इन्स्टाग्रामवरुन अरमान मलिकने फोटो केले 'डिलीट', फॅन्स चिंतेत

इन्स्टाग्रामवरुन अरमान मलिकने फोटो केले 'डिलीट', फॅन्स चिंतेत

कोणत्याही सेलिब्रिटीला फॉलो करण्याचे बेस्ट ठिकाण म्हणजे ‘इन्स्टाग्राम’. सेलिब्रिटींच्या आयुष्यातील इत्यंभूत माहिती फॅन्सला अगदी घरबसल्या एका क्लिकवर मिळत राहते. सेलिब्रिटींचे लिंकअप- ब्रेकअप, फिल्म्स सगळे काही एकदम ऑफिशियल मिळते.पण सध्या असा एक किस्सा घडला आहे की, चाहत्यांना घरघर लागली आहे. गायक अरमान मलिक याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सगळे फोटो डिलीट करुन टाकले आहे. 8 मिलियन फॅन फॉलोअर असलेल्या अरमानला अचानक असा निर्णय का घ्यावा लागला हे अजूनही कळलेले नाही. दरम्यान अरमाननेच एक ट्विट केले आहे.

अरमानला कोणत्या गोष्टीचा ताण

Instagram

अरमानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सगळे फोटो डिलीट तर करुन टाकले. पण त्याने दोन पोस्ट अशा शेअर केल्या ज्यामुळे अधिकच संभ्रम निर्माण झाला . i cant take it anymore अशी पोस्ट त्याने शेअर केली आणि त्याच्या फॅन्सनी त्याला वेगवेगळे प्रश्न विचारायला सुरुवात केली. हल्ली कधी कोणाला ताण येईल सांगता येत नाही. त्यामुळे अरमान मलिक कोणत्या टेन्शनमध्ये तर नाही ना ? अशी भीती अनेकांना वाटू लागली. त्याच्या फॅन्ससोबत अनेक सेलिब्रिटींनीही त्याला या पोस्टच्या माध्यमातून विचारणा केली पण त्याने त्यावर काहीच उत्तर दिले नाही. उलट त्याने आणखी एक पोस्ट टाकून संभ्रम निर्माण केला Pushing And You, Pulling Me Back असे त्याने पोस्ट केले. त्यामुळे एकूणच अरमानच्या आयुष्यात चालले काय असा प्रश्न पडला आहे.

बॉलीवूडमध्ये नंबर वन हिरो विकी कौशल

वेळ सगळे काही सांगेल

Instagram

फॅन्सची वाढती चिंता पाहून अरमान मलिकला बोलावेच लागले. त्याने ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने तिथेही असाच संभ्रम निर्माण करणारा मेसेज दिला आहे. वेळ सगळे काही सांगेल असे लिहित त्याने आता आणखीनच सस्पेन्स निर्माण केला आहे. पण पुढे त्याने आणखी एक ट्विट केले आहे. ज्यात त्याने काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. तो म्हणाला की, आपण एखाद्या गोष्टीचा इतका विचार करतो की,आपल्या मनाला वाटेल त्या निर्णयाला आपण पोहोचतो. पण सत्य त्यापासून कोसो दूर असते. थोडं थांबा तुम्हाला खरं काय ते नक्की कळेल.

काहीच दिवसांपूर्वी फॅन्सचे मानले आभार

इन्टाग्रामच्या काळात ट्विटर आणि फेसबूक हे माध्यम थोडे मागे पडत असले तरीसुद्धा आजही ट्विटरवर केलेले ट्विट हे अनेकदा ऑफिशियल मानले जाते. सोशल मीडियापासून दूर जाण्याचा प्रयत्न जर अरमान मलिक करत असेल तर काहीच दिवसांपूर्वी त्याने ट्विटरचे कुटुंब 1 मिलियन झाल्याचा आनंद अजिबात व्यक्त केला नसता. त्याने त्याचा फोटो शेअर करुन ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवली. त्यामुळे सोशल मीडियावर काही झाले असे आपण मानू शकत नाही.

या कारणासाठी करिना कपूरचा राग झाला अनावर, व्हिडिओ झाला व्हायरल

अरमानची करिअरग्राफ चढताच

अरमान डिप्रेशनमध्ये असावा अशी शंका अनेकांच्या मनात चुकचुकत असेल तर तसे काही नसावे कारण अरमानचा करिअर ग्राफ कायमच चढता राहिला आहे. त्याच्या गाण्याची जादू काही औरच आहे. तरुणांमध्ये तो फारच आवडता सिंगर म्हणून प्रसिद्ध आहे. त्याने गायलेले लव्ह साँग कायमच हिट राहिले आहेत.  


आता स्वत: अरमानने काही गोष्टींचा खुलासा केल्यानंतर शांत बसणे आणि त्याच्या उत्तराची वाट पाहणे यातच शहाणपण आहे. 

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.