लिपस्टिकच्या अनंत शेड्स मार्केटमध्ये सहज उपलब्ध असतात. त्यामुळे प्रत्येकीकडे लिपस्टिकच्या शेड्सचे खास कलेक्शनच असते. मात्र आजकाल लिपस्टिकच्या डार्क शेडस् पेक्षा न्यूड शेड्स जास्त ट्रेंडमध्ये आहेत. न्यूड लिपस्टिकमुळे तुम्हाला फ्रेश आणि नॅचलर लुक मिळतो. न्यूड लिपस्टिक (Nude Lipstick) शेड्स हे विशेषतः परदेशातील महिलांच्या स्कीन टोननुसार तयार केलेले असतात. त्यामुळे भारतीय महिलांच्या त्वचेसाठी त्यातून बेस्ट शेड्स निवडण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज नक्कीच असू शकते. जर तुम्ही एखादी चुकीची शेड निवडली तर त्यामुळे तुमचा लुक चांगला दिसण्याऐवजी खराब होऊ शकतो. बऱ्याचदा न्यूड शेडमध्ये जास्तीत जास्त हलक्या रंगाची निवड करण्याची चुक केली जाते. वास्तविक न्यूडमध्ये अनेक शेड्स उपलब्ध असतात. मात्र शिवाय तुमच्या स्कीन टोननुसार केलेल्या योग्य शेडच्या निवडीनेचतुम्हाला हवा तसा फ्रेश आणि नॅचरल लुक मिळू शकतो. यासाठी आम्ही तुमच्यासोबत न्यूड लिपस्टिकच्या काही अशा खास शेड्स शेअर करत आहोत. ज्यामुळे तुमच्या लिपस्टिक कलेक्शनमध्ये अधिकच भर पडेल.
मेबिलिनची दी कलर सेंसेशनल क्रिमी मॅट लिपस्टिकची ही शेड तुमच्या लिपस्टिक कलेक्शममध्ये असायलाच हवी. यांच प्रमुख कारण म्हणडे मेबिलिनच्या लिपस्टिक्समध्ये जवळजवळ 35 शेड्स उपलब्ध आहेत. ज्यात लालरंगापासून ते अगदी न्यूडपर्यंत अनेक शेड्स आहेत. आम्ही शेअर केलेली ही न्यूड शेड भारतीय त्वचेसाठी नक्कीच उत्तम आहे. तुम्हाला परफेक्ट मॅट लुक देणारी मेबिलिनची ही '657 Nude Nuance' शेड तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता. मेबिलिनच्या लिपस्टिक फार महागड्या नसल्यामुळे ती विकत घेणं कुणालाही सहज परवडू शकतं. यeत युनिक मॅट लुक फॉर्म्युला वापरण्यात आलेला आहे. ज्यामुळे ही लिपस्टिक तुमच्या ओठांवर बराच काळ टिकू शकते. विशेष म्हणजे मॅट असूनही यातील क्रिमी टेक्चरमुळे मुळे तुमचे ओठ कोरडे होत नाहीत.
इलि 18 हा कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलींमध्ये एक लोकप्रिय ब्रॅंड आहे. याचं महत्वाचं कारण म्हणजे या ब्रॅंडची उत्पादनं फार महाग नसतात. त्यामुळे तुम्ही अठरा ते पंचविस वयोगटातील तरूणी असाल तर तुमच्यासाठी ही लिपस्टिक अगदी परफेक्ट आहे. तरूण मुलींमध्ये न्यूड शेडसच्या लिपस्टिक वापरण्याचा ट्रेंड आहे. इलि 18 ची ही 'N51 Nude Fix' न्यूड लिपस्टिक तुमच्या पॉकेटमनीमध्ये तर नक्कीच येईल शिवाय तुम्हाला एक खास लुकदेखील मिळेल. हा न्यूड लिपस्टिकचा मॅट शेड तुम्हाला कॉलेजला जाण्यासाठी, एखाद्या खास कार्यक्रमासाठी, प्रेंझेटेशनसाठी कधीही वापरता येऊ शकतो. एखाद्या खास मैत्रिणीला गिफ्ट करण्यासाठीही ही एक उत्तम लिपस्टिक आहे.
लॅक्मे कपंनीच्या या न्यूड लिपस्टिक शेडमध्ये व्हिटॅमिन ईचा समावेश करण्यात आलेला आहे. ज्यामुळे तुमचे ओठ मऊ आणि मुलायम राहण्यास नक्कीच मदत होईल. शिवाय यातील सॉफ्ट आणि स्मूथ मॅट फिनिश टेक्चरमुळे तुम्हाला हवा तो न्यूड इफेक्ट लुक नक्कीच मिळेल. लॅक्मेची ही लिपस्टिक खूप वेळ तुमच्या ओठांवर टिकू शकते. कारण त्यात हाय परफॉर्मन्स कलर फिक्स फॉर्म्युलाचा वापर करण्यात आलेला आहे. शिवाय या लिपस्टिकमध्ये न्यूडप्रमाणेच अनेक शेड तुमच्यासाठी उपलब्ध आहेत.
मेबिलिनच्या लिपस्टिकचे अनेक प्रकार तुमच्या मेकअप किटमध्ये नक्कीच असू शकतात. कारण या लिपस्टिक अगदी सर्वसामान्यांना परवडण्यासारख्या नक्कीच आहेत. जर तुम्ही न्यूड शेडमध्ये लिक्विड लिपस्टिकच्या शोधात असाल तर ही लिपस्टिक तुमच्यासाठी नक्कीच परफेक्ट आहे. या लिपस्टिकची खासियत ही की ती तुम्हाला एक सुपरस्टे मॅट फिनिश लुक देऊ शकते. जवळजवळ सोळा तास तुम्ही तुमच्या ओठांवर ही लिपस्टिक टिकवून ठेवू शकता. यातील इंटेन्सली पिंगमेंटेड फॉर्म्युला लिपस्टिक जास्त काळ ओठांवर राहूनही तुमच्या ओठांना कोरडं होऊ देत नाही. या लिपस्टिकच्या न्यूड व्यतिरिक्त आणि पंचविसहून अधिक शेड उपलब्ध आहेत.
लॅक्मेच्या लिपस्टिक तुम्हाला आवडत असतील तर या कंपनीची आणखी एक न्यूड शेड तुमच्याकडे असायलाच हवी. याचं कारण असं की ओठांच्या सुरक्षेसाठी आपण लिपस्टिक अथवा लिप कलर लावण्यापूर्वी प्रायमरचा वापर करत असतो. मात्र या लिपस्टिकमध्ये प्रायमरही असल्यामुळे तुम्हाला या गोष्टींची चिंता करण्याची गरज नाही. शिवाय त्यामध्ये व्हिटॅमिन ई आणि शिया बटर वापरण्यात आलेलं असल्यामुळे तुमचे ओठ बराच काळ मऊ आणि मुलायम राहू शकतात. तेव्हा ही न्यूड डस्ट CP 10 शेड खरेदी करा आणि तुम्हाला हवा तसा नॅचलर लुक मिळवा.
न्यूड लिपस्टिकमध्ये मॅट फिनिश लुकचा ट्रेंड आहे. या क्रेयॉन लिपस्टिकमुळे तुम्हाला तो लुक नक्कीच मिळेल. शिवाय क्रेयॉन प्रकार असल्यामुळे तुमच्या एखाद्या अगदी छोट्या पर्समधूनही तुम्ही ती कॅरी करू शकता. सिल्की आणि क्रिमी स्वरूपात असल्यामुळे तुमचे ओठ यामुळे कोरडे अथवा चिकट होत नाहीत.
न्यूड लिपस्टिक आजकाल अनेकींना आवडत असते. कारण या लिपस्टिक मुळे तुम्हाला नॅचरल लुक मिळतो. कॉलेज अथवा ऑफिससाठी या लिपस्टिक अगदी परफेक्ट असतात. जर तुम्ही अशा परफेक्ट लुकसाठी एखाद्या न्यूड शेडच्या शोधात असाल तर ही लिपस्टिक अगदी परफेक्ट आहे. या लिपस्टिकमध्ये न्यूडसारख्याच आणखी 52 शेड आहेत.
न्यूड शेड मध्ये लवकर खराब न होणारी, लिक्विड फॉरमॅटमध्ये आणि पावसाळ्यात अथवा उन्हाळ्यात वापरता येईल अशी लिपस्टिक तुम्हाला हवी आहे? मग ही लिपस्टिक नक्कीच वापरून पाहा. कारण ही वॉटरप्रूफ लिपस्टिक तुमच्या नक्कीच फायद्याची आहे. या शेडमुळे तुमचा दिवस नक्कीच खास होईल.
स्विस ब्युटी लिपस्टिकच्या अनेक शेड मार्केटमध्ये आहेत ज्या बोल्ड पासून नॅचरल लुकमध्ये उपलब्ध आहेत. यामध्ये तुमच्या ओठांना हायड्रेट ठेवण्यासाठी खास फॉर्म्युला वापरण्यात आलेला आहे. आम्ही तुमच्यासोबत एक अशी न्यूड शेड शेअर करत आहोत ज्यामुळे तुमचा चेहरा फ्रेश आणि टवटवीत वाटेल.
बायोफ्रेशची ही मॅट लिपस्टिक तुमच्या न्यूड लिपस्टिक शेडच्या कलेक्शनमध्ये असालाच हवी. क्रेयॉन टेक्चर असलेल्या लिपस्टिकचा शेड कोणत्याही रंगाच्या स्कीन टोनवर सूट होऊ शकतो. तेव्हा ही शेड लावा आणि फोटोशूटसाठी पाऊट करायला तयार राहा.
मॅक ही मेकअप उत्पादनातील एक लोकप्रिय कंपनी आहे. त्यामुळे प्रोफेशनल लुकसाठी या कंपनीची उत्पादने मोठ्या प्रमाणावर वापरली जातात. आम्ही शेअर केलेल्या मॅकच्या या न्यूड शेड अल्ट्रा क्रिमी लिपस्टिकमुळे तुम्हाला नॅचरल असूनही एक बोल्ड लुक मिळेल. ही लिपस्टिक थोडी महाग असली तरी उत्तम लुकसाठी थोडे जास्त पैसे खर्च करणं नक्कीच योग्य ठरेल.
तुम्हाला ब्रॅंडेड मेकअप प्रोडक्टचं कलेक्शन करायला आवडतं. मग तुमच्यासाठी मायग्लॅमची ही लिपस्टिक नक्कीच खास ठरू शकते. निरनिराळ्या पोझमधल्या आणि पाऊट केलेल्या तुमचे फोटोज या शेडमुळे खूपच लाईक्स मिळू शकतील. शिवाय यामध्ये मोरींगा आणि व्हिटॅमिन ईचं खास कॉम्बिनेशन वापरण्यात आलं आहे. ज्यामुळे तुमचे ओठ सतत हायड्रेट राहण्यास मदत होईल.