ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
DIY: त्वचेवर इन्संट ग्लो हवा असेल तर असा वापर करा ‘पपई’चा

DIY: त्वचेवर इन्संट ग्लो हवा असेल तर असा वापर करा ‘पपई’चा

लॉकडाऊनमुळे सध्या सर्वजण घरातच आहेत. शिवाय ब्युटी पार्लर बंद असल्यामुळे घरात राहून सौंदर्याची काळजी कशी घ्यायची हा प्रश्न अनेकींना सतावत आहे. जवळजवळ तीन आठवडे चेहऱ्यावर कोणतीही ब्युटी ट्रिटमेंट न केल्यामुळे स्वतःचा चेहरा आरशात पाहण्याचाही आता कंटाळा येत आहे. यासाठीच आम्ही तुम्हाला अगदी घरच्या घरी आणि सोप्या DIY पद्धतीने तुमचे सौंदर्य खुलवण्याची युक्ती सांगणार आहोत. लॉकडाऊनमुळे ब्युटी पार्लर जरी बंद असले तरी भाजी आणि फळं अशा जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा नक्कीच होत आहे. ज्यामुळे तुम्हाला या काळात पिकलेली पपई नक्कीच मिळेल. होय, आपण याच पपईचा वापर करून आपले सौंदर्य खुलवणार आहोत. कारण या पपईत अनेक गुणधर्म दडलेली आहेत. ज्यामुळे तुमची त्वचा अगदी चमकदार आणि फ्रेश दिसेल. म्हणूनच पिकलेल्या पपईचा वापर करून तयार करा असा सोपा आणि सहज होणारा फेसपॅक.

Shutterstock

पपईचा वापर केल्यामुळे तुमच्या त्वचेत होतील हे आश्चर्यकारक बदल –

काही संशोधनानुसार कच्च्या पपईमुळे जखमा आणि त्वचा समस्या दूर होतात. पपईमधील औषधी गुणधर्मांमुळे जखमा, व्रण भरून निघण्यास मदत होते. म्हणूनच पपई त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी वापरणे नक्कीच फायदेशीर ठरेल. त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी पिकलेली पपई वापरली जाते. यासाठीच आजकाल अनेक सौंदर्योत्पादनात पपईचा वापर हमखास केला जातो. याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी हे मुद्दे नक्की वाचा. ज्यामुळे घरीच हा होममेड फेसपॅक तयार करण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन मिळेल.

ADVERTISEMENT
  • पपईमधील पोटॅशियममुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. म्हणून जर तुमची त्वचा कोरडी आणि निस्तेज  असेल तर पपईचा फेसपॅक चेहऱ्यावर अवश्य वापरा.
  • वातावरणातील फ्री रेडिकल्समुळे तुमच्या चेहऱ्यावर वयाआधीच एजिंगच्या खुणा दिसू लागतात. मात्र पपईमुळे तुम्ही चिरतरूण दिसू शकता.
  • पपईमध्ये अॅंटि बॅक्टेरिअल आणि अॅंटि फंगल घटक असतात ज्यामुळे तुमच्या त्वचा समस्या कमी होतात.
  • पपईचा वापर केल्यास तुमच्या त्वचेमधील कोलेजीनच्या निर्मितीला चालना मिळते. ज्यामुळे तुमची त्वचा मऊ आणि मुलायम होते. त्वचेचा सैलपणा कमी होता आणि तुम्ही चिरतरूण दिसता.
  • पिकलेल्या पपईमुळे तुमची त्वचा मुळापासून स्वच्छ होते. ज्यामुळे त्वचेतील डेडस्कीन आणि घाण निघून जाते. पिंपल्स कमी करण्यासाठी हा एक उत्तम नैसर्गिक उपाय आहे.
  • पपईमुळे तुमच्या चेहऱ्यावरील  अनावश्यक केसदेखील कमी होतात.
  • जर तुमच्या त्वचेवर सनबर्नच्या अथवा इतर त्वचा समस्येच्या खुणा असतील तर पपईमुळे त्या हळूहळू पूसट होतात.
  • त्वचेवरील काळे डाग आणि व्रण कमी झाल्यामुळे तुमच्या त्वचेचा पोत बदलतो आणि त्वचेला नैसर्गिक चमक येते

Shutterstock

पपईचा वापर करून केलेला होममेड फेसपॅक –

साहित्य – 

पिकलेला पपई, पिकलेले केळं आणि काकडी

ADVERTISEMENT

कसा तयार कराल फेसपॅक –

अर्धा कप पिकलेल्या पपईचा गर, अर्धा कप केळ्याचा गर आणि एक कप काकडीचा रस घ्या. हे सर्व मिश्रण एकजीव करा. तुमचा होममेड फेसपॅक तयार आहे. आहे की नाही अगदी सोपा आणि सहज होणारा फेसपॅक.

फेसपॅक चेहऱ्यावर लावण्याची पद्धत –

सर्वात आधी चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवा. त्यानंतर चेहरा स्वच्छ टॉवेलने टिपून घ्या. तयार फेसपॅक बोटांच्या मदतीने चेहरा आणि मानेवर पसरवा. कमीत कमी पंधरा मिनीटे तो चेहऱ्यावर तसाच असू द्या. त्यानंतर कोमट अथवा थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. आठवड्यातून एकदा अथवा दोनदा हा फेसपॅक तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता. या फेसपॅकमध्ये कोणतेही अनैसर्गिक घटक नसल्यामुळे त्वचेवर याचा दुष्परिणाम होत नाही. शिवाय यातील सर्व साहित्य तुम्हाला तुमच्या किचनमध्ये अगदी सहज मिळू शकते. तेव्हा या लॉकडाऊनच्या काळात हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा आणि इंस्टंट ग्लो मिळवा.

ADVERTISEMENT

Shutterstock

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

हे ही वाचा –

ADVERTISEMENT

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा

अधिक वाचा –

पोटातील चरबी आणि वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे पपई

सौंदर्य खुलविण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी नियमित खा ‘पपई’

ADVERTISEMENT

पपईच्या पानांचा रस प्या, नितळ त्वचेसह मिळतील असंख्य आरोग्यवर्धक फायदे

09 Apr 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT