ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
5 बेस्ट मेकअप प्रोडक्ट्स त्वचेसाठी | 5 Best Products For Skin In Marathi

5 बेस्ट मेकअप प्रोडक्ट्स त्वचेसाठी | 5 Best Products For Skin In Marathi

मेकअपचा सर्वात मोठा फायदा हा आहे की आपल्या चेहऱ्याचे फिचर्स मेकअपमुळे अधिक शार्प होतात आणि नियमित स्वरूपात आपण जर फाऊंडेशन लावले तर त्वचेचे पोअर्स बंद होतात आणि चेहऱ्यावर पुळ्या येतात. त्यामुळे मेकअपचा काही फायदा आहे तर काही तोटा आहे. पण त्यामुळे मेकअप करणं बंद करावं का? असा प्रश्न असेल तर नक्कीच त्याचं उत्तर नाही असं आहे. काही मेकअप उत्पादने अशीही आहेत जी आपल्या त्वचेची नक्कीच काळजी घेतात. मेकअप कसा करायचा (makeup kasa karaycha) तसंच यामध्ये असे काही गुण असतात जे त्वचेला फायदा मिळवून देतात. मेकअप सामान लिस्ट अथवा मेकअप चे सामान प्रत्येक महिलेकडे असतेच. आपल्या चेहऱ्याचे फिचर्स चांगले करण्याव्यतिरिक्त आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठीही हे उपयुक्त ठरतात. अशाच काही उत्पादनांविषयी या लेखातून आपण जाणून घेऊया. अशी कोणती उत्पादने आहेत जी वापरून त्वचेची काळजी घेतली जाते.

बीबी आणि सीसी क्रिम – BB And CC Cream

ज्या लोकांना रोज फाऊंडेशन लावायला आवडत नाहीत ते सीसी क्रिमचा वापर करू शकतात. हे तुम्हाला चांगले स्किन टोन मिळवून देते आणि लहान मोठ्या चेहऱ्यावरच्या कमतरता भरून काढते. वास्तविक सीसी क्रिम हे आपल्यटा त्वचेसाठी थोडी चिकटसर वाटते कारण धूळ आणि घाण पटकन यावर चिकटते. त्यामुळे चेहरा त्वरीत चिकट होतो. पण तुम्ही तुमच्या रोजच्या वापरासाठी काही सीसी क्रिम वापरू शकता. असे कोणते सीसी क्रिम आहेत आणि त्याचे गुणधर्म काय आहेत पाहूया.  

मायग्लॅम ट्रिट लव्ह (MyGlamm Treat Love Care 24 Hr Anti Pollution Foundation) 

बीबी आणि सीसी क्रिम (BB cream and CC cream) मध्ये खूप फरक आहे. Myglamm च्या साईटवरून तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी नक्कीच हे फाऊंडेशन मागवू शकता. याचा उपयोग सीसी क्रिमप्रमाणे होतो. प्रदूषणापासून तुमची रक्षा तर हे करतेच. याशिवाय संपूर्ण दिवस तुमच्या त्वचेला सुरक्षित ठेवते. याशिवाय त्वचेला पोषण देण्याचे कामही करते. यामध्ये सोया, सूर्यफूल तेल आणि रोझमेरी तेलासारखे घटक असून तुमच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी हे उत्तम ठरते. 

लॅक्मे 9 टू 5 नॅचरल सीसी क्रिम (LAKMÉ 9TO5 NATURALE CC CREAM) 

लॅक्मे 9 ते 5 नॅचरल सीसी क्रिमचा वापर करू शकता. यामध्ये कोरफडचे गुण असून आपल्या त्वचेला उत्तम चमक देते. तसंच बाहेरील गोष्टींपासून नुकसान होण्यापासून वाचवते. याचे पॅकिंग अत्यंत सुंदर असून तसंच हे आपल्या प्रवासात घेऊन जाणेही सोपे आहे. तसंच गडद त्वचेसाठीही याचा वापर होतो. 

ADVERTISEMENT

ओठांना पोषण देणारी अशी लिपस्टिक – Lip Nourishing Lipsticks

आपल्यापैकी बऱ्याच जणांना मॅट लिपस्टिक लावणं जास्त आवडतं कारण ही लिपस्टिक लाँग लास्टिंग असते. मॅट लिपस्टिकचा लुक जितका चांगला असतो तितकाच याचा तोटा म्हणजे तुमचे ओठ पटकन कोरडे पडतात आणि फाटतात. विशेषतः थंडीच्या दिवसात याचा फायदा होत नाही. मग अशावेळी कायम ओठांना पोषण देणारी लिपस्टिक चांगली वाटते. 

MANISH MALHOTRA HI-SHINE LIPSTICK 

अशावेळी तुम्ही MyGlamm ची MANISH MALHOTRA HI-SHINE LIPSTICK – Wild ROSE ची लिपस्टिक नक्कीच वापरून पाहू शकता. मॅट फिनिशसह तुम्ही तुमच्या ओठांना पोषणही देऊ शकता. त्यामुळे ही तुमच्या ओठांसाठी परफेक्ट आहे. याशिवाय ही लिपस्टिक क्रुएल्टी फ्री आणि विगन असल्यामुळे तुम्हाला अधिक चांगली वाटू शकते. Myglamm ची सर्व उत्पादने ही क्रुएल्टी फ्री आणि विगन आहेत. त्यामुळे त्याचा वापर अधिक चांगला होतो आणि अधिक काळ ही उत्पादने टिकतात. हाय- शाईन लिपस्टिक्समध्ये तुम्हाला 25 शेड्स उपलब्ध आहेत. तसंच कोणत्याही पार्टीला जाण्यासाठी तुम्ही या लिपस्टिक शेड्सचा तुमच्या स्टाईलप्रमाणे वापर करू शकता. 

POPxo कलेक्शनमधील POPxo Makeup No Drama 

प्रत्येक मुलीच्या किट्समध्ये अर्थातच लिपस्टिकचे खूप असे कलेक्शन नसते. तुम्हाला हवी असणारी प्रत्येक शेड असणे हे नक्कीच प्रत्येकासाठी शक्य नाहीये. कितीही मेकअपचे वेड असले तरीही प्रत्येक मुलीला वेगवेगळ्या लिपस्टिकच्या शेड्स बदलाव्या वाटणे हे साहजिकच आहे. पण भारतीय त्वचेसाठी अगदी परफेक्ट लिपस्टिक शेड्स शोधून काढणे हे तसे नक्कीच कठीण आहे असे म्हटले जाते. पण आता मात्र POPxo चे नवे मेकअप कलेक्शन लाँच झाले असून तुमच्याकडे याचे मिनी लिप किट्स असायलाच हवेत. तुम्हाला हव्या असणाऱ्या लिपस्टिकच्या शेड्स एकाच ठिकाणी आता मिळू शकतात आणि ते मिळविण्यासाठी तुम्हाला फक्त क्लिक करायचे आहे ते MyGlamm संकेतस्थळावर. द पॉपएक्स मेकअप कलेक्शन मिनी लिप किट हे तीन सेट्समध्ये समाविष्ट आहे – ‘पॉवर ट्रिप’ (Power Trip), ‘नो ड्रामा (No Drama)’ आणि ‘प्रिटी मेस’ (Pretty Mess). या तिन्ही किट्समध्ये प्रिटी पिंक्स, विविध न्यूड्स आणि बोल्ड ह्यूजचा समावेश आहे. सर्वांसाठी यामध्ये शेड असून तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये रंग तुम्हाला सापडेल. 

लिक्विड लिपस्टिक (Liquid Lipstick)

MyGlamm ची लिट लिक्विड मॅट लिपस्टिक तुमच्या ओठांना अगदी कोमल किस-प्रूफ बनवते. याचा वापर केल्यानंतर तुमच्या ओठांना अगदी प्युअर इंटेन्स कलर मिळतो आणि कोणत्याही प्रकारचा डाग ही ओठांवर राहू देत नाही. सर्वात चांगली बाब म्हणजे ही मोरिंगा तेलाने युक्त असून कोरड्या आणि फाटलेल्या ओठांना मॉईस्चराईज करण्यासाठी याचा उपयोग होतो आणि ओठ अधिक मऊ होतात. मॅट फिनिश असणारी ही लिपस्टिक स्मज-प्रूफ आणि ट्रान्सफर-प्रूफ फॉर्म्युलायुक्त आहे. तसंच मुलायम आणि ओठांना लावण्यासाठी सोपी आहे. याशिवाय पिगमेंटेशनमुक्त आणि विगन/शाकाहारी अशी ही लिपस्टिक तुमच्या फायद्याची आहे. यामध्ये तुम्हाला 100 पेक्षा अधिक शेड्स उपलब्ध आहेत. 

ADVERTISEMENT

मेटालिक लिपस्टिक (Metallic Lipstick)

सध्या मेटालिक लिपस्टिकचा ट्रेंड आहे आणि तुम्हाला पार्टीसाठी उत्तम लुक करायचा असेल तर या लिपस्टिकशिवाय पर्याय नाही. त्यातही तुम्हाला ग्लॅम हवं असेल तर तुम्ही MyGlamm च्या या लिपस्टिक्सचा नक्कीच वापर करायला हवा. मॅट फिनिश असणारी ही लिपस्टिक ओठांना फुल कव्हरेज देते. तसंच क्रेयॉनमध्ये ही लिपस्टिक उपलब्द असून घाईमध्ये असल्यास, कुठेही पटकन वापरता येते. याशिवाय पर्समधून कॅरी करणेही सोपे आहे. ओठांचा परफेक्ट आकार दिसण्यासाठी या लिपस्टिकचा उत्तम वापर करून घेता येतो. तसंच या लिपस्टिकमध्ये नैसर्गिक तेल असल्यामुळे ओठांना चांगले पोषण आणि कंडिशनही मिळते. 

मॅट लिपस्टिक्स (Matte Lipsticks)

तुमच्या प्रत्येक मूडसाठी अशा 17 शेड्स मॅट लिपस्टिक्समध्ये MyGlamm कडे उपलब्ध आहेत. याशिवाय तुम्हाला क्रिमी लिपस्टिक्सची आवड असेल तर तुमच्यासाठी हे योग्य ठिकाण आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या खिशाला परवडणाऱ्या अशा या लिपस्टिक्सचा साठा तुमच्याकडे असायलाच हवा. 

हायड्रेटिंग प्रायमर – Hydrating Primer

तुम्हाला स्मूद आणि मऊ मुलायम त्वचा हवी असेल तर प्रायमर लावायला विसरू नका. प्रायमरचा वापर करून तुम्ही सेलिब्रिटीसारखा लुक मिळवू शकता. तुम्ही मेकअप करा अथवा करू नका. प्रायमर हे लावाच. वास्तविक कोरड्या त्वचेवर प्रायमर लावणे थोडे कठीण असते. पण यासाठी तुम्ही पोषक तत्व असणारे प्रायमर वापरा. 

लॅक्मे अब्सोल्युट अंडर कव्हर जेल फेस प्रायमर (Lakme Absolute Undercover Gel Face Primer) 

लॅक्मे अब्सोल्युट अंडर कव्हर जेल फेस प्रायमर (Lakme Absolute Undercover Gel Face Primer) हे त्वचेच्या टेक्स्चरला हे नीट करते आणि त्वचेला योग्य बेस मिळतो. हे विटामिन ई युक्त असून त्वचेला पोषण देते. ज्यामुळे त्वचेवर जास्त चांगली चमक येते. तुम्ही हेल मेकअप करण्याआधी चेहऱ्याला लावा आणि तुम्हाला जर मेकअप करायचा नसेल तर आधी प्रायमर लावा आणि मग कन्सीलर लावा.

ADVERTISEMENT

टिंटेड परफेक्शन फेस प्रायमर (Tinted Perfection Face Primer) 

तुम्हाला पोर्स आणि सुरकुत्या चेहऱ्यावर दिसू द्यायच्या नसतील तर त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. तुमची त्वचा जर खडबडीत असेल तर त्यासाठी तुम्ही या प्रायमरचा वापर करावा. मेकअप करण्यापूर्वी तुमची त्वचा अगदी मऊ आणि मुलायम करण्यासाठी तुम्हाला या प्रायमरचा उपयोग करून घेता येतो. तसंच हे तुम्हाला अधिक तरूण दिसण्यासाठीही उपयुक्त ठरतं. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही स्किन टाईपवर हे उठावदार दिसते. 

युव्ही प्रोटेक्टिंग कॉम्पॅक्ट – UV Protecting Compact

सनस्क्रिन अशी गोष्ट आहे जी तुम्ही टाळू शकत नाही. तुम्हाला सनस्क्रिन रोज लावणं आवश्यक आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? सनस्क्रिन काही तासांनी लावत राहायला हवे. पण मेकअफ केल्यानंतर सतत सनस्क्रिन लावणे कठीण होते. त्यामुळे तुम्ही असा कॉम्पॅक्ट वापरा ज्यामध्ये एसपीएफ समाविष्ट असेल. 

लॅक्मे सन एक्स्पर्ट अल्ट्रा मॅट एसपीएफ 40 पीए +++ (Lakme Sun Expert Ultra Matte SPF 40 +++) 

त्यासाठी तुम्ही लॅक्मे सन एक्स्पर्ट अल्ट्रा मॅट एसपीएफ 40 पीए +++ (Lakme Sun Expert Ultra Matte SPF 40 +++) कॉम्पॅक्ट वापरा. यामध्ये तुमच्या चेहऱ्यावरील येणारे तेल नियंत्रणात आणण्यासह मेकअप टिकवून ठेवण्याची क्षमताही असते. तसंच हे सूर्यापासून संरक्षण करते. 

मनिष मल्होत्रा सँडलवूड एसपीएफ (Manish Malhotra Sandalwood SPF 25 Gel)

सर्व पद्धतीच्या स्किन टाईपसाठी तुम्ही हे उत्पादन वापरू शकता. SPF 25 सह हे जेल बेस्ड असे सनस्क्रिन आहे. जे तुमच्या चेहऱ्याला अधिक चांगले हायड्रेशन मिळवून देते. चंदन, हळद, कॅमोमाईल तेल, नारळाचे तेल आणि ऑलिव्ह ऑईल या घटकांनी तयार करण्यात आलेले हे क्रिम तुमच्या त्वचेला पोषण देते आणि तुमच्या चेहऱ्यावर उजळपणा आणण्याचे काम करते. तसंच त्वचेवरील जखम भरून काढणारे घटक यामध्ये समाविष्ट आहेत. सनस्क्रिन लावणे हे अत्यंत गरजेचे आहे. 

ADVERTISEMENT

मायग्लॅम के. फ्लेवर्ड कॉम्पॅक्ट (MYGLAMM K.PLAY FLAVOURED COMPACT)

अत्यंत सिल्की टेक्स्चर असणारे हे कॉम्पॅक्ट तुमच्या चेहऱ्यावर खूपच चांगले दिसते. अत्यंत हलक्या वजनाचे आणि अनेक तास टिकून राहणारे असे हे कॉम्पॅक्ट आहे. याशिवाय चेहऱ्यावरील सुरकुत्या लपविण्यासाठीही याचा उपयोग होतो. प्रदूषणापासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही या कॉम्पॅक्टचा वापर करून घ्या. तुमच्या चेहऱ्यावर व्यवस्थित ब्लेंड होणारे हे उत्पादन आहे. 

स्मूथ आयलायनर – Eyeliner

बाकी काही वापरलं नाही तरी आयलायनर हा बऱ्याच जणींच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असतो. पण काही आयलायनर हे अगदी सहज कोरडे पडतात. तर काही स्मज होतात. पण तुम्हाला हायड्रेटिंग आयलायनर हवं असेल आणि त्याचसह डोळ्यांचीही काळजी घ्यायची असेल तर तुम्ही MyGlamm चे आयलायनर वापरू शकता. यामध्ये अनेक गुण असून हे डोळ्यांना सहज लावता येते आणि त्वचेला कोरडे करत नाही. 

लिक्विड आयलायनर (Liquid Eye Liner)

लिक्विड आयलायनरचा ट्रेंड कधीही कमी होत नाही. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या रंगाचीही आता उपलब्धता आहे. वेगवेगळ्या ब्रँड्सचे हिरवे, निळे, काळे, ग्लिटरी असे लिक्विड आयलायनर मिळतात. तुम्हाला MyGlamm कडे अधिक काळ टिकणारे असे निळ्या रंगाचे लिक्विड आयलायनर उपलब्ध आहे. याचे टोक पेन्सिलसारखी असल्यामुळे तुम्हाला हे लावण्यासाठी अधिक कष्ट घ्यावे लागत नाहीत. तसंच जास्त काळ डोळे बंद करूनही बसावं लागत नाही. हे लावल्यानंतर पटकन सुकते आणि दिसायलाही छान दिसते. 

ग्लिटर आयलायनर (Glitter Eye Liner)

पटकन एखाद्या पार्टीसाठी अथवा कार्यक्रमासाठी निघायचे असेल आणि वेळ नसेल तर ग्लिटर आयलायनर हा उत्तम पर्याय आहे. गोल्डन, सिल्व्हर अशा या ग्लिटर आयलायनरमुळे डोळ्यांना एक ग्लॅम लुक मिळतो आणि तुम्हीही अधिक आकर्षक आणि उत्तम दिसता. त्यामुळे तुम्ही नक्की या आयलायनरचा वापर करून पाहा. 

ADVERTISEMENT

पेन्सिल आयलायनर (Pencil Eyeliner)

काजळ आणि लायनर असा सर्व लवाजमा तुम्हाला नको असेल तर काजळ आणि आयलायनर असा दोन्ही उपयोग करता येईल असे पेन्सिल आयलायनर तुम्हाला वापरता येऊ शकते. MyGlamm कडे वेगवेगळ्या शेड्समध्ये अशा पेन्सिल्स उपलब्ध आहेत. तुम्हीही तुमचा लुक अधिक ग्लॅम करण्यासाठी याचा उपयोग करून घेऊ शकता. 

तुमच्या त्वचेची काळजी घेणारी ही सर्व मेकअप उत्पादने आहेत, जी आम्ही तुम्हाला लेखातून सांगितली आहेत. तुम्ही या मेकअप उत्पादनांचा वापर करून अधिक ग्लॅम दिसा आणि घ्या त्वचेची काळजी!

23 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT