ADVERTISEMENT
home / Budget Trips
केरळला जाण्याचा प्लॅन करताय… मग येथे नक्की जा – Kerala Tourism Places In Marathi

केरळला जाण्याचा प्लॅन करताय… मग येथे नक्की जा – Kerala Tourism Places In Marathi

भारतात फिरण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत. तुम्ही यंदा भारतभ्रमंतीचा विचार करत असाल यंदा दक्षिणेकडील सौंदर्य पाहायला नक्की जा. भारताचा दक्षिण भाग म्हटला की, प्रामुख्याने आपल्या डोळ्यासमोर पर्यटनाचे ठिकाण येते ते म्हणजे ‘देवभूमी केरळ’ अगदी फॅमिली पिकनिकपासून ते हनिमूनपर्यंत सगळीच जण केरळला पसंती देतात.केरळ तुम्हाला वाटते तितके लहान नाही. केरळमध्ये पाहाण्यासारखे बरेच काही आहे. केरळ पर्यटन स्थळे यांचा विचार करता त्याची एक यादीच आम्ही तयार केली आहे. तुमच्या बकेट लिस्टमध्ये केरळ फिरणे असेल तर आज आम्ही तुम्हाला केरळमध्ये गेल्यानंतर प्रामुख्याने काय करायला हवे ते सांगणार आहोत. म्हणजे तुम्ही तुमची केरळची टूर आखू शकता. जाणून घेऊया केरळ पर्यटन स्थळे (Kerala tourism places in marathi)

तिरुअनंतपुरम (Thiruvananthapuram)

श्री पद्मनाभस्वामी मंदिर - केरळ पर्यटन स्थळे

Instagram

 

तिरुअनंतपुरम केरळची राजधानी असलेले शहर आहे. त्यामुळे इथे इतर शहरांसारखा झगमगाट दिसेल. स्टेशनला उतरल्यानंतर तुम्हाला तुम्ही बुक केलेल्या हॉटेलसाठी थेट टॅक्सी करता येईल. तिरुअनंतपुरममध्ये तुम्हाला चांगली फॅमिली हॉटेल्स मिळतील. या ठिकाणी ब्रिटीशांचे राज्य असल्यामुळे येथील अनेक इमारती ब्रिटीश आर्किटेक्चरचे उत्तम उदाहरण आहे.त्यामुळे तुम्हाला अगदी स्टेशनपासून त्याचा अनुभव येईल.तिरुअनंतपुरम येथे  पद्मनाभ स्वामी यांचे मंदिर आहे. हे मंदिर फारच सुंदर आहे. जर तुम्ही बाहुबली हा चित्रपट पाहिला असेल तर याच्या दुसऱ्या भागामध्ये पहिलाच्या सीनमध्ये तुम्हाला शिवगामी देवी प्रदक्षिणा घालताना दिसेल. अगदी त्याचपद्धतीने साग्रसंगीतपणे हत्ती घेऊन देवाला प्रदक्षिणा घातली जाते. या मंदिरातील पद्मनाभस्वामीची मूर्ती पाहण्यासाठी तुम्हाला पहाटे जावे लागते. येथे अंगभर कपडे घातल्याशिवाय तुम्हाला प्रवेश मिळत नाही. येथे लुंगीचीही व्यवस्था केलेली मिळेल. हे मंदिर 12 च्या आत बंद होते. त्यामुळे तुम्हाला पहाटे जाण्याशिवाय पर्याय नाही. 

ADVERTISEMENT

पाहण्यासारखी ठिकाणं – नेपियार म्युझिअम, शांघुमुगम बीच, कुटीरा मलिका ही काही ठिकाणं पाहण्यासारखी आहेत.

तिरूअंतपुरममध्ये करण्यासारख्या गोष्टी – या ठिकाणी तुम्हाला अनेक पारंपरिक साऊथ इंडियन थाळींचा आस्वाद घेता येईल. येथे मिळणारी व्हेज थाळी फारच चविष्ट असतात. दोन ते तीन भाज्या, भात, डाळ, केरळ स्पेशल पापड, चटणी अशी चमचमीत थाळी तुम्हाला मिळेल.

महाराष्ट्रातील प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळे (Historical Places In Maharashtra In Marathi)

 

ADVERTISEMENT

 

कोची (Kochi)

कोची बंदर - केरळ पर्यटन स्थळे

Instagram

 

केरळमधील कोची हे शहर कोचीन नावाने देखील ओळखले जाते. कोचीमध्ये तुम्हाला भरपूर शॉपिंग करता येईल. कोचीन केरळमधील फारच प्रसिद्ध बंदर आहे. येथे पोर्तुगीजांचे राज्य होते. त्यामुळे तिथे आयात-निर्यात मोठ्या प्रमाणात चालते. तुम्हाला या ठिकाणी उत्तम ड्रेस मटेरिअल्स, सोनं आणि इतर दागिन्यांचे प्रकार मिळतील. त्यामुळे केरळला आल्यानंतर कोची अगदी मस्ट आहे.  तुम्हाला या ठिकाणी पोर्तुगीजांच्या अस्तित्वाच्या अनेक गोष्टी पाहाचयला मिळतील.

ADVERTISEMENT

पाहण्यासारखी ठिकाणं – कोची किल्ला, मत्तान चेरी पॅलेस, चेराई बीच आणि बरेच काही

कोचीमध्ये करण्यासारख्या गोष्टी – कोची फिरण्यासोबतच शॉपिंगसाठी प्रसिद्ध आहे त्यामुळे तुम्ही या ठिकाणी मनसोक्त शॉपिंग करा तुम्हाला या ठिकाणी उत्तम कपडे मिळतील तेही अगदी वाजवी दरात तुम्हाला मिळेल.

गुलाबी शहर जयपूरचा फेरफटका, शॉपिंग आणि बरेच काही…मग तुम्ही कधी जाताय?

 

ADVERTISEMENT

 

मुन्नार (Munnar)

मुन्नारमधील मुट्टीपेट्टी डॅम - केरळ पर्यटन स्थळे

Instagram

केरळमधील थंड हवेचे ठिकाण म्हणून मुन्नार प्रसिद्ध आहे. मुन्नार डोंगरावर असल्यामुळे या ठिकाणी पोहोचल्यानंतर तुम्हाला कमालीची थंडी जाणवेल. या ठिकाणाहून तुम्हाला बाहेर पडावेसे वाटणार नाही. मुन्नार हे अनेकदा हनिमून डेस्टिनेशन म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही छान थंडीचा आनंद घ्या. कारण या ठिकाणी तुम्हाला फिरायला मिळेल. वातावरणाचा आनंद घेता येईल. 

ADVERTISEMENT

पाहण्यासारखी ठिकाणं – मुट्टीपुट्टी डॅम,अन्नामुडी, पोथामेडी व्ह्यू पॉईंट, टी म्युझिअम, काऊबॉय पार्क अशी काही ठिकाणं आहेत. 

मुन्नारमध्ये करण्यासारख्या गोष्टी – मुन्नारमध्ये तुम्हाला मुट्टीपुट्टी डॅमकडे छान वेगळे दागिने मिळतील. तिथेच तुम्हाला छान लोकल फूडचा आस्वाद घेता येईल.

Nashik Paryatan Sthal In Marathi

अल्पुझा (Alappuzha)

अलप्पी येथील बोटहाऊस - केरळ पर्यटन स्थळे

ADVERTISEMENT

Instagram

 

अल्पुझा हे ठिकाण ‘अल्लपी’ नावाने  देखील ओळखले जाते. केरळला आल्यानंतर तुम्ही हमखास या ठिकाणी जायला हवे  कारण या ठिकाणी तुम्हाला बोट हाऊसमध्ये राहता येईल. बोटहाऊसमध्ये राहण्यासाठी तुम्हाला खूप आधीपासून बुकींग करावी लागते. जर तुमचे बजेट फार जास्त नसेल तर तुम्ही ही घर पाहून येऊ शकता. पण या ठिकाणी तुम्हाला राहता आले तर फारच उत्तम कारण तुम्हाला केरळचे सौंदर्य या सुंदर बोटीतून छान पाहता येते. 

पाहण्यासारखी ठिकाणं – अल्लपी बीच वगळता तुम्हाला या ठिकाणी अन्य काही ठिकाणही पाहता येतील. वेंबानंड बीच,मरारी बीच, पथारीमनाल बेट अशी काही ठिकाणे सुद्धा येथे आहेत.

अल्पुझामध्ये करण्यासारख्या गोष्टी – अल्पुझामध्ये तुम्हाला काही खरेदी करता आले नाही तरी निसर्गाचा आनंद घेता येईल.

ADVERTISEMENT

 

वाचामहाराष्ट्रातील पर्यटन स्थळे

कोवलम (Kovalam)

कोवलम बीच - केरळ पर्यटन स्थळे

Instagram

ADVERTISEMENT

समुद्राचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही कोवलमला जायलाच हवं. कोवलमचे बीच फारच सुंदर आहेत. जर तुम्हाला वॉटर स्पोर्ट्सची आवड असेल तर तुम्हाला या ठिकाणी अगदी आवर्जुन जायला हवं. तुम्हाला जरी अँडव्हेंचर करायचं नसेल तरी सुद्धा येथील निसर्ग सौंदर्य पाहायला तुम्ही जायला हवं.  याशिवाय येथे फिरण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत. त्यामुळे तुमच्या केरळ दौऱ्यामध्ये एक दिवस कोवलमला द्यायलाच हव्यात. 

पाहण्यासारखी ठिकाणं – समुद्र बीच पार्क,  लाईट हाऊस बीच, कोवलम बीच, विझहिमजॅम मंदिर

कोवलममध्ये करण्यासारख्या गोष्टी – कोवलम हे ठिकाण वॉटर स्पोर्टससाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी अगदी हमखास वॉटर स्पोर्टससाठी जा.

कन्याकुमारी (Kanyakumari)

स्वामी विवेकानंद स्मारक  - केरळ पर्यटन स्थळे

ADVERTISEMENT

Instagram

केरळला गेल्यानंतर (kerala tourism in marathi) तुम्ही तामिळनाडूतील कन्याकुमारी येथे गेला नाहीत तर तुमच्या केरळ दौऱ्याला काहीच अर्थ नाही. कन्याकुमारी हे ठिकाणही समुद्र किनारी आहे. येथील विवेकानंद स्वामींचे स्मारक आहे आणि कन्याकुमारीचे मंदिर आहे. शिवाय येथे सूर्याेदय आणि सूर्यास्त पाहण्यासाठीही गर्दी असते. या ठिकाणी तुम्हाला सुंदर मोत्याचे दागिने मिळतील. हिंदी महासागर, बंगालची खाडी आणि अरबी समुद्र यांचा सुरेख संगम या ठिकाणी होत असल्यामुळे या ठिकाणी पाण्याचे तीन वेगळे रगं दिसतात. तामिळनाडूत आल्यानंतर तुम्हााल कन्याकुमारीला यायचे आहे. तुम्ही या ठिकाणी बस करुन येऊ शकता. येथे तुम्हाला तुमचा संपूर्ण दिवस घालवता येईल.

पाहण्यासारखी ठिकाणं – विवेकानंद रॉक गार्डन, कन्याकुमारी मंदिर, तिरुवॅलुवर पुतळा, वट्टाकोटी किल्ला, कन्याकुमारी बीच

कन्याकुमारीमध्ये करण्यासारख्या गोष्टी – कन्याकुमारी येथील प्रसिद्ध ठिकाणं असले तरी ते तुलनेत शांत आहे. तुम्ही सकाळी कन्याकुमारी मंदिर आणि रॉक गार्डन पाहिल्यानंतर आजुबाजूची ठिकाणं पाहू शकता.

ADVERTISEMENT

एर्नाकुलम (Ernakulam)

केरळी मेजवानी  - केरळ पर्यटन स्थळे

Instagram

खूप आधी कन्याकुमारी आणि एर्नाकुलम असा प्रवास करतात. तर काही जण एर्नाकुलम हे शेवटचे डेस्टिनेशन ठेवतात. आता एर्नाकुलमबद्दल सांगायचे तर ते एखाद्या शहराप्रमाणे आहे.  एर्नाकुलम ही केरळची आर्थिक राजधानी असल्यामुळे हे ठिकाण तुम्हाला मुंबई, दिल्ली सारख्या शहरांसारखी जाणवेल. त्यामुळे तुम्हाला इथे केरळचे खास कपडे, खाद्यपदार्थ अशा गोष्टी हमखास मिळू शकतील.  जर तुम्ही शॉपिंग करणार नसाल तर एर्नाकुलमला जाण्यात काहीच अर्थ नाही.

पाहण्यासारखी ठिकाणं – इथे काही ब्रीज आणि पार्क्स पाहण्यासारखे आहे.

ADVERTISEMENT

एर्नाकुलममध्ये करण्यासारख्या गोष्टी – दिवसभर शॉपिंग, केरळी जेवणाचा आस्वाद

गुरुवायुर (Guruvayur)

गुरुवायुर मंदिर - केरळ पर्यटन स्थळे

Instagram

केरळमध्ये गुरुवायुर नावाचे एक शहर आहे येथे असलेले गुरुवायुर मंदिर फारच प्रसिद्ध आहे. या मंदिरात कृष्णाच्या बालरुपातील मूर्ती आहे. या मंदिरात हिंदूशिवाय अन्य कोणालाही प्रवेश दिला जात नाही. कृष्णाचा अवतार मानणाऱ्यांना आणि कृष्णाची भक्ती करणाऱ्यांना या ठिकाणी प्रवेश दिला जातो. हे मंदिर 500 वर्षे प्राचीन असून यावर करण्यात आलेले काम फार सुंदर आहे. गुरु, वायू आणि उर यापासून या परिसराला आणि मंदिराला नाव ठेवण्यात आले आहे. या मंदिराची स्थापना बृहस्पति आणि वायूदेवाने केली असा मंदिराचा इतिहास सांगते. या मंदिरामध्ये कृष्णाची बालरुपातील मूर्ती असून कृष्णाच्या बाललिलया कोरण्यात आल्या आहेत.

ADVERTISEMENT

पाहण्यासारखी ठिकाणं – गुरुवायुरमध्ये अनेक मंदिर आहेत. मॅमयुर मंदिर, श्री चामुंडेश्वरी मंदिर,श्रीपार्थसारथी मंदिर, चावकाड बीच, कोटा एलिफंट कॅम्प ही काही ठिकाणे पाहण्यासारखी आहे.

गुरुवायुरमध्ये करण्यासारख्या गोष्टी – येथील गुरुवायुर मंदिरात कायम गर्दी असते. मंदिर भेटी झाल्यानंतर तुम्ही तुमचा वेळ येथील किनाऱ्यावर घालवू शकता.

कोझीकोडे (Kozhikode)

कोझीकोड समुद्र किनारा - केरळ पर्यटन स्थळे

Instagram

ADVERTISEMENT

कोझीकोडे ही जागा कालिकत या नावाने आधी प्रसिद्ध होते. साधारण 500 वर्षांपूर्वी येथून कापड, मसाले आणि अन्य गोष्टींचे निर्यात ज्यू आणि अरब लोकांना केले जात होते. या शिवाय कोझाकोडे येथील मंदिरांसाठीही प्रसिद्ध आहे. त्यांची रचनाही तुम्हाला फार वेगळी जाणवेल. त्यामुळे केरळच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे हे ठिकाण पर्यटकांसाठी फारच महत्वाचे आहे.

पाहण्यासारखी ठिकाणं – कोझीकोड बीच, मनानाचिरा,कदालुंदी बर्ड सेंच्युरी,आर्किओलाॅजी म्युझिअम

कोझीकोडेमध्ये करण्यासारख्या गोष्टी – तुम्हाला या ठिकाणचा छान फेरफटका मारता येईल.

वर्कला (Varkala)

वर्काला बीच - केरळ पर्यटन स्थळे

ADVERTISEMENT

Instagram

केरळमध्ये जाणार म्हटल्यावर तुम्हाला समुद्र किनारे फिरायलाच हवेत. वर्काला हा केरळमधील असा परीसर आहे जिथे तुम्ही हमखास जायला हवे कारण हा समुद्र किनारा फारच सुंदर आहे. कोवलम आणि वर्काला अशी निवड करायची झाली तर तुम्ही वर्कालाला नक्की पसंती द्या कारण या समुद्र किनाऱ्यावर तुम्हाला खूप चांगले फोटो काढता येतील. आता या ठिकाणीही तुम्हाला मंदिर आहेत. येथील जनार्दनस्वामींचे मंदिर फारच प्रसिद्ध आहे.

पाहण्यासारखी ठिकाणं – जनार्दन स्वामी मंदिर,वर्कला बीच, कपील बीच आणि जनार्दन स्वामी मंदिर

वर्कलामध्ये करण्यासारख्या गोष्टी – तुम्हाला या ठिकाणी बीचवर छान वेळ घालवता येईल. मस्त समुद्र किनारी बसून नारळपाण्याचा आस्वाद घेता येईल. 

ADVERTISEMENT

टेकडी (Thekkady)

टेकडी येथे एलिफंट राईडचा आनंद घेताना - केरळ पर्यटन स्थळे

Instagram

मुन्नारपासून फारच जवळ जर कोणते ठिकाण असेल तर ते आहे टेकडी. येथील निसर्गसौंदर्यासाठी ते फारच प्रसिद्ध आहेत. त्यामुळे तिथे आल्यानंतर तुम्हाला तुमचा वेळ घालवावासा हमखास वाटेल. केरळ कॉफीसाठी प्रसिद्ध आहे ते का याचा प्रत्यय तुम्हाला इथे येईल कारण तुम्हाला इथे अनेक कॉफीचे मळे दिसतील. त्यामुळे तुम्हाला इथे कॉफी खरेदी करता येईल.

पाहण्यासारखी ठिकाणं – मुरीकाडी, छेल्लर कोवील, अन्नकारा, मंगला देवी मंदिर

ADVERTISEMENT

टेकडीमध्ये करण्यासारख्या गोष्टी – तुम्हाला इथे अनेक ठिकाणी कॉफी मिळतील . तुम्हाला छान ब्लेंडेंट कॉफी या ठिकाणी मिळतील

अशी करा केरळची तयारी (A Handy Guide To Kerala Tourism In Marathi)

सुंदर केरळ -  केरळ पर्यटन स्थळे

Instagram

  1. केरळला जाण्याचा उत्तम  कालावधी हा जूनपासून सुरु होतो. उन्हाळ्यात या ठिकाणी जाण्यास काहीच हरकत नाही. पण तुम्हाला उन्हाळ्यातकाही भागांमध्ये भयकंर उकाडा जाणवेल. 
  2. केरळला जाण्यासाठी अनेक पर्याय आहेत. तुम्ही ट्रेनने जाणार असाल तर थेट तिरुअंतपुरमला उतरुन मजल दरमजल करत फिरु शकता. तिरुअनंतपुरम केरळचं एक टोक आहे. जिथून तुम्हाला खाली येत म्हणजे एर्नाकुलम असे करता येते.
  3. काही टूर्स या तुम्हाला कोचीवरुनही नेतात. कोचीवरुन तुम्ही जाणार असाल आणि तुम्हाला दिवस प्रवासात वाया घालवायचे नसतील तर तुम्ही फ्लाईट करुनही जाऊ शकता. 
  4. केरळ हे राज्य अजिबात लहान नाही. तुम्हाला रोड ट्रॅव्हल भरपूर कराव लागते. त्यामुळे बसमध्ये बसण्याची तयारी ठेवा. 
  5. केरळच्या काही भागांमध्ये तुम्हाला मोठा उकडा तांदूळ मिळतो.काही ठिकाणी तुम्हाला जेवण आवडेलच असे नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्यासोबत काही चांगले कॅरी करा. 
  6. केरळच्या काही भागात तुम्हाला खूप गरम होईल म्हणजे कन्याकुमारी आणि तिरुअमंतपुरमचा काही भाग. तर पेरियार आणि मुन्नारमध्ये तुम्हाला थंड वाटेल त्यामुळे तुम्ही थंड हवेचे कपडे नक्की कॅरी करा. 
  7. खरेदीचा विचार करत असाल तर तुम्हाला कन्याकुमारीला मोत्याचे दागिने, पेरियार आणि एर्नाकुलममध्ये तुम्हाला साड्या, ड्रेस मटेरिअल्स,स्कार्फ घेता येईल.

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ)

केरळला जाण्याचा उत्तम कालावधी कोणता?
केरळला समुद्र किनारा जवळ असल्यामुळे या ठिकाणी वातावरण थोडे उष्ण असते. म्हणजे मुन्नार वगळता तुम्हाला अन्य कोणत्याही ठिकाणी गारवा असा जाणवणार नाही. त्यामुळे तुम्ही साधारण दिवाळीपासून ते फेब्रुवारी या कालावधीत जाऊ शकता. पावसाळ्यात या ठिकाणी प्रसन्न वातावरण असले तरी येथे गेल्या काही वर्षांपासून खूप पाऊस पडतोय. अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थितीही निर्माण झाली आहे. त्यामुळे वातावरणाचा अंदाज घेऊन तुम्ही बुकींग करा.

ADVERTISEMENT

केरळ कशासाठी प्रसिद्ध आहे?
दक्षिणेकडील राज्य हे त्यांच्या संस्कृतीसाठी फारच प्रसिद्ध आहे. केरळमध्ये तुम्हाला अनेक प्रसिद्ध देवस्थान पाहता येतील. या प्रत्येक देवस्थानांमागे तेथील लोकांची श्रद्धा आणि आख्यायिका फारच प्रसिद्ध आहे. येथील देवस्थांनामध्ये जाण्यासाठी असलेली शिस्त फारच वाखाणण्यासारखी आहे. या शिवाय केरळ चहा, कॉफी, तेथील जेवण, समुद्र किनारे आणि मसाले यांच्यासाठी प्रसिद्ध आहे.

केरळमध्ये गेल्यानंतर काय करता येईल? 
केरळमध्ये करण्यासारखे बरेच आहे. तुम्हाला वॉटर स्पोर्टसचा पर्याय इथे उपलब्ध आहे. पेरियारमध्ये तुम्हाला मसाले मिळतील. केरळमध्ये गेल्यानंतर तुम्ही हमखास करायला हवा तो म्हणजे मसाज. कारण या ठिकाणी शास्त्रशुद्धपद्धतीने मसाज केला जातो. त्यामुळे तुम्ही या गोष्टी अगदी हमखास करायला हवा. Kerala tourism places in marathi ची माहिती आम्ही तुम्हाला दिली आहेच

केरळमधील सगळ्यात सुंदर ठिकाणं कोणते?
केरळ हे राज्य निसर्ग सौदंर्याने नटलेले आहे. त्यामुळे येथील प्रत्येक ठिकाणाचे असे वैशिष्टय आहे. येथील मुन्नार हे थंड हवेचे ठिकाण आहे. इथे तुम्हाला कमालीची प्रसन्नता मिळेल. तर पेरियार हे ठिकाण डोंगरावर असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला चहाचे मळे, मसाला शेती  पहायला मिळतील. या शिवाय कोची, कन्याकुमारी ही ठिकाणही फार सुंदर आहेत.

केरळ टूरचा खर्च साधारण किती येऊ शकतो?
तुम्ही संपूर्ण केरळ फिरण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला साधारण 10 दिवस तरी लागतात. त्यामुळे या दिवसांचा प्रत्येकी खर्च 25 ते 30 हजार येऊ शकतो. फ्लाईटचा विचार करत असाल तर याचा खर्च मागे पुढे येऊ शकतो. पण तुम्हाला फिरण्यासाठी इतके पैसे पुरेसे आहेत. तुम्ही एखाद्या टूरसोबत जाणार असाल तर तुम्हाला अधिक चांगल्या पद्धतीने केरळची टूर करता येईल. 

ADVERTISEMENT

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा. या लिंकवर क्लिक करा https://www.popxo.com/shop/zodiac-collection/

10 Feb 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT