घरातील कामे करताना, व्यायाम करताना अथवा पटकन घराबाहेर जाताना तुम्ही तुमच्या केसांचा हाय पोनीटेल बांधता. कारण ती एक झटपट होणारी आणि सोपी हेअरस्टाईल आहे. शिवाय स्वयंपाक अथवा घरातील कामे करताना यामुळे तुमचे केस गळण्याचा धोकाही टाळता येतो. लांबसडक अथवा मानेखालील उंचीच्या केसांना बांधून ठेवण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. पण असं केल्यामुळे कदाचित तुमचं वारंवार डोकं दुखू शकतं. जर तुमचं नेहमी असं डोकं दुखत असेल तर तुम्हाला तुमची हेअरस्टाईल बदलण्याची गरज आहे हे लक्षात घ्या. यासाठी जाणून घ्या तुमच्या या हेअरस्टाईलचा आणि डोकेदुखीचा नेमका काय संबध आहे.
हाय पोनीटेलमुळे का दुखतं तुमचे डोकं
हाय पोनीटेलसाठी एखाद्या इलॅस्टिक रबरने तुम्ही तुमचे सर्व केस वरच्या दिशेने घट्ट बांधून ठेवता. तुमच्या केसांच्या फॉलिकल्स आणि स्काल्पमध्ये अतिशय संवेदनशील अशा रक्तवाहिन्या असतात. जेव्हा तुम्ही बराच वेळ केस असे घट्ट बांधून ठेवता तेव्हा या रक्तवाहिन्यांवर ताण येऊ लागतो. शिवाय पोनीटेल बांधण्यासाठी तुम्ही रबराचा वापर करता त्यामुळे तुमचे केस घट्ट आवळले जातात आणि त्यांच्यावर हळूहळू हा ताण येण्यास सुरूवात होते. डोकेदुखी होण्यासाठी हे कारण पुरेसं आहे. जर तुम्ही एकदा कधीतरी अशी हेअरस्टाईल केली असेल तर कदाचित तुमचं डोकं दुखणार नाही. मात्र वारंवार अशा पद्धतीने केस बांधून ठेवणं डोकेदुखीसाठी कारणीभूत ठरू शकतं. जर तुम्हाला मायग्रेनचा त्रास असेल तर अशा प्रकारच्या हेअरस्टाईलमुळे तुमचा त्रास अधिकच वाढण्याची शक्यता आहे. कधी कधी तर या त्रासमुळे केसांमधून साधा कंगवा फिरवल्यावरदेखील डोकं दुखू शकतं. अशा परिस्थितीत केस मोकळे सोडल्यामुळे लगेच आराम मिळू शकतो. म्हणूनच आाता तुम्हाला तुमची हेअरस्टाईल बदलण्याची नक्कीच गरज आहे.
Shutterstock
डोकेदुखी कमी करण्यासाठी नेमका काय उपाय करावा
डोके दुखण्याची कारणे खरंतर अनेक असू शकतात. मात्र जर तुम्हाला सतत डोके दुखायचा त्रास होत असेल तर तुम्हाला आता तुमची हेअरस्टाईल बदलण्याची गरज आहे हे ओळखा. तुम्ही केस अशा पद्धतीने बांधण्यापेक्षा मानेवर सैलसर वेणी घालून तुमचे केस बांधून ठेवू शकता. जर तुमचे केस लहान असतील तर बॉबीपिनने तुम्ही एखादी साधी हेअरस्टाईल करू शकता. ज्यामुळे तुम्हाला असा घट्ट पोनी बांधण्याची मुळीच गरज भासणार नाही. वास्तविक केस बांधण्यापेक्षा ते मोकळे सोडणेच तुमच्यासाठी योग्य आहे. मात्र काम करताना अथवा उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही तुमचे केस अती ताण न देता सैलसर बांधून ठेवू शकता. केसांच्या मुळांवर आणि स्काल्पवर ताण येणार नाही अशा पद्धतीने केस बांधल्यास तुमचा त्रास नक्कीच कमी होऊ शकतो. मात्र असं करून देखील जर तुम्हाला डोके दुखण्याचा त्रास होतच असेल तर तुम्हाला त्वरीत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज आहे. कारण मघाशीच सांगितल्याप्रमाणे डोके दुखण्याची कारणे अनेक आहेत. मात्र तोपर्यंत तुमची हेअरस्टाईल बदलून पाहण्यास काहीच हरकत नाही.
Shutterstock
फोटोसौजन्य – शटरस्टॉक
हे ही वाचा –
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.
अधिक वाचा –
महाराष्ट्रीयन नववधूवर खुलून दिसतील या ’15’ हेअरस्टाईल्स