ADVERTISEMENT
home / Weight Loss
कडधान्य सकाळी रिकाम्या पोटी खाऊन करा वजन कमी

कडधान्य सकाळी रिकाम्या पोटी खाऊन करा वजन कमी

सकाळी कडधान्य नाश्तामध्ये खाल्ल्याने तुम्हाला अफलातून फायदा मिळतो. कडधान्य अर्थात स्प्राऊट्स सकाळी खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहाते आणि तुम्हाला लवकर भूकही लागत नाही. कडधान्यांमध्ये अनेक पोषक तत्व आणि प्रोटीन्स असतात. तुम्ही रोज जर कडधान्य खाल्लीत तर तुम्ही अनेक आजारांपासूनही दूर राहू शकता. धान्य, डाळी अथवा बिया तुम्ही अंकुर आल्यानंतर खाल्ले तर यामुळे अनेक पोषक तत्व तुम्हाला मिळतात. त्यामुळेच अनेक तज्ज्ञ नाश्त्यामध्ये तुम्हाला कडधान्य खाण्याचा सल्ला देतात. कडधान्याला आलेल्या मोडांमध्ये मिनरल्स असते. त्याचप्रमाणे शरीरामध्ये प्रोटीन वाढवण्यासाठी, विटामिन्स आणि अन्य पोषक तत्वांच्या वाढीसाठीही मदत  मिळते. कोणतेही धान्य अथवा ते शिजवलेले पाणी तुम्ही खाल्ले तर त्यातून तुमच्या अन्नपचनाची प्रक्रिया अधिक चांगली होते. तसंच यामध्ये स्टार्च कमी प्रमाणात असल्यामुळे यांच्या सेवनाने तुमच्या पोटातील चरबी वाढत नाही. तुमचे भुकेवर नियंत्रण राहून तुमचे वजनही कमी होण्यास मदत मिळते. कडधान्याचे नेमके काय फायदे होतात ते आपण या लेखातून जाणून घेऊया. 

कडधान्याचे फायदे (Benefits of Sprouts)

कडधान्यामध्ये विटामिन डी, मिनरल्स आणि प्रोटीनचे प्रमाण अधिक असते. त्याच्या सेवनामुळे आपल्या शरीराला खूपच फायदे मिळतात. नक्की काय फायदे आहेत ते जाणून घेऊया. 

1. जेवण पचण्यास सहायक

Shutterstock

ADVERTISEMENT

कडधान्यांमध्ये एंजाइम्सचं प्रमाणही अधिक असतं. ज्यामध्ये मेटाबॉलिक प्रक्रिया आणि केमिकल रिअॅक्शनचे कार्य हे योग्य तऱ्हेने चालते. यामध्ये फायबरचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे पचनक्रियेसाठी याचा जास्त प्रमाणात फायदा होतो. पचनक्रिया नीट नसेल तर वजनवाढीला कारणीभूत ठरते. पण कडधान्यांचे नियमित सेवन केल्याने पचनक्रिया सुरळीत होऊन तुम्हाला वजन वाढीच्या त्रासापासूनही सुटका मिळते. 

फायबरयुक्त पदार्थ आणि फळं खाल्ल्यामुळे होणार फायदे

2. रक्तप्रवाह करते सुरळीत

कडधान्याे सेवन केल्याने तुम्हाला योग्य प्रमाणात लोह आणि कॉपर मिळते.  त्यामुळे शरीरामध्ये लाल पेशींचा विकास व्यवस्थित होतो आणि त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत चालू राहातो. तसंच ऑक्सिजन हा आपल्या शरीरातील अवयव आणि पेशींपर्यंत पोहण्यासाठी सोपा होतो. यामुळे शरीरातील अवयव आणि पेशी आपले कार्य योग्य प्रमाणात करू शकतात. रक्तप्रवाह सुरळीत राहिल्याने अनेक आजारांपासून आपल्याला दूर राहाता येते. 

3. वजन कमी करण्यास फायदेशीर

ADVERTISEMENT

Shutterstock

कडधान्य हे तुमचे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. कारण कडधान्यांमध्ये मंप कॅलरीचे प्रमाण कमी असेत आणि प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे तुमचे वजन नेहमी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. त्यामुळेच तुम्ही कोणतेही डाएट करत असाल तर त्यामध्ये कडधान्यांचा समावेश करून घेण्यात येतो. यामध्ये जास्त प्रमाणात फॅट नसते. तसेच पचनक्रिया सुरळीत होऊन शरीरामध्ये कडधान्ये चरबी साठू देत  नाहीत. 

जाणून घ्या पोट कमी करण्यासाठी अकुंरित धान्य कसे आहेत फायदेशीर

4. प्रतिकारशक्ती चांगली राहाते

कडधान्यामध्ये विटामिन सी चे अधिक प्रमाण असते. ज्यामुळे शरीरातील पांढऱ्या पेशींचा विकास होतो. पांढऱ्या पेशी या शरीराला होणारे इन्फेक्शन आणि आजारापासून वाचवण्यासाठी मदत करत असतात. तुम्हाला निरोगी राखण्याचं काम या पेशी करतात. त्यामुळे या पेशींना वाढवण्यासाठी तुम्ही नियमित कडधान्ये खायला हवीत. 

ADVERTISEMENT

5. डोळ्यांसाठी फायदेशीर

Shutterstock

कडधान्यांमध्ये फायबर आणि प्रोटीनशिवाय विटामिन ए देखील आढळतं. जे आपल्या डोळ्यांसाठी फायदेशीर ठरतं. त्याचप्रमाणे कडधान्यांमध्ये अँटिऑक्सिंड्टसचे गुणधर्मही आढळतात. जे तुमच्या डोळ्यांच्या पेशींना कणांपासून त्रास होण्यापासून वाचवतात.

या पावसाळ्यात करा कडधान्यांच्या या चटकदार हेल्दी रेसिपी (Mouth Watering Sprout Recipes)

ADVERTISEMENT

6. हृदयाची घेते काळजी

कडधान्यामध्ये ओमेगा – 3 फॅटी अॅसिडचे प्रमाणही आढळते, जे आपल्या चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते आणि वाईट कोलेस्ट्रॉलदेखील आपल्या रक्तातून कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो.  ओमेगा – 3 फॅटी अॅसिड हे एका तऱ्हेचे अँटीइन्फ्लेमेटरी आहे जे तुमच्या कार्डिओ व्हॅस्क्युलर सिस्टिममधून थकवा दूर करण्यासाठी उपयुक्त ठरते.  

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

16 Mar 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT