ADVERTISEMENT
home / Make Up Products
Best Cruelty Free Makeup Brands In Marathi | बेस्ट विगन आणि क्रुअल्टी फ्री मेकअप ब्रॅंड

Best Cruelty Free Makeup Brands In Marathi | बेस्ट विगन आणि क्रुअल्टी फ्री मेकअप ब्रॅंड

प्राण्यांवरील प्रेमापोटी आजकाल अनेकांनी शाकाहारी (Non Veg) अथवा विगन (Vegan) जीवनशैली आत्मसात केलेली आहे. कोणत्याही प्राण्यावर अत्याचार होऊ नये यासाठी विगन जीवनशैली निवडण्यात येते. विगन जीवनशैलीत फक्त आहाराच नाही तर प्राण्यांपासून तयार होणाऱ्या वस्तूदेखील वापरण्यात येत नाही. म्हणूनच आपण आज विगन आणि क्रुअल्टी फ्री मेकअप प्रॉडक्ट आणि त्यांच्या ब्रॅंड्सविषयी जाणून घेणार आहोत. विगन प्रॉडक्ट म्हणजे असे प्रॉडक्ट ज्यामध्ये प्राण्यांचे कोणतेही घटक जसे की मांस, चामडे अथवा दूध वापरण्यात आलेले नसते तर क्रुअल्टी फ्री प्रॉडक्ट म्हणजे जे तयार करण्यासाठी प्राण्यांवर त्यांची कोणतीही टेस्ट घेण्यात आलेली नसते. तुम्हीही विगन जीवनशैलीचे असाल तर हे विगन (Vegan) आणि क्रुअल्टी फ्री (Cruelty Free) बेस्ट मेकअप प्रोडक्ट्स अवश्य वापरा.

Myglamm | मायग्लॅम

Cruelty Free Makeup Brands In Marathi
Cruelty Free Makeup Brands In Marathi

मायग्लॅम ब्युटी कंपनीची जास्तीत जास्त मेकअप आणि स्किन केअर उत्पादने ही क्रुअल्टी फ्री, विगन फ्रेंडली, पॅराबेन फ्री आणि नैसर्गिक घटकांपासून बनवलेली आहेत. मेकअपसाठी तुम्हाला विविध प्रकारच्या लिपस्टिक्स, नेलपेंट, फाऊंडेशन, कॉम्पॅक्ट, फेस पावडर, आय मेकअपचं साहित्य, हायलायटर आणि मेकअप अॅक्सेसरिज मिळतात. या सर्व उत्पादनांच्या निर्मितीसाठी कोणत्या प्राण्यांचा घटकांचा वापर करण्यात येत नाही किंवा प्राण्यांवर या वस्तूंची चाचणी करण्यात आलेली नाही.

मायग्लॅमचे ब्युटी प्रॉडक्ट खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा.

POPxo | पॉपएक्सो

क्रुअल्टी फ्री मेकअपसाठी बेस्ट ब्रॅंड
क्रुअल्टी फ्री मेकअपसाठी बेस्ट ब्रॅंड

दी गुड ग्लॅम कंपनी अंतर्गत लॉंच झालेले POPxo चं मेकअप कलेक्शनही विगन, पेराबेन फ्री आणि क्रुअल्टी फ्री आहे. या कलेक्शनमध्ये तुम्हाला मिनी किट्स उपलब्ध आहेत. जे वापण्यासाठी आणि प्रवासासाठी अतिशय सोयीचे आहेत. विशेष म्हणजे या उत्पादनांच्या टेस्टसाठी प्राण्यांवर चाचणी करण्यात आलेली नाही. जास्त वेळ टिकणारे, व्यवस्थि ब्लेंड होणारे मेकअप किट तुम्हाला नक्कीच आवडतील. यामध्ये फेस मेकअप, नेलपेंट आणि आयशॅडोज कॉम्बो सेटमध्ये तुम्हाला मिळू शकतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सेट अतिशय स्वस्त असून सर्वसामान्यांच्या खिशाला पडवणारे आहेत. 

ADVERTISEMENT

पॉपएक्सोचे ब्युटी प्रॉडक्ट खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा.

Organic Harvest | ऑर्गेनिक हार्वेस्ट

Cruelty Free Makeup Brands In Marathi
Cruelty Free Makeup Brands In Marathi

ऑर्गेनिक हारवेस्ट कंपनीची सर्व उत्पादने ही नैसर्गिक घटकांपासून बनवलेली आणि क्रुअल्टी फ्री आहेत. यामध्ये तुम्हाला तुमच्या त्वचा आणि केसांची निगा राखण्यासाठी अनेक उत्पादने मिळू शकतात. सोबत यातील लिप बाम, फेस क्रीम, आयजेल, मेकअप रिमूव्हलचा वापर तुम्ही तुमचा मेकअप करण्यासाठी आणि काढण्यासाठी करू शकता. शंभर टक्के नैसर्गिक घटकांचा यात वापर करण्यात आलेला आहे. त्यामुळे जर तुम्ही विगन जीवनशैली फॉलो करत असाल तर हा ब्युटी ब्रॅंड तुम्ही ट्राय करायलाच हवा. 

ऑर्गेनिक हारवेस्टचे ब्युटी प्रॉडक्ट खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा.

St. Botanica | सेंट बोटॅनिका

क्रुअल्टी फ्री मेकअपसाठी बेस्ट ब्रॅंड
क्रुअल्टी फ्री मेकअपसाठी बेस्ट ब्रॅंड

सेंट बोटॅनिका कंपनीचे सर्व प्रॉडक्ट हे पेटा सर्टिफाईड आणि क्रुअल्टी फ्री आहेत. मेकअप करण्याआधी तुम्हाला गरजेचं असतं स्किन केअर आणि या कंपनीमध्ये तुमच्या त्वचेची निगा राखण्यासाठी विस्तृत उत्पादनांची श्रेणी उपलब्ध आहे. या शिवाय केस आणि आरोग्याची काळजी घेणारी अनेक उत्पादनेही तुम्हाला इथे मिळतात. नैसर्गिक घटकांपासून बनवलेल्या या उत्पादनांची चाचणीदेखील प्राण्यांवर करण्यात आलेली नाही.

ADVERTISEMENT

सेंट बोटॅनिका ब्युटी प्रॉडक्ट खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा.

Dermablend | डर्माब्लेंड

Cruelty Free Makeup Brands In Marathi
Cruelty Free Makeup Brands In Marathi

डर्माब्लेंड कंपनीची सर्व उत्पादने क्रुअल्टी फ्री आहेत. म्हणजेच ती तयार करण्यासाठी कोणत्याही प्राण्यांवर त्यांची टेस्ट घेतली जात नाही. शिवाय आता तर या कंपनीने संपूर्ण विगन उत्पादने देखील तयार केलेली आहेत. अनेक मेकअप आर्टिस्ट आणि ब्युटी एक्पर्ट डर्माब्लेंडचे मेकअप प्रॉडक्ट वापरतात. विगन असण्यासोबत ही उत्पादने तुम्हाला परफेक्ट लुकदेखील देऊ शकतात. या कंपनीची एक बेस्ट सेटिंग पावडर तुमच्यासाठी अगदी बेस्ट आहे मात्र ती वापरताना एक गोष्ट लक्षात ठेवा या पावडचा वापर करण्यासाठी मेकअप ब्रशही याच कंपनीचा वापरा. कारण तो प्राण्यांच्या केसांपासून तयार केलेला नाही. 

डर्माब्लेंडची उत्पादने खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा.

Milani | मिलानी

Cruelty Free Makeup Brands In Marathi
Cruelty Free Makeup Brands In Marathi

जर तुम्हाला मेकअपसाठी विगन आयलायनर, लिपस्टिक अथवा ब्लश हवं असेल तर मिलानी यासाठी एक उत्तम ब्रॅंड आहे. म्हणूनच मिलानीचे मेकअप प्रॉडक्ट निवडा आणि तुमचे प्राणी प्रेम अशा पद्धतीने व्यक्त करा. मिलानीच्या काही उत्पादनांमध्ये प्राण्यांचा वापर करण्यात येतो. मात्र आम्ही तुमच्यासोबत मिलानीचं एक परफेक्ट विगन ब्लश शेअर करत आहोत. त्यामुळे या कंपनीचे प्रॉडक्ट खरेदी करण्यापूर्वी त्याचं डिस्ट्रिप्शन वाचून मगच ते खरेदी करा.

ADVERTISEMENT

मिलानीचे मेकअप प्रॉडक्ट तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता. 

Too Faced | टू फेसड

क्रुअल्टी फ्री मेकअपसाठी बेस्ट ब्रॅंड
क्रुअल्टी फ्री मेकअपसाठी बेस्ट ब्रॅंड

टू फेस कंपनीचे मेकअप प्रॉडक्ट तुम्हाला मेकअप करताना फुल कव्हरेज देतात. म्हणूनच अनेक प्रोफेशनल मेकअपसाठी यांचा आवर्जून वापर केला जातो. विशेष म्हणजे हे मेकअप प्रॉडक्ट विगन आहेत. या कंपनीच्या कोणत्याही मेकअप प्रॉडक्टमध्ये प्राण्यांचा वापर केलेला नाही. एवंढच नाही या कंपनीचे मेकअप टूल्स आणि साहित्यही विगन आहे. 

टू फेस्डची मेकअप उत्पादने खरेदी करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा.

Tarte | टार्टे

क्रुअल्टी फ्री मेकअपसाठी बेस्ट ब्रॅंड

टार्टे हा एक मेकअप प्रॉडक्टसाठी अगदी परफेक्ट ब्रॅंड आहे. शिवाय या कंपनीचे मेकअप प्रॉडक्ट शंभर टक्के विगन आहेत. या कंपनीमधून तुम्ही मेकअपसाठी प्रायमर, ब्लश, ब्यूटी ब्लेंडर आणि तुम्हाला हवं ते मेकअप उत्पादन खरेदी करू शकता. टार्टे शेप टेप कन्सिलरने तुम्हाला इतकं छान कव्हरेज मिळेल की त्यामुळे तुमचे टॅटूजदेखील झाकले जातील. आम्ही तुमच्यासोबत टार्टेचा एक लिप ग्लॉस शेअर करत आहोत.

ADVERTISEMENT

टार्टे ब्रॅंडच्या वस्तू तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता. 

Urban Decay | अर्बन डिके

अर्बन डिकेची काही उत्पादने अशीही आहेत की ज्यामध्ये मध आणि प्राण्यांपासून मिळणाऱ्या इतर वस्तूंचा वापर करण्यात येतो. मात्र त्यांची विगन प्रॉडक्टची एक खास रेंज आहे. विशेष म्हणजे ही मेकअप उत्पादने स्मज- प्रूफ आहेत. ज्यामुळे तुमचा मेकअप लवकर खराब होत नाही. यासाठी अर्बन डिकेचं हे आयशॅडो पॅलेट अगदी परफेक्ट आहे. 

अर्बन डिकेचे मेकअप प्रॉडक्ट या ठिकाणी खरेदी करा.

Wet n Wild | वेट अॅंड वाईल्ड

वेट अॅंड वाईल्ड
वेट अॅंड वाईल्ड

वेट अॅंड वाईल्ड ची खासियत ही की यांची उत्पादने सहज उपलद्ध होतात. शिवाय ही उत्पादने इतर मेकअप प्रॉडक्टसच्या मानाने स्वस्तही असतात. या कंपनीची विगन उत्पादने तुम्हाला नक्कीच आवडतील अशी आहेत. वेट अॅंड वाईल्डच्या कोणत्याही उत्पादनांची टेस्ट करण्यासाठी प्राण्यांचा वापर केला जात नाही.

ADVERTISEMENT

वेट अॅंड वाईल्डची मेकअप उत्पादने तुम्हाला या ठिकाणी खरेदी करता येतील.

Kat Von D | कॅट वोन डी

Cruelty Free Makeup Brands In Marathi
Cruelty Free Makeup Brands In Marathi

कॅट वोन डीचे अनेक स्पेशल मेकअप आणि ब्युटी प्रॉडक्ट आहेत. हा एक नामांकीत ब्रॅड असून या कंपनीची उत्पादने तुम्हाला भारतातही सहज मिळतात. ग्राहकांच्या मागणीनुसार या कंपनीने विगन उत्पादनांची एक खास श्रेणी बाजारात आणलेली आहे. 

कॅट वोन डीचे प्रॉडक्ट तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता.

Cover FX | कव्हर एफ एक्स

या ब्रॅंडचे फाऊंडेशन, कन्सिलर आणि प्रायमर फारच उत्तम आहेत. शिवाय ते खास विगन मेकअप प्रॉडक्ट असल्यामुळे आम्हाला खात्री आहे की तुम्हाला ते नक्कीच आवडतील. या ब्रॅंडचे हे कलर करेक्टर तुम्ही वापरून पाहा. ज्यामुळे तुम्हाला एक नॅचरल लुक मिळेल. शिवाय या ब्रॅंडचे हे प्रायमर तुम्ही मेकअप आधी नक्कीच ट्राय करू शकता. 

ADVERTISEMENT

या मेकअप ब्रॅंडची उत्पादने तुम्हाला या ठिकाणी खरेदी करता येतील.

NYX | निक्स

Cruelty Free Makeup Brands In Marathi
Cruelty Free Makeup Brands In Marathi

निक्स हा सहज उपलब्ध होणारा आणि कमी खर्चिक मेकअप प्रॉडक्ट ब्रॅंड आहे. लॉरेल कंपनीच्या या ब्युटी ब्रॅंडमध्ये प्रॉडक्ट निर्माण करताना कोणत्याही प्राण्याची टेस्ट घेतली जात नाही. त्यामुळे हा एक क्रुअल्टी फ्री बॅंड आहे. या ब्रॅंडची काही उत्पादने विगनदेखील आहेत. 

तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन हे मेकअप साहित्य खरेदी करू शकता. 

The Body Shop | दी बॉडी शॉप

क्रुअल्टी फ्री मेकअपसाठी बेस्ट ब्रॅंड

दी बॉडी शॉप या कंपनीची संपूर्ण मेकअप उत्पादने ही विगन आहेत. या बॅंडचे काही ब्युटी प्रॉडक्ट पूर्ण विगन नसले तरी त्यांच्या निर्मितीसाठी कोणत्याही प्राण्यांची टेस्ट घेतली जात नाही. त्यामुळे ती क्रुअल्टी फ्री तर नक्कीच आहेत.

ADVERTISEMENT

दी बॉडी शॉपची विविध उत्पादने खरेदी करण्यासाठी या ठिकाणी खरेदी करा.

Smashbox | स्मॅश बॉक्स

स्मॅश बॉक्सचे मेकअप उत्पादनांच्या टेस्टसाठी प्राण्यांचा वापर केला जात नसल्यामुळे ही उत्पादने क्रुअल्टी फ्री अथवा अॅनिमल फ्रेंडली नक्कीच आहेत. शिवाय या ब्रॅंडचे प्रायमर, फाऊंडेशन खास विगन ग्राहकांसाठी तयार करण्यात आलेले आहेत. ज्यामध्ये कोणत्याही प्राण्यांच्या घटकांचा वापर केलेला नाही. 

स्मॅश बॉक्सचे हे खास मेकअप प्रॉडक्ट तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता.

विगन अथवा क्रुअल्टी फ्री मेकअप ब्रॅंडविषयी मनात असलेले प्रश्न | FAQ’s

1. विगन उत्पादने ही क्रुअल्टी फ्री असतात का ?

क्रुअल्टी फ्री उत्पादने म्हणजे असे प्रॉडक्ट ज्यांच्या  टेस्ट प्राण्यांवर केल्या जात नाहीत. तर विगन उत्पादने म्हणजे ज्यांच्यामध्ये प्राण्यांचे घटक जसे की, मांस, कातडी अथवा दूध वापरले जात नाही. सहाजिकच कोणतेही विगन प्रॉडक्ट हे क्रुअल्टी फ्रीच असते. 

ADVERTISEMENT

2. विगन अथवा क्रुअल्टी फ्री उत्पादने कुठे मिळतात ?

आजकाल विगन आणि क्रुअल्टी फ्री प्रॉडक्ट सहज उपलब्ध असतात. अनेक कंपन्यांनी त्यांची विगन आणि क्रुअल्टी फ्री उत्पादनांची श्रेणी बाजारात लॉंच केलेली आहे. त्यामुळे एखाद्या शॉपमधून अथवा ऑनलाईन तुम्ही ही उत्पादने खरेदी करू शकता. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत अशीच काही मेकअप उत्पादने शेअर केलेली आहेत. 

3. एखादे प्रॉडक्ट क्रुअल्टी फ्री आहे हे कसे ओळखावे ?

तुम्ही वापरत असलेले अथवा खरेदी करण्यासाठी निवडलेले उत्पादन क्रुअल्टी फ्री आहे हे ओळखण्यााठी त्याच्यावर पेटाचा बनी लोगो आहे का हे तपासा. 

14 Feb 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT