ADVERTISEMENT
home / Acne
चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासोबतच त्वचा खुलवतील हे फेसऑईल

चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासोबतच त्वचा खुलवतील हे फेसऑईल

 फक्त वय झाल्यानंतरच चेहऱ्यावर सुरकुत्या येतात असे तुम्हाला वाटत असेल तर हा तुमचा गैरसमज आहे. तुमचा चेहरा नीट निरखून पाहा. तुम्हाला डोळ्यांच्या बाजूला, ओठांजवळ किंवा भुवयांच्या आजुबाजूला बारीक बारीक सुरकुत्या आलेल्या दिसतील. वयपरत्वे चेहऱ्यावर सुरकुत्या येणे अगदी स्वाभाविक आहे पण तुमच्या चेहऱ्यावर अगदी तारुण्यात सुरकुत्या आल्या असतील तर फेसऑईलचा वापर तुम्ही आजपासूनच सुरु करा. फेसऑईलचे अनेक फायदे आहेत. फक्त तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार तुम्ही फेसऑईलची निवड कशी करायला हवी ते आज आपण जाणून घेऊया. 

फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे कधीच खराब होत नाहीत हे ब्युटी प्रॉडक्ट

टी ट्री फेस ऑईल (Tea Tree Face Oil)

अगदी कोणत्याही त्वचेच्या प्रकारासाठी टी ट्री ऑईल हे उत्तम आहे. अनेक बड्या कंपन्या या ऑईलचे उत्पादन करतात. टी ट्री ऑईल विशेषत: तेलकट त्वचेसाठी योग्य मानले जाते. कारण याच्या वापरामुळे चेहऱ्यावरील पिंपल्सचे डाग जाण्यास मदत होते. शिवाय तेलकट चेहऱ्याला अपेक्षित असलेला ग्लो या तेलाच्या वापरामुळे होतो. या तेलाचा वापर तुम्ही आंघोळीनंतर करु शकता. या गंध थोडासा वेगळा असतो.तुम्ही जेड रोलरच्या मदतीने तुम्ही हे तेल तुमच्या त्वचेवर मुरवू शकता. या तेलाचा उपयोग केल्यानंतर तुम्हाला त्यावर मेकअपही करता येऊ शकतो. 

वाईन फेशियल ऑईल (Wine Facial Oil)

वाईनच्या सेवनामुळे तुमची त्वचा चांगली होते हे तुम्हाला माहीत असेलच. वाईनमध्ये आता फेस ऑईल असा प्रकारही मिळतो. वाईन फेशियल हे तेलकट त्वचेसाठी उत्तम असे म्हटले जाते. म्हणूनच वाईन फेशियल ऑईल हे देखील तेलकट त्वचेसाठी वापरण्याचा सल्ला दिला जातो. ज्या प्रमाणे वाईनचे फायदे आहेत अगदी तसेच फायदे वाईन ऑईलचे आहे. चेहऱ्यावरील सुरकुत्या, पोअर्स, पिंपल्सचे डाग कमी करण्यासाठी हे तेल मदत करते. शिवाय या तेलामुळे तुमच्या त्वचेला एक वेगळाच ग्लो येतो. याचा उपयोग तुम्ही रात्री झोपताना केला तरी चालेल. म्हणजे तुमचा चेहऱ्यावर छान मुरेल.

ADVERTISEMENT

चेहऱ्यावर लावा बर्फ आणि अवाढव्य चरबी करा कमी

रोझ फेस ऑईल (Rose Face Oil)

जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुमच्या त्वचेसाठी रोझ फेस ऑईल हे फारच उत्तम आहे.  रोझ ऑईलमध्येही तुम्हाला वेगवेगळे प्रकार मिळू शकतात. रोझ ऑईल तुमच्या त्वचेच्या अनेक समस्या दूर करते. रोझ ऑईल चेहऱ्यावरील पिंपल्सचे डाग, कोरडेपणा, चेहऱ्यावरील सुरकुत्या, चेहऱ्यावरील इतर डाग जाण्यास रोझ फेस ऑईल मदत करते. याशिवाय तुमच्या चेहऱ्याला ग्लो आणण्याचे काम रोझ फेस ऑईल करते. तुम्ही घराबाहेर पडताना याचा वापर करु शकता. पण उन्हात निघताना या तेलाचा वापर टाळा. घरीच असताना लावा. कारण अनेकांना तेलाचा त्रास उन्हाळ्यात होऊ शकतो. तुमचा चेहरा चिकट, काळवंडलेला दिसू शकतो. 

 

पॉमग्रॅनेड फेस ऑईल (Pomegranate Face Oil0

अगदी कोणत्याही त्वचेसाठी पॉमग्रेनेड (डाळिंबाचे) तेल चांगले असते. चांगल्या त्वचेसाठी डाळिंबाच्या रसाचे सेवन करायला सांगतात. अगदी त्याचप्रमाणे तुमच्या त्वचेसाठी डाळिंबाचे तेल हे फारच चांगले असते. कोणत्याही त्वचेसाठी हे तेल योग्य असल्यामुळे तुम्हाला त्याचा वापर अगदी बिनधास्त करता येऊ शकतो. पॉमग्रेनेड तेल तुमच्या त्वचेमध्ये छान आतपर्यंत मुरते आणि तुमच्या त्वचेच्या समस्या कमी करते. सूर्यकिरणांमुळे तुमची त्वचा खराब झाली असेल तर या तेलाचा उपयोग तुमच्यासाठी फारच फायद्याचा आहे. कारण सूर्यकिरणांचा त्रास तुम्हाला या तेलाच्या वापरामुळे होत नाही. 

ADVERTISEMENT

आरगन फेस ऑईल (Argan Face Oil)

तुमच्या त्वचेचा प्रकार कोणताही असला तरी तुम्हाला आरगन फेसऑईलचा उपयोग करता येतो. तुमच्या त्वचेसंदर्भातील सगळ्या तक्रारी  दूर करण्याचे काम आरगन फेस ऑईल करते. त्वचेवरील पिंपल्सचे डाग, काळवंडलेली त्वचा या सगळ्यावर आरगन ऑईल चांगले काम करते. जर तुमच्या त्वचेच्या समस्या अधिक असतील तर तुम्ही दिवसातून दोनवेळा याचा उपयोग करु शकता. 


आता तुमच्या त्वचेवर सुरकुत्या असतील किंवा तुमच्या त्वचेच्या इतर समस्या असतील तर तुम्ही हे फेसऑईल नक्की वापरुन पाहा. 

जेलपॉलिश आणि नेलपॉलिशमध्ये आहे हा फरक

03 Aug 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT