का केलं नाही तब्बूने आजपर्यंत लग्न, जाणून घ्या कारण

का केलं नाही तब्बूने आजपर्यंत लग्न, जाणून घ्या कारण

एखाद्या अभिनेत्रीने लग्न केलं आणि नाही केलं तर या दोन्ही गोष्टीची चर्चा फारच चांगली रंगते. आता अभिनेत्री तबूचे घ्या ना सध्या ती 48 वर्षांची असून तिने अजूनही लग्न केले नाही. आणि आता ती या पुढे लग्न करणार नाही, असे तिने अनेकदा म्हटले आहे. तब्बूने लग्न का केलं नाही. असं तुम्ही गुगलला विचाराल तर तुम्हाला त्याची अनेक कारणे दिसतील. पण तुम्हाला माहीत आहे का तब्बूने कोणत्या कारणासाठी लग्न केलं नाही. मग आज जाणून घेऊया याचे कारण यातील काही कारणं स्वत: तब्बूने मुलाखतीदरम्यान सांगितली आहेत. जाणून घेऊया तब्बूच्या सिंगल असण्याची कारणं 

तब्लिगी लोकांच्या बेजबाबदार वागण्यावर नुसरत जहाँचे रोखठोक विधान

या अभिनेत्याला ठरवले दोषी

Instagram

एका मुलाखतीदरम्यान ज्यावेळी तब्बूला विचारण्यात आले की, तू अजूनही सिंगल का? त्यावर तिने एका अभिनेत्याचे नाव घेतले. हा अभिनेता आणखी कोणी नसून अजय देवगण होता. अजय तिच्या शेजारीच बसला असताना तिने हे विधान केले. ती म्हणाली की, मला अजयसारखा मुलगा हवा होता. पण तो मिळाला नाही म्हणून लग्न केलं नाही. ‘गोलमाल अगेन’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिने हे विधान केलं. त्यानंतर दोघांनी ही गोष्ट मजेत घेतली. पण खरंचं अजय देवगणमुळे तब्बूने लग्न केलं नाही ही गोष्ट खरी असेल का? असा प्रश्नच आहे. कारण त्या मुलाखतीदरम्यान ती ही गोष्ट गांभीर्याने सांगत आहे असे अजिबात जाणवले नाही.

अनेक वर्षांची दोघांमध्ये मैत्री

पुढे तब्बू हे सांगायला विसरली नाही की, अजय आणि तब्बू लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. तब्बूचा भाऊ समीर आर्य याचा अजय देवगण शेजारी असल्यामुळे तब्बूचे लहानपणी त्याचाकडे येणे- जाणे होते. समीरचा खास मित्र अजय असल्यामुळे ते एकत्रच असायचे. समीर आणि अजय दोघांनी मला लहानपणी सांभाळले आहे. जर कोणी मुलगा माझ्याशी बोलायला आला की, त्याची शाळा अजय आणि समीरच घ्यायचे. माझ्या भाऊ समीरप्रमाणे अजयही माझी काळजी घ्यायचा. त्यामुळे साहजिकच आम्हाला एकमेकांची अधिक ओढ होती. पण त्यामध्ये प्रेम नव्हते. काजोलला आमच्या मैत्रीबद्दल माहीत आहे. त्यामुळे आता मैत्रीही लपून राहिली नाही.

करण जोहरच्या मुलाने केली बोलती बंद, कोरोनाच्या काळात व्हिडिओ व्हायरल

अनेक चित्रपटांमध्ये एकत्र केलं काम

Instagram

अजय-तब्बूने एकत्र अनेक चित्रपट केले आहेत. विजयपथ, हकीकत,  दृश्यम, गोलमाल अगेन आणि आता आलेला ‘दे दे प्यार दे’ या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले आहे. अनेकदा सेटवर त्यांना एकत्र पाहण्यात आले आहे. पण त्यांच्यामध्ये निखळ मैत्रीशिवाय काहीच नाही असे म्हणायला हवे. काही काळ तब्बूने चित्रपटात काम करणे बंद केले होते. पण ती परत आली आणि तिने पुन्हा एकदा तिच्या दर्जेदार अभिनयातून सगळ्यांची मन जिंकली. तिने अंदाधुंदमध्ये केलेला अभिनय आजही अनेकांच्या लक्षात आहे. त्यामुळे अभिनयात तिचा हात कोणीच धरु शकत नाही. कदाचित तब्बूला तिच्या तागडीचा कोणी मुलगा मिळाला नसेल म्हणूनच तिने सिंगल राहण्याचा कदाचित निर्णय घेतला असेल. 


तब्बूच नाही तर अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी लग्न करण्याचा विचार कधी मनातही आणला नाही. त्या आयुष्यभर सिंगल राहिल्या आणि सुखात राहिल्या. त्यामध्ये आता तब्बूचाही समावेश आहे.

या कारणासाठी आशा पारेख यांनी केलं नाही लग्न