आता नो टेन्शन...मेकअप जास्त वेळ टिकण्यासाठी फॉलो करा या टिप्स

आता नो टेन्शन...मेकअप जास्त वेळ टिकण्यासाठी फॉलो करा या टिप्स

जर ऊन लागलं की, टेन्शन येतं ते मेकअपचं. कारण गरम व्हायला लागलं की, घाम येतो आणि मग चिकचिक जाणवू लागली की, मेकअप स्मजी आणि तेलकट दिसू लागतो. तसंच मेकअप कधी पसरू लागेल सांगता येत नाही. अशावेळी एखाद्या फंक्शनला किंवा मीटिंगला पोचायचं असेल आणि टचअपसाठी वेळ नसेल तर अजूनच चिंता वाटू लागते. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत काही खास टिप्स. ज्यामुळे तुमचा मेकअप जास्त वेळ टिकून राहील.

Canva

  • आय मेकअप ठेवा वॉटरप्रूफ

शिमरी आणि क्रीम आयलाईनरने डोळ्यांच्या सुंदरतेत वाढ होते पण जर ते वॉटरप्रूफ नसेल तर प्रोब्लेम होऊ शकतो. पण डोळ्यांचा मेकअप बिघडल्यास पूर्ण लुक खराब होऊ शकतो. म्हणूनच नेहमी निवडा वॉटरप्रूफ आय मेकअप. 

  • मेकअप लेयर्स ठेवा कमी 

फाऊंडेशन भरपूर प्रमाणात एकावर एक लेयर लावणं टाळा. यामुळे तुमच्या त्वचेचं पोर्स ब्लॉक होतील आणि त्यामुळे मॉईश्चर असलेल्या हवामानात मेकअप खराब होण्याची शक्यता असते. जर तुम्हाला हे टाळायचं असल्यास नेहमीच लाईटवेट फाऊंडेशन वापरा. जे तुमच्या त्वचेला देईल श्वास घेण्याची संधी. 

  • मिस्टचा करा वापर

त्वचा तजेलदार दिसण्यासाठी टोनर किंवा मिस्ट स्प्रेचा वापर सुरू करा. हे मेकअप करण्याआधी आवर्जून लावा. यामध्ये व्हिटॅमीन सी, ग्रीन टी, फ्रूट वॉटरसारखे पर्याय असतात. जे तुमच्या स्कीनची जळजळ कमी करतात. 

  • डार्क लिपस्टिक निवडू नका

डार्क किंवा भडक रंगाच्या लिपस्टिक आकर्षक वाटतात. पण खराब झाल्यावर मात्र तुमचा लुक बिघडवतात. त्यामुळे डार्क शेड्सऐवजी लाईट शेड्सची निवड करा. ज्या स्मज झाल्यावरही वाईट दिसत नाहीत आणि लुकही मेंटेन होतो. 

  • पावडरचा करा वापर

जर प्रत्येक वेळी तुमचा मस्कारा पसरून खराब होत असेल तर तुमच्या डोळ्यांखाली लावा ट्रान्सपरंट पावडर डॅब करू शकता. यामुळे तुम्हाला जास्त वेळ मेकअप टिकवण्यास मदत होईल.

Instagram

तुम्हीही वरील टिप्स वापरून जास्त काळ मेकअप टिकवू शकता. तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या आम्हाला नक्की सांगा. तुमच्याकडेही मेकअपबाबतच्या काही वेगळ्या टिप्स असतील आम्हाला सांगा. 

POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.