ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
नाकाचे सौंदर्य खुलवायचे, तर नक्की करा असा प्रयोग

नाकाचे सौंदर्य खुलवायचे, तर नक्की करा असा प्रयोग

आपण बऱ्याच अभिनेत्रींनी नाकाची सर्जरी केल्याचं ऐकतो. बऱ्याच जणींना आपलं नाक बेढब वाटतं. मग अशावेळी नक्की काय करायचं? त्यासाठी आपण मेकअपची मदत घेऊ शकतो. जाड किंवा बेढब नाक हे अनेकांसाठी अडचण ठरू शकते. पण असे नाक असेल तरीही आपण ते सुंदर आणि सुबक करू शकतो. मेकअप करून आपण आपल्या नाकाचं सौंदर्य खुलवू शकतो. पण त्यासाठी नक्की काय करायचं हे आपण या लेखातून पाहणार आहोत. काही जणांच्या नाकाचा आकार हा चेहऱ्याच्या आकारानुसार नसतो. त्यावेळी नक्की काय करायचं? काही जणांना आपल्या नाकाचा आकार अजिबातच आवडत नसतो. त्यामुळे काही जणी सर्जरीचा पर्यायही निवडतात. पण याशिवाय अनेक पर्याय आपल्याकडे असतात. आपण या लेखातून हेच पर्याय पाहणार आहोत. 

1. नोज पिन अथवा नथ बदल

आपलं नाक जर बेढब असेल अथवा नाकाचा आकार नीट वाटत नसेल तर आपण जी नोज पिन घालतो अथवा  कोणत्याही कार्यक्रमामध्ये आपण जी नथ घालणार असतो तो आपण बदलू शकतो. यासाठी तुम्ही तुमच्या ब्युटिशियनचा सल्ला घेऊ शकता अथवा तुमच्या घरातील व्यक्तींना फॅशनबद्दल समज असेल तर तुमच्या नाकाच्या आकाराला कोणत्या प्रकारची नोज रिंग अथवा नथ सुटेबल होते आहे हे विचारून घ्या. आपल्या नाकामध्ये जाड अथवा बारीक नथ चांगली दिसते आहे की नाही हे दोन्ही नीट बघून घ्या. या पद्धतीने नाकाचा बेढब आकार तुम्ही सुधारू शकता. तुमच्या नाकाचा आकार अधिक चांगल्या प्रकारे उठून दिसतो. 

‘नथ’ घातल्याशिवाय महाराष्ट्रीयन साजशृंगार अपूर्ण, पाहूया सध्याचा Trend

2. जाड नाकासाठी वापरा कॉन्टूर मेकअप

ADVERTISEMENT

Shutterstock

काही जणींंचं नाक हे जाड असतं. पण हे नाक जर तुम्हाला छोटं दाखवायचं असेल तर मेकअपमधील कॉन्टूरचा आपण उपयोग करून घेऊ शकतो. बऱ्याच जणांना कॉन्टूर कसं लावायचं याची माहिती नसते. कारण कॉन्टूर लावणं ही एक प्रकारची कला आहे. तुम्ही कॉन्टूर कसं वापरायचं हे एकदा शिकून घेतलं तर तुम्ही आपल्या नाकासाठी याचा योग्य वापर करू शकतो. यामध्ये सहसा मॅट ब्रॉन्झचा वापर करण्यात येतो. चेहरा उजळत नाही तर तुमचा फेसकट व्यवस्थित दिसतो. 

‘या’ लाईफ चेजिंग मेकअप टीप्स तुम्हाला माहित असायलाच हव्या

 

ADVERTISEMENT

3. हेअरस्टाईल्सचा घ्या आधार

ज्यांचे नाक मोठे असते ते लहान आणि टोकदार दिसण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या हेअरस्टाईल्सदेखील करू शकता. हेअरस्टाईल्सच्या काही प्रकाराने तुम्हाला तुमच्या नाकाचा आकार लपवता येतो आणि तुम्हाला नाक टोकदार दाखवायचे असेल तर तुम्ही केस एका बाजूला करू शकता. यासाठी तुम्ही उजव्या बाजूला तुमचा भांग पाडा आणि डाव्या बाजूला अधिकाधिक केस मोकळे सोडा. तुमचे केस जर कुरळे असतील तर तुम्हाला ही हेअरस्टाईल अधिक सुंदर दिसेल आणि नाक अधिक सुंदर दिसू शकेल. नाक जर बसकं अथवा चपट असेल तर तुम्ही अशा वेगवेगळ्या हेअरस्टाईल्सचा उपयोग करू शकता. 

लग्न असो वा साखरपुडा, ट्रेंडमध्ये आहे ग्लिटरी मेकअप

4. ब्लशर अथवा फाऊंडेशनचा वापर करा

Shutterstock

ADVERTISEMENT

नाक अधिक चपट अथवा जाड असेल तर तुम्ही चमचमत्या अर्थात ब्लश करणाऱ्या ब्लशर अथवा फाऊंडेशनचा वापर तुम्ही करू शकता. नाकाच्या दोन्ही बाजूला तुम्ही डार्क फाऊंडेशन लावा आणि मधल्या भागात नाक टोकदार दिसण्यासाठी लाईट फाऊंडेशनचा वापर करा. हे लावताना तुम्ही ब्रशचा वापर करा. त्यानंतर नाकाच्या हाडावर तुम्ही हायलायटरचा वापर करा जेणेकरून नाक शार्प दिसेल आणि तुम्हाला अगदी आकर्षक नाक दिसायला हवं असेल तर त्यामध्ये कन्सिलरचा वापर करा. तुम्हाला नाक आकर्षक दिसण्यासाठी अथवा नाकाचं सौंदर्य खुलविण्यासाठी अशा पद्धतीचा वापर करता येऊ शकतो. 

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा. 

11 Feb 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT