ADVERTISEMENT
home / Jewellery
तुमच्या चेहऱ्याच्या आकारानुसार निवडा तुमच्यासाठी परफेक्ट कानातले

तुमच्या चेहऱ्याच्या आकारानुसार निवडा तुमच्यासाठी परफेक्ट कानातले

दागिने घालण्याची आवड आपल्या सगळ्यांनाच असते पण सगळेच दागिने तुम्हाला चांगले दिसतील असे नाही. आता यामध्ये वाईट वाटण्यासारखे काहीच नाही. याचे कारण असे की, प्रत्येकाची देहयष्टी वेगळी असते. चेहऱ्याचा आकार वेगळा असतो त्यानुसार तुम्हाला तुमच्या दागिन्यांची निवड करायची असते. हल्ली आपण फार दागिने घालत नसलो तरी कानातले सगळ्यांनाच घालायला आवडतात. कारण नुसते कानातले घालूनसुद्धा तुम्हाला चांगला लुक मिळू शकतो. पण चांगला लुक मिळवण्यासाठी तुमच्या कानातल्यांची निवडही महत्वाची असते. शिवाय कोणत्या ड्रेसवर किंवा अटायरवर ते घालायला हवे हे देखील तुम्हाला माहीत हवे. त्यासाठीच या खास टिप्स

कोणत्याही ट्रेडिशनल ड्रेसवर उठून दिसतात मोजडी, तुम्ही ट्राय केलीत का?

रिंग्ज (Ear rings)

रिंग्जचे मिळतील तुम्हाला वेगवेगळे प्रकार

Instagram

ADVERTISEMENT

सगळ्यांच्या ज्वेलरी बॉक्समध्ये  रिंग्ज असतात. लहान मोठ्या आकाराच्या या रिंग्ज दिसायला नक्कीच चांगल्या दिसतात. रिंग्जचा आकार साधारणपणे गोल असतो. अगदी लहान आकारापासून तुम्हाला मोठ्या आकारपर्यंत या रिंग्ज मिळतात.हल्ली वेगवेगळ्या आकारातसुद्धा या रिंग्ज मिळतात.  

  • आता जर तुमचा चेहरा फार लहान असेल तर तुम्ही फार मोठ्या रिंग्ज घालू नका. कारण मोठे कानातले तुम्हाला थोडे जास्त मोठे वाटू शकतात.
  • फॅन्सी टॉप घालणारे असाल तर तुम्हाला हे रिंग्ज नक्कीच चांगले दिसू शकतील. सिंग्लेट टॉप्स, ऑफ शोल्डर ड्रेस किंवा टॉप्सवर तुम्हाला हे इअररिंग्ज चांगले दिसतात
  • तुमच्या चेहऱ्याचा आकार गोल असेल तर तुम्ही गोल रिंग्ज घालू नका. त्यामुळे तुमचा चेहरा खूप मोठा दिसू शकतो.
  •  रिंग्जमध्ये तुम्हाला वेगवेगळे रंग आणि पॅटर्न मिळतात. तुमच्या ड्रेसमध्ये गोल्डन किंवा सिल्वहर अशी छटा असेल त्यानुसार तुम्हाला रंग निवडायचा आहे. 
  • रिंग्जमध्ये तुम्हाला वेगवेगळे हँगिंगसुद्धा दिसतात. त्यामुळे तुम्ही ते ही ट्राय करायला हरकत नाही. पण तुमच्या ड्रेसच्या पॅटर्ननुसार तुम्ही त्याचा वापर करा. 

सेलिब्रिटींमध्ये बॅगचा हा ट्रेंड आहे सध्या व्हायरल

झुमके (Jhumka)

झुमक्याची निवड करताना

Instagram

ADVERTISEMENT

झुमका हा प्रकार सध्या आपल्या सगळ्यांच्याच आवडीचा आहे. ट्रेडिशनल वेअरवर अगदी हमखास हा प्रकार घातला जातो. गोल घुमटासारखा आकार त्याखाली मोती किंवा लटकन असा हा प्रकार असतो. हल्ली गोलच नाही तर चौकोनी, त्रिशंकु अशा वेगवेगळ्या स्वरुपात तुम्हाला झुमके मिळतात.  

  • इतर कानातल्यांच्या निवडीप्रमाणेच तुमची ही  निवड अवलंबून असते. तुमचा चेहरा गोल असेल तर तुम्ही लांब आकाराचे झुमके घ्या ते तुम्हाला जास्त चांगले दिसतील. 
  • जर तुमचा चेहरा लांब असेल तर तुम्हाला गोलाकार झुमके घ्यायला हरकत नाही.
  •  जर तुमचे काम लहान असतील तरी तुम्ही मोठे झुमके घेऊ नका. कारण त्यामुळे तुमचे कान ओढल्यासारखे दिसतीलच आणि ते तुम्हाला खूप वेळ घालता येणार नाही. 

चांदबाली (Chandbali)

चांदबालीजचे वेगवेगळे प्रकार

Instagram

चांदबाली हा प्रकार अनेकांना आवडतो.चंद्रासारखा आकार असतो म्हणून त्याला चांदबाली असे म्हटले जाते. चांदबालीमध्येही तुम्हाला वेगवेगळे आकार मिळतात. तुम्हाला या कानातल्यांच्या बाबतीतही अशीच निवड करायची आहे.  मोठ्या चांदबाली तुम्हाला लग्न समारंभासारख्या कार्यक्रमांना वापरता येतील. तर लहान चांदबालीज तुम्हाला अगदी छोटेखानी समारंभांना वापरता येतील. 

ADVERTISEMENT
  • काही जणांना लहान कानातले घालायला आवडतात.पण जर तुमचा चेहरा मोठा असेल तर फार लहान कानातले तुम्हाला चांगले दिसले तरी तुमचा चेहरा त्यामुळे मोठा दिसू शकतो. 
  • तुम्ही रोजच्यासाठी कानातल्यांची निवड करण्याच्या विचारात असाल तर तुम्ही नाजूक कानातले घातले तर ते अधिक चांगले दिसतात. 
  •  पण एखाद्या मिटींग्जमध्ये किंवा तुम्हाला काही खास ठिकाणी जायचे असे तर मात्र तुम्ही काही खास कानातले निवडा.
  •  ऑफिससारख्या ठिकाणी खूप गडद कानातल्यांची निवड करु नका. कारण ते नाहक फॅन्सी दिसतात. अशा ठिकाणी तुम्ही टॉप्स किंवा खड्यांचे कानातले घाला.

कानातल्यांचा प्रकार कोणताही असो तुम्ही काही गोष्टी लक्षात घेतल्या तर तुम्हाला तुमचे कानातले छानच दिसतील.तुमचा वर्ण, तुमच्या चेहऱ्याचा आकार, आणि कानातल्यांचे निमित्त लक्षात घेत त्यांची निवड करा. 

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

13 Feb 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT