‘रोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरला आपल्यापासून दूर ठेवा’ अशा आशयाची म्हण आपण नक्कीच ऐकली आहे. सफरचंदाचे अनेक फायदे आहेत. आपण केवळ ऐकून आहोत. पण याचे फायदे आहेत म्हणजे नक्की यामध्ये काय काय आहे याची माहिती तुम्हाला आहे का? सफरचंद कधीही सोलून खाऊ नये तर सालीसकट खावे त्यामुळे तुमच्या शरीराला अधिक फायदे मिळतात आणि हे सत्य आहे. यामध्ये पेक्टिन फायबर भरपूर असून आपल्या शरीरातील साखर नियंत्रणात ठेवण्याचे काम सफरचंद करते. त्याशिवाय यामध्ये महत्त्वाचे विटामिन्स आणि खनिजेही आहेत. जे आपल्या हाडांना मजबूत ठेवण्यास कारणीभूत ठरतात. पण केवळ सफरचंदच नाही तर त्याच्या सालीचे फायदे अधिक आहेत आणि त्यामुळेच सफरचंद हे नेहमी सालीसकट खायला हवे. सफरचंदाच्या सालीचे नक्की काय फायदे आहेत ते आपण या लेखातून जाणून घेऊया.
संयुक्त राज्य अमेरिका कृषी विभाग (युएसडीए) नुसार, सफरचंदात आढळणारे अधिकांश फायबर हे त्याच्या सालीमध्ये असते. फायबर तुम्हाला अधिक काळापर्यंत पोट भरलेले असल्याची जाणीव करून देते. त्याशिवाय फायबर हे तुमच्या निरोगी हाडे आणि तसेच यकृत निरोगी राखण्यासाठीही मदत करते. फायबर तुमच्या पचनशक्तीला वाढ मिळवून देते. तसेच मधुमेह असणाऱ्या रूग्णांना साखर नियंत्रणात ठेवण्यासाठीही उपयुक्त ठरते.
सफरचंदाच्या सालीमध्ये क्वार्सेटिन नावाचे एक शक्तीशाली यौगिक आढळते. जे अँटिइन्फ्लेमेटरी स्वरूपात आपण ओळखतो. यामुळे तुमचे फुफ्फुस आणि हृदय विविध रोगांपासून दूर राखण्यास मदत मिळते. त्यामुळे किमान आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी तुम्ही सालीसकट सफरचंद खायला हवे.
फळं स्वच्छ करण्याची ही पद्धत आहे सगळ्यात सोपी
सफरचंदाच्या सालीतील आढळणाऱ्या फायबरमुळे तुमचे पोट अधिक वेळ भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे तुम्ही अतिरिक्त खाणं खाण्यापासून दूर राहाता. याचा परिणाम होतो तो म्हणजे तुम्ही कमी कॅलरीचे सेवन करता आणि तुमचे वजन कमी व्हायला सुरूवात होते. याशिवाय सफरचंदाच्या सालीमध्ये पॉलीफेनॉल असते जे कार्ब्स आणि चरबी शोधून घेण्याचे काम करते. वजन कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो.
काही अभ्यासानुसार हे सिद्ध झाले आहे की, सफरचंदाच्या सालीतील आढळणारे पॉलीफेनॉल रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. इतकंच नाही तर सफरचंदाच्या सालीच्या सेवनामुळे तुमचे हृदय निरोगी राखण्यासाठी मदत मिळते.
सफरचंदाच्या सालीमध्ये विटामिन एस, सी आणि के आढळते. त्याशिवाय यामध्ये पोटॅशियम, फॉस्फरस आणि कॅल्शियमसारखी शरीराला आवश्यक असणारी खनिजेही भरलेली आहेत. जी आपल्याला निरोगी ठेवण्यास फायदेशीर ठरतात. तसंच सर्व पोषक तत्व आपल्या हृदय, मेंदू, नस, त्वचा आणि हाडांची रक्षा करण्यास मदत करतात.
त्यामुळे तुम्ही जर सफरचंद खात असताना साल काढून घात असाल तर तसे करू नका. बाजारात यावर वॅक्स लावण्यात येत असेल म्हणून तुम्ही जर असे करत असाल तर सफरचंद व्यवस्थित धुवा आणि मग सालीसकट खा. कारण याने तुमच्या शरीराला अधिकाधिक फायदा मिळेल.
घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा