ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
पाहायला हवेत असे नवीन मराठी चित्रपट 2020 (Latest Marathi Movie List)

पाहायला हवेत असे नवीन मराठी चित्रपट 2020 (Latest Marathi Movie List)

मराठी चित्रपट आता बदलू लागले आहेत. साचेबद्ध विषयाबाहेर अनेक चित्रपट आता मराठीमध्येही येऊ लागले आहेत. 2020 हे वर्ष सुरु कधी झालं आणि ऑगस्ट महिना कधी उजाडला हे देखील आपल्याला कळले नाही. कोरोनामुळे थिएटरमध्ये अनेक चित्रपटांचे प्रदर्शित होणे लांबणीवर गेले आहे. पण जर तुम्ही मराठी चित्रपटांचे चाहते असाल तर मराठी चित्रपट नवीन कोणते आले आहेत याविशषी तुम्हाला थोडी माहिती असायलाच हवी. जर तुम्ही चित्रपटांचे चाहते असाल तर तुम्ही रिलीज झालेले आणि 2020 या वर्षामध्ये रिलीज होणारे चित्रपट जाणून घ्यायला हवे. वर्क फ्रॉम करता करता तुम्हाला काही रिलीज चित्रपटांचा आनंद नक्कीच लुटता येईल. चला तर मग जाणून घेऊया रिलीज झालेल्या आणि रिलीज होणाऱ्या नवीन मराठी चित्रपट 2020 ची एक यादी

2020 मध्ये पाहायलाच हवेत हे मराठी चित्रपट (Must Watch Marathi Movies In 2020)

सगळ्यात आधी सुरुवात करुया नवीन मराठी चित्रपट 2020 जे झाले आहेत लॉकडाऊन आधी रिलीज

असे मराठी चित्रपट जे तुम्ही हमखास पाहायलाच हवे (Best Marathi Movie List)

धुरळा (Dhul)

वर्षाची सुरुवात ज्या धमाकेदार चित्रपटाने झाली तो म्हणजे मल्टी स्टारर असा धुरळा हा चित्रपट. अनेक बड्या कलाकारांना घेऊन तयार झालेला धुरळा हा चित्रपट चांगलाच चालला. बॉक्स ऑफिसवर त्याने चांगलीच कमाई केली. 

ADVERTISEMENT

दिग्दर्शन (Director) : समीर विद्वांस

कलाकार (Artist) : अंकुश चौधरी, सोनाली कुलकर्णी, अलका कुबल, सिद्धार्थ जाधव, देवेंद्र गायकवाड, प्राजक्ता हणमघर, सई ताम्हणकर, उमेश कामत, प्रसाद ओक, उदय सबनीस, सुलेखा तळवळकर, सुनील तावडे, अमेय वाघ

कथानक (Story line) : सत्तेचा मोह राजकारण्यांना किती असतो हे सांगायला नको. राजकारणात नाते विसरुन लढावे लागते. धुरळा हा चित्रपट राजकारणावरच आधारीत आहे. एकाच कुटुंबात सुरु असलेली सत्तेची चढाओढ त्यामधून निर्माण होणारे पेचप्रसंग हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. समीर विद्वांस आणि लेखक क्षितीज पटवर्धन या जोडीचा हा चित्रपट असून या आधी नाटकातूनही त्यांनी ही कथा आणली होती.पण त्यावेळी त्याला इतका प्रतिसाद मिळा नाही. जितका या चित्रपटातून मिळाला. मल्टीस्टारर असूनही या चित्रपटात सगळ्यांच्या भूमिका अगदी ठळकपणे दिसतात.

मन फकीरा (Man Faqira)

प्रेमाची गोड सफर आयुष्यात आपण नकळत करत असतो. एखाद्या व्यक्तीवर आपले मन जडले की, त्या व्यक्तिवर आपले प्रेम आहे की आकर्षण यामध्ये अनेकदा गोंधळ उडून जातो. ‘मन फकीरा’ ही अशीच एक लव्हस्टोरी आहे.

ADVERTISEMENT

दिग्दर्शन (Director) : मृण्मयी देशपांडे

कलाकार (Artist) : सुव्रत जोशी, अंजली पाटील, सायली संजीव आणि अंकित मोहन

कथानक (Story line) : ही गोष्ट आहे चार तरुणांची भूषण, रिया, माही आणि नचिकेतची.. स्वतंत्र विचारसरणीचे हे चारही तरुण मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेले. अगदी घरच्यांच्या आणि स्वत:च्या पद्धतीने लग्नाला होकार देतात. लग्न झाल्यानंतर त्यांच्या भविष्यकाळातील आठवणी वर्तमानात येऊ लागतात आणि सगळा गुंता होऊन बसतो. नात्यांची ही गुंतागुंत सांगणारी आणि आयुष्य नवा पद्धतीने जगायला शिकवणारा असा हा चित्रपट आहे. सगळ्या कलाकारांची कामे आणि त्यांची केमिस्ट्री अगदी उत्तम जुळून आली आहे. 

संगीतप्रेमींसाठी मेजवानी, लता मंगेशकर मराठी गाणी (Lata Mangeshkar Marathi Songs)

ADVERTISEMENT

अश्लील उद्योग मित्र मंडळ (Dirty Film Friends Circle)

मराठीमध्ये अॅडल्ट कॉमेडीवर चित्रपट यापूर्वीही आले आहेत. पण 2020 साली आलेला हा चित्रपट अगदीच खास आहे. या चित्रपटाच्या नावावरुन आणि त्यातील ‘सविता भाभी’ या पात्रावरुन अनेक वाद झाले होते. पण अखेरीस हा चित्रपट रिलीज झाला. अनेकांनी या चित्रपटाला सॉफ्ट पॉर्न असे देखील म्हटले होते. 

दिग्दर्शन (Director) : आलोक राजवाडे

कलाकार (Artist) : अभय महाजन, पर्ण पेठे आणि सई ताम्हणकर, सायली पाठक, अक्षय टांकसाळे, ऋतुराज शिंदे, केतन विसाळ, विराट मडके, अमेय वाघ 

कथानक (Story line) : अश्लील उद्योग मित्र मंडळ या चित्रपटाच्या नावाने गोंधळून जाऊ नका. ही एक धमाल कथा आहे. दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी काहीतरी हटके सेलिब्रिटी बोलवायला हवे म्हणून सविता भाभीला बोलवायचे ठरवतात. सई ताम्हणकरने यामध्ये सविता भाभीचे कॅरेक्टर केले आहे. हा चित्रपट एक धमाल अॅडल्ट कॉमेडी असून तुम्ही हा चित्रपच एकदा पहायला काहीच हरकत नाही.

ADVERTISEMENT

मेकअप (Makeup)

‘सैराट’ या चित्रपटानंतर एका वेगळ्याच भूमिकेत रिंकु राजगुरु दिसली ती मेकअप या चित्रपटात. मेकअप हा चेहरा सुंदर दिसण्यासाठी केला जातो. पण तो मनाचा करुन चालत नाही. हेच सांगणारा हा चित्रपट आहे.

दिग्दर्शन (Director) : गणेश पंडित

कलाकार (Artist) : रिंकु राजगुरु, चिन्मय उद्गिरकर, प्रतिक्षा लोणकर

कथानक (Story line) : माणूस जसा आहे तसा दाखवण्यापेक्षा चेहऱ्यावर मुखवटा लावणेच अनेकांना पसंत असते. रिंकु राजगुरु ही खट्याळ, मनमोकळी आणि बिनधास्त अशा तरुणीचा रोल यामध्ये साकारत आहे. तिच्यासाठी स्थळ पाहताना डॉक्टर असलेल्या चिन्मय उद्गीरकरचे स्थळ तिला येते. त्याच्या साचेबद्ध स्वभाव बदलण्याचे काम अर्थात त्याचा मेकअप बदलण्याचे काम ती करते. ते दाखवणारा हा चित्रपट आहे. चित्रपटात ड्रामा विनोद असे सगळे आहे.

ADVERTISEMENT

रात्रीचा पाऊस (Rain In Night)

पाऊस हा सगळ्यांच्या आयुष्यात आनंद आणतो. दुष्काळी भागात राहिलेल्या एखाद्या व्यक्तिला जर पावसाचा आनंद मिळाला तर… पण तरीही आयुष्य जगण्याची ही खटपट माणसाला जगण्याचा वेगळा अर्थ देते.

दिग्दर्शन (Director) : शाईन रवी

कलाकार (Artist) : अभिरामी बोस, जिजॉय, उत्कर्ष कोंडाळे, ऋषिकेश पाटील, किरण पाटील

कथानक (Story line) : रात्रीचा पाऊस ही एका अशा महिलेची कहाणी आहे. जी दुष्काळी भागातून आलेली आहे. शहरामध्ये आल्यानंतर प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि  रोजचा दैनंदिन खर्च करण्यासाठी तिला बरीच मेहनत करावी लागते.पण पुन्हा ती तिच्या गावी परतते . पण ती का परतते याचे कारण जाणून घेणे महत्वाचे आहे.

ADVERTISEMENT

विजेता (Vijeta)

मराठीतील बहुचर्चित असा विजेता हा चित्रपट आहे. या चित्रपटाची स्टारकास्ट तर मोठी होतीच. हा चित्रपट मराठी वगळता अनेक भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट खेळावर अवलंबून आहे

दिग्दर्शन (Director) : अमोल शेटगे

कलाकार (Artist) : सुबोध भावे, पुजा सावंत, दीप्ती धोत्रे, अमोल कागणे, सुशांत शेलार, देवेंद्र चौघुले, सुहास पळशीकर

कथानक (Story line) : विजेता चित्रपटाची कहाणी स्पोर्टसवर अवलंबून आहे. मैदानावरील थरार या चित्रपटात पाहायला मिळतो. राष्ट्रीय खेळांसाठी खेळाडू तयार करताना करावी लागणारी विशेष मेहनत या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट प्रेरणादायी असून प्रत्येक खेळाडूने पाहायला हवा हा चित्रपट आहे. 

ADVERTISEMENT

भयभीत (Bhaibheet)

भयभीत हा मराठी हॉरर चित्रपट आहे. मराठीमध्ये फार कमी असे हॉरर चित्रपट बनले आहेत. ‘भयभीत’ हा त्यापैकीच एक चित्रपट आहे.

दिग्दर्शन (Director) : दीपक नायडू

कलाकार (Artist) : सुबोध भावे, पूर्वा गोखले, मृणाल जाधव

कथानक (Story line) : भूतांवर तुम्ही विश्वास ठेवत नसाल पण तरीही तुम्हाला असे चित्रपट पाहायला आवडत असतील तर तुम्हाला ही कथा नक्की आवडेल. ही कथा एका अशा कुटुंबाची आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर तिची मुलगी फार विचित्र वागत असते. मुलगी मेलेल्या आईला पाहू शकते असा दावा ती करते आणि आई त्याच घरात अजूनही राहत असल्याचा दावा करते. पण तिची आईच नाही तर ती अन्य मृत व्यक्तिलाही पाहण्याचा दावा करते त्यानंतर सगळी परीस्थिती रहस्यमय होऊन जाते.

ADVERTISEMENT

चोरीचा मामला (Choricha Mamla)

जर तुम्हाला धमाल कॉमेडी असा चित्रपट पाहायचा असेल तर तुम्ही चोरीचा मामला हा चित्रपट पाहायलाच हवा. एका सज्जन चोराची ही कहाणी आहे. या चित्रपटातील प्रत्येक क्षण तुम्हाला फुल टू हसायला भाग पाडते. 

दिग्दर्शन (Director) : प्रियदर्शन जाधव

कलाकार (Artist) : जितेंद्र जोशी, हेमंत ढोमे, अमृता खानविलकर, क्षिती जोग, अनिकेत विश्वासराव, मुग्धा कर्णिक

कथानक (Story line) : जितेंद्र जोशीने एका सज्जन चोाची भूमिका साकारली आहे. एका राजकारण्याच्या घरात तो चोरी करायला जातो. त्या ठिकाणी चोरी करत असताना त्या ठिकाणी हेमंत ढोमे म्हणजेच राजकारणी अमृता खानविलकरला बायकोला न सांगता आणतो. त्यांच्या फार्म हाऊसवर आणल्यानंतर जो काही गोंधळ उडतो. हा गोंधळ काय कॉमेडी करतो ते दाखवणारा हा चित्रपट आहे.

ADVERTISEMENT

प्रवास (Pravas)

अशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे यांनी पहिल्यांदाच मोठ्या पड्यावर प्रवास या चित्रपटाच्या निमित्ताने काम केले आहे. आयुष्याच्या उतारवयात केलेला हा प्रवास फारच ह्रदयस्पर्शी अशा आहे. 

दिग्दर्शन (Director) : शशांक उदापुरकर

कलाकार (Artist) : अशोक सराफ, पद्मिनी कोल्हापुरे, श्रेयस तळपदे, विक्रम गोखले, रजत कपूर, शशांक उदापुरकर

कथानक (Story line) : चित्रपटाचा प्रवास हा अनेकांना रेंगाळलेला वाटत असला तरीदेखील काहींना हा प्रवास नक्की आवडेल. अशोक सराफ रिटायर्ड झाल्यानंतर पद्मिनी कोल्हापुरे यांच्यासोबत राहत असतात. त्यांना आयुष्य जगायचं असतं. शरीर थकलं तरी त्यांना त्यांच्या सगळ्या आशा आकांक्षा या पूर्ण करायच्या असतात. त्यासाठी ते काय काय करतात हे दाखवणारा हा चित्रपट आहे. 

ADVERTISEMENT

शहीद भाई कोतवाल (Shaheed Bhai Kotwal)

स्वातंत्र्यसमराचील बलिदानाची कहाणी म्हणजे शहीदभाई कोतवाल.. हा चित्रपट इतिहासातील रोमहर्षक टप्पा मांडणारी आहे.

दिग्दर्शन (Director) : एकनाथ देसले, पराग सावंत

कलाकार (Artist) : आशुतोष पत्की, श्रीरंग देशमुख, अरुण नलावडे, गणेश यादव  

कथानक (Story line) : स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान केले आहे. पण काही योद्धांचे बलिदान हे कोणालाच माहीत नाही. त्यापैकीच एक आहेत भाई कोतवाल. त्यांचीच कथा मांडण्याचा प्रयत्न हा या चित्रपटात करण्यात आला आहे. 

ADVERTISEMENT

मराठीतील ही नवीन गाणी तुम्ही ऐकलीत का? नाही.. मग आताच ऐका (Latest Marathi Songs)

विकून टाक (Vikoon Talk)

विनोदी चित्रपट पाहण्याची इच्छा असेल तर तुम्ही ‘विकून टाक’ हा चित्रपट पाहायला हवा. धमाल, वात्रट अशी ही कॉमेडी असून तुम्हाला खळखळून हसायला लावते.

दिग्दर्शन (Director) : समीर पाटील

कलाकार (Artist) : चंकी पांडे, शिवराज वायचल, राधा सागर, रोहित माने, ह्रषिकेश जोशी, समीर चौघुले 

ADVERTISEMENT

कथानक (Story line) : ही कथा एका कान्या नावाच्या व्यक्तिची आहे. कान्या नावाच्या मुलाचे भंगारचे दुकान असते. त्याच्या भंगाराच्या दुकानात असे काही घडते की, त्यानंतर सगळा गोंधळ सुरु होतो. एकूणच सगळा उंदरामांजराचा हा खेळ या चित्रपटात मजा आणतो. 

केसरी (Kesari)

चित्रपटाचे पोस्टर पाहिल्यानंतरच तुम्हाला हा चित्रपट काय ते कळेल. ही कहाणी एका पैलवानाची आहे. हा चित्रपट अस्सल कुस्तीगाराच्या जीवनावर अवलंबून आहे.

दिग्दर्शन (Director) : सुजय डहाके

कलाकार (Artist) : महेश मांजरेकर, विक्रम गोखले, विराट मडके, रुपा बोरगावकर

ADVERTISEMENT

कथानक (Story line) : कुस्ती हा महाराष्ट्रातल्या मातीतला रांगडा खेळ. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात राहणाऱ्या एका तरुणाला कुस्तीची आवड असते. कोणतीही तालीम करत नसला तरी त्याची अपार मेहनत करुन तो आपले जीवन साध्य करतो. त्याच्या घरातून यासाठी फार विरोध असतो पण तरीही तो आपले उद्दिष्टय साध्य करतो. हा चित्रपट तुम्हाला शेवटपर्यंत रोखून धरतो. 

बोनस (Bonus)

कायम श्रीमंतीत राहिलेल्या मुलाला गरीबीची झळ बसत नाही. पण ज्यावेळी प्रत्यक्ष गरीबीचा अनुभव येतो. त्यावेळी त्याला त्याचे महत्व कळते.

दिग्दर्शन (Director) : सौरभ भावे

कलाकार (Artist) : गश्मीर महाजनी, पुजा सावंत, मोहन आगाशे, जयवंत वाडेकर, योगेश शिरसाट

ADVERTISEMENT

कथानक (Story line) : आदित्य( गश्मीर महाजनी) हा एका बिझनेस मॅनचा मुलगा. तो त्याचा खानदानी बिझनेस चालवत असतो. जास्तीत जास्त नफा कमावण्याच्या नादात तो त्यांच्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्यास ते नकार देतो. त्याच्या या निर्णयाविरोधात त्याचे आजोबा असतात. ते त्याला कर्मचाऱ्यांसोबत 30 दिवस राहण्यासाठी सांगतात. ते सांगणारा हा सगळा चित्रपट आहे. तेथील लोकांसोबत राहताना त्याच्यामध्ये होणारे बदल या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. हा चित्रपट मुंबईतील धारावी परीसरात शूट करण्यात आला आहे.

स्वीटी सातारकर (Sweety Satarkar)

एक आगळीवेगळी प्रेमकहाणी असलेला स्वीटी सातारकर हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे प्रमोशनही एकदम हटक्या पद्धतीने करण्यात आले होते. कॉमेडी आणि रोमान्स असा हा चित्रपट आहे.

दिग्दर्शन (Director) : शब्बीर नाईक

कलाकार (Artist) : संग्राम समेळ, अमृता देशमुख

ADVERTISEMENT

कथानक (Story line) : अत्यंत अतरंगी अशा स्वीटी सातारकरची ही कहाणी आहे. ती एका मुलाच्या प्रेमात असते. तिच्या ती मागे लागते. पण तिला तो मुलगा मिळतो का हे सांगणारा हा चित्रपट आहे. चित्रपटाचा टीझर आल्यानंतरच अनेकांना तो आवडला होता. या चित्रपटाची गाणीही चांगलीच हिट झाली.

2020 मध्ये रिलीज होणार आहेत हे भन्नाट मराठी चित्रपट (Latest Marathi Movie List 2020)

वरील चित्रपटांव्यतिरिक्त काही आणखी चित्रपट या वर्षी रिलीज होणार आहेत. काही चित्रपट हे ओटीटीवर रिलीज करण्यात येणार आहेत.तर काहींनी त्यांच्या रिलीजच्या तारखा निश्चित केल्या नाहीत.

गडबड गोंधळ (Gadbad Godhak)

रोमांसवर आधारीत असा हा चित्रपट ‘गडबड गोंधळ’ हा चित्रपट 2020 मध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या स्टोरीलाईनबद्दल फारशी काही माहिती नसली तरी यामध्ये मराठीतील अनेक मोठे स्टार आहे.

दिग्दर्शक (Director) : योगेश दत्तात्रय गोसावी

ADVERTISEMENT

कलाकार (Artist) : संतोष जुवेकर, स्मिता गोंदकर, आनंद अभ्यंकर, नीलम शिर्के, मिलिंद पाठक

झिम्मा (Jhimma)

झिम्मा

Instagram

चित्रपटाच्या पोस्टर व्यतिरिक्त या चित्रपटाविषयी कोणतीही माहिती आतापर्यंत देण्यात आली नाही. झिम्मा हा खेळ लहानपणी तुम्ही खेळला असला तर त्याचा याच्याशी काही संबंध असलेला दिसत नाही. तर हा चित्रपट काहीतरी वेगळाच दिसत आहे. आता याचा ट्रेलर येईपपर्यंत थोडी वाट पाहावी लागणार आहे.

ADVERTISEMENT

दिग्दर्शक (Director) : हेमंत ढोमे

कलाकार (Artist) : सोनाली कुलकर्णी, सायली संजीव, सिद्धार्थ चांदेकर, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग

जंगजोहर (Jagjohar)

बाजीप्रभू देशपांडे यांनी लढवलेली पावनखिंड आणि त्याचा इतिहास तुम्हाला माहीत असेलच. पण तानाजी नंतर आता मराठी प्रेक्षकांसाठी ही नवी भेट मिळणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहेत. 

दिग्दर्शक (Director) : दिग्पाल लांजेकर

ADVERTISEMENT

 कलाकार (Artist) : मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर

मी वसंतराव (Me Vasantrao)

मी वसंतराव

Instagram

शास्त्रीय संगीतातील एक सुरसम्राट म्हणजे वसंतराव नाईक यांच्या जीवनावर आधारीत जीवनपट लवकरच चित्रपट रुपात येणार आहे. या चित्रपटात वसंतराव नाईकांची भूमिका शास्त्रीटय गायक राहुल देशपांडे साकारणार आहे. याचा एक लुक देखील प्रदर्शित करण्यात आला होता. मराठीत दर्जेदार बायोपिक आल्यानंतर आता या चित्रपटाचीही अनेकांना उत्सुकता आहे. 

ADVERTISEMENT

दिग्दर्शक (Director) : निपुण धर्माधिकारी

कलाकार (Artist) : राहुल देशपांडे 

एकदा काय झालं (What Happened Once)

एकदा काय झालं

Instagram

ADVERTISEMENT

वडील आणि मुलाच्या नात्यावर आधारीत असा हा चित्रपट असून 2019 साली या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. या महिन्याच्या मे मध्ये हा चित्रपट रिलीज होणार होता. पण लॉकडाऊनमध्ये हा चित्रपट रिलीज झाला नाही.

दिग्दर्शक (Director) : डॉ. सलील कुलकर्णी

कलाकार (Artist) : सुमीत राघवन, उर्मिला कोठारे, डॉ. मोहन आगाशे, सुहास जोशी, पुष्कर जोग, राजेश भोसले

पेठ (Peth)

पेठ या मराठी चित्रपटाची घोषणा 2019 मध्येच करण्यात आली होती. या चित्रपटाच्या संगीताचे अनावरण करण्यात आले होते. पण त्यानंतर हा चित्रपटाच्या रिलीजविषयी काहीच सांगण्यात आले नाही. 

ADVERTISEMENT

दिग्दर्शक (Director) : अभिजीत साठे

कलाकार (Artist) : निशिगंधा वाड, वृषभ शहा, नम्रता रणपिसे, सायली शिंदे, अभिषेक शिंदे

19 Aug 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT