ADVERTISEMENT
home / मनोरंजन
स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेला निरोप देताना कलाकार झाले भावूक

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेला निरोप देताना कलाकार झाले भावूक

टेलिव्हिजन मालिका आणि प्रेक्षकांचं नेहमीच अतूट नातं असतं. लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच आवडणारी सध्याची मालिका म्हणजे ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका. ही एक ऐतिहासिक मालिका असल्यामुळे लहानांपासून वृद्धापर्यंत सर्वांनाच आवडते. ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. नुकताच या मालिकेचा शेवटचा भाग शूट करण्यात आला. निरोपाच्या क्षणी मालिकेतील सर्वच कलाकारांना मात्र त्यांच्या भावना आवरणे कठीण झाले. भावूक मनाने आणि साश्रू नयनाने कलाकारांनी मालिकेला निरोप दिला. या  क्षणी कलाकारांनी त्यांच्या मनातील भावना आणि आठवणी चाहत्यांसोबत शेअर केल्या. याशिवाय मालिकेतील सर्वच कलाकारांनी संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. फेब्रुवारी महिन्यात या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. या वेळी संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधला. “काही चुकलं असेल तर माफ करा” अशा शब्दात त्यांनी मनातल्या भावना व्यक्त केल्या. ज्यावरून प्रेक्षकांप्रमाणेच या मालिकेला निरोप देणं कलाकारांसाठीदेखील कठीण झालं आहे असं दिसत आहे. या मालिकेवर केलेल्या भरभरून प्रेमाबद्दल कलाकारांनी प्रेक्षकांचे आभारही मानले. 

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचं यश

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेनं अल्पावधीतचं प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. सुरुवातीपासूनच या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं. कुठलीही ऐतिहासिक भूमिका प्रेक्षकांना पटेल अशी निभावणं हे कलाकारासाठी आव्हानात्मक असतं आणि तीच भूमिका सहजरित्या निभावणं हे त्या कलाकाराचं यश आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र संभाजी महाराजांचा इतिहास प्रेक्षकांच्या डोळ्यांपुढं उभा करण्यात यशस्वी झालंय. अल्पावधीतच लोकप्रिय झालेली ही मालिका मात्र आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. सूत्रांकडून मिलेल्या माहितीनुसार या मालिकेचा शेवटचा भाग नुकताच चित्रित करण्यात आला. जवळपास दोन वर्ष या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. 

या मालिकेच्या लोकप्रियतेचं गुपित

काही मालिकाच अशा असतात ज्यांचा प्रभाव प्रेक्षकांच्या मनावर त्या संपल्यावरही वर्षानूवर्ष कायम राहतो. स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिकादेखील अशाच प्रकारची एक मालिका आहे. या मालिकेतून संभाजी  महाराजांच्या आयुष्यातील महत्वाच्या घडामोडींवर, तसेच बारीकसारीक प्रसंगांवर प्रकाश टाकण्यात आला. डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेली संभाजी यांची भूमिका, तसेच शंतनू मोघे यांनी साकारलेली शिवाजी महाराजांची भूमिका आणि प्राजक्ता गायकवाडने साकारलेली येसूबाईंची भूमिका यांनादेखील प्रेक्षकांचे तितकेच प्रेम मिळाले. फेब्रुवारीमध्ये या मालिकेचा अखेरचा भाग प्रसारित होणार अशी माहिती मिळाली आहे. ज्यामुळे या मालिकेच्या चाहत्यांसाठी नक्कीच हा एक अचानक मिळणारा धक्का असणार आहे. मात्र या मालिकेच्या आठवणी अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनात नक्कीच तशाच राहतील. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

ADVERTISEMENT

हे ही वाचा –

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

अधिक वाचा –

अग्गंबाई सासूबाईमधली ‘शुभ्रा’ करतेय बॉलीवूडमध्ये पदार्पण

ADVERTISEMENT

सिद्धार्थ शुक्लाचे जिंकणे आधीच होते निश्चित,कलर्सच्या कर्मचाऱ्याने केला खुलासा

नवाजुद्दीन सिद्दकीने पहिल्यांदा शेअर केला खऱ्या आयुष्यातील गुरूजींचा फोटो

16 Feb 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT