वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी हल्ली जितकी मेहनत घेतली जाते तितकी कोणत्याच बाबतीत घेतली जात नाही. हल्ली इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे डाएट्स आहेत की, नेमका योग्य डाएट कोणता हेच कळत नाही. पण या सगळ्या विश्वासार्ह डाएटमध्ये डॉक्टर दीक्षितांचा डाएट प्लॅन येतो. या डाएट प्लॅनबद्दलही अनेकांना शंका आहेत. म्हणजे नेमकं काय करायचं? याचा फायदा कसा होतो? साधारण किती दिवस हा डाएट करायचा असतो वगैरे… हा डाएट स्वत: करुन पाहिल्यानंतर याचा फायदा काय आणि नेमका त्रासही काय होतो. ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
पोट सुटले असेल तर हे 3 व्यायामप्रकार आठवड्याभरात करतील चमत्कार
शरीराचे कोणतेही हाल न करता नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करणारा असा डॉ. जगन्नाथ दीक्षितांचा डाएट आहे. या डाएटनुसार वजन कमी करण्यासाठी तुम्हाला दिवसातून दोनदाच आहार घ्यायचा आहे. या आहारात तुम्हाला काहीही खाता येईल. पण यामध्ये प्रोटीन्सचा अधिक समावेश असावा. कार्बोहायड्रेटचे प्रमाण यामध्ये फारच कमी असायला हवे. आता तुम्हाला दोन वेळाच खायचे आहे म्हटल्यावर त्यासाठी तुम्हाला तो घेण्याची योग्य वेळही माहीत हवी. रोज दोन वेळा तुम्ही ठरवलेल्या वेळी तुम्हाला बरोबर 55मिनिटांमध्ये तुमचा आहार घ्यायचा आहे. साधारण तीन महिने तरी हा डाएट तुम्हाला करायचा आहे. यामुळे तुमचे 8 किलो वजन कमी होईल असे सांगितले जाते. तुमच्या उत्तम आरोग्यासाठी तुमचे वजन योग्यप्रमाणात कमी झालेले फारच बरे असते.
दीक्षितांचा डाएट फायदेशीर आहे याचे कारण असे की, हल्लीच्या लाईफस्टाईलमुळे फार कमी वयात मधुमेहाचा त्रासही अनेकांना होत आहे. याचे कारण आहे आणि वजनवाढीला कारणीभूत चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि वेळा. हीच गोष्ट योग्य करण्याचे काम दीक्षित डाएट करते. दिवसातून केवळ दोनदा आहार घेतल्यामुळे तुमचे अन्न पचण्यास मदत होते. तुमची पचनशक्ती सुधारली तर तुमच्या शरीरात फॅट साचून राहात नाही. तुमचे खाल्लेले अन्न तुम्हाला उर्जा देण्याचे काम करते.
वाढते वजन, भूक आणि मेटाबॉलिजम नियंत्रणात आणण्यासाठी उपयुक्त आहे गोलो डाएट
8 किलो वजन कमी होईल या आशेने अनेक जण लगेचच दीक्षित डाएट करण्याचा विचार करतात. पण डाएट सुरु करण्याआधी तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी माहीत हव्यात. तुम्ही खात असलेले पदार्थ हे चांगले असायला हवेत. दीक्षित डाएटमध्ये तुम्हाला खाण्यावर कोणतेही निर्बंध ठेवण्यात आलेले नाही.तुम्ही काहीही कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ खाऊ शकता पण त्या 55 मिनिटांमध्येच. त्यानंतर अगदी एक सेंकदही पुढे तुम्हाला काहीही खाता येत नाही.
आता दीक्षित डाएट तुम्हाला कळला असेल तर तुम्ही तो नक्की करुन पाहा. चांगल्या गोष्टींचे सेवन करा तुम्हाला या डाएटचा फायदा होईल.
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.