लिपस्टिक इतके लावले तरी पुरेसे आहे.
  • जर तुम्ही लंच किवा डिनर पार्टीला जाणार असाल अशावेळीही तुम्हाला मेकअप फार जपवून करावा लागतो. याचं कारण असं की तुम्ही यामध्ये जेवणाचा आस्वाद घेता. अशावेळी तुमचा मेकअप खूप जास्त असेल तर जेवणानंतर तुमचा मेकअप निघण्याची शक्यता असते. जर तुम्ही लंचला जाणार असाल तर तुम्ही मेकअप करताना बेस लावला तर चालेल. त्यावर आयलायनर, काजळ,मस्कारा आणि लाईट शेडची लिपस्टिक लावा. म्हणजे तुम्ही या लंच पार्टीला फ्रेश दिसाल टॅकी नाही. 
  • जर तुम्ही डीनरला जाणार असाल तर तुम्हाला मेकअप थोडा जास्त केला तर चालू शकतो. पण डीनरलाही जेवणाचा आस्वाद घेणे आले अशावेळी तुम्ही लाल किंवा गडद रंगाची लिपस्टिक लावणार असाल तर ती लाँग लास्टिंग असल्यास फारच उत्तम 
  • बॉयफ्रेंडसोबत डेटवर जाणं किंवा कोणासोबत कॉफीला जाताना जर तुम्हाला त्याच्यावर तुमचा ठसा उमटवायचा असेल अशावेळी तुम्ही खूप मेकअप करु नका. अति मेकअपमुळे तुम्ही फार आर्टीफिशिअल दिसू शकता. त्यामुळे अशावेळी तुम्हाला फ्रेश आणि हटके दिसायचे असेल तर तुम्ही कमीत कमी मेकअपचा उपयोग करा. अशा मिटींग्जमध्ये तुमचे डोळे अधिक बोलके आणि प्रसन्न वाटायला हवेत. अशावेळी तुम्ही मस्कारा आणि बारीक आयलायनर लावले तर चांगले दिसेल. अशावेळी तुम्ही तुमच्या ओठांसाठी एखादे लीप बाम लावले तरी पुरेसे आहे. 
  • लग्न किंवा यासारख्या मोठ्या सोहळ्यासाठी तुम्ही तयार होत असाल तर तुम्हाला तुमच्या गेटअपनुसार मेकअप करणे गरजेचे असते. हा असा सोहळा असतो ज्यावेळी तुम्हाला अगदी परफेक्ट तयार व्हायचे असते. अशावेळी तुम्ही फाऊंडेशनपासून सगळे लावले तरी चालू शकते. ( जर तुम्ही अशा सोहळ्यांसाठी मेकअप करत नसाल तर तुम्ही मेकअप करायलाच हवा कारण हाच तो परफेक्ट दिवस असतो जेव्हा तुम्ही मेकअप करायला हवा)
  • जर तुम्ही प्रवास करत असाल तर तुम्ही शक्यतो मेकअप करु नका याचे कारण तुम्हाला तुमच्या मेकअपला टचअप करण्याची वेळ मिळेल असे सांगता येत नाही. शिवाय तुम्हाला सतत टिश्यू पेपर घेऊन मेकअप स्वच्छ करण्याची गरज भासू शकते म्हणून तुम्ही प्रवास करताना मेकअप टाळा. 
  • जर तुमचा रोजचा प्रवास हा सार्वजनिक वाहनांमधून होत असेल तर तुम्ही तुमचा मेकअप थोडा लाईट ठेवा. कारण जर तुम्ही गडद मेकअप केला असेल तर तो खराब होण्याची शक्यता जास्त असते.
  • जर तुम्ही शॉपिंग किंवा मॉल भटकायला जाणार असाल तरीसुद्धा  तुमचा मेकअप हा लाईट असला पाहिजे. विशेषत: ज्यावेळी आपण कपड्याची शॉपिंग करतो अशावेळी तुम्ही ट्राय करत असलेल्या नव्या कपड्याला मेकअप लागण्याची शक्यता असते. त्यामुळे ट्रायल किंवा अशा शॉपिंगसाठी तुम्ही मेकअप न केलेला बरा. जर तुम्हाला तुमचा चेहरा अगदीच मेकअप न करता वेगळा वाटत असेल तर चेहऱ्याला मॉश्चरायझर आणि लीप बाम लावा तितकेही पुरेसे असते. 
  • काही जणांना अगदी कुठेही जाताना मेकअप करण्याची सवय असते. पण असं करु नका. मेकअपमुळे तुम्ही जितके सुंदर दिसता. तितकेच तुम्ही लाऊड ही दिसू शकता. अगदी क्षुल्लक कारणासाठी मेकअप अजिबात करु नका. 

आता मेकअप कधी करावा असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर या गाईडलाईन नक्की फॉलो करा. 

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

11 Feb 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT