बाजारात अळूची पाने दिसली की लगेचच आपण अळूचे फदफदे किंवा चमचमीत अळूवड्या करण्याचा बेत आखतो. पण बाजारात असलेला अळू हा भाजीचा आहे की, अळूचा हे खूप जणांना आजही ओळखता येत नाही. तुम्हालाही अळूसंदर्भात हा प्रश्न पडत असेल तर तुम्हाला हा अळू ओळखण्याची सोपी पद्धत माहीत हवी. ही पद्धत तुम्हाला कळली की, तुम्हाला कोणत्या अळूच्या पानापासून काय करायचे ते देखील कळेल. मग करुया सुरुवात
सर्वसाधारणपणे भाजीच्या अळूचे आपण फदफदे किंवा पातळ भाजी बनवतो. या भाजीसाठी लागणारे अळू छान शिजण्याची गरज असते. जर ही पान छान शिजली की, अळूची भाजी छान लागते. आता त्यासाठी तुम्हाला अळूची पाने पातळ लागतात.त्यामुळे ज्यावेळी तुम्ही अळूची पानं घ्यायला जाता तेव्हा पातळ, मऊ, पातळ शिरा असलेली पान दिसतील ही पान भाजीच्या अळूची असतात. आता या अळूच्या पानाबद्दल आणखी एक गोष्ट सांगायची झाली तर भाजीचे अळू हे थोडे खाजाळू असते. ते शिजवताना किंवा स्वच्छ करताना कोकम, चिंच हाताळा छान चोळून घ्यावे लागते. नाहीतर त्याची खाज अनावर होते. अनेक जण भाजी करताना म्हणजे अळू शिजवताना त्यामध्ये कोकम घालतात. त्यामुळे त्याची खाज कमी होते. याशिवाय अळूच्या दांड्यामध्येही फरक असतो. कोकणात पांढऱ्या रंगाच्या दांड्या असलेल्या अळूच्या पानांना ‘तेरं’ असे म्हणतात. हे फक्त भाजीसाठी वापरण्यात येते
परफेक्ट आणि कुरकुरीत भजी करायच्या असतील तर फॉलो करा या टीप्स
आता भजीच्या अळूचा विचार करत असाल तर भजीच्या अळूची पानही थोडी जाड असतात. त्याच्या शिरा जाड असतात. ती हाताला मुळीच मऊ लागत नाही. त्यांचा रंगही थोडा गडद हिरवा असतो. ही पान भाजीच्या अळूच्या तुलनेत थोडू कमी खाज देणारी असतात. पण तरीही तुम्हाला अळूवड्यांमध्येही कोकम किंवा चिंचाच्या पाण्याचा उपयोग करावाच लागतो. तशीतर अळूची पानं वर्षभर उपलब्ध असतात.पण पावसाळ्यात अळूची भाजी मिळण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे या अळूला एक वेगळी चव सुद्ध असते. त्यामुळे पावसात, श्रावणात ही पानं मिळण्याचे प्रमाण जास्त असते.
महागड्या कांद्याला करा हद्दपार, या स्वस्त-मस्त पर्यायांनी स्वादिष्ट होईल स्वयंपाक
अळूच्या पानांमधील फरक तुम्हाला कळला असेलच. त्यानुसार अळूच्या पानांची निवड करा.
आता अळूच्या पानांमधील हा फरक तुम्हाला नक्कीच लक्षात आला असेल. आता अळू बाजारातून घेताना ही गोष्ट नक्की लक्षात घ्या.
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.