लग्न तुटल्याच्या बातमीवर गायिका सुनिधी चौहानचं मौन पण…

लग्न तुटल्याच्या बातमीवर गायिका सुनिधी चौहानचं मौन पण…

प्रसिद्ध बॉलीवूड गायिका सुनिधी चौहानची वेगळी ओळख सांगण्याची गरज नाही. तिने आपल्या आवाजाच्या जादून लोकांच्या मनात जागा बनवली आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीत तिने अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. पण जेवढं चांगलं तिचा करिअर ग्राफ आहे. तेवढंच चर्चेत राहिलं आहे ते तिचं खाजगी आयुष्य.

बातमी आहे की, सुनिधी आणि तिचा नवरा हितेश सोनिक हे एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. हो..लॉकडाऊनदरम्यान त्यांचं 8 वर्ष जुनं लग्न तुटलं आहे. या बातमीवर सुनिधीचं मौन असलं तरी हितेशचं स्पष्टीकरण समोर आलं आहे.

सुनिधीचं मौन तर नवऱ्याचं अजब उत्तर

स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार, सुनिधी आणि हितेश गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळे राहत आहेत. पण दोघांनी कधीही आपल्या नात्यातील हा दुरावा लोकांसमोर येऊ दिला नाही. जेव्हा दोघांना याबाबत विचारण्यात आलं तेव्हा मात्र दोघांनीही यावर बोलण्यास नकार दिला. पण या बातमीला खोटं ठरवत सुनिधीचा नवरा संगीत दिग्दर्शक हितेश सोनिकने दिलेलं स्पष्टीकरण अजब आहे. एका वृत्तपत्रानुसार सुनिधी याबाबत विचारण्याचा प्रयत्न झाला तेव्हा तिने काहीच कमेंट दिली नाही. पण हितेशने ही बातमी खोटं असल्याचं सांगितलं आणि म्हणाला की, आम्ही दोघंही एकाच घरात राहत आहोत. लॉकडाऊनदरम्यान आम्ही सर्व कामंही वाटून घेतली आहेत. हितेश विनोदी अंदाजात उत्तर दिलं की, कदाचित ती माझ्या घरकामामुले खूश नाही. म्हणून या बातम्या येत आहेत.

View this post on Instagram

Goa!!!!

A post shared by Sunidhi Chauhan (@sunidhichauhan5) on

बातमी आहे की, सुनिधी आणि हितेश काही दिवसांपूर्वीच आपल्या मित्रमंडळींसोबत गोवा ट्रीपला जाऊन आले. या गोवा ट्रीपचे फोटोजही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले. पण गोव्याहून आल्यावर मात्र ते वेगळे राहत असून त्यांच्यातील नातं बिघडल्याचं कळतंय.

सुनिधी आणि हितशेचं वैवाहिक नातं

View this post on Instagram

Earthlings..... 😷

A post shared by Sunidhi Chauhan (@sunidhichauhan5) on

बराच काळ डेट केल्यानंतर 2012 मध्ये या दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर त्यांनी गोव्यात ग्रँड रिसेप्शनही दिलं. त्यांच्या लग्नाला 8 वर्ष झाली आहेत. या दोघांना 2018 साली मुलगाही झाला. मुलांसोबतचे फोटोज ते नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असतात.

सुनिधीचं दुसरं लग्न

गायिका सुनिधीचं हे दुसरं लग्न असून तिने 2002 साली वयाच्या 19 व्या वर्षी लग्न केलं होतं. कोरिओग्राफर बॉबी खानसोबत तिने लग्न केलं होतं. जे फार काळ टिकलं नाही. एका वर्षातच सुनिधीने बॉबी खानपासून घटस्फोट घेतला होता.