ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
घरीच बनवा फेस मास्क आणि कोरोनापासून राहा सुरक्षित

घरीच बनवा फेस मास्क आणि कोरोनापासून राहा सुरक्षित

दिवसेंदिवस सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे.  कोरोनाचा बचाव करण्यासाठी आपण घरात काही मास्क आणून ठेवले असतील.  पण आता खराब झाले असतील आणि नवे मास्क बाजारात मिळणं सध्या अशक्य झालं आहे. बरीच क्षेत्रे कोरोनामुळे सील करण्यात आली आहेत. त्यामुळे तुम्ही स्वतःची आणि घरातल्या लोकांची काळजी घेण्यासाठी घरच्या घरी फेस मास्क तयार करू शकता.  त्यासाठी तुम्हाला काही शिलाई मशीनची गरज भासणार नाही. ज्या लोकांना मास्क वापरण्याची इच्छा आहे पण सध्या त्यांच्याकडे उपलब्ध नाही त्यांच्यासाठी मुख्य भारतीय विज्ञान संस्था कार्यालयाने घरात बनवल्या जाणाऱ्या मास्कविषयी एक कृतिकापत्रही प्रकाशित केले आहे.  कोणीही याचा वापर करून घरच्या घरी फेस मास्क तयार करू शकता. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत मिळू शकते. तसंच सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे मास्क तुम्ही वापरून पुन्हा ते धुऊन त्याचा वापर करू शकता. घरच्या घरी कसा मास्क बनवायचा जाणून घेऊया 

फेस मास्क तयार करण्यासाठी काय करावे

Shutterstock

फेस मास्क घरच्या घरी तयार करण्यासाठी तुम्हाला दोन महत्त्वाच्या गोष्टी लागतात. त्यापैकी एक म्हणजे मोठा हातरूमाल किंवा 100% कॉटनचा कपडा. 

ADVERTISEMENT

कृती – 

  • सर्वप्रथम तुम्ही हातरूमालाची एका बाजूने मध्यभागापर्यंत घडी घाला
  • त्यानंतर दुसऱ्या बाजूनेही अशीच मध्यभागापर्यंत घडी घालून घ्या
  • असे केल्यानंतर दोन्ही भागांची एकमेकांवर घडी घाला
  • आता दोन रबरबँडपैकी एक घेऊन तो हातरूमालाच्या डाव्या बाजूला अडकवा 
  • मग दुसरा रबरबँड उजव्या बाजूला अडकवा. या दोन्ही रबरबँडसच्या मध्ये हातरूमालाची जी जागा आहे ती तुमचे तोंड झाकोळण्यास पुरेशी  आहे की नाही ते पाहून घ्या 
  • त्यानंतर रबरबँडचा एका बाजूचा कोपरा घ्या आणि त्याची घडी आला आणि मग दुसऱ्या बाजूनही तशीच घडी घाला
    ही एक घडी दुसऱ्या घडीमध्ये टाका. अशाप्रकारे तुमचा फेस मास्क हा घरच्या घरी तयारही होतो आणि 100 टक्के स्वच्छ आणि बाजारापेक्षाही अधिक उपयोगी ठरतो. फक्त हा मास्क लावत असताना घट्ट तर बसत नाही ना याची नीट खात्री करून घेणे गरजेचे आहे.  

#Coronavirus चा फटका आता मालिकांच्या चित्रीकरणालाही

घरी बनवलेले मास्क कसे कराल स्वच्छ

  • मास्क तुम्ही स्वच्छ साबणाने धुवा आणि साधारण 4-5 तास उन्हात वाळत घालायला ठेवा
  • पाण्यात मीठ टाका आणि 15 मिनिट्स त्यात मास्क भिजवून ठेवा. त्यानंतर मास्क धुवा
  • प्रेशर कुकरमध्ये पाणी उकळवा आणि त्यात मास्क धुवा 
  • मास्क सुकवण्यासाठी तुम्ही गरम इस्त्रीचा वापरही करू शकता
  • मास्क व्यवस्थित ठेवण्यासाठी तुम्ही प्लास्टिकच्या  पिशवीचा वापर करा
  • तुम्ही घरी बनवलेले मास्क रोजच्या रोज बदलूनही वापरू शकता

तुम्हाला एकदा घरी मास्क करता येऊ लागले की तुम्हाला बाहेरील मास्कची अजिबातच गरज भासणार नाही आणि तुम्ही तुमच्या आरोग्याचीही नीट काळजी घेऊ शकता. त्याचप्रमाणे तुमचा मास्कसाठी करण्यात येणारा खर्चही वाचेल. 

कोरोनामुळे भारतीयांना मिळत आहेत सोशल डिस्टन्सिंगचे धडे

ADVERTISEMENT

मास्क वापरताना घ्या काळजी

Shutterstock

  • मास्क चेहऱ्यावर घालण्यापूर्वी व्यवस्थित धुतले आहे की नाही याची खात्री करून घ्या
  • मास्क घालण्यापूर्वी आपले हात स्वच्छ साबणाने धुवा
  • घातलेला मास्क दमट अथवा ओला लागायला लागल्यावर लगेच दुसरा मास्क बदला आणि पहिला धुऊन टाका
  • मास्क काढत असताना कानाच्या मागच्या बाजूला धरून मगच काढा
  • मास्क काढल्यानंतरही तुमचे हात त्वरीत धुवा आणि सॅनिटाईझ करा 
  • मास्क धुताना साबणाच्या पाण्यात अथवा पाण्यात मीठ घालूनच धुवा

Corona Virus: अफवांना बळी पडून असे वागत असाल तर वाचा

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा 

ADVERTISEMENT
08 Apr 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT