डोळ्यांखाली आलेल्या काळ्या वर्तुळांना आपण ‘डार्क सर्कल’ (Dark Circle) म्हणतो. डार्क सर्कल येण्याची बरीच कारणे आहेत. अपुरी झोप, ताण-तणाव, सतत कॉम्प्युटर स्क्रिनवर असलेले काम किंवा दिवसभर मेकअपमध्ये असणे हे सुद्धा यामागील कारण असू शकते. तुम्ही या डार्क सर्कलकडे दुर्लक्ष केले की, आपोआपच तुमचा चेहरा अधिक शुष्क जाणवू लागतो. तुमच्या चेहऱ्यावरील सगळे तेज निघून जाते. तुमच्या अति दुर्लक्षित करण्यामुळे डोळ्यांच्यावरील भागही काळा होऊ दिसू लागतो. आरशात तुम्ही स्वत:कडे नीट निरखून पाहा. तुमचेही डोळे खोल गेल्यासारखे वाटत आहे किंवा डोळ्यांच्या आजुबाजूचा भाग काळा दिसू लागला आहे. तर आज आम्ही तुम्हाला घरीच अगदी 5 मिनिटात फक्त 3 साहित्याचा उपयोग करुन हे अंडर आय क्रिम बनवायला शिकवणार आहोत.
या लोकांनी मुळीच पिऊ नये ग्रीन टी, होऊ शकतं नुकसान
असे बनवा अॅलोवेरापासून अंडर आय क्रिम
Shutterstock
आता अंडर आय क्रिम घरी बनवायचे म्हटल्यावर तुम्हाला काही गोष्टी आहे की नाही ते पाहावे लागेल. चला तर मग करुया सुरुवात
साहित्य:
अॅलोवेरा जेल, नारळाचे/बदामाचे/ऑलिव्ह/व्हिटॅमिन E ( कोणतेही उपलब्ध तेल), एक लहान चमचा व्हॅसलीन जेली
कृती:
- एका प्लास्टिकच्या बाऊलमध्ये एक मोठा चमचा अॅलोवेरा जेल घ्या. बाजारात उपलब्ध असलेली किंवा तुमच्या घरी असलेली कोणत्याही ब्रँडची जेल तुम्हाला चालू शकेल.
- एक अगदी लहान चमचा पेट्रोलिअम जेली त्यामध्ये टाकून हे मिश्रण चांगलं मिक्स करायचे आहे.
- असे करताना तुम्हाला अॅलोवेरा जेलचा रंग बदलताना दिसेल. तुम्हाला हा रंग थोडा पांढरा होताना दिसेल. साधारण दोन ते तीन मिनिटं ते छान मिक्स करुन घ्या.
- आता त्यात तुमच्या आवडीनुसार आणि तुमच्या त्वचेला चालत असेल असे चार ते पाच थेंब तेल घाला. सगळे मिश्रण पुन्हा एकजीव करा.
- तयार क्रिम तुम्हाला फ्रिजरमध्ये अगदी 5 मिनिटांसाठी सेट करायला ठेवायची आहे.
- तुम्ही एखाद्या भांड्यात काढून कायमच ही क्रिम फ्रिजमध्ये ठेऊ शकता. म्हणजे नेहमी लावताना ती छान थंडावा देईल.
केस पातळ असल्याने हैराण असाल तर फॉलो करा या टिप्स
लावण्याची योग्य पद्धत
shutterstock
आता तुमची अॅलोवेरा अंडर आय क्रिम वापरण्यासाठी तयार आहे. आता यामुळे तुमचे डार्क सर्कल दूर होतात म्हणून त्याचा जास्त वापर करणे चांगले नाही.
- फ्रिजमधून थंडगार क्रिम काढल्यानंतर दोन्ही बोटांवर घेऊन ते डोळ्यांच्या खाली लावा.
- असे करताना पापण्यांच्या वर क्रिम लावायला विसरु नका.
- आता तुम्हाला थोडं आणखी रिलॅक्स व्हायचं असेल तर गोलाकार पद्धतीने डोळ्यांभोवती छान मसाज करा. त्यामुळे क्रिम त्वचेत मुरण्यास मदत होईल.
- असे तुम्ही एक दिवस आड किंवा आठवड्यातून तीनवेळा करा.
- हा प्रयोग करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की, तुम्हाला तुमचे डोळे अधिक छान दिसू लागतील. या क्रिममध्ये तेल असल्यामुळे तुमच्या पापण्याही दाट होतील आणि तुमच्या डोळ्यांखालील काळी वर्तुळ कमी होतील.
मग आता कोणतेही महागडे क्रिम बाजारातून घेण्यापेक्षा हे क्रिम नक्की ट्राय करा.