ADVERTISEMENT
home / Fitness
डोकेदुखीने हैराण असाल तर ज्योतिषशास्त्रानुसार असे करा उपाय

डोकेदुखीने हैराण असाल तर ज्योतिषशास्त्रानुसार असे करा उपाय

डोकेदुखी ही आताच्या काळात फारच सर्वसाधारण अशी समस्या आहे. डोकेदुखी झाल्यानंतर आपण अनेक वेगवेगळे उपाय करतो. बरेचदा डोकेदुखी ही सर्दी किंवा पित्तामुळे होते. याशिवाय अनेक वेगळ्या कारणांनी प्रत्येकाला डोकेदुखी होते. पण तुम्हाला माहीत आहे का तुमच्या डोकेदुखी मागे ग्रह- नक्षत्र हे देखील कारणीभूत असतात. बरीच औषधे घेऊनही डोकेदुखीमधून तुम्हाला डोकेदुखीमधून आराम मिळत नसेल तर ज्योतिषशास्त्रानुसार काही उपाय आहेत जे तुम्हाला डोकेदुखीतून नक्कीच आराम देतील. जाणून घेऊया डोकेदुखीवर ज्योतिषशास्त्राचे उपाय

जाणून घ्या जलनेतीची योग्य पद्धत, डोकेदुखी, सायनस होईल दूर

ज्योतिषशास्त्रानुसार डोकेदुखीचे कारण

 ज्योतिषशास्त्र हे डोकेदुखीसाठी कसे कारणीभूत असते हे आधी जाणून घेऊया. प्रत्येकाच्या जन्मकुंडलीमध्ये प्रथम भाव डोक्याशी निगडीत असेल तर तो डोक्याचे प्रतिनिधित्व करतो.  जर तुमच्या पत्रिकेत असा भाव असेल तर ज्योतिषशास्त्रानुसार तुम्हाला डोकेदुखी असण्याचा त्रास होत असेल. जन्मकुंडलीमध्ये पहिल्या ग्रहाचा मान हा सूर्याला असतो. जर   तो ग्रह कमजोर पडला तरी देखील डोकेदुखी होऊ शकते.  जर सूर्य पहिल्या, बाराव्या घरामध्ये  अत्यंत कमजोरस्थितीमध्ये असेल  किंवा मंगल ग्रह हा अधिक पीडित असेल तर डोकेदुखी आणि मायग्रेन होण्याची शक्यता असते.  जर सूर्य आणि मंगळ मजबूत असेल तर मात्र तुमच्या शरीरामध्ये उर्जेची मुळीच कमतरता नाही. 

क्लस्टर डोकेदुखी म्हणजे काय आणि कसे करावे उपचार

ADVERTISEMENT

डोकेदुखीचे ज्योतिषशास्त्रीय उपाय

ज्योतिषशास्त्रानुसार डोकेदुखीची कारणं जाणून घेतल्यानंतर आता त्यावर ज्योतिषशास्त्र नेमका कोणता उपाय सांगतो हे जाणून घेऊया. 

  • सूर्य नमस्कार आणि गायत्री मंत्र हा यावरील एक उत्तम उपाय आहे. सूर्यनमस्कारामुळे शरीरातील रक्तपुरवठा सुरळीत होतो. तर गायत्री मंत्र तर मनाचे समाधान देतो. 
  • नारळपाण्याचे सेवन हे देखील ज्योतिषशास्त्रानुसार फायदेशीर ठरते. 
  • 108 वेळा सूर्यदेवाय नम: हा मंत्र जाप करा.त्यामुळेही तुम्हाला आराम मिळेल. 
  • धन्वंतरी होम किंवा कोणत्याही मंगल होमामुळेही डोकेदुखीपासून आराम मिळतो. 
  • सकाळी उठून सूर्याचे दर्शन घेतले तरी देखील तुम्हाला नक्कीच आराम मिळू शकतो. 

 त्वरीत परिणामासाठी करा डोकेदुखीवर घरगुती उपाय (Headache Home Remedies In Marathi)

 

अन्य डोकेदुखीची कारणे

डोकेदुखीच्या कारणांचा विचार करता वेगवेगळ्या कारणांमुळे डोकेदुखी होऊ शकते. त्याकडे तुम्ही मुळीच दुर्लक्ष करु नका. जर तुम्हाला ज्योतिषशास्त्रावर विश्वास असेल तर तुम्हाला असे उपाय करण्यास काहीच हरकत नाही. कारण त्यामुळे तुम्हाला नक्कीच खूप आराम मिळेल. 

ADVERTISEMENT
05 Apr 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT