या कारणासाठी आशा पारेख यांनी केलं नाही लग्न

या कारणासाठी आशा पारेख यांनी केलं नाही लग्न

बॉलीवूडमध्ये जितकी चर्चा कामांची होते त्याहून काकणभर जास्त चर्चा ही अभिनेता आणि अभिनेत्रींच्या खासगी आयुष्याची होते. आताच्या काळात कोणकोणासोबत लिव्ह-ईनमध्ये आहे. कोणाचे कोणासोबत अफेअर आहे हे फार स्पष्टपणे बोलले जाते. पण साधारण 60 च्या दशकात या गोष्टी फार उघडपणे बोलल्या जात नव्हत्या किंवा त्या फार पसरत नव्हत्या कारण सोशल मीडिया त्या काळात फार स्ट्राँग नव्हता म्हणून… त्या काळात अनेक अभिनेत्रींनी लग्न केली नाहीत. काहींची लग्न टिकली नाहीत. काहींचा प्रेमभंग झाला.या लग्न न झाल्याच्या यादीमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांचे नाव देखील घेतले जाते. त्यांनी लग्न का केले नाही याचा खुलासा आता त्यांनीच एका कार्यक्रमात केला आहे.

तापसी पन्नूने हिरावली ही भूमिका

 

या कारणासाठी त्यांनी केलं नाही लग्न

Instagram

आशा पारेख यांनी नुकतीच एक मुलाखत दिली त्यामध्ये त्यांनी पुन्हा एकदा लग्न का केले नाही याचा खुलासा केला आहे. मुलाखतीत त्या म्हणाल्या की, मला लग्न करायचं होतं. पण मी ज्याच्यावर प्रेम केलं त्याचं आधीच लग्न झालं होतं त्यामुळे मी लग्नाचा विचारही पुन्हा मनात आणला नाही. त्यामुळेच मी आजन्म ‘सिंगल’ राहणे पसंत केले. आता ही गोष्ट आशा पारेख यांनी पहिल्यांदा सांगितलेली नाही तर 2016 साली आलेल्या बायोग्राफीतही त्यांनी ही मांडली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, आशा पारेख नेमक्या कोणाच्या प्रेमात होत्या.स्वत: आशा पारेख यांनीच ही गोष्ट सांगितली आहे.आशा पारेख फिल्ममेकर नासिर हुसैनच्या प्रेमात होत्या. पण त्यांना त्यांच्या कुटुंबात कोणताही तणाव निर्माण करायचा नव्हता म्हणून त्या सिंगल राहिल्या.

बालकलाकार म्हणून केली सुरुवात

Instagram

पूर्वी अभिनेत्री होण्याचं वय अगदी कोवळं वय असायचं अनेकांनी त्यांच्या करिअरची सुरुवात अगदी 16 व्या 17 व्या वर्षापासून केली आहे. आशा पारेख यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात चाईल्ड आर्टीस्ट म्हणून केली. बेबी आशा पारेख म्हणून त्यांना त्या वेळी ओळखले जायचे. त्यांच्या अभिनयासोबत त्यांच्यात असलेली कला म्हणजे नृत्यकला. प्रसिद्ध दिग्दर्शक विमल रॉय यांनी अवघ्या 10 वर्षांच्या आशा पारेखला ‘मा’ (1952) या चित्रपटात नृत्य करताना पाहिले आणि त्यांनी आशाजींना पुन्हा काम दिले. ‘बाप बेटी’ या चित्रपटात आशाजी परत दिसल्या. पण हा चित्रपट फारसा चालला नाही. निराश झालेल्या आशाजींनी आपले शिक्षण पूर्ण केले. वयाच्या 16 व्या वर्षी त्या पुन्हा एकदा अभिनेत्री म्हणून आल्या. त्यानंतर आशा पारेख थांबल्याच नाहीत. त्यांनी एका मागोमाग एक उत्तम चित्रपट केले.

पति,पत्नी और वो'नंतर भूमी दिसणार ऐतिहासिक चित्रपटात

दिग्दर्शक म्हणून केले पदार्पण

Instagram

प्रत्येकाचा एका काळ असतो. आश पारेख यांचाही एक काळ होता. अभिनेत्री म्हणून काम करणाऱ्या आशा पारेख यांना कधी साईड रोल मिळू लागले हे त्यांनाही कळले नाही. पण त्यांना ज्यावेळी ही गोष्ट लक्षात आली त्यावेळी त्यांनी मित्राचा सल्ला घेतला. त्याच्या सल्ल्यानुसार त्यांनी एक प्रोडक्शन हाऊस उघडले आणि दिग्दर्शन क्षेत्रात त्या उतरल्या. ‘कोरा कागज’, ‘दाल मे काला’, ‘पलाश के फूल’ या मालिकांची निर्मिती केली.1995 साली त्यांनी या सगळ्याला राम राम केला. आशा पारेख यांनी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. पद्मश्री हा पुरस्कारही त्यांना प्रदान करण्यात आला आहे. 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.