अंडरवर्ल्डच्या संपर्कामुळे संपले या अभिनेत्रींचे करीअर

अंडरवर्ल्डच्या संपर्कामुळे संपले या अभिनेत्रींचे करीअर

मनोरंजन नगरीमध्ये टिकायचं असेल तर तुम्हाला खडतर असे परिश्रम घ्यावे लागतात.  असेच उठून कोणीही एका झटक्यात स्टार होत नाही. त्यासाठी त्यांना विशेष मेहनत घ्यावी लागते. पण एक चुकीचा निर्णय एखाद्याचे करिअर कसे बिघडवू शकते. याचा अनुभव अनेक अभिनेत्रींना आला आहे. कास्टींग काऊच आणि अंडरवर्ल्डशी असलेला संपर्क यामुळे अनेकांनी ही मनोरंजन नगरी सोडली आहे. तर काहींना यामुळे कामही मिळणे बंद झाले. अंडरवर्ल्ड हा शब्द ऐकला तरी अनेकांचे हातपाय थरथरायला लागतात. अशा अंडरवर्ल्डशी जवळीक करणे काही अभिनेत्रींना इतके त्रासदायक ठरले की, त्यांना या क्षेत्रातून कायमचे बाहेर पडायला लागले. जाणून घेऊया अशा काही अभिनेत्री

लग्न तुटल्याच्या बातमीवर गायिका सुनिधी चौहानचं मौन पण...

 

मंदाकिनी

Instagram

‘राम तेरी गंगा मैली हो गई’ या चित्रपटातील मंदाकिनीच्या अदांनी सगळ्यांनाच घायाळ केले होते. धबधब्याखाली पाण्यात आंघोळ करणारी मंदाकिनी यामुळे एका रातोरात प्रसिद्ध झाली. तिच्या या बोल्ड अंदाजामुळे तिच्यावर टीकाही खूप झाली. 30 जुलै 1963 चा मंदाकिनीचा जन्म. मेरठमध्ये तिचा जन्म झाला. ‘राम तेरी गंगा मैली हो गई’ या चित्रपटात तिच्या आधी संजना कपूर आणि डिंपल कपाडिया यांचा विचार करण्यात आला होता. पण हा रोल मंदाकिनीला मिळाल्यानंतर सगळ्यांनाच थोडे आश्चर्य वाटले. त्यानंतर मंदाकिनीने अनेक चित्रपटात काम केले. पण तिच्यासाठी एक फोटो करिअरचे शेवट बनला हा फोटो म्हणजे 1994-95 दरम्यान दुबईच्या शारजाह मैदानात रंगलेल्या भारत-पाकिस्तान मॅचच्या दरम्यान तिचे आणि दाऊद इब्राहिमचे बाजूला बसणे. त्यानंतर अंडरवर्ल्डच्या भीतीने तिला चित्रपट मिळणेच बंद झाले. सध्याच्या माहितीनुसार मंदाकिनीचे लग्न झाले असून आता ती नवऱ्यासोबत खूश आहे. आणि बॉलीवूडपासून दूर 

मोनिका बेदी

Instagram

अंडरवर्ल्डशी संपर्क असलेली दुसरी अभिनेत्री म्हणजे मोनिका बेदी. मोनिका बेदी हिचे अंडरवर्ल्ड डॉन आणि अबू सालेम यांच्याशी असलेले संबंध तिच्या करिअरसाठी जास्तच त्रासदायक ठरले. अबू सालेम याच्याशी तिचे असलेले प्रेम संबंध आजही प्रसिद्ध आहे. तिने त्याला अनेक मिशनमध्ये मदत केल्याचे आरोपही तिच्यावर झाले होते. पण तिने अबू सालेम हा अंडरवर्ल्डशी संबधित असलेले तिला माहीत नव्हते अशी माहिती तिने दिली होती. पण तिचे असे बेजबाबदार वागणे तिच्या करिअरसाठी घातक ठरले. 2002 साली मोनिकाला बनावट पासपोर्टसाठी अटक करण्यात आले होते. ती बिग बॉसमध्येही दिसली होती. पण त्याचाही तिच्या करिअरसाठी कोणताही फायदा झाला नाही.

लॉकडाऊनमध्ये टायगर आणि दिशा पटानी लिव्ह-इनमध्ये रहात असल्याची चर्चा

ममता कुलकर्णी

Instagram

हॉट आणि सेन्शुअल अभिनेत्री म्हणून ममता कुलकर्णीची ओळख होती. तिच्या अदांनी तिने अनेकांना घायाळ केले होते.  ममता कुलकर्णीचे नाव अंडरवर्ल्डशी जोडले गेले होते. फिल्मी करिअरमध्ये माफिया विक्की गोस्वामीसोबत लग्न केले. 2016 साली ममता कुलकर्णीला केन्याचा विमानतळावर पकडण्यात आले होते. ड्रग्जची तस्करी केल्यामुळे तिला अटक करण्यात आली होती. तिची विचारपूस करण्यात आली होती. त्यानंतर ती बॉलीवूडपासून दूर गेली. त्यानंतर तिने संन्यास घेतला. आता ती संन्यासी जीवन जगत आहे. काहीच दिवसांपूर्वी तिने तिच्यासोबत घडलेली आपबिती सांगितली. पण या सगळ्यामध्ये तिचे करिअर मात्र वाया गेले.

शोले रिमेक एकाच अटीवर बनवणार

साक्षी शिवानंद

Instagram

1995  साली आलेल्या ‘जन्म कुंडली’ या चित्रपटातून साक्षी शिवानंद हिने चित्रपटात डेब्यू केला.  ‘.पापा कहते है’, ‘क्रोध’,’आपको पहले भी कही देखा है’ या चित्रपटात तिने काम केले आहे. आपको पहले भी कही देखा है हा चित्रपट तिच्या करिअरसाठी टर्निंग पॉईंट ठरला.  या चित्रपटानंतर अंडरवर्ल्डने तिच्या आयुष्यात हस्तक्षेप करायला सुरुवात केली.त्यामुळे घाबरलेल्या साक्षीने चित्रपटसृष्टी सोडून देण्याचा निर्णय घेतला. साक्षी साऊथच्या चित्रपटातील एक चांगली अभिनेत्री होती. पण तिने हे सगळे सोडून वेगळाच मार्ग निवडायचे ठरवले आहे. 


अंडरवर्ल्डमुळे अभिनेत्रींच्या आयुष्यात असे वादळ आले की, त्यांचे करीअरच खराब झाले.