ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
अप्परलिप्स करा आता घरच्या घरी, सोपी पद्धत

अप्परलिप्स करा आता घरच्या घरी, सोपी पद्धत

फेशियल हेअर अर्थात चेहऱ्यावरील केस ही समस्या बऱ्याच जणींना असते आणि सध्या तुम्ही ब्युटी पार्लरमध्ये जायचा धोका पत्करायला तयार नसलात तर तुम्हाला आता घरच्या घरीदेखील अप्परलिप्स करता येईल. कारण किमान अप्परलिप्प करायचे असतील तेव्हा तुमच्या जवळ एखाद्या व्यक्तीला यावंच लागेल. मग अशावेळी तुम्हाला कोणताही धोका पत्करायचा नसेल तर तुम्ही नैसर्गिक तऱ्हेने घरच्या घरी त्वचेवर कोणताही दुष्परिणाम न होता अप्परलिप्स करू शकता. वाटलं ना आश्चर्य? पण हो हे खरं आहे. आम्ही जी पद्धत देणार आहोत, त्यानुसार तुम्ही वापर केल्यास, तुम्हाला घरच्या घरी अप्परलिप्स करता येतील आणि कोणताही त्रास होणार नाही. तसंच हे करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही आणि कोणत्या महागड्या वस्तूंची गरजही भासणार नाही. तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने हे हाताळता येईल. 

1. साखर आणि लिंबू करेल ब्लीचचे काम

साखर आणि लिंबू

Shutterstock

सर्वात पहिली पद्धत जी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्यासाठी तुम्हाला साखर आणि लिंबू या दोन गोष्टींची गरज भासेल. तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरील केस आणि अप्परलिप्स करायचे असतील तर तुम्ही याचा वापर करू शकता. 

ADVERTISEMENT

कसे वापरावे 

  • 1 चमचा ब्राऊन शुगरमध्ये 1 चमचा लिंबाचा रस मिसळा
  • व्यवस्थित मिक्स करून घ्या 
  • हे मिश्रण तुम्ही आपल्या अप्परलिप्स आणि केस असणाऱ्या ठिकाणी लावा
  • काही वेळ तसंच ठेवा तुम्हाला चेहऱ्यावरील केसांचा रंग हळूहळू फिका पडलेला दिसून येईल
  • काही वेळानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा आणि कपड्याने नीट टॅप करून पुसून घ्या 

टीप – तुमच्या चेहऱ्याला लिंबू सहन होत नसेल अथवा लिंबाचा अलर्जी असेल तर याचा वापर न केलेला बरा. 

अप्पर लीपवरील केस काढताय, मग तुम्ही अशी घ्यायला हवी काळजी

2. हळद आणि कॉर्नफ्लोअरचा करा वापर

हळद आणि कॉर्नफ्लोअर

ADVERTISEMENT

Shutterstock

दुसऱ्या  पद्धतीसाठी तुम्हाला कॉर्नफ्लोअरसह हळद पावडर आणि पाणी या गोष्टी लागतील. ही पद्धत वापरण्यासाठी या तीन गोष्टींचीच गरज भासेल. 

कसे वापरावे 

  • सर्वात पहिले दोन चमचे कॉर्नफ्लोअर घ्या आणि त्यात चिमूटभर हळद पावडर मिक्स करून एक चमचा पाणी मिक्स करा
  • आता हे मिश्रण साधारण 10 सेकंद गरम करून घ्या
  • गॅसवर तसंच ठेऊ नका अन्यथा जळेल. त्यामुळे सतत ढवळत राहा
  • मिश्रण सुकलं आहे असं वाटलं तर त्यात अजून एक चमचा पाणी घाला. हे थोडं क्रिमी झालं पाहिजे 
    हा पॅक चेहऱ्यावर लावा 
  • चेहऱ्यावर लावण्यापूर्वी चेहरा तेलकट नाही ना याची खात्री करून घ्या. तेलकट असेल तर चेहरा धुवा आणि मगच हा पॅक चेहऱ्यावर लावा. तेलकट असल्यास या फेसपॅकचा परिणाम होणार नाही
  • अतिशय पातळ लेअर अप्परलिप्स आणि केस असलेल्या ठिकाणी लावा आणि साधारण 15 मिनिट्स तसंच राहू द्या 
    सुकल्यावर पील ऑफप्रमाणे हे काढा  

घरच्या घरी कसं करावं फेशियल, जाणून घ्या फेशियलबाबत सर्व माहिती ( Facial At Home)

ADVERTISEMENT

लक्षात ठेवायच्या काही महत्त्वाच्या गोष्टी

  • चेहरा पूर्ण स्वच्छ असायला हवा 
  • दोन्ही मिश्रण लावताना त्याचे लेअर पातळ लावावेत जेणेकरून त्यांना पील ऑफ करणं सोपं जाईल. जाडसर लेअर काढताना त्वचा खेचली जाऊ शकते 
  • आपल्या त्वचेची काळजी घ्या आणि यातील कोणत्याही घटकांनी तुम्हाला खाज अथवा अलर्जीचा त्रास असेल तर त्यापैकी कोणतीही वस्तू वापरू नका

चेहऱ्यावर ब्लीच करत आहात, तर नक्की घ्या अशी काळजी

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा  

20 Aug 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT