ADVERTISEMENT
home / Love
नातं समजून घ्यायला वर्ष लागतात आणि तोडायला फक्त दोन मिनिटं

नातं समजून घ्यायला वर्ष लागतात आणि तोडायला फक्त दोन मिनिटं

प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो . त्यामुळे एकमेकांसोबत जुळवून घेताना थोडीशी जुळवाजुळव करावी लागतेच. एखादी व्यक्ती चिडखोर असते,एखादी संथ तर एखादी इतकी प्रेमळ की तो गोडवा ही नकोसा होतो एकूणच काय ‘परफेक्ट’ असं कोणी नसतंच. सगळ्यांशीच आपल्याला थोड्याफार फरकाने एकमेकांशी जुळवून घ्यावे लागते. यालाच ‘रिलेशनशीप’ असे म्हणतात. पण जुळवून घेणे ही काहींची वृत्ती नसते. त्यामुळेच इतकी वर्ष जुळवलेलं नातं तोडायला ते अगदी पटकन तयार होतात. नातं जोडायला आणि टिकवून ठेवायला वर्षानुवर्ष लागतात. पण तोडायला अगदी एक भांडण ही पुरेसे असते. असे तुमच्यासोबतही कधी झाले असेल तर तुम्ही काही गोष्टींचा बोध जयेश आणि नेहाच्या अनुभवातून घ्यायला हवा.

रिलेशनशीपमध्ये गैरसमज होतायत? मग या गोष्टी तुम्हाला माहीत हव्या

गोष्ट नेहा आणि जयेशची

नातं तोडण्याचा पटकन करु नका विचार

shutterstock

जयेश आणि नेहाच्या नात्याला आता चांगली दोन वर्ष झाली होती. त्यांचे एकमेकांवर नितांत प्रेम होते. दोघांच्या एकमेकांकडून प्रेमाव्यतिरिक्त काहीच अपेक्षा नसल्यामुळे त्यांचे अगदी छान सुरळीत सुरु होते. दोघांना एकमेकांना देण्यासाठी फारसा वेळ नसला तरी सुद्धा त्यांनी एकमेकांना समजून घेतले होते. पण नेहाला जयेशचा दुरावा आता सहन होत नव्हता. लांब राहून न भेटता प्रेम टिकवले पण आता आपण एकमेकांच्या जवळ असायला हवे असे नेहाला वाटत होते. त्यामुळे नेहाची सतत चीडचीड होऊ लागली. जयेशला भेटण्यासाठी त्याच्यासोबत वेळ घालवण्यासाठी ती कारणं काढू लागली. जयेशला बदलेल्या नेहाचा स्वभाव फारच त्रास देत होता. आधीच्या दोन वर्षात कधीही कोणता हट्ट न करणारी नेहा अचानक हट्टी का होतेय ? यामागचे कारण शोधण्याऐवजी तो नेहाला सतत बोलू लागला. ‘तू आता फारच बदलली तुझ्या अशा वागण्यामुळे आपल्या नात्यात दुरावा येतोय. तुझे असे वागणे माझ्या समजण्याच्या पलीकडे आहे. जर तू अशीच वागत राहिलीस तर आपण एक दिवस एकमेकांपासून दूर होऊ किंवा मला ते पाऊल उचलावे लागेल’ जयेशचे ते कठोर शब्द ऐकल्यानंतर नेहाला नात्यात कधीच न वाटणारी भीती वाटू लागली. इतक्या दोन वर्षात जयेशने तिला सोडून जाण्याच्या गोष्टी कधीच केल्या नव्हत्या. पण बदलत्या परिस्थितीत जयेशलाही राग आवरता येत नव्हता. नेहाच्या प्रत्येक गोष्टीला त्याने विरोध करायचे ठरवून टाकले होते.  त्यामुळेच त्यांच्यामध्ये वादाला सुरुवात झाली होती. आधी समजून वागणारी नेहाही जयेशच्या प्रत्येक गोष्टीवर भांडू लागली होती. दोघांमध्ये होणारी भांडणं त्रासदायक असल्याचे दोघांनाही कळत होते. भांडणानंतर ते शांत होत होते.त्यांना त्यांची चूक कळत होती. पण काही केल्या परिस्थिती काही बदलायचे नाव घेत नव्हती. अखेर या दोघांनी हे नाते संपवून टाकायचे ठरवले. दोन वर्ष एकमेकांना समजून वागणारे हे दोघे अचानक नाते तोडण्याच्या निर्णयावल आले होते. या सगळ्यामध्ये चुकी दोघांचीही होती. पण एकमेकांना सोडण्याचा निर्णय सर्वस्वी चुकीचा होता. 

ADVERTISEMENT

वरील सगळ्या प्रकरणावरुन आपण काय धडा घ्यायला हवा असा विचार करत असाल तर

नातं टिकवायचं असेल तर लक्षात ठेवा

shutterstock

  1.  रिलेशनशीपमध्ये असताना प्रेमासोबतच जबाबदाऱ्या स्विकारण्याची तयारी हवी. प्रत्येक गरजा या पैशाने पूर्ण होत नाहीत तर एखाद्या माणसाने आयुष्यात शरीरानेही उपस्थित असणेही फार महत्वाचे असते. प्रत्येकाला आपल्या जोडीदाराचा स्पर्श हवा असतो.
  2. एखाद्या व्यक्तीला तुमच्यासोबत वेळ घालवायचा आहे आणि त्यासाठी तुमची भांडण होत असतील तर त्या व्यक्तीला समजून घेण्याची गरज आहे. वेळप्रसंगी त्या व्यक्तीला ऐकून घेण्याचीही गरज आहे. 
  3. सगळ्यांची राग व्यक्त करण्याची पद्धत सौम्य नसते काही जण पटकन चिडतात. तर काही जण शांतपणे कोणताही वाईट शब्द न उच्चारता राग व्यक्त करतात. पण सगळेच असे करतील असे नाही. कधी कधी तोंडातून एखादा वाईट शब्द निघतो. त्यावेळी त्या व्यक्तीला शांत होण्यासाठीचा वेळ द्या. एका छोट्याशा गोष्टीवर नाते तोडायला जाऊ नका. 
  4.  एकमेकांना समजूनही ज्यावेळी तुम्ही परिस्थिती समजून घेत नाही याचा अर्थ तुम्ही एकमेकांवर कधी प्रेम केले नाही असेच होते. 
  5. जर तुमच्या नात्यामध्येही असे काही होत असेल तर तुम्ही एकमेकांना दुरावा देऊ नका. कधी कधी हा दुरावा नात्यामध्ये गैरसमज निर्माण करत असतो. 
    लक्षात ठेवा नात समजून घ्यायला खूप वर्ष लागतात. पण तोडायला अगदी एक भांडणही पुरेसे असते

१० गोष्टींतून मुली व्यक्त करतात प्रेम, जाणून घ्या या गोष्टी (Signs That She Loves You In Marathi)

16 Feb 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT