पित्तामुळे उठणाऱ्या चट्ट्यांवर घरच्या घरीच मिळवा आराम (Home Remedies On Urticaria )

पित्तामुळे उठणाऱ्या चट्ट्यांवर घरच्या घरीच मिळवा आराम (Home Remedies On Urticaria )

शरीरावर पित्ताचे चट्टे उमटणे किंवा शरीरावर गांध उमटण्याचा त्रास आपल्यापैकी कितीतरी लोकांना झाला असेल. हे चट्टे उमटले की, त्वचेवर विलक्षण खाज उठायला सुरुवात होते. ही खाज इतकी तीव्र असते की, शरीरावर त्यामुळे जखमा ही होऊ शकतात. पित्तामध्ये तुमच्याही संपूर्ण अंगावर चट्टे उठून आग आग होत असेल तर तुम्हाला झालेला हा त्रास कमी करण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय आहेत. हे उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच पित्तावेळी होणारा त्रास आटोक्यात आणता येईल.

डबलचीन घालवण्यासाठी व्यायाम नाही तर वापरा या ट्रिक्स

असे असतात पित्ताचे चट्टे

shutterstock

आता पित्ताचे चट्टे नेमके कसे असतात हे अनेकांना माहीत नसेल तर पित्ताचे चट्टे लाल असतात. असे चट्टे शरीरातील टॉक्झिक वाढले की येतात. काहींना जर सतत अपचनाचा त्रास असेल तर त्यांना हा त्रास हमखास होतो. या काळात चामडी जाड जाड असल्यासारखी वाटते. सतत खाजवावेसे वाटते. 

मुलाने हे खायलाच हवं हा हट्ट वाढवू शकतो तुमच्या मुलांमधील लठ्ठपणा

आता जाणून घेऊया या शीत पित्तावरील सोपे उपाय

shutterstock

तुमच्या घरीच तुम्ही या पित्तावर सोपे उपाय करु शकता. तुमच्या किचनमध्ये उपलब्ध असलेल्या काही गोष्टीच त्यावरील उत्तम इलाज आहेत. जाणून घेऊया या गोष्टी नेमक्या कोणत्या 

कोकम किंवा आमसूल: आपल्या प्रत्येकाकडे अगदी हमखास किचनमध्ये असणारी गोष्ट म्हणजे कोकम किंवा आमसूल. जर तुम्हाला पित्ताचा त्रास झाला असेल आणि तुमच्याकडे छान ओली कोकमं असतील तर ती थेट तुम्ही तुमच्या चट्ट्यांवर लावू शकता. शरीरावर आलेली खाज शमवण्यासाठी कोकम हा उत्तम इलाज आहे. आता जर तुम्हाला कोकम त्वचेवर चोळायची नसेल तर तुम्ही कोकमाचा रस घेऊ शकता. कोकमाच्या रसात, भाजलेली जीरा पूड आणि साखर घालून त्याचे सेवन करा तुम्हाला आराम मिळेल.

पुदिना: शीत पित्तावर पुदिनाही खूप छान काम करतो. पुदिन्याच्या रसाचे सेवन केले तरी चालू शकते. किंवा काही पुदिन्याची पाने घेऊन ती छान उकळवून घ्या. उकळवताना त्यामध्ये साखर घाला त्याचा छान काढा तयार होतो. अशा पद्धतीने तुम्हाला पुदिन्याचा काढा बनवून त्याचे सेवन करायचे असते. दिवसातून किमान दोन ते तीनवेळा तरी तुम्हाला याचे सेवन करावे लागते त्यामुळे तुम्हााल छान आराम मिळतो. आता जर तुम्हाला पुदिन्याचा हा काढा प्यायचा नसेल तर तुम्ही पुदिन्याच्या पानांचा नुसता रस काढून जरी अंगाला लावला तरी तुम्हाला आराम मिळतो. 

हळद: जर तुम्हाला सतत पित्त उठण्याचा त्रास होत असेल तर तुमच्यासाठी हळद अत्यंत गुणकारी आहे. एका ग्लासात दूध किंवा पाणी घेऊन त्यात हळद घालावी आणि हे हळदीचे पाणी किंवा दूध प्यावे तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. 

बडीशेप आणि जीर: शीत पित्तावर  बडीशेप आणि जीरंही खूप गुणकारी आहे. जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर तुम्ही दररोज याचे सेवन करायला हवे. रात्री साधारण अर्धा चमचा बडीशेप आणि जीरं पावडर (प्रत्येकी) भिजत घाला. सकाळी या पाण्यामध्ये चवीनुसार खडीसाखर घालून हे पाणी उपाशीपोटी प्या तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. 


आवळा रस: शीत पित्तावर आवळा रस ही अत्यंत गुणकारी आहे. तुम्हाला असा त्रास सतत होत असेल तर तुम्ही रोज आवळ्याच्या रसाचे सेवन करा तुम्हाला नक्कीच बरे वाटेल. 

आता असे काही सोपे इलाज करुन तुम्ही पित्तामुळे उठणाऱ्या चट्ट्यांचा त्रास कमी करु शकता.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.